निशा कोत्तावार - आपल्या अंगणात ममतेनं लावल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आपल्या अंगणात ममतेनं लावलेलं रोपटं
बाळसं धरतं...बहरतं...
आपल्याही अपेक्षा उंचावतात...
...पण त्या रोपाच्या मनात दुसरेच काही विचार सुरू असतात !
चांगलं खतपाणी घातलं, नीट निगराणी केली,
तरी ते रोपटं मलूल असल्यासारखंच दिसतं
पुढं त्याचं हे मलूलपण जाणवण्याइतपत वाढत जातं...
मग या गुंत्यातले धागेदोरे आपल्याला उलगडू लागतात...
आपल्या रोपट्याला आता शेजारच्या बागेतल्या रोपट्याशी स्पर्धा
करायची आहे तर !
त्यासाठी इथून तिकडं जावं लागतं तरी बेहत्तर !
रोपट्याला तमा नसते खत - पाण्याची, निगराणीची,
वादळवार्यात त्याला जपणार्या पहिल्या बागवानाची !
रोपटं दुसर्या बागेत गेल्यावर तिथं जिद्दीनं मुळं रोबून स्थिरावतं
पाना - फुलांनी बहरतं - डवरतं...
कधीकधी त्याला स्मरतोही
पहिल्या बागवानाच्या मायेचा दरवळ
पण...!
*******
असंच तर होत नसावं
परदेशांत स्थिरावलेल्या लेकरांचं ?
आणि जे भारतात त्यांच्या वाटेकडं डोळे लावून बसलेले
असतात,
त्या त्यांच्या म्हातार्या आई - वडिलांचं ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP