प्रेमाच्या गावा जावे - तुझ्या पापण्यांचं थरथरणं ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझ्या पापण्यांचं थरथरणं
तुझ्या पापण्यांचं थरथरणं
किंचित विलगून उघडणं...पुन्हा मिटणं
तुझ्या पापण्यांचं थरथरणं
जणू काही दिसतंय तुला स्वप्नात
कुठल्याशा कळीचं उमलणं - मोहरणं
तुझ्या पापण्यांचं थरथरणं
दे ना मला त्या स्वप्नाचा एक किरण
माझी मनीषा ही,
की व्हावं तुझ्या त्या स्वप्नाचा एक कण
बाकी सगळा काळ तिर्हाईत
बस्, तेवढाच क्षण आपला उरणं
तुझ्या पापण्यांचं थरथरणं...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP