सौ. मंजिरी सरदेशमुख - आरशाचा मला येतोय राग भर त...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आरशाचा मला येतोय राग
भर त्याचा बाह्यरूपावर
रंग, अंग कांतीवर
जे कधीतरी लोपणार
सत्याकडे दुर्लक्ष फार
म्हणूनच - आरशाचा म अला येतोय राग,
जे आहे गहिरं अपार
आस्तित्व गहन फार
असं हे मन...
जे सार्यांचं अंतर्मन जाणतं
मला अंतर्मुख करतं,
कधीतरी एकटेपणात
दोन नव्हे चार पाच मने
मनातल्या मनात
संवाद साधतात
माझं मन रिझवतात,
माझा सारा संवाद
मनातल्या मनात
आनंद देतो आतल्या आत
सुखावते मी अंतर्मनात
भांबावते कधी जनात,
असं निरागस मन
पंचतत्वात एकरूप होणारं
तुझ्या माझ्यातलं देवपण जाणणारं
मन मला अधिक भावतं
पण ते आरशात दिसत नसतं,
म्हणूनच वनापेक्षा
मनावरच मी अतोनात प्रेम करते.........
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP