जागृती बावडेकर - मला कुठं बघितलंय का तुम्ह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मला कुठं बघितलंय का तुम्ही?
हरवलेल्या व्यक्तीमध्ये दिसला का माझा फोटो?
तशी तक्रार केलीय मी माझी
पोलिस चौकित फोटोही लावलाय माझा
सोबत पँनकार्ड, आधारकार्ड, झालंच तर निवडणूकार्ड,
वीजबिल पावती, राहण्याचा इंडेक्स टूचा दाखला
सगळं सगळं जोडलंय सोबत
मीही शोधत निघालेय स्वत:ला....
आणि, दिसले मी मला
त्या विस्तीर्ण जलाशयात
हिरव्या गर्द रानात
फुलांच्या मत्त गंधात
पाखरांच्या किलबिलाटात
धो धो बरसणार्या पावसात
ताज्या वाहणार्या वार्यात
पाकोळी होऊन स्वत:तच आत्ममग्न मी
सापडीन मी तुम्हाला पण नक्की तिथंच...
आणि हो, इथं कुठलाच पुरावा नाही दिला मी
माझ्या अस्तित्वाचा....!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP