लक्ष्मीनारायण बोल्ली - मी एक वेडा पाहिला तो रस्त...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


वेडा
मी एक वेडा पाहिला
तो रस्त्यावर जे जे मिळेल
ते ते अधाश्याप्रमाणे गोळा करतो
सकाळपासून रात्रीपर्यंत...
चिंध्या...चिठोरे...डबे...प्लँस्टिकच्या
पिशव्या...
यांचं भलंमोठं गाठोडं करून
तो पाठीवर वाहत असतो...

पारवा पाहिलं
तर तो वेडा फ़ुटपाथच्या कट्ट्यावर
मरून पडला होता
त्याच्या उशाशी
ते निरर्थक गाठोडं तसंच होतं...

मी मनात म्हटलं :
’सुटला बिच्चारा एकदाचा...’
मग माझ्या लक्षात आलं -
आपण तरी त्याच्याहून काय वेगळे आहेत ?
आपणही त्याच्य़ासारखेच...!
निरर्थक कीर्ती, प्रसिद्धी, पदव्या, मोठेपणा
यांचं गाठोड करून
खांद्यावर शेवटपर्यंत मिरवतच असतो आपण

फ़रक एवढाच की -
तो फ़ुटपाथच्या कट्ट्यावर मरतो...
आणि
आपण आपल्या घरात मरतो !


Translation - भाषांतर
N/A

References :
९८५००७४१४१

Last Updated : 2016-11-11T12:52:31.3730000