रघुनाथ पाटील - तुझ्याविना मी शून्य जाहलो...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझ्याविना मी शून्य जाहलो जगात आता
आठवणींची रोजच वर्दळ उरात आता
मला मुखवटा कधी घालता येतच नाही
कशास ठेवू उगा आरसा घरात आता ?
हात दिला तू हाती, मजला सर्व मिळाले...
तुझ्याच नावे केली मीही हयात आता
काळोखाशी झुंज दिली तू प्राणपणाने
तुझ्याचसाठी सजली आहे प्रभात आता
नजर कुणाची हिला न लागो हेच मागणे
लेक लाडकी आली आहे वयात आता
एक सावली तुझी पुरेशी जगण्यासाठी...
खुशाल जावो सगळे जगणे उन्हात आता !
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2017
TOP