गिरीष देशमुख - आंबटलोल्या भुईत माय सपान ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आंबटलोल्या भुईत
माय सपान पेरते
तिचं पिऊन रगत
कपाशी ही अंकुरते
आठ -दहा पानं येता
किडा- कोकडा पडतो
एका फवारणीपायी
मायें उपास घडतो
काळी माय दानसूर
पर बाप वरचा आसूर
हिरव्यागार रानामधी
जाळ उन्हाचा भेसूर
रान चेतते चेतते
माय आसवं ओतते
मायेसंगचा झगडा
सदा बापच जितते... !
माय लढते लढते
माती अन् ढगासंग
उरी माऊली- तुकोबा
ओठी ओवी नि अभंग
मार हरते हरते
माय मरते मरते
पुन्हा लढाया सार्यांशी
माय मातीत उरते... !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP