सतीश दराडे - कोणी न साव येथे, तूही दडू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कोणी न साव येथे, तूही दडू नको
चोरात मोर हो रे...पण ओरडू नको...!
कुठल्या परंपरेचा नाही गुलाम मी
तूही कुण्या प्रथेच्या हाती पडू नको...!
देवा, सदैव आपण खेळू लपाछपी
मी शोधण्यास येतो, तू सापडू नको...!
पकडू कुण्या पुलाची गुपचूप तर्जनी ?
माझा वसंत म्हणतो, ‘ तू बागडू नको...!
काळा, तुझ्या गतीशी बांधून घेतले...
आता पळू नको वा मागे पडू नको...!
माझा जुना शहारा परतून दे मला
नुसतेच पाकळ्यांवर दव शिंपडू नको...!
माझ्या समूळ नोंदी डोळ्यांमध्ये तुझ्या
मी नामशेष होइन इतके रडू नको...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP