कविता क्षीरसागर - ब्रशच्या एका फटकार्यात ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ब्रशच्या एका फटकार्यात
झाडांची आउटलाईन काधून
तू मोकळा होतोस
आणि मी त्यातलं
पान न् पान जिवंत करत राहते
निर्विकारपने लॅंडस्केप्स काढून
तू सहज हातावेगळी करतोस
आणि माझं मन मात्र
तिथल्या झर्याच्या खळाळत्या पाण्यात
पक्ष्यांत गाण्यात
पाचूच्या डोंगर - दर्यांत गुंतून राहतं
तसे आपण दोघंही चित्रकारच...
पण
आपला ` कॅनव्हास ' च वेगळा आहे... !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP