मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
ती खोली होती तशी ऐसपैस त...

चंचल काळे - ती खोली होती तशी ऐसपैस त...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


ती खोली
होती तशी ऐसपैस
त्याचं टेबल, तिचा आरसा
भिंतीवर फोटो दोघांचा
सगळं कसं जागच्या जागी
नव्हता फक्त पुरेसा उजेड
आणि बाहेरून तो यायला
जागाच नव्हती फारशी
पण कधीतरी तो येईल
या आशेवर होती ती बिचारी

बाहेर लख्ख उजेड
पण आत मात्र अंधार
तरीही उजेडाची तीव्र आशा
तेवत होती तिच्या मनात
तिला हवा होता
प्रकाशाचा फक्त एक कवडसा

...आणि तो चमत्कार झाला
आरशानं चक्क जागा बदलली !
आता येणारी प्रकाशाची एक क्षीण तिरीप
आता थेट आरशावर !

उजळून निघाली ती लख्ख प्रकाशानं
आनंदानं नाचलीसुद्धा जागच्या जागी
आरशाचे आभार मानत !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP