मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
परवा सकाळच्या घाई - गडबडी...

मधुरा बुटाले - परवा सकाळच्या घाई - गडबडी...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


परवा सकाळच्या घाई - गडबडीत
दुधाचं गरम पातेलं कडांना धरून
गॅसवरून खाली उतरवलं
तर शेजारीच उभी
असलेली छोटुली मुलगी एकदम ओरडली :
‘ आई, तुझा हात भाजला ना ! ’
आणि लगेच मलम आणण्यासाठी धावली
मला आठवलं...
मीही असाच प्रश्न केला होता माझ्या आईला :
‘ तू दुधाचं
गरम पातेलं कसं उतरवतेस हातानं ?
तुझा हात भाजत नाही का ? ’

आई म्हणाली होती : ‘ संसार कधी चटक्यांशिवाय असतो का ?
त्या चटक्यांपुढं हा चटका काहीच नाही !
पण तुझ्या वाट्याला नको यायला हा चटका ’
आणि आईनं मला जवळ ओढलं होतं.

आज तोच प्रश्न
माझ्या मुलीचाही होता
आणि तीच मन:स्थिती, भावना माझी होती
आणि माझंही उत्तर तेच !
माझ्या तोंडून सहज निघून गेलं : ‘ संसार कधी
चटक्यांशिवाय असतो का ? ’
आणि मीही माझ्या छोटुकीला जवळ ओढून घेतलं !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP