पूर्वी म्हाळगी - बदलत्या ऋतूमधला पहिला मोग...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
बदलत्या ऋतूमधला
पहिला मोगर्याचा गजरा
तुझ्या कोवळ्या हातांनी
माझ्या हातात पडतो
आणि माझा जीव उमलतो...
घरातल्या बोलक्या कोपर्यातून
घुंगराच्या आवाजात
गत - निकास जगोजागी घुमतो
आणि माझा जीव रुणझुणतो...
कवितेच्या पुस्तकात
बुडून जातं घर
स्वप्नाळू शब्दांना उचलत तू म्हणतेस :
‘ कित्ती सुंदर ओळ ’
अन् माझा जीव मोरपीस होतो...
आरशात डोकावतात
केसामधले चंदेरी क्षण
डोळ्यांखालची काळी वर्तुळं
कवितेच्या शब्दाशी
अडखळतं मन
आणि माझा जीव तुझ्यात नवकोरा सापडतो... !
N/A
References : N/A
Last Updated : April 24, 2017
TOP