डॉ. शंतनू चिंधडे - शब्दांतुन मी आठवणीचे जपले...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
शब्दांतुन मी आठवणीचे जपले अत्तर
पहा जरा ना डोकवुन तू...लपले अत्तर
शब्द खरे तर टपोर होते गुलाब माझे
त्यांना केवळ दिसले काटे...खुपले अत्तर !
अक्षर अक्षर फुलाप्रमाणे गुंफत होतो
धागे तुटले...डोळ्यांतुन टपटपले अत्तर
आठवते ना ? चंद्रहि होता...समीप तूही
आणि तुझ्या मी ओठांवरचे टिपले अत्तर
आताशा मी वाट पाहतो...थकतो...सुकतो
मला वाटते दोघांमधले खपले अत्तर
तुझ्या नि माझ्या जरी वेगळ्या होतिल वाटा...
जपून ठेवू मिठीतले त्या अपुले अत्तर !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP