Dictionaries | References

   { सहा, षड्‌‍, षट्‌‍ }
Script: Devanagari

६     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : छह, छह

६     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सहा, सहा

६     

Sanket Kosh | Marathi  Marathi
षट्‌‍‍कर्में (उपजीविकेचीं)   
१ असि, २ मसि, ३ कृषि, ४ वाणिज्य ' ५ शिष्य आणि ६ पशुपालन. (जैनधर्मादर्श)
षट्‌‍कर्में (गृहिणीचीं)   
१ देवपूजन, २ अतिथिपूजन (आल्यागेल्यांचा समाचार), ३ तुलसीपूजन, ४ गोग्रास देणें, ५ अर्ध्यदान देणें, आणि ६ दीपदान.
देव - अतिथि - तुलसी पूजां गौओंके हितग्रासप्रधान।
अर्ध्यदान और दीपदान ये गृहिणीके षट्‌‍कर्म प्रधान ॥
षट्‌‍कर्में (नित्याचीं)   
१ स्नान, २ संध्योपासना, तथा जप, ३ दान, ४ देवपूजा, ५ अतिथिसत्कार आणि ६ वैश्वदेव.
संध्यास्नानं जपो होमः देवतानां च पूजनम् ।
आतिथ्यं वैश्वदेवं च षट्‌‍कर्माणि दिनेदिने ॥ (प. स्मृति १-३९)
षट्‌कर्में (ब्राह्मणाचीं)   
१ अध्ययन, २ अध्यापन, ३ यजन, ४ याजन, ५ दान आणि ६ परिग्रह. ([मनु. १०-७५])
षट्‌‍कर्में (मंत्रतंत्र विद्येंतील)   
१ जारण, २ मारण, ३ उच्चाटन, ४ मोहन, ५ स्तंमन, व ६ विध्वंसन.
षट्‌‍कर्में (वैश्याचीं)   
१ पशूंचें रक्षण, २ दान, ३ यज्ञ, ४ अध्ययन, ५ व्यापार आणि ६ व्याजबट्टा व शेती. ([मनु, १-९०])
षट्‌‍कर्में (जैनधर्म)   
१ देवपूजा, २ गुरुउपासना, ३ स्वाध्याय, ४ संयम, ५ तप आणि ६ दान.
षट् कर्में (संन्यास मार्गाचीं)   
१ मिक्षाटन, २ जप, ३ शौच, ४ स्नान, ५ ध्यान आणि ६ देवतार्चन.
षट्‌‍कर्में (हठयोग)   
१ धौति, २ बस्ति, ३ नेति, ४ नौलि, ५ कपालमाति आंणि ६ त्राटक. (ह. प्र.)
षट्‌‍कोष   
१ त्वचा, २ रुधिर, ३ मांस, ४ मज्जा, ५ अस्थि आणि ६ मेद.
षट्‌‍चक्रें (शरीरांतील) व त्यांचीं स्थानें   
(अ)
१ मूलाधार चक्र अथवा पृथ्वीचक - गुदद्वार व वृषण यांच्या मध्यावर.
२ स्वाधिष्ठानचक्र अथवा आपचक्र - जननेंद्रियांच्यावर व बेंबीच्या खालीं.
३ मणिपूरचक्र अथवा अग्निचक्र - नाभिस्थान.
४ अनाहतचक्र अथवा वायुचक्र - ह्रदयस्थान.
५ विशुद्धिचक्र अथवा आकाशचक्र - कंठस्थान.
६ आज्ञाचक्र अथवा मनश्चक्र - भरुमध्यावर.
मानवदेहास आधारभूत अशीं हीं चक्रें सुषुम्नानामक नाडीवर असतात. ([शिवसंहिता]) या चक्रांना कमलें असेंहि म्हणतात. खेरीज अथर्व वेदांत आणखी दोन -
७ ललनाचक्र - जिव्हेच्या मुळाशीं.
८ सहस्त्रारचक्र - मस्तकांत, अशी आठ असल्याचें वर्णन आहे. ([अथर्व - अनु - मराठी])
(आ) १ त्रिकुट, २ श्रीहाट, ३ गोल्हाट, ४ औटपीठ, ५ अमरगुंफां व ६ ब्रह्मरंध्र. ([ज्ञानेश्वराचे अभंग])
षट्‌प्रज्ञ   
१ धर्म, २ अर्थ, ३ काम, ४ मोक्ष, ५ व्यवहार व ६ तत्त्वज्ञान. हीं सहा जाणणारा.
षट्‌‍शक्ति   
१ पराशक्ति, २ ज्ञानशक्ति, ३ इच्छाशक्ति, ४ क्रियाशक्ति, ५ कुंडलिनीशक्ति आणि ६ मातृकाशक्ति, या सहा शक्ति मानव शरिरांत आहेत ([कल्याण शक्ति अंक])
षट्‌‍शास्त्रें   
१ धर्मशास्त्र, २ सांख्यशास्त्र, ३ वेदान्तशास्त्र, ४ न्यायशास्त्र, ५ कामशास्त्र, आणि ६ योगशास्त्र ([दर्शनप्रकाश]); १ कापालिक, २ लौकायतिक, ३ दिगंबर, ४ शून्यवादी, ५ निरीश्वरवादी आणि ६ चार्वाक. (वाचस्पतिमिश्र)
षट्‌‍संपत्ति   
१ शम - मनोनिग्रह, २ दम - इंद्रियनिग्रह, ३ तितिक्षा - शीतोष्णादिक द्वंद्वें सहन करणें, ४ उपरति - स्वधर्मानुष्ठान, ५ श्रद्धा आणि ६ समाधान. या अध्यात्मविषयांतील संपत्ति होत. (कल्यान योगांक). या सहा साधनांस शमादिषट्‌‍क म्हणतात.
षट्‌स्थल   
१ भक्त, २ महेश, ३ प्रसादि, ४ प्राणलिंगी, ५ शरण ६ ऐक्य. सहा षट्‌‍स्थल किंवा मोक्षाच्या सहा पायर्‍या. (वीरशैव प्र.)
षड्‌‍ऊर्मि   
१ शोक, २ मोह, ३ जरा, ४ मृत्यु, ५ क्षुघा व ६ पिपासा. या सहा ऊर्मि म्हणजे संसाररूपी समुद्राच्या लहरी होत.
षडुष्ण   
१ पिंपळीं, २ पिंपळमूळ, ३ चवक, ४ चित्रक, ५ सुंठ ६ मिरी. ([नूतनामृतसागर])
षड्‌‍ऋतु   
१ वसंत - चैत्र, वैशाख ; २ ग्रीष्म - ज्येष्ठ, आषाढ ; ३ वर्षाश्रावण, भाद्रपद ; ४ शरद् ‌- आश्चिन, कार्तिक ; ५ हेमंत - मार्गशीर्ष, पौष व ६ शिशिर - माघ, फाल्गुन.
"षड्‌‍वा ऋतवः संवत्सरस्य।"([शतपथ])
षड्‌‍गया   
१ गया - गयाक्षेत्र, २ गय - देशवाचक अथवा गय नांवाचा राजा होऊन गेला - ज्यानें शंभर अश्वमेध केले, ३ गयादित्य, ४ गायत्री, ५ गदाधर व ६ गयेंतील गयासुर - याचा देह ब्रह्मानें यज्ञाकरितां मागितला व तो त्यानें लोकोपकारार्थ दिला म्हणुन, अशी सहा गया स्थानें भुक्तिदायक होत.
गया गयो गादित्यो गायत्री च गदाधरः।
गयागयासुरश्चैवं षड्‌‍गया मुक्तिदायकाः ॥ ([वायु. उत्तरार्ध ५०-७३])
षडंगें (कला साधनेचीं)   
नैपुण्य, २ योजकता, ३ लोकसंग्रहा, ४ लोकमत, ५ काळ आणि ६ उपासना (माऊली विशेषांक)
षडंगें (दानाचीं)   
१ दाता, २ प्रतिगृहीता (घेणारा), ३ पवित्रता, ४ वस्तु, ५ देश (स्थान) आणि ६ काल.
दाता प्रतिगृहीता च शुद्धिर्देयं च धर्मयुक् ‌।
देशकालौ च दानानामङ्‌‍गान्येतानि षड् विदुः ॥ ([स्कंदमाहेश्वर ३-५०])
षडंर्गे (योगाचीं)   
१ आसन, २ प्राणायाम, ३ प्रत्याहार, ४ धारणा, ५ ध्यान व ६ समाधि.
आसनं प्राणसंरोधः प्रत्याहारश्च धारणा।
ध्यांन समाधिरेतानि योगाङ्‌गानि भवन्ति षट् ॥ ([स्कंद काशी ४१-५९])
षडंगें (वेदाचीं)   
१ शिक्षा - उच्चार शास्त्र (वेदाचें घ्राणेंद्रिय),
२ कल्प सूत्र - यंत्रशास्त्र (वेदाचे हात),
३ व्याकरण - शब्दशास्त्र (वेदाचें मुख)
४ निरुक्त - कोश (वेदाचे कान),
५ छंद - वृत्त, (वेदाचे चरण) आणि
६ ज्योतिष, (वेदाचे नेत्र). तत्त्व - निज - बोध)
शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदसामिति।
ज्योतिषं नयनं चैव षडंगो वेद उच्यते ॥ ([सु])
षडंगें (सैन्याचीं)   
१ रथ, २ हत्ती, ३ घोडे, ४ पायदळ ५ गाडे आणि ६ उंट. अशीं महाभारत काळीं, सेनेचीं सहा अंगें होतीं.
षड्‌‍गुण   
(अ) १ ऐश्वर्य, २ धर्म, ३ यज्ञ, ४ श्री, ५ ज्ञान व ६ वैराग्य. हे सहा ईश्वरी गुण मानले आहेत.
ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा ॥ ([बृहन्नारदीय पूर्वखंड])
(आ) १ कर्तुत्व, २ नियंतृत्व, ३ भोक्तृत्व, ४ विभुत्व, ५ साक्षित्व आणि ६ सर्वज्ञत्व (वज्रकोश);
(इ) १ सर्वज्ञता, २ तृप्ति, ३ अनादिज्ञान, ४ स्वातंत्र्य, ५ शक्तिप्रकाशन आणि ६ अनंतशक्तित्व. असे सहा गुण श्रीकृष्णाचे ठिकाणीं होते. ([हरिवंश - विष्णुपर्व अ. ६५])
षड्‌गुण गायनांतील   
१ सुस्वर, २ सुरस, ३ सुराग, ४ मधुराक्षर, ५ सालंकार आणि ६ प्रमाण.
सुस्वरं सुरसं चैव सुरागं मधुराक्षरम् ।
सालंकारं सप्रमाणं षड्‌‍विधं गीतलक्षणम् ॥ (रागविलास)
षड्‌‍गुण (राजनीतिशास्त्र)   
१ संधि - प्रसंगीं एकमेकांस मदत करणें,
२ विग्रह - युद्ध,
३ यान - शत्रूवर चाल करून जाणें,
४ आसन - शत्रूची उपेक्षा करणें,
५ द्वैधीमाव - केव्हां संधि केव्हां विग्रह करणें (दुटप्पी धोरण) आणि
६ संश्रय - दुसर्‍याचा आश्रय घेणें - बलिष्ठ सत्तेशीं स्पर्धा न करणें. ([मुन. ७-१६०])
षड्‌‍दर्शनें   
(अ) १ न्याय, २ विशेषिक, ३ वेदान्त, ४ बौद्धमत, ५ सांख्य आणि ६ पूर्वमीमांसा.
'बौद्धमतसंकेतु बार्तिकांचा' ([ज्ञानेश्वरी १-१२])
(आ) १ सौर, २ शाक्त, ३ गाणपत्य, ४ शैव, ५ विष्णव ६ स्कांद.
षड्‌‍दर्शनें व षड्‌दर्शनप्रणेते   
१ सांख्य - कपिलमुनि, २ योगपतंजलि, ३ न्याय - गौतम, ४ वैशेषिक - कणाद, ५ पूर्वमीमांसा - जैमिनि आणि ६ वेदान्त - बादरायण (व्यास)
सांख्यस्य कर्ता कपिलो न्यायसूत्रस्य गौतमः।
पतजलिस्तु योगस्य कर्ता योगीश्वरो महान् - ॥
वैशेषिकस्य काणादो मीमांसायाश्च जैमिनिः।
वेदान्तशास्त्रस्य कर्ता व्यासो नारायणः स्वयम्‌ ॥ ([सु.])
षड्‌‍दोष   
१ झोंप, २ जडत्व, ३ भीति, ४ क्रोध, ५ आळस व ६ चेंगटपणा. षड्‌दोषाः पुरुषेणैव हातव्या भूतिमिच्छता। ([हितो.])
षड्‌द्रव्यें (जैनधर्म)   
१ जीवद्रव्य, २ पुद्नलद्नव्य, ३ धर्मद्रव्य, ४ अधर्मद्रव्य, ५ कालद्र्व्य आणि ६ आकाशद्वव्य.
षडधिप   
१ राजा, २ मंत्री, ३ अग्रधान्येश, ४ मेधेश, ५ रसेश व ६ पश्चाद्धान्येश. (पचांग)
षडक्षरी मंत्र   
(अ) ॐ नमःशिवाय.
"सर्वमंत्राधिकश्चायं ओंकाराद्यः षडक्षरः"([शिवपुराण])
(आ) ॐ विष्ण्वे नमः
(इ) राम - कृष्ण - हरि हा मंत्र भगवद्भक्त तुकाराम यांस त्यांचे गुरुकडून स्वप्रांत मिळाला त्या दिवशीं माघ शु. १० गुरुवार होता.
(ई)"ॐ मणिपद्मे हूँ"हा मंत्र बौद्धांचा.
षड्‌‍भिषक् संहिता   
१ अग्निवेश, २ भेड, ३ जातुकर्ण, ४ पराशर, ५ हारीत व ६ क्षारपाणि, या अत्रिपुत्र पुनर्वसूनें पढविलेल्या सहा शिष्यांनीं लिहिलेल्या आयुर्वेदावरील ग्रंथास म्हणतात. (विज्ञान उदय आणि विकास)
षड्‌‍भुज गणेश देवतोची सहा आयुधें व विषय   
१ परशु - तर्क (न्याय), २ अंकुश - नीतिभेद (वैशेषिक), ३ मोद्क - वेदान्त (उत्तर - मीमांस) ४ भग्नदंत - बौद्धमत (पूर्वमीमांसा), ५ कमल - सत्कारवाद (सांख्या), आणि ६ अभय - धर्मप्रतिष्ठा ([योग]) ज्ञानेश्वरी अ. १ ला विवरण.
षण्मुखीमुद्रा   
२ दोन कानाचीं दोन भोके, २ डोळे व २ नाकपुडया, हीं सहा हातांच्या बोटांनीं दाबून करावयाची एकमुद्रा.
षण्मुद्रा   
१ भूचरी, २ चाचरी, ३ अगोचरी, ४ खेचरी, ५ उन्मनी व ६ अलक्ष्य. (ह. प्र.)
षड्‌योग कपिलाष्टी   
१ भाद्रपद मास, २ कृष्णपक्ष, ३ मंगळवार, ४ षष्ठी, ५ रोहिणी नक्षत्र व ६ व्यतिपात. असे सहा योग एकत्र आल्यास त्यास कपिलाषष्ठी म्हणतात. हा योग, प्रायः साठ वर्षांनीं येतो. ([धर्मसिंधु])
षड्रस   
१ गोड, २ आबंट, ३ तिखट ; ४ कडू, ५ खारट, आणि ६ तुरट.
"षड्रस जीवन चालवी। षड्रिपु माया प्रसवी"
मधुराम्लकटुतिक्तक्षारकषायाः षड्रसाः ॥ (च. सं.)
षड्‌रिपु   
१ काम, २ क्रोध, ३ मोह, ४ लोभ, ५ मद आणि ६ मत्सर.
हे मनुष्याच्या मनाचे शत्रु समजले गेलेले सहा विकार.
षड्‌‍राग (गायनशास्त्रांतील)   
१ श्री, २ वसेत, ३ भैरव, ४ पंचम, ५ मेघ किंवा मेघमल्हार व ६ बृहन्नाट किंवा नटनारायण.
हे सहा पुरुष राग होत.
श्रीरागोऽथ वसंतश्र भैरवः पंचमस्तथा।
मेघरागो बृहन्नाटो षडैते पुरुषाः स्मृताः ॥ ([संगीतरत्नाकर])
षडंगोदक   
१ नागरमोथा, २ पित्तपापडा, ३ वाळा, ४ काळा वाळा, ५ रक्तचंदन आणि ६ सुंठ.
या सहा जिनसा घालून उकळलेलें ऊन पाणी.
षडंगन्यास   
१ हातांचीम बोटें, २ तळहाताच्या मागचा भाग, ३ ह्रदय, ४ मस्तक, ५ शिखा आणि ६ नेत्र, गायत्री मंत्रानें शरीरशुद्धीसाठीं या सहा अवयवांस स्पर्श करावयाचा असतो.
षडंगभक्ति   
१ समरस भक्ति, १ आनंद भक्ति, ३ अनुभव भक्ति, ४ अवधान भक्ति, ५ निष्ठा भक्ति आणि ६ सद्भाब भक्ति.
असे सहा भक्तीचे प्रकार वीरशैव संप्रदायांत मानले आहेत.
षड् लवण   
१ मीठ, २ सैंधव, ३ संचळ, ४ बीडलोण, ५ रोमक आणि ६ पांसन. (निघंटु)
षड्‌‍विकार   
(अ) १ अस्ति - गर्मांत संभवणें, २ जायते - जन्मास येणें, ३ वर्धते - वाढणें, ४ विपरिणमते - तारुण्यांत येंणेंज, ५ अपषीयते - वृद्धत्व येणें आणि ६ विनश्यति - मरण. हे सहा विकार देहाला असतात.
(आ) १ जन्म, २ बुद्धि, ३ परिणाम म्हणजे बदल, ४ क्षय, ५ रोग व ६ मृत्यु, ([विवेक चूडामणि])
षड्‌‍विधि (गणितशास्त्र)   
१ बेरीज, २ वजाबाकी, ३ गुणाकार, ४ भागाकार, ५ वर्गमूळ आणि ६ घनमूळ. अशा गणिताच्या सहा प्रक्तिया अथवा प्रकार आहेत.
षड्‌‍विध अधिकारी   
१ मनु, २ मनुपुत्र, ३ देव, ४ ऋषि, ५ इंद्र व ६ परमेश्ररी अवतार.
प्रत्येक मन्वतरांत या सहा प्रकारच्या अधिकार्‍यांची योजना लोकस्थिति चांगली राखण्यासाठीं आहे अशी कल्पना आहे. ([भाग - स्कंध *])
षड्‌‍विध अन्न   
१ मक्ष्य - चर्वण करून खाण्याचे - भाकरी, पोळी वगैरे, २ भोज्य - भात वगैरे, ३ पेय - प्यावयाचें, ४ लेह्म - चाटून खाण्याचें पंचामृत वगैरे, ५ चोष्य - चोखून खाण्याचें व ६ पिच्छिल - चटण्या - कोशिंबिरी.
भक्ष्यं भोज्यं च पेयं च लेह्मं चोष्यं च पिच्छिलम् ।
इति भेदाः षडन्नस्य मधुराद्याश्च षड्रसाः ॥ ([सु.])
षड्‌विध भक्ति   
१ श्रद्धा भक्ति, २ नैष्ठिक भक्तित, ३ अवधान भक्ति, ४ अनुभवभक्ति, ५ आनंद भक्ति आणि ६ समरम भक्ति.
असे भक्तीचे सहा प्रकार वीरशैव संप्रदायांत मानले आहेत. ([विवेक चिंतामणि])
षडविधभाव   
१ दास्यरति, २ सख्यरति, ३ वात्सल्यरति, ४ शान्तरति, ५ कान्तरति आणि अद्‌‍भुतरति, असे भक्तिरसाला पोषक सहा भाव अथवा रस मानले आहेत.
षड्‌‍विधसाधनें आदर्श गृहस्थ धर्माचीं   
१ धन, २ कीर्ति, ३ न्याय्यवर्तन, ४ राष्ट्रसेवा, ५ विचक्षण व ६ विमर्शित्व ([विवेक])
(चित्रमयजगत् मासिक)
षट्‌‍सूत्रें   
१ जैमिनीय सूत्र, २ आश्वलायन सूत्र, ३ आपस्तंब सूत्र, ४ बौधायन सूत्र, ५ कात्यायन सूत्र आणि ६ वैशेषिक सूत्र, हीं सहा ग्रह्य - सूत्रें होत.
सहा अंगें चित्रकलेचीं   
१ रूपभेद, २ प्रमाण, ३ भाव, ४ लावण्ययोजना, ५ साद्दश्य व ६ वर्णिकाभंग - विषयानुकूल रंगाचा यथोचित प्रयोग.
रूपमेदो प्रमाणानि लावण्यं भावयोजनम् ।
साद्दश्यं वर्णिकाभङ्‌गमिति चित्रषडङ्‌‍गकम् ॥ ([वा, कामसूत्रे - यशोधरी टीका])
सहा अंगें नाटकाचीं   
१ कथानक, २ स्बभाव, ३ भाषाशैली, ४ विचार, ५ देखावे - सजावट व ६ संगीत हीं होत. (ऑरिस्टॉटल)
सहा अंगें योगाचीं   
१ प्रत्याहार, २ ध्यान, ३ प्राणायाम, ४ धारणा ५ तर्क आणि ६ समाधि.
"तर्कश्वैव समाधिश्व षडंऽगो योग उच्य्ते"([अमृतनादोपनिषद्])
सहा अणुव्रतें   
१ हिंसा, २ लबाडी, ३ चोरी, ४ मैथुन, ५ परिग्रह व ६ रात्रीं भोजन न करणें. हीं सहा अणुव्रतें जैनधर्मांत मानलींज आहेत. (रत्न - श्राव्काचार अ. ३)
सहा अतिरथी भारतीय युद्धांतले   
१ अर्जुन, २ अभिमन्यु, ३ द्रोण, ४ अश्वत्थामा, ५ भूरिश्रवा व ६ भीष्म.
अहं भूरिश्रवाश्चैव षडैत्तेऽतिरथाः स्मृताः (भारतसावित्री)
सहा अवस्था (वस्तुमात्रांच्या)   
१ उत्पत्ति, २ अस्तित्व, २ वृद्धि, ४ बदल - परिणत होणें, ५ क्षय - क्षीण होणें आणि ६ नाश पावणें.
या सहा अवस्था प्रत्येक वस्तुमात्राला आहेत.
"क्षयश्च षडमी भावाः विकाराः कालनिर्मिताः ([शिवभारत. अ. ८])
सहा अवस्था (स्थूल शरीराचे काल)   
१ शिशु - एक वर्ष, २ कौमार - दोन ते पांच वर्षें, ३ पौगंड - सहा ते दहा वर्षें, ४ किशोर - अकरा ते पंधरा, ५ यौवन - सोळा ते चाळीस वर्षेंपर्यंतचा काल व ६ जरा - चाळीस वर्षांनंतरचा काल. (मो. प्र.)
सहा अधिष्ठानें (दानाचीं)   
१ धर्म, १ अर्थ, ३ काम, ४ ब्रीडा (जज्जा), ५ हर्ष व ६ भय. हीं दानाचीं सहा अधिष्ठानें होत.
सहा अनर्थ सदैव टाळावेत   
१ अतिनिद्रा, २ आळस, ३ भय, ४ क्रोध, ५ मृदुता आणि ६ चेंगटपणा.
'निद्रालस्यं भयं क्रोधो मार्दवं दीर्घसूत्रता ॥' (म. मा. सभा. ५-१२८)
सहा आस्तिक दर्शनें   
१ सांख्य, २ पातंजल, ३ पूर्वमीमांसा, ४ उत्तरमीमांसा, ५ न्याय व ६ वैशोषिक. हीं सहा आस्तिक दर्शनें होत.
सहा उपाय (पैसा मिळविण्याचे)   
१ भीक मागणें, २ सरकारी चाकरी, ३ कला (हुन्नर), ४ शेती, ५ सावकारी आणि ६ व्यापार - उदीम करणें. ([पंचतंत्र])
सहा उपदर्शनें   
१ योगाभ्यास, २ संन्यास, ३ जैन, ४ बौद्ध, ५ प्राभाकर आणि ६ चार्वाक. (म. वा. को.
सहा कर्तव्यें (संन्यासाश्रमास विहित)   
१ मिक्षेवर निर्वाह, २ जप, ३ ध्यान, ४ स्नान, ५ शौच आणि ६ देवतापूचन
(यतिधर्मसंग्रह)
सहा उपरत्नें   
१ वैक्रांत, २ सूर्यकांत, ३ चंद्रकांत, ४ राजावर्त, ५ लाल आणि ६ पेरोज.
सहा कर्ण   
१ दातृत्वांत - महारथी कर्ण, २ कौरवांत - विकर्ण, ३ क्षेत्रांत - गोकर्ण, ४ राक्षसांत - कुंभकर्ण, ५ घोडयांत - श्यामकर्ण, आणि ६ देहांत - अंतःकरण.
हे सहा कर्ण म्हणून वाङमयांत प्रसिद्ध आहेत.
सहा कलिकौतुकें   
१ संत - दुःखी, २ असंतांचा उदोउदो, ३ मुलें अल्पायुषी, ४ मातापितरें दीर्घायु, ५ परक्याशीं मैत्री आणि ६ स्वकीयाशीं वैर.
हीं सहा कलिकौतुकें प्रत्यक्षांत अनुभवास येतात.
सीदन्ति सन्तो विलसन्त्यसन्तः पुत्रा म्रियन्ते जनकश्चिरायुः।
परेषु मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोकाः कलिकौतुकानि ॥ ([सु.])
सुहा कालविभाग   
१ वर्ष, २ अयन, ३ ऋतु, ४ मास, ५ पक्ष आणि ६ दिवस. असे सहा कालविभाग मानले आहेत. ([धर्मसिंधु])
सहा कारणांनीं रोगोत्पत्ति होते   
१ अति पाणी पिणें, २ अति कठीण पदार्थ खाणें, ३ धातुक्षय, ४ मलमूत्रावरोध, ५ दिवसा झोप आणि ६ रात्रीं जागरण.
अत्यम्बुपानं कठिनाशनश्च धातुक्षयो विगविधारणं च।
दिवाशयो जागरणं च रात्रौ षड्‌‍भिर्नराणां प्रभवन्ति रोगाः ॥ ([सु.])
सहा कारणें प्रायः परमार्थप्रवृत्तीचीं   
१ वंचना, २ अज्ञानाची निद्रा, ३ अविवेकाचें आंधळेपण, ४ जगांतील अन्याय, ५ पापाची जाणीव व ६ जरामृत्यूंचें दुःख. (परमार्थपर व्याख्यानें)
सहा कारणें सृष्टयुत्पत्तीसंबंधीं (आयुर्वेदमतें)   
१ स्वभाववाद, २ ईश्वरवाद, ३ कालवाद, ४ यद्दंच्छावाद, ५ परिणामबाद आणि ६ नियतिवाद. ([सुक्षुत - शारीर - १-११])
सहा कुलपरीक्षेचीं लक्षणें   
१ सामानसुमान, २ जन्मभूमि, ३ घर, ४ आचार, ५ अन्न आणि ६ आच्छादन. या सहा गोष्टींवरून कुलाची परीक्षा केली जाते.
सहा गायनमहर्षि   
१ अग्नि, २ ब्रह्मा, ३ चंद्र, ४ विष्णु, ५ नारद आणि ६ तुंबरु.
वह्लिर्वेधाः शशांकश्चा लक्ष्मीनाथस्तथैव च।
नारदस्तुंबरुश्चैव षड्‌‍जादीनां ऋषीश्वराः ॥ (गायनाचार्यमाला)
सहा गुण (आत्म्याचे)   
१ सर्वज्ञत्व, २ नित्यत्व, ३ नित्यतृप्तत्व, ४ बोधरूपत्व, ५ स्वतंत्रत्व आणि ६ नित्यस्फूर्ति. (अ. रा. उत्तर सर्ग. ५)
सहा गुण ऐश्वर्याप्रत नेणारे   
१ उद्योग, २ साह्स, ३ धैर्य, ४ बल, ५ बुद्धि आणि ६ पराक्रम.
उद्यमः साहसं धैर्यं बलं बुद्धिः पराक्रमः।
षडिमे यत्र तिष्ठन्ति स सर्वं प्राप्नुयात् पुमान ॥ ([सु.])
सहा गुण कुत्र्यापासून घ्यावेत   
१ पुष्कळ खाणें, २ अल्पसंतुष्टता, ३ झोंप सावध, ४ एकदम तुटून पडणें, ५ इमानी आणि ६ शूर. ([वृ. चा. ६-२०])
सहा गुण नाटय कवीस आवश्यक   
१ बहुश्रुतता, २ प्रतिभा, ३ भाषाप्रभुत्व ४ शब्दलालित्य, ५ प्रसाद आणि ६ स्वतःनट
(रंगभूमि)
सहा गुण (पाठकाचे)   
१ गोडी, २ स्पष्टोच्चार, ३ पदें पाडून म्हणणें, ४ गोड आवाज, ५ धीटपणा आणि ६ तन्मयता.
माहुर्यमक्षरव्यक्तिः पद‌‍च्छेदस्तु सुस्वरः
धैर्यं लयसमर्थं च षडेते पाठका गुणाः ॥ ([पाणिनिशिक्षा])
सहा गुण मनुष्यानें टाकूंज नयेत   
१ सत्य, २ परोपकार, ३ अनालस्य, ४ अनसूया, ५ क्षमा आणि ६ धैर्य. (प्रमाणसाहस्त्री)
सहा गुण (मित्रत्वाचे)   
१ कायम टिकणारा, २ अनुकूल, ३ सहज किंवा अल्प प्रयासानें सज होणार, ४ वाडवडिलांपासून चालत आलेला, ५ वैभवशाली आणि ६ प्रतारणा न करणारा.
असे मित्राचे सहा गुण म्हणून सांगितले आहेत.
नित्यं वश्यं लघूत्थानं पितृपैतामहं महत्‌६।
अद्धैध्यं चेति सग्पन्नं मित्रं षड्‌‍गुणमुच्यते ॥ ([कौटिल्य अ. १०७])
सहा गुण मिताहारी पुरुषाचा आश्रय करतात   
१ आरोग्य, २ आयुष्य, ३ बल, ४ सुख, ५ शुद्ध संतति आणि ६ अधाशी म्हणून निंदिला न जाणें.
या सहा गोष्टी मिताहारी पुरुषाला लाभतात. ([भा. उद्योग. ३७-३४])
सहा गुण राज्यशासकांस आवश्यक   
१ वक्तृत्व, २ शत्रूचें दमन कराण्याची सिद्धता, ३ तर्ककुशलता, ४ स्मरणशक्ति, ५ नीतिशास्त्रज्ञता आणि ६ विद्वत्ता. ([म. भा. सभा. ५-२२]).
सहा गुण लेखकाचे अंगीं असावेत   
१ बुद्धिमान्, २ समयस्फूर्त बोलणारा, ३ धीर - गंमीर, ४ जलद लिहिणारा, ५ संयमी आणि ६ दुसर्‍याचें इंगित संपूर्णपणें जाणणारा.
मेधावी वाक्पटुर्धीरो लघुहस्तो जितेंद्रियः।
परशास्त्रपरिज्ञाता एष लेखक उच्यते ॥ ([सु.])
सहा गुण वधूपरीक्षेकामीं उपयुक्त   
१ कन्या - कमनीया - सुडौल म्हणजे पाहातांच आकर्षण उत्पन्न करणारी,
२ पतिगृह हेंच स्वतःचें खरें घर समजते,
३ उभय कुलांचे यश वाढविणारी,
४ पतीचें भाग्य वाढविणारी,
५ सासर सोडून इतरत्र कोठेंहि राहूं न इच्छिणारी व
६ वृक्षावरील फुलाप्रमाणें पितृकुलाला सुंगधित करणारी, ([अथर्व - अनु - मराठी भाग. ३ रा])
सहा गुण वरपरीक्षेकामीम उपयुक्त   
१ यम - नियम पालन करणारा, २ धर्मपत्नीचा संतोष वाढविणारा, ३ स्वातंत्र्यप्रिय, ४ परिस्थिति आणि कर्तव्याची जाणीव असलेला, ५ बलवान् आणि ६ ज्ञानी. ([अथर्व - अनु - मराठी])
सहा गुण विद्यापरंपरा चिरकाल टिकण्यास आवश्यक   
१ स्वाभाविक बुद्धि, २ सतत वाचन, ३ दीर्घकाल चिंतन, ४ चर्चा, ५ अध्यापन आणि ६ वेदलेखन (स्वराज्य्य ३-८-१९६३)
सहा गुण सत्पुरुषाचे (स्वाभाविक)   
१ विपत्कालीं धैर्य, २ भाग्यकालीं सहिष्णुता, ३ समेंत पांडित्य, ४ रणांत शौर्य, ५ यशाविषयी आवड आणि ६ ज्ञानसंपादन करण्याचें व्यसन. ([भर्तृ. नीति.])
सहा सद्‌‍गुण सुवैद्यास आवश्यक   
१ विद्या, २ विचार, ३ अन्यशास्त्राचें ज्ञान, ४ स्मरण, ५ तल्लीनता आणि ६ दीर्घ अनुभव.
"यस्यैते षड्‌‍गुणास्तस्य न साध्यमतिवर्तते"([चरक सूत्रस्थान. ९-२१])
सहा गुरु   
१ मातापिता, २ सुईण, (कान फुंकून हातपाय थोपटते) ३ शिक्षक, ४ कर्ममार्गी, ५ नामकरण करणारा व ६ बीजमंत्र देणारा. ([सिद्धांत बोध. अ. ५०])
सहा गोष्टी अग्निविना शरीर जाळणार्‍या   
१ कुग्रामांत वसति, २ दुर्जनाची सेवा, ३ जेवण चांगलें नसणें, ४ क्रोधमुखी भार्या, ५ मूर्ख मुलगा आणि ६ विधवा कन्या.
कुग्रामवासः कुलहीनसेवा कुभोजनं क्रोधमुखी च भार्या।
पुत्रश्च मूर्खो विधवा च कन्या विनाग्निना षट् प्रदहन्ति कायम् ([सु.])
सुहा गोष्टी अशाश्वत होत   
१ तारुण्य, २ रूप, ३ जीवित, ४ धनसंचय, ५ आरोग्य आणि ६ प्रियजनांचा सहवास. या सहा गोष्टींची शहाण्यानें आसक्ति ठेवूं नये.
अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्र्व्यसंचयः।
आरोग्यं प्रियसंवासो मुह्मेत् तत्र न पण्डितः ॥ ([सु.])
सहा गोष्टी अभ्युदयाच्या आड येणार्‍या   
१ आळस, २ स्त्रीमोह, ३ व्यधि, ४ जन्मभूमिवात्सल्य, ५ अल्पसंतुष्टता आणि ६ भीरुता.
आलस्यं स्त्रीसेवा सरोगता जन्मभूमिवात्सल्यम् ।
संतोषो भीरुत्वं षड्‌‍व्याघाता महत्त्वस्य ॥ ([हितो.])
सहा गोष्टीमुळें आयुष्याची हानि होते   
१ अमर्याद अभिमान, २ अमर्याद भाषण ३ अमर्याद पाप, ४ क्रोध, ५ आप्पलपोटेपणा व ६ मित्रद्रोह. ([म. भा. उद्योग. ३७-१०])
सहा गोष्टी तत्काल क्षीण करणार्‍या   
१ शिळें मांस, २ वृद्ध स्त्री, ३ सकाळचें उन्ह, ४ पूर्ण न विरजलेलें दहीं. ५ सकाळचें मैथुन आणि ६ निद्रा.
शुष्कमांस्सं स्त्रियो वृद्धा बालार्कस्तरुणं दधि।
प्रभाते मैथुनं निद्रा सद्यः प्राणहराणि षट् ॥ (शा. नि.
सहा गोष्टी पाण्यावरील बुडबुडयाप्रमाणें होत   
१ आभाळाची सावली, २ गवतापासून उत्पन्न झालेला अग्नि, ३ दुष्ट पुरुषाच्या ठिकाणची प्रीति, ४ उंचवठयावरील पाणी, ५ वेश्येचें प्रेम आणि ६ कुमित्र.
सहा गुण पद्यरचनेस आवश्यक   
१ मृदु, ललित, आणि सोपी शब्दरचना, २ व्याकरण शुद्धता, ३ सुबोधता, ४ वेचक शब्दांचा उपयोग, ५ प्रसंगानुसार भाषा व चाल व ६ रचनेत सहजता (नाटक - शास्त्र आणि तंत्र).
सहा गोष्टी प्रारब्धाधीन   
१ हानि, २ लाभ, ३ जनन, ४ मरण, ५ यश व ६ अपयश. या सहा गोष्टी प्रारब्धवशात् ज्या समयीं ज्या स्थानीं घडावयाच्या त्या ठिकाणीं तेव्हांच त्या घडतात. (तुलसीरामायण - टीप)
सहा गोष्टी बल वाढविणार्‍या   
१ ताजें मांस, २ ताजें अन्न, ३ तरुण स्त्री, ४ दुधाचे पदार्थ, ५ तूप आणि ६ ऊन पाणी.
सद्योमांसं नवान्नं च बाला स्त्री क्षीरभोजनम् ।
घृतमुष्णोदकं चैव सद्यः प्राणकराणि षट् ॥ (शां. नि.)
सहा गोष्टी ब्रह्मचर्यास वर्ज्य   
१ सुखशय्या, २ वेषभूषा, ३ तांवूल, ४ अभ्यंगस्नान, ५ दन्तकाष्ठ वापरणें आणि ६ सुगंधी पदार्थ सेवन.
सूखशय्यासनं वस्त्रं तांबूलं स्नानमज्जनम् ।
दन्तकाष्ठं सुगंधं च ब्रह्मचर्यस्य दूषणम् ॥ ([शिवपुराण])
सहा गोष्टींत मौन आवश्यक   
१ शौच, २ विषयसेवन, ३ लघ्वी, ४ दांत घासणें, ५ श्राद्धकाल व ६ भोजन.
उच्चारे मैथुने चैव प्रस्त्रावे दन्तधावने।
श्राद्धे च भोजने चैव षट्‌‍सु मौनं समाचरेत् ॥ ([हारीत])
सहा गोष्टी योगाला साधक   
१ उत्साह, २ साहस, ३ धैर्य, ४ भावना, ५ अभ्यास चालू ठेवण्याचा निश्चय व ६ विषयीजनसंग त्याग.
सहा गोष्टी योगाभ्यासाला बाधक   
१ अति आहार, २ अधिक श्रम, ३ फार बोलणें, ४ उपोषण (एकादशी वगैरे आवश्यक उपोषणांखेरीज), ५ योगाभ्यासी नव्हेत अशांची संगति व ६ जिह्लालौल्य.
अत्याहारः प्रवासश्च प्रजल्पो निय्यमग्रहः।
जनसंगश्च लौल्यं च षड्‌‍भिर्योगो विनश्यति ॥ (ह. प्र.).
सहा गोष्टी लघुता म्हणजे कमीपणा आणणार्‍या   
१ लहान मुलाबरोबर सख्यत्व, ३ अकारण हास्य, ३ स्त्रियांशीं वाद, ४ असज्जनांची सेवा, ५ गर्दभ - वाहनाचा योग आणि ६ ग्राम्यभाषा. ([सु.])
सहा गोष्टी विडंबन करणार्‍या   
१ ब्राह्मण - पण मूर्ख, २ स्थविर (वृद्ध)- पण कामी, ३ कामी - पण दरिद्री, ४ धनवान् - पण तपस्वी, ५ वेश्या - पण कुरूपा आणि ६ थोर - पण कृपण.
सहा गोष्टी क्षणिक असतात   
१ ढगाची छाया, २ दुर्जनाची प्रीति, ३ शिजलेलें अन्न, ४ स्त्री, ५ तारुण्य आणि ६ धन.
अभ्रच्छाया खलप्रीतिः सिद्धमन्नं च योषितः।
किंचित्कालोपभोग्यानि यौवनानि धनानि च ॥ ([पंचतंत्र])
सहा गोष्टी क्षणभंगुर होत   
१ यौवन, २ जीवित, ३ मन, ४ शरीराची सावली, ५ लक्ष्मी आणि ६ स्वामिता (नीतिशास्त्र).
सहा गोष्टी संसारांत सुखप्रद   
(अ) १ धनलाभ, २ निरोगी प्रकृति, ३ प्रियमित्र, ४ मधुरभाषिणी स्त्री व ५ आज्ञाधारक पुत्र आणि ६ द्रव्य मिळवून देणारी विद्या ;
(आ) १ आरोग्य़, २ ऋण नसणेंज, ३ सारखा प्रवास नसणें, ४ सज्जनसमागम, ५ अनुकूल उपजीविका आणि ६ भयरहित वसतिस्थान,
हीं सहा जीवलोकींचीं सुखें होत. ([म. भा. उद्योग ३३-८९])
सहा गव्य पदार्यांच्या उपयोगानें दुःस्वप्रांचें निवारण होतें   
१ गोमूत्र, २ गोमय, ३ दूध ४ दहीं, ५ तूप व ६ गोरोचन.
गोमूत्रं गोमयं क्षीरं दघि सर्पिश्च रोचना।
षडङ्रं परमं पाने दुःस्वप्रादि निवारणम्‌६ ॥ ([सु.])
सहा जाती पुरुषांच्या   
१ शश, २ मृग, ३ अश्च, ४ गर्दभ, ५ वृषभ व ६ महिष (टोणगा). (तत्त्व निजबोध - विवेक)
सहा जाती (बाभळीच्या)   
१ कांटे बाभूळ, २ निकांटे बाभूळ. ३ देवबाभूळ, ४ रानबाभूळ, ५ संतबाभूळ, व ६ गुआबाभूळ. (वाभळीचा उपयोग)
सहा जाती स्त्रियांच्या   
(अ) १ पद्मिनी, २ हरिणी ३ हस्तिनी, ४ चित्रिणी, ५ वडवा आणि ६ शंखिनी, पैकीं सहावी शंखिनी वर्ज्य करून बाकीच्या पांच शुभ होत.
' शखिनी प्रहरूनि अन्य सुंदरी। येरे पंच त्या शुद्धा ॥"
(आ) १ पद्मिनी २ चित्रिणी, ३ हस्तिनी, ४ शंखिनी, ५ नागिणी व ६ डाकिणी. (तत्त्व - निजबोध ' विवेक)
सहा ज्योति (अवकाशांतला पदार्थ)   
१ सूर्य, २ चंद्र, ३ ग्रह, ४ उल्का, ५ धूमकेतु आणि ६ तारे असे सहा ज्योति अनंत आकाशांत आहेत. (राहु - केतु आणि ग्रहणें)
सहा ठिकाणें आश्रयास पात्र   
१ इष्ट प्राप्तीविषयीं निश्चिति, २ अनिष्टाचा त्याग, रक्षण होईल असा विश्वास, ४ रक्षणाविषयींची मान्यता, ५ ठेवीची सुरक्षितता व ६ मनाचा मोठेपणा. अशा प्रकारचीं असलेलीं सहा ठिकाणें आश्रयास पात्र होत.
आनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।
रक्षिष्यतीति विश्वासः गोप्तृविधा शरणागतिः ॥ ([वायुपुराण])
सहा तीर्थें   
१ भक्तितीर्थ, २ गुरुतीर्य, ३ मातृतीर्थ, ४ पितृतीर्थ, ५ पतितीर्थ आणि ६ पत्नीतीर्थ, हीं सहा तीर्थें मानवाला पावन करणारीं. ([पद्म - भूमिखंड])
सहा दाते (पुराणप्रसिद्ध भारतीय)   
१ बलि - सत्ययुग, २ भार्गव राम व ३ श्रीरामचंद्र - त्रेतायुग, ४ धर्मराज, व ५ कर्ण - द्वापरयुग आणि ६ व्यापारी - कलियुग.
सहा दुःखी   
१ मत्सरी, २ दयाळू, ३ असंतुष्ट, ४ रागीट, ५ सदा शंकेखोर आणि ६ दुसर्‍याच्या भाग्यावरा उपजीविका करणारा. हे सहा नित्याचे दुःखी असतात. ([म. भा. उधोग ३३-९०])
सहा दुःखें जीवितांतील   
१ गर्भदुःख, २ जन्मदुःख ३ व्याधिदुःख, ४ दारिद्य - दुःख, ५ जरादुःख व ६ मृत्युदुःख.
सहा दोष (आसुरी संपत्तीचे)   
१ दंभ, २ दर्प, ३ अभिमान, ४ क्रोध, ५ पारुष्य (कठोरपणा) आणि ६ अज्ञान. ([भ. गी. १६-४])
सहा दोष (अभ्युदयाच्या आड येणारे)   
१ निद्रा, २ सुस्ती, ३ भय, ४ क्रोध, ५ आळस आणि ६ दीर्घसूत्रीपणा. ([म. भा. उद्योग. ३३-७८])
सहा दोष पद्य रचनेसंबंधीं   
१ कर्णकठोर, अपरिचित किंवा क्लिष्ट शब्दयोजना, २ शब्दांची ओढाताण, ३ भिन्न भाषांतील शब्दांचे समास, ४ त्याच त्या शब्दांची पुनरावृत्ति, ५ रसाला प्रतिकूल चाल व ६ यतिमंग. (नाटक - शास्त्र व तंत्र)
सहा दोष (पाठकाचे - पठण करणाराचे)   
१ गात म्हणणारा, २ जलद जलद म्हणणारा, ३ वाचतांना किंवा म्हणतांना डोकें हलविणारा, ३ लिहिलेलें वाचणारा, ५ अर्थ न जाणणारा व ६ बारीक आबाजाचा.
गीती शीघ्री शिरःकंपी तथा लिखितपाठकः।
अनर्थज्ञोऽल्पकंठश्र षडेते पाठकाधमाः ॥ ([पा. शिक्षा ३२])
सहा दोष (स्त्रियांचे बाबतींत)   
(अ) १ मद्यपान, २ दुर्जनसंगति, ३ पतीपासून दूर राहणें, ४ इकडे तिकडे भटकणें, ५ परगृहीं निद्रा, आणि ६ परगृहवास ([मनु. ९-३३]);
(आ) १ अनृत, २ साहस, ४ माया, ५ जाणीव कमी, ५ अतिलोभ आणि ६ अशुचित्व.
अनृतं साहसं माया मूर्खत्वमांतेलोभता।
अशौचत्वं निदर्यत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥ ([वृ. चा.])
सहा द्वारें मसलत फुटण्याची (राजनीतिशास्त्र)   
१ मद, २ निद्रा, ३ अज्ञान (शत्रुकडील गुप्त हेर वगैरेबद्दल), ४ चेहर्‍यावरील विकार, ५ दुष्ट मंत्र्यावर विश्वास आणि ६ अकुशल दूत. ([म. भा. उद्योग. ३९-३९])
सहा 'न' कार   
१ मौन, २ विलंब, ३ भिवया चढविणें, ४ अधोवदन, ५ निघून जाणें आणि ६ विषयांतर.
मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम ।
भरुकुटयन्यमुखी वार्ता नकारः षड्‌‍विधः स्मृतः ॥ ([सु.])
सहा नराधम   
१ कोणतेंहि काम न करितां ज्यांत त्यांत घोटाळा करणारा, २ कामाकडे अति दुर्लक्ष करणारा, ३ नेहमीं खोटें बोलणारा, ४ द्दढ प्रेम न करणारा, ५ स्नेहभावाचा त्याग केलेला आणि ६ स्वतःला शहाणा समजणारा. ([म. भा. उद्योग ३७-३७])
सहा नास्तिक दर्शनें   
१ चार्वाक, २ सौत्रांत्रिक, ३ वैभाषिक, ४ योगाचार, ५ माध्यमिक आणि ६ अर्हत् ‌. (वृ. प्र.)
सहा निसर्गदत्त वैद्य   
१ सूर्यप्रकाश, २ अन्न, ३ हवा, ४ पाणी, ५ व्यायाम आणि ६ विश्रांति,
हे सहा निसर्गदत्त वैद्य परमेश्वरानें मनुष्याच्या सन्निध ठेविले आहेत. त्यांची आठवण ठेवावी. (प्रातःस्मरण)
सहा पद्धती सुगंधी पदार्थ तयार करण्याच्या   
१ भावन, २ पाचन, ३ बोधन ४ वेधन, ५ धूपन व ६ वासन. (गंधसार)
सहा पारतंत्र्यें   
१ स्वाभावा - पारतंत्र्य, २ ईश्वर - पारतंत्र्य, ३ प्रकृति - पारतंत्र्य, ४ गुण - पारतंत्र्य ५ कर्म - पारतंत्र्य आणि ६ काल - पारतंत्र्य.
सहा पुरणप्रसिद्ध सभा   
१ इंद्रसभा. २ वरुणसभा, ३ कुवेरसभा, ४ यमसभा, ५ ब्रह्मसभा आणि ६ धर्म (मय) सभा. ([पांडव प्र. १६-४]).
सहा प्रकारची अभिज्ञा (दिव्यज्ञान)   
१ दिव्यद्दष्ठि, २ दिव्यथुति, ३ कामरूप, ४ पूर्वजन्मस्मृति, ५ दिव्यज्ञान आणि ६ विमक्तिज्ञान (बुद्धदर्शन)
सहा प्रकार (ऋषींचे)   
१ छंदऋषी - वसिष्ठ कण्व २ इ. ब्रह्मऋषी - अत्रि वगैरे, ३ महर्षि - भृगु वगैरे, ४ रजर्षि - विश्वामित्र, जनक, ऋतुपर्ण इ. ५ गोत्रऋषी - शांडिल्य - कौंडिण्य वगैरे आणि ६ देवऋषी - नारद. ([ऐति. गोष्टी भाग, ३ रा])
सहा प्रकार उन्मादाचे   
१ वातोन्माद, २ पित्तोन्माद, ३ कफोन्माद, ४ सान्निपाति उन्माद, ५ मानसिक उन्माद व ६ विषयन्य उन्माद. ([आयुर्वेद])
सहा प्रकारचे ऐतिहासिक विपर्यास (दोष)   
१ स्थलविपर्यास, २ कालविपर्यास, ३ घटनाविपर्यास, ४ कार्य - करण विपर्यास, सभावविपर्यास आणि ६ परिस्थितिविपर्यास.
असे सहा प्रकारचे दोष इतिहासशास्त्रांत मानले आहेत. (साहित्याचा संसार)
सहा प्रकारचे गुरू   
१ प्रेरक, २ सूचक, ३ वाचक, ४ दर्शक, ५ बोधक आणि ६ शिक्षक. ([मंत्रशास्त्र])
सहा प्रकारचे गंध   
१ लवंग, बेलदोडे वगैरेंज्चा खमंग वास, २ फुलें, अत्तर वगैरेंचा वास, ३ पक्क फळांचा स्वादिष्ट वास, ४ तरपेंटाईन वगैरेंचा दर्प, ५ कुजक्या पदार्थांचा दुर्गंध आणि ६ डांबर वगैरेंचा जळफट
सहा प्रकारांनीं अंतरंग जाणतां येतें   
१ चर्या (चाल रीत), २ इंगित (खाणाखुणा), ३ चेष्टा (हालचाल,) ४ भाषण, ५ द्दष्टि आणि ६ मुखचर्या. ([मनु. ८. २६])
सहा प्रकारांनी तीळ पापाचाअ नाश करणारे आहेत   
१ तिलमिश्रित पाण्यानें स्नान, २ तीळ बाटून अंगास लावणें, ३ तिळांनीं हवन करणें, ४ तिलोअदकानें तर्पण, ५ तीळ भक्षण आणि ६ तिलदान.
तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी।
तिलभुक्‌ तिलदाता च षट्‌तिलाः पापनाशकाः ॥ ([सु.])
सहा प्रकारचीं दर्शनें (मतें)   
१ शैव दर्शन, २ शाक्त दर्शन, ३ वैष्णव दर्शन, ४ गाणपत्य दर्शन, ५ सौर दर्शन आणि ६ कापालिक दर्शन.
दर्शनं षड्‌विधं प्रोक्तं शैवशाक्तेयवैष्णवम् ।
गाणपत्यं च सौरं च कापालिकमिति स्मृतम् ॥ ([सु.])
सहा प्रकार दक्षिणेचे   
१ धेनु, २ भूमि, ३ सुवर्ण, ४ रौप्य, ५ वस्त्र व ६ अश्व. ([म. भा. आरण्यक पर्व])
सहा प्रकारचा देह   
१ स्थूलदेह, २ वासनादेह, ३ मनोदेह, ४ कारणदेह, ६ बुद्धिदेह आणि ६ निर्वाणदेह. असे सहा प्रकारचे देह असतात असें थिऑसफीनें (ब्रह्मविद्या) मानलें आहे.
सहा प्रकारचे दुर्ग   
१ निर्जन प्रदेश दुर्ग, २ भूदुर्ग (भुईकोट किल्ला), ३ डोंगरी किल्ला. ४ नरदुर्ग - नगराभोंवतीं पहारा वा अनन्यनिष्ठ सेवक असणें, ५ मृद्‌दुर्ग - मातीचा तट आणि ६ नगराभोवतीं दुर्गम अरण्य असणें.
असे सहा प्रकार दुर्गांचे (किल्लयांचे) प्राचीन काळीं असत.
सहा प्रकार दूषित अन्नाचे   
२ आश्रयदुष्ट, २ कालदुष्ट, ३ भावदुष्ट, ४ स्वभावदुष्ट, ५ वाग्दुष्ट आणि ६ संसर्गदुष्ट. ([भविष्य. पु.])
सहा प्रकार प्रकृतीचे   
१ स्वभाव, २ ईश्वर, ३ काल, ४ यद्दच्छा, ५ नियति आणि ६ परिणाम. ([सुश्रुत. शा. अ. १])
सहा प्रकारचे पशुमानव   
१ वेदपशु, २ शास्त्रपशु, ३ पुराणपशु, ४ देवपशु, ५ नरपशु, व ६ स्त्रीपश, असे सहा प्रकारचे पक्षपाती अविचारी मानव जगांत असतात. (निर्पक्ष सत्यदर्शन)
सहा प्रकार भक्तीचे (जैनधर्म)   
१ नामभक्ति, २ स्थापनाभक्ति, ३ द्र्व्यभक्ति, ४ भावभक्ति, ५ क्षेत्रभक्ति आणि ६ कालभक्ति.
([कल्याण - भक्ति अंक])
सहा प्रकार भाज्यांचे   
१ पानें - मेथी, चुका, पाचवत इ., २ फुलें - कोबी हदगा इ, ३ फळें - भोपळा, कारली इ., ४ कंद - सुरण, रताळी इ., ५ देठ - अळू - शिरस इ. व ६ भुईफोड - भूमि, गोमय, लाकूड इत्यादिकांत पावसाळ्यांत पत्पन्न होणारी छत्रीवजा दिसणारी वनस्पती. ([बृहद्योग तरंगिणी])
सहा प्रमुख प्रकार (भाताचे)   
१ वांगीभात, २ दोडकेभात, ३ तोंडालीभात, ४ वाळकीभात, ५ केळीभात व ६ बटाटेभात. (स्वयं - पाक शास्त्र)
सहा प्रकार रतिक्रियेचे   
१ उत्तान रत, २ तिर्यग् रत, ३ उपविष्ट रतु, ४ स्थित रत, ५ आनत रत व ६ विपरीत रत.
(रतिशास्त्र)
सहा प्रकार राजनीतीचे   
१ संधि - प्रसंगीं परस्पर साह्म, २ विग्रह - युद्ध, ३ यान - आक्रमण, ५ आसन - शत्रूची उपेक्षा करणें, ५ द्वैधीभाव - केव्हां संधि केव्हां विग्रह व ६ द्वैध - दुटप्पी धोरण.
तथा चान्वीक्षिकीं विद्यां राजनीतिं च षड्‌विधाम् ॥ ([भाग. १०. ४५-३४])
सहा प्रकार लघुकथांचे   
१ स्वभावप्रधान, २ कथानकप्रधान, ३ तत्त्वप्रधान, ४ लघुतम कथा, ५ रूपक कथा. व ६ स्वैर कथा. असे हे सहा प्रकार प्रचारांत आहेत. (ल. क. कशा लिहाव्या ?)
सहा प्रकारची वनस्पति - सृष्टि   
१ वनस्पति - फुलावांचून फळ येणारे वड, पिंपळ इ., २ औषधी - एक वार फुलें फळें येऊन नाश पावणारे - केळी, धान्यें इ., ३ लता - वृक्षाचा आधार लागतो असा, ४ त्वक्‌‍सार - त्वचा कठीण असे वेळू, वगैरे, ५ विरुध् ‌- आधाराशिवाय वाढतात अशा आणि ६ द्रुम - फुलें फळें येणारे आंबा इत्यादि वृक्ष.
सहा प्रकारचे विरह   
१ प्रांरभ विरह - लग्नच न झाल्यामुळें बायको नाहीं म्हणून, २ क्षणिक विरह - नजरेआड झाल्यामुळें, ३ वाङ्‌‍मयविरह - तंटा - बखेडा होऊन अबोला झाल्यामुळें, ४ परोक्ष विरह - मोहरीं गेल्यामुळें ५ प्रत्यक्ष विरह - बायको आजारी झाल्यामुळें आणि ५ चिरविरह - पत्नी मृत झाल्यामुळें होणारा विरहा (भावबंधन अंक १)
सहा प्रकारचीं विषें   
१ निकोटीन, २ प्रसिकऑसिड, ३ पाइअरीडीन, ४ कोलीडीन, ५ अमोनिया आणि ६ कार्वन मोनो ऑक्साइड. अशीं सहा प्रकारचीं विषें तंबाखूंत असतात. असे चालू युगाचे वैज्ञानिक सांगतात. ([कल्याण जून १९६१])
सहा प्रकार व्याख्यानांत आवश्यक   
१ संधी सोडून पदें सांगणें, २ पदांचा अर्थ, ३ समास सोडवणें, ४ वाक्य योजना, ५ आक्षेपांचा अनुवाद करणें व ६ त्या आक्षेपांचें निरसन करणें. (वैदिकधर्म व भारतीय राजनीति)
सहा प्रकार श्रृंगार चेष्टांचें   
१ विलास, २ विव्वोक, ३ विभ्रम, ४ ललित, ५ हेला व ६ लीला. ([अमर])
सहा प्रकारचे वैष्णव   
१ भक्त, २ भागवत, ३ वैष्णव, ४ पांच - रात्रागमाप्रमाणें चालणारे, ५ वैखानसशाखी व ६ कर्म न करणारे.
भक्ता भागवतश्चैन वैष्णवाः पांचरात्रिणः।
वैखानसाः कर्महीनाः षड्‌विधा वैष्णवा मताः ॥
सहा प्रकार सैन्याचे   
१ पिढीजाद सैन्य, २ पगारी, ३ पथक सैन्य, ४ मित्रराजांचें, ५ शत्रुराजांचे आणि ६ रानटी लोकांचें सैन्य, असे सहा प्रकार महाभारतकालीं असत. ([कौ. अर्थ. अधि. ९])
सहा प्रकार (स्नानाचे)   
१ नित्य, २ नैमित्तिक, ३ काम्य, ४ क्रियास्नान, ५ मलापकर्षण आणि ६ कर्मांग.
नित्यं नैमित्तिकं काम्यं क्रियाख्यं मलकर्षणम् ।
कर्माङ्राश्चेति विज्ञेया षट्‌‍प्रकाराः समासतः ॥ (भ. ब्राह्म.)
सहा प्रकारचें स्त्रीधन   
१ विवाहसमयीं अग्नीसमक्ष दिलेलें २ सासरीं जातांना मिळालेलें, ३ प्रेमानें दिलेलें, ४ भावाकडून मिळालेलें, ५ मातेकडून मिळालेलें व ६ पित्याकडून मिळालेलें. ([मनु. ९-१९४])
सहा प्रकारची समाधि   
१ द्दश्यानुविद्ध, २ शब्दानुविद्ध, ३ निः - संकल्प, ४ निर्विकल्प, ५ निर्वृत्तिक आणि ६ निर्वासन. ([सरस्वती रहस्योपनिषद् ‌])
सहा प्रकारची सिद्धि   
१ प्रतिभा (त्रिकालज्ञान), २ श्रवणा, ३ वार्ता, ४ दर्शना, ५ आस्वादा आणि ६ वेदना (स्पर्शज्ञान). ([लिंग. अ. ४])
सहा प्रकार सिद्धांचे   
१ नित्यसिद्ध, २ अचानकसिद्ध, ३ स्वप्रसिद्ध, ४ दैवसिद्ध, ५ कृपासिद्ध व ६ हठात्‌सिद्ध, असे सहा मुख्य प्रकार. (जीवनविकास. आक्टोबर १९६२)
सहा प्रकार सूत्रांचे   
१ संज्ञासूत्रें, २ परिभाषासूत्रें, ३ विधिसूत्रें, ४ नियमसूत्रें, ५ अतिदेशसूत्रें व ६ अधिकारसूत्रें, (व्याकरण म. भा प्रस्तावना)
सहा प्रकारचें सैन्यबल   
१ शारीरिक बल - कष्ठाळूपणा, २ शूर असणें, ३ सैन्यबल - भरपूर संख्या असणें, ४ आस्त्रिक बल - तीक्ष्ण ह्त्यारें, ५ बुद्धिबल आणि ६ आयुर्बल - सैन्याचा सतत पुरवठा होत असणें. ([शुक्र - नीति अ. ४])
सहा प्रकार हास्याचे   
१ स्मित - गालांतल्या गालांत हसणें, २ दांत काढून हसणें, ३ विहसित - बोलत बोलत हसणें, ४ उपहसित - नाक फुगवून हसणें, ५ अपहसित - डोळ्यांला आंसवें आणून हसणें आणि ६ अतिहसित - मोठमोठयानें टाळी वाजवून हसणें. (तत्त्व - निज - विवेक भ. ना. ६-६०)
सहा प्रकारचे होम   
१ राष्ट्रभृत होम, २ जया होम, ३ अभ्यातन होम, अरिष्टनाशक, ५ लाजा होम व ६ पापमोचन. असे सहा प्रकारचे होम विवाहसंस्कारसमयीं करावे लागतात. ([रामतीर्थ. दिवाळी अंक])
सहा प्रकार संभोगासनांचे   
१ उत्तान आसन, २ तिर्यक् आसन, ३ उपविष्ट आसन, ४ उत्थित आसन, ५ व्यानत आसन व ६ पुरुषायित आसन ([कामशास्त्र])
सहा प्रकार (संन्यासाचे)   
१ कुटीचक, २ बहूदक, ३ हंस, ४ परमहंस, ५ तुरीयातीत व ६ अवधूत, ([नारद परिव्राजकोपनिषद])
सहा प्रयोजनें (काव्याचीं)   
१ कीर्ति, २ धनप्राति, ३ व्यवहारज्ञान, ४ अशुभपरिहार, ५ परमानंद व ६ कांतेकडून होतो तसा माधुर्यानें तत्त्वबोध. ([काव्यप्रकाश])
सहा प्राचीन तेलगु कवि आणि त्यांचीं काव्यें   
१ नन्नयभट्ट - तेलगू महाभारत, २ तिक्कन सोमयाजी - निर्वचनोत्तर रामायय्ण महाभारत, ३ एराप्रग्गड - हरिवंश, ४ नाचनसोम - उत्तर हरिवंश, ५ श्रीनाथ - आंध्रनैषध ६ व वम्मन पोतराम - श्रीमद्भागवत. संस्कृत भागवत पुराण शैलींत तसें आंध्रभागवत प्रबंध शैलींत प्रसिद्ध आहे. ([म. ज्ञा. को. वि. १५])
सहा स्थानें भुक्ति आणि मुक्ति ह्मा दोन्ही प्राप्त करून देणारीं   
१ करवीर, २ विरूपाक्ष, ३ श्रीशैल, ४ पंढरीक्षेत्र, ५ श्रींरगम् व ६ सेतुबंध रामेश्वर.
करवीरं विरूपाक्षं श्रीशैलं पांडुरंगकम् ।
श्रीरङ्‌गं सेतुबन्धं च भुक्तिमुक्तिप्रदानि षट् ॥ ([करवीरमहात्म्य])
सहा प्रमाणें   
१ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ शब्द, ४ उपमान, ५ अर्थापत्ति व ६ अनुपलब्धि.
सहा प्रमुख अंगें संध्येचीं   
१ आसन, २ आचमन, ३ प्राणायाम, ४ मार्जन, ५ अर्व्यप्रदान व ६ जप व उपस्थान, (आर्यांची दिनचर्या)
सहा प्रमुख नीतिशास्त्रकार   
१ मनु, २ बृहस्पति, ३ शुक्र, ४ पराशर, ५ व्यास व ६ कौटिल्य.
सहा पशुधर्म   
१ आच्छादन २ भोजन ३ मैथुन ४ भय ५ निद्रा व ६ मोह.
छादन भोजन मैथुन। भय निद्रा मोह षटधर्मा ॥ ([पंचग्रंथी])
सहा पंथ गाणपत्य सांप्रदायाचे   
१ महागणपति पंथ, २ हरिद्रा गणपति, ३ उच्छिष्ट गणपति, ४ नवनीत गणपति, ५ स्वर्ण गणपति व ६ संतान गणपति पंथ. (अ. रा. सर्ग. ७-७)
सहा प्राचीन पुराणवेत्ते   
१ त्रैयारुणी, २ कश्यप, ३ सावर्णि, ४ अकृतव्रण, ५ वैशंपायन व ६ हारीत. ([भा. स्कंध १२-७-५])
सहा प्रीतिलक्षणें   
१ जो देतो, २ तसेंच घेतो, ३ आपलें गुह्म सांगतो, ४ तसेंच ऐकून घेतो, ५ पंक्तीला जेवतो, आणि ६ जेवूंहि घालतो. हीं सहा प्रीतिलक्षणें होत.
ददति प्रतिगृह्लाति गुह्ममाख्याति पृच्छति।
भुंक्ते भोजयते चैव षड्‌‍विधं प्रीतिलक्षणम् ॥ ([हितो. २-५१])
सहा प्रेरणा ग्रंथलेखनाच्या   
१ द्रव्य, २ कीर्ति, ३ अमंगल स्थितींतून मुक्त होण्यासाठीं, ४ सरकार - दरबारची लोकांना माहिती पुरविण्यासाठीं, ५ तात्कालिक आनंद व ६ उपदेश करण्यासाठीं, अशा सहा प्रेरणा अथवा प्रयोजनें आहेत.
सहा ब्रह्मवादी   
१ काश्यप, २ वत्सार, ३ विभ्रस, ४ रैभ्य, ५ असित आणि ६ देवल.
काश्यपश्वैव वत्सारो विभ्रमो रैभ्य एव च।
असितो देवलश्चैव षडेते ब्रह्मवादिनः ॥ ([वायुपु. ५९-१०३])
सहा भाग पृथ्वीचे   
१ द्यु २ पृथिवी, ३ अहन, ४ रात्रि, ५ उदक व ६ ओषधी ([ऋग्वेद मंडल ६-४७])
सहा भाव - जीवगर्भोत्पत्तीला कारणीभूत   
१ मातेचा भाव, व ६ सत्त्वाचा भाव ([ईशावास्योपनिषद - आर्य भैषज्य शास्त्र])
सहा महारथी (कौरवपक्षीय)   
१ कर्ण, २ भूरिश्रवा, ३ अश्वत्थामा, ४ वृषसेन, ५ कृपाचार्य व ६ शल्य
([म. भा. द्रोण. अ. ७५])
सहा महान दोष (आसुरी वृत्तीच्या मानवांचे)   
१ दंभ, २ दर्प, ३ अभिमान, ४ क्रोध, ५ दुष्टपणा आणि ६ अज्ञान, हे सहा महान् दोषा संख्येनें कमी असले तरी त्यांचा प्रभाव विषारी असतो. ([भ. गी. १६-४])
सहा मनोव्यापार कार्यान्वित होणारे विज्ञानाचे रचनेस आवश्यक   
१ निरीक्षण, २ विकलन (पृथक्करण), ३ संक्लन, ४ अमूतींकरण, ५ सामान्यीकरण व ६ समन्वय. (तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विवेचन पद्धति)
सहा मुख्य परिमेयें   
१ लांबी, २ क्षेत्रफळ (पृष्ठफळ) ३ अवकाश फळ अगर घनफळ (गर्मफळ), ४ वजन, ५ मूल्य व ६ काल. खेरीज घनता व शक्ति अशीं अनेक परिमेयें गणिताच्या उपशाखांतून द्दष्टीस पडतात. ([म. ज्ञा. को. वि. ९])
सहा राष्ट्रीय दुर्घटना   
१ अतिवृष्टि, ३ अनावृष्टि, ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें, ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण.
अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः।
प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ([सु.])
सहा लाभ (प्रवासापासूनच मिळणारे)   
१ तीर्थावलोकन, २ सर्वत्र परिचय, ३ वित्तर्जन, ४ नानाश्रर्यनिरीक्षण, ५ चतुरता आणि ६ संभाषणकुशलता. ([सु.])
सहा विघ्नें विद्येला येणारीं   
(अ) १ द्यूत, पुस्तकशुश्रूषा, ३ नाटकाची आसक्ति, ४ स्त्रीचा ध्यास, ५ सुस्ती आणि ६ झोपाळूपणा.
द्यूतं पुस्तकशुश्रूषा नाटकासक्तिरेव च।
स्त्रियस्तन्द्री च निद्रा च विद्याविघ्नकराणि षट् ॥ ([सु.])
(आ) १ स्वच्छंदीपणा, २ द्र्व्य, मिळविण्याचा मोह, ३ प्रेमसंबंधांत पडणें, ४ चैन, ५ उद्धटपणा आणि ६ आळस.
स्वच्छंन्दत्वं धनार्थित्वं प्रेमभावोऽथ भोगिता।
अविनीतत्वमालस्यं विद्याविघ्नकराणि षट् ॥ ([सु.])
सहा विघ्नें योगाभ्यासाच्या आड येणारीं   
१ अति आहार, २ विशेषश्रम, ३ फार बोलणें, ४ उपोषन (आवश्यक उपोषणाव्यतिरिक्त), ५ योगाम्यासी नव्हेत अशांची संगत व ६ मनाची अस्थिरता.
अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमग्रहः।
जनसंगश्च लोल्यं च षड्‌भिर्योगो विनश्यति ॥ (ह. प्र.)
सहा विकार देहाचे   
१ शोक, २ मोह, ३ क्षुधा, ४ तृष्णा, ५ जरा व ६ मरण.
सहा विषय (शिक्षेचे - उच्चार शास्त्र)   
१ वर्ण, २ स्वर, ३ मात्रा, ४ बल. ५ साम व ६ संतान (संहिता) ([ऋग्वेददर्शन])
सहा वीरांचे सहा सर्वप्रसिद्ध शंख   
१ श्रीकृष्ण - पांचजन्य, २ अर्जुन - देवदत्त, ३ भीमसेन - पौंड्र, ४ युधिष्ठर - अनंतविजय, ५ नकुल - सुघोष व ६ सहदेव - मणिपुष्पक, महाभारतकालीं अनेक प्रसिद्ध बीरांचे निरनिराळे शंख असत आणि सैन्याचे उत्साहवर्धनार्थ ते प्रस्फुरले जात. ([भ. गी. १-१५]) या व्यतिरिक्त परशुरामाचा"अमित्रजित् "नामक शंख होता असें वर्णन आढळतें. ([प्रा. च. को.])
सहा विकुंठ लोक   
१ नित्यवैकुंठ, २ पादविभूतिवैकुंठ, ३ विश्वक्‌‍सेन वैकुंठ, ४ ब्रह्मविद्यावैकुंठ, ५ तुलसीवैकुंठ व ६ बोधानंदवैकुंठ, ([ईशादि विंशोत्तरशतोपनिषदः])
सहा विष्णव (प्रातःस्मरणीय)   
१ बलि, २ बिभीषण, ३ भीष्म, ४ प्रह्लाद, ५ नारद आणि ६ धरुव.
बलिर्बिभीषणो भीष्मः प्रह्लादो नारदो धरुवः
षडेते वैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ॥ ([भा. रा. युद्धकांड])
सहा वाईट गोष्टी   
१ चांगलें काम न करणारा - शहाणा मनुष्य, २ धर्म नसलेला - म्हातारा, ३ आज्ञाधारक नसलेला - तरुण, ४ दातृत्वहीन - श्रीमंत, ५ विनय नसलेली - स्त्री आणि ६ कोणताहि गुण नसलेला - धनी.
सहा शककर्ते   
१ युधिष्ठिर, २ विक्रम, ३ शालिवाहन, ४ विजया - भिनन्दन (वैतरणी - सिंधुसंगमीं), ५ नागार्जुन व ६ कल्की ([करवीर]).
हे सहा सककर्ते म्हणून पुराणांत वर्णिले आहेत. पांच यापूर्वी होऊन गेले व सहावा होणार आहे.
युधिष्ठिरो विक्रमशालिवाहनौ। ततो नृपस्थो विजयाभिनंदनः ॥
ततस्तु नागार्जुनकल्किभूपती। कलौ षडेते शककारका नृपाः ॥ ([दर्शनप्रकाश])
आधुनिक कालांत छत्रपति शिवाजीमहाराज हे एक शककर्ते होत.
सहा शत्रुरूपी रोग वृद्धापकालाची वाट पाहणारे   
(मनुष्य शरिराच्या डाव्या बाजूला)- १ संभोगाचे रोग, २ चाळपुळी (कॅन्सर), ३ रक्ताशयाचे रोग, (उजव्या बाजूला)- ४ वेडेपणाचे रोग, ५ नाडयांचा लवचिकपणा जाऊन जाड व बरड होणें व ६ मूत्रपिंडाचे रोग.
सहा शास्त्रें जगताचा चरितार्थ चालविणारीं   
१ शिल्पशास्त्र, २ वैद्यशास्त्र, ३ सिद्धान्त (गणित) शास्त्र, ४ ज्योतिषशास्त्र, ५ कामशास्त्र आणि ६ ज्ञानशास्त्र. या सहा शास्त्रांच्या आधारानें लोक आपला निर्वाह करून घेतात.
सहा षाड्‌‍गुण्यसंपन्न सत्पुरुष   
१ वसिष्ठ, २ वामदेव, ३ नारद, ४ व्यास, ५ वाल्मीकि आणि ६ प्रह्लाद. हे सहा षाड्‌‍गुण्यसंपन्न पुरुष म्हणून पुराणांतरी प्रसिद्ध आहेत.
सहा संन्यासधर्माला दूशणें   
१ पलंग, २ शुभ्रवस्त्र, ३ स्त्रीकथा, ४ जिह्लालौल्य, ५ दिवसा निद्रा आणि ६ वाहनांत बसणें. या सहा गोष्टी यतिधर्माला बाधक आहेत. (अ. स्मृ.)
सहा साधनांनीं कर्माला धर्मत्व प्राप्त होतें   
१ सद‌‍गुरूपदेश, २ ईश्वरार्पित कर्म, ३ शुद्ध काल, ४ पवित्र स्थळ, ५ मंगलद्र्व्य आणि ६ वेदोक्त कर्म.
सहा सद्‌‍भ्रम   
१ कुल, २ गोत्र, ३ जाति, ४ वर्ण, ५ आश्रम आणि ६ नाम. हे सहा सद‌भ्रम होत. (मो. प्र.)
सहा स्वभावधर्म (देहाचे)   
१ आच्छादन, २ भोजन, ३ मैथुन, ४ भय, ५ निद्रा आणि ६ मोह. हे सहा देहाचे स्वभावधर्म मानले आहेत. (तत्त्व - निजबोधक - विवेक)
सहा सर्व प्रसिद्ध अशा सार्थप्रतिज्ञा   
१ भीष्मप्रतिज्ञा, २ भीमप्रतिज्ञा, ३ राणाप्रतापप्रतिज्ञा, ४ शिवरायप्रतिज्ञा, ५ लोकमान्य 'स्वराज्यप्रतिज्ञा, आणि ६ महात्मा गांधी -' चलेजाव' प्रतिज्ञा.
सहा सूत्र ग्रंथ व त्यांचे कर्ते   
१ जैमिनीयसूत्र - जैमिनि, २ आश्रलायन सूत्र - अश्वलायन, ३ आपस्तम्ब सूत्र - आपस्तंब, ४ बौधायनसूत्र - बौधायनं. ५ कात्यायनसूत्र - कात्यायन आणि ६ वैखानसीयसूत्र - कणाद. (तत्त्व - निज - विवेक)
सहा संस्कार गुण   
१ वैराग्य, २ ज्ञान, ३ ब्रह्मचर्य, ४ तप, ५ करुणा व ६ सदाचार (सूक्ष्मागम)
सहा सूत्र लक्षणें   
१ अल्पाक्षरत्व, २ असंदि‌ग्धता, ३ सारग्रहण, ४ विश्वतोमुखम् म्हणजे सामान्य सिद्धान्त सांगणें, ५ अस्तोभम् म्हणजे निरर्थक शब्दांचा अभाव आणि ६ दोषराहित्य.
हीं सहा म्हणजे त्या त्या शास्त्राच्या आचार्यांनीं लिहिलेले मूलग्रंथ - लक्षणें होत.
अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतोमुखम् ।
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ॥ (वेदान्त)
सहा स्त्रीचे आदर्शगुण   
१ कार्यप्रसंगीं मंत्री अथवा सल्लागार, २ गृहकृत्यांत दासी, ३ भोजनसमयीं माता, ४ रतिप्रसंगीं रंभा, ५ धर्माला अनुकूल आणि ६ धरित्रीप्रमाणें क्षमायुक्त, हे सहा स्त्रीचे आदर्श गुण होत.
कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा।
धर्मानुकूला क्षमया धरित्री, भार्या च षाड्‌गुण्यवतीह दुर्लभा ॥ ([सु.])
सहा स्थानीं क्षौर विहित आहे   
१ गंगेच्या कांठीं, २ भास्कर - क्षेत्रांत, ३ माता - निधनप्रसंगीं, ४ पिता - निधनप्रसंगीं, ५ यज्ञ आणि ६ सोमपान. या सहा स्थलीं व काळी क्षौर विहित मानलें आहे.
गंगायां भास्करे क्षेत्रे मातृपित्रोर्मृतेऽहनि।
आधाने सोमपाने च षट्‌‍सु क्षौरं विधीयते ॥ ([सु.])
सहाजण आततायी   
१ घर जाळण्यास आलेला. २ विष घलणारा, ३ शस्त्र घेऊन वध करावयास आलेला, ४ धन लुटून नेणारा, ५ स्त्री अपहर्ता ६ शेत हरण करणारा.
अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहः।
क्षेत्रदारापहर्ता च षडेते ह्माततायिनः ॥ (व. स्मृ. ३-१६)
सहाजण आत्मघातकी   
१ आळशी, २ गर्विष्ठ, ३ झोपाळू, ४ दुसर्‍याकडून लिहून घेणारा, ५ अल्पविद्या असलेला आणि ६ वितंडवादी.
सालस्यो गर्वितो निद्रः परहस्तेन लेखकः।
अल्पविद्यो विवादो च षडेते चात्मघातकाः ॥ ([भा. रा. युद्धकांड ५८-५])
सहाजणांना कन्या देणें अनुचित   
१ निकट असलेला, २ अति दूर असलेला, ज ३ अत्यंत धनवान् ४ अति दरिद्री, ५ उपजीविकेचें साधन नसलेला असा आणि ६ मूर्ख.
अत्यासन्ने चातिदूर अत्याढये धनवर्जिते।
वृत्तिहीने च सूर्खे च कन्यादांन न शस्यते ॥ ([स्कंद माहेश्वर २३-८])
सहाजण कार्य झाल्यानंतर अवमानित होतात   
१ शिक्षण संपल्यानंतर आचार्य, २ बायको आल्यानंतर आई, ३ कार्य झाल्यानंतर नियोजक, ४ प्रौढा नारी, ५ नदीपार गेल्यावर नाव आणि ६ रोगपरि - हारानंतर वैद्य.
सहाजण तें तें कार्य झाल्यानतंर अवमानित होतात. म्हणजे त्यांचा आदर राखला जात नाहीं. ([म. भा. उद्योग. ३३-८७-८८])
सहा जण गुरुसमान   
१ प्रेरणा करणार, २ सुचविणारा, ३ तोंडानें सांगणारा, ४ दाखवून देणारा, ५ शिकविणारा व ६ उपदेश करणारा. हे सहाजण गुरुसमान होत.
प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा।
शिक्षको बोधकश्वैव षडेते गुरवः स्मृताःअ ॥ (कुलागम)
सहाजण त्याज्य होत   
(अ) १ मृदु अंतःकरणाचा शासनाधिकारी, २ खादाड ब्राह्मण, ३ दुष्ट मनाचा सोवती, ४ आज्ञा मोडणारा नोकर, ५ कामांत गाफिल राहणारा अधिकार व ६ केलेलें न स्मरणारा ([पंचतंत्र]);
(आ) १ विवरण न करणारा आचार्य, २ अध्ययनहीन ऋत्विज, ३ रक्षण न करणारा राजा अथवा शासनाधिकारी, ४ अप्रियभाषिणी भार्या, ५ गांवांत राहूं इच्छिणारा गोपाळ (गुराखी) व ६ वनांतच राहूं इच्छिणारा नापित.
हे सहा त्यागार्ह होत. ([म. भा. उद्योग ३३-८०])
सहाजण दुसर्‍यादर उपजीविका करणारे   
१ चोर - बेसावध मनुष्यावर, २ चिकित्सक - व्याधिग्रस्तावर, ३ कुमार्गी स्त्रिया - विषयलंपटावर, ४ याजक - यज्ञ अथवा हव्यकव्य करणारांवर, ५ शासनसंस्था - परस्पर कलह करणारावर आणि ६ पंडित (विद्वान)- मुर्खावर. ([म. भा. उद्योग. ३३-८५])
सहाजण धर्मभिक्षुक होत   
१ पांथस्थ (प्रवासी), २ उपजीविकेचें साधन नष्ट झालेला, ३ विद्यार्थी, ४ गुरूचें पालनपोषण करणारा, ५ संन्यासी आणि ६ ब्रह्मचारी.
अध्वगः क्षीणवृत्तिश्च विद्याथीं गुरुपोषकः।
यतिश्च ब्रह्मचारी च षडेते धर्मभिक्षुकाः ॥ ([स्कंद ब्राह्मखंड])
सहाजण महान परोपकारी   
१ सूर्य, २ चंद्र, ३ घनदाट वृक्ष, ४ नदी, ५ गाय आणि ६ सज्जन.
रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाःअ।
एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः ॥ ([सु.])
सहाजण मदनाचे अवतार   
१ सुदर्शन, २ भरत, ३ प्रद्युम्न, ४ सांब, ५ सनत्कुमार व ६ स्कंद.
सुदर्शनश्च भरतः प्रद्युम्नः सांब एव च।
सनत्कुमारः स्कंदश्च षडेते काम एव च ॥ ([गुरुड ब्रह्म. २९-३६])
सहाजणांकडे रिकाम्या हातानें जाऊं नये   
१ राजा (अधिकारी), देवता, ३ गुरु, ४ ज्योतिषी, ५ लहान मूल आणि ६ मित्र. ([सु.])
सहाजण श्राद्धास वर्ज्य   
(अ) १ फलज्योतिषी, २ वैद्य, ३ पुराणिक, ४ कृषीवल, ५ गायक आणि ६ राजसेवक.
ज्योतिर्गण्यं तथा वैद्यं पुराणं कृषिकारिकाःअ।
गायको राज्यसेवाश्च षडेते श्राद्धघातकाः ॥ ([सु.])
(आ) १ मेहुणा, २ गोत्रज, ३ अतिवृद्ध, ४ व्यभिचारी व व्यभिचारी स्त्रीचा पति, ५ ज्ञानहीन आणि ६ मूर्ख.
शालाकश्च स्वगोत्रश्च अतिवृद्धश्च वृषलीपतिः।
ज्ञानहीनश्च मूर्खश्च षडेते श्राद्धघातकाः ॥ ([सु.])
सहाजण सर्वत्र (संगतीला) वर्ज्य   
१ निंदक, २ लबाड, ३ धूर्त, ४ दुष्ट, ५ दुष्कर्में करणारा व ६ तामसी.
निंदको वंदको धूर्गः खलो दुष्कृतितामसौ।
एते नाटकिनः प्रोक्ताःअ सर्वतः परिवर्जयेत् ॥ ([सु.])
सहाजणांच्या सहा सर्वप्रसिद्ध वीणा   
१ श्रीशिव - नालंबी, २ सरस्वती - कच्छपी, ३ नारद - महती, ४ गणपति - प्रभावती (गणानां तु प्रभावती) ५ विश्वावसु - बृहती आणि तुम्बर - कलावती. ([अमिधान चिंतामणि])
सहाजणांच्या स्मरणानें प्रवास सुखकर होतो   
१ वैन्य, २ पृथु, ३ हैहय, ४ अर्जुन, ५ भरत आणि ६ नल.
एतान् नृपान् यः पठति प्रयाणे।
तस्यार्थसिद्धिः फलदागमश्च ([सु.])
सहाजणी मातेसमान   
१ राजपत्नी, २ गुरुपत्नी, ३ मित्रपत्नी, ४ सती स्त्री, ५ सासू आणि ६ स्वमाता.
राजपत्नी गुरोः पत्नी मित्रपत्नी सती तथा।
पत्नीमाता स्वमाता च सर्वास्ताः मातरः स्मृताः ([सु.])
सहा घटक अन्नाचे   
१ पिष्ट पदार्थ, २ स्निग्ध पदार्थ ३ नैट्रोजनयुक्त पदार्थ (प्रोटीन), ४ क्षार, ५ पाणी व ६ जीवनसत्त्वें. (विज्ञानपरिचय)
सहा अवस्था प्रीतीच्याअ   
१ प्रेम, २ मान, ३ प्रणय, ४ स्नेह, ५ राग व ६ अनुराग.
प्रेमा मानः प्रणयं स्नेहो रागोऽनुरागः - इत्युक्तेः॥
सहा दुर्गुण   
१ आळस. २ निद्रा, ३ भय ४ तृष्णा, ५ क्रोध व ६ कामः हे सहा दुर्गुण नाहींसे करण्याकरितां पुढचे दांत समांतर रेषेंत सारखे करण्याची एक प्रथा बाली बेटांत आहे. ([स्त्री नोहेंबर १९६३])
सहा प्रकार भक्तीचें   
१ श्रद्धाभक्ति, २ नैष्ठिकय भक्ति, ३ अवधान भक्ति, ४ अनुभव भक्ति, ५ आनंदभक्ति आणि ६ रमरस भक्ति, ([विवेक चिंतामणि द्वितीय परिच्छेद])
सहा प्रमुख वर्ग अन्न पदार्थांचे   
(त्यांतील घटक द्रव्यांप्रमाणें)- १ पिष्टप्रधान, २ नत्रप्रधान,- अंकुरित धान्यें, कंदमूळांतील जीवनरस इ. ३ स्नेहप्रधान - दूध वगैरे, ४ शर्करा प्रधान - फळांतील रस ५ शर्कराम्ल प्रधान - आम्ल फळांतील जीवनरास व ६ क्षार प्रधान - फळभाजी पालेभाजी इ. ([कौटुंबिक स्वास्थ्यांतून जागतिक शान्ति])
सहा प्रकार स्वागताचे   
१ नुसतें बसविणें - बसा म्हणणें, २ हाताला धरून बसविणे, ३ जवळ बसविणें, ४ हाताला धरून जवळ बसविणें, ५ अतिजवळ बसविणें व ६ हाताला धरून अति जवळ बसविणें, यानें प्रेम व आदर याचें प्रमाण प्रदर्शित केलें जातें.
([गूढार्थ चंद्रिका])

६     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : छ

Related Words

ब-६-जीवनसत्त्व   ब-६      6   सहा   ६ तारीख   छ ६   half-dozen   adermin   vitamin b6   pyridoxal   pyridoxamine   pyridoxine   vi   six   half a dozen   captain hicks   hexad   sestet   sextet   sextuplet   sise   sixer   وِیٹامِن بی 6   षष् ‍   વિટામિન બી-૬   छह   बी6 जिवनसत्व   विटामिन बी6   ଛଅ   ভিটামিন বি6   ଭିଟାମିନ ବି୬   ਛੇ   ਵਿਟਾਮਿਨ ਬੀ6   ছয়   ആറ്            ஆறு   ಆರು   nylon 6   सुघटी   sixty-fourmo   इलाकी   अंबोली   गुडशस्त्र   चक्षुस् मानव   इराडें   दुवारणी   द्विजिह्र   नातक   नामेवहि   पाण्यांत बोडका बुचकळणें   पाण्यांत बोडकी बुचकळणें   पाण्यांत बोडकें बुचकळणें   पाताळ लव्हाळा   शित्ता   वोळंबणें   fructose-1, 6-diphosphate   fructose-6-phosphate   glucose-6-phosphate dehydrogenase deficiency disease   अंचेलियां   आपुलीक   चैकलदोडकी   चोंटणें   चोंढणें   चोकडी   जसोऊ   कवकवा   इंद्रजिह्र   अरिष्टसेन   कंदराकंदल   कुडतर   फरेब देणें   पट खळणें   राकव   वहचणी   वेवारणें   वोनामा   सित्त   सीगट   सरगुंटलो   गैरराह   गैरराहा   आराटी   आरुवार   आरुवाळ   आव्हाटणें   जानोसें   जिरगें   अटुवें   अडास   गदाणा   चिपली   तद्दन   तांबार   तालीकचा   तिकाडी   तुडताळ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP