|
पु. १ चाकर ; नोकर ; कामीं येणारा , हाताखालचें हलकें काम करणारा माणूस . २सेवन पहा . [ सं .] सेवकिनी - स्त्री . दासी ; मोलकरीण . सेवकै - स्त्री सेवाधर्म .. सेवणें --- सक्री . १ उपयोग करणें ; कामावर योजनें ; सेवा - चाकरी करणें ; पूजा करणें आदर दाखविणें . २ उपभोग घेणें ; भक्षण करणें ; खाणें सेवन करणें ; [ सं . सेवन ] सेवन --- न . १ चाकरी ; चाकरी करणें . २ उपयोग ; उपभोग ; स्वीकार ; अनुभव घेणें ; कामी लावून पहाणें ( वस्तु , उपाय , योजना , औषध , अन्न इ० ) हें औषध सेवर कर . ३ शिवणें ; दोरा घालणें . ४ पूजा , उपासना , करणें . सेवनीय --- वि . पूजा करण्यास , आज्ञा पाळण्यास , सेवा करण्यास , उपयोगांत आणण्यास , उपभोगण्यास योग्य . सेवा --- स्त्री . १चाकरी ; नौकरी ; दास्य . २ पूजा ; मान ; आदर . देवाची चाकरी ; उपासना . ४उपयोग ,[ सं .] ०चोर - वि . सेवेंत अंतर पाडणारा . ०दल - न . स्वयंसेवकांचे पथक . ०धर्म - पु चाकरीचें काम . ०धार - पु . सेवेकरी . सेविका --- स्त्री . १ स्त्रीव्यंसेविका . २ इस्पितळांत रोग्याची शुश्र्षा करणारी स्त्री . ( इं .) नर्स सेवित --- वि . सेवन केलेलें ; चाकरी झालेलें . सेवी - वि . सेवा . चाकरी , उपयोग करणारा , उपभोग घेणारा . ( समासांत ) तीर्थ - औषध - सेवी . सेवेकरी - पु चाकर ; विशेषत : देवांची सेवा करणारा ; पुजारी ; उपासक . सेव्य - वि . सेवनीय . सेव्याठाय --- पु . ( संकेतानें ) ब्रह्मशर .
|