प्रा. रायभान दवंगे - पाऊस हल्ली भ्रष्टाचारी झा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पाऊस हल्ली भ्रष्टाचारी झालाय...
त्याच्याही बरसण्यात असते गारांची भेसळ
जिच्यामुळं दुभंगून जातोय
आसुसल्या धरणीचा तळ
पूर्वी पाऊस कसा हळुवार यायचा
धरणीच्या काळ्याभोर केसांत
थेंबकळ्यांचा गजरा माळायचा !
आता पाऊस कधीही येतोय
रात्री - अपरात्री घरी परतणार्या
व्यसनी बापासारखा
घालतोय पिकाच्या मानेभोवती विळखा
विषारी सापासारखा !
गारांच्या ओझ्याखाली
दाबले जात आहेत पिकांचे श्वास
मातीमोल होतोय
हाता - तोंडाशी आलेला सोन्याचा घास
Last Updated : November 11, 2016
TOP