|
स्त्री. १ ( संगीत ) रागाचा आरोह व अवरोह ह्या मधील स्वरसंख्येवरून रागाचे जे प्रकार होतात ते प्रत्येकीं . त्यांची संख्या ९ आहे . त्यांचीं नांवें - संपूर्ण - संपूर्ण , संपूर्ण - षाडव , संपूर्ण - औडुव , षाडव , औडुव - औडुव २ ( संगीत ) न्यास , अंश , ग्रह , इत्यादि स्वर , तसेंच ताल , कला , मार्ग हे ठराविक असून अमुक एक रस उत्पन्न व्हावा अशी योजना ज्या एखाद्या नियमबध्द स्वररचनेंत असते ती . हिचे प्रकार दोन - शुध्द जाति व विकृत जाति . ३ ( संगीत ) मात्रानियमावरून तालांचे झालेले प्रकार प्रत्येकीं . ह्या जाती पांच आहेत :- चतुरस्त्र , त्र्यस्त्र , खंड , मिश्र व संकीर्ण . [ सं . जाति ] स्त्री. १ जात ; प्रकार ; वर्ग . २ वंश ; कुळ ; बीज . ३ वर्ण . जात पहा . ४ ( गणित ) अंश व छेद यांचें एकीकरण . उदा० विशेष - शेष जाति . ५ ( साहित्य ) एक अलंकार . संस्कृत आणि प्राकृत या दोहोंतहि सारखेच वाचले जातील अशी अक्षरांची रचना . ६ छंदांचा एक वर्ग . हा मात्रासंख्याक असून , षण्मात्रिक तालाचा व अष्टमात्रिक तालाचा असे याचे दोन प्रकार आहेत . [ सं . ] ०दंड पु. १ जातीनें लादलेला कर . २ जातिबहिष्कृत माणसानें शुध्द झाल्यावर जातीला द्यावयाचा दंड . ०पक्ष पु. समुदायरीत्या जात , वर्ग , वंश ( सबंध जात एक धरून विचार करतांना ). याच्या उलट व्यक्ति पक्ष = एकटा माणूस . ०बंधु पु. जातींतील माणूस ; जातभाऊ ; जातभाई ; ज्ञातिबांधव . ०भेद पु. वंशभिन्नत्वावरून , वर्णभिन्नत्वावरून अगर निरनिराळया उद्योगधंद्यांवरून समाजाचे जे वेगवेगळाले गट बनले आहेत त्यांस जाती म्हणतात . जातीमधून भिन्न भिन्न प्रकार , आचार , रूढी उत्पन्न होतात . त्यामुळें जातिभेद उत्पन्न होतात ; जातींमधील भिन्नत्व ; असमानता . ०भ्रंश पु. जातिबहिष्कृत होणें ; जातीस मुकणें . ०भ्रष्ट वि. जातिबहिष्कृत ; जातिबाह्य ; बाटगा . ०मर्यादा स्त्री. जातीचे नियम ( चालचालणुकीचे ); जातीनें घालून दिलेलें बंधन . ०लक्षण न. जातीचे विशेष किंवा सामान्य गुणधर्म ; जातीची दानीचा ; घरंदाज ; कुलीन , उत्कृष्ट किजविज करिताती जातिवंत पाखरें । - सला ४१ . २ जातलग पहा . ०वाचक वि. १ ( व्या . ) वर्ग - प्रकार - भेददर्शक ( संज्ञा . ) याच्या उलट व्यक्तिवाचक . २ सामान्य , वर्गवाचक ( नाम ) ०वैर न. जन्मत : स्वाभाविक वैर . ०व्यवहार वेव्हार - पु . विशिष्ट समाजामध्यें प्रचलित असलेल्या नीतिमार्गाचें आचरण कीं जातिवेव्हारा परौता । - ऋ १४ . ०स्मृति स्त्री. पूर्वजन्मस्मरण मग जाहली जातिस्मृती । - गुच ११ . ९२ ०स्वभाव पु. १ कुळाचा , जातीचा , वर्गाचा स्वभाव ; जातिलक्षण . २ जन्मस्वभाव ; प्रकृतिस्वभाव . जातीचा - वि . १ जातीनें ; जातीसंबधानें . हा जातीचा ब्राह्मण आहे . २ जन्मस्वभावाचा , प्रकृतीचा जन्मत : च जातीचा - भला खरा - आंधळा - पांगळा - रोगी . जातिवंत ; अस्सल . तुका म्हणे तेथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचे काम नोहे . - तुगा ३५८७ . ३ खानदानीचा ; मोठया कुळांतला . म्ह० १ जातीची खावी लात परजातीचा नको भात २ जातीकरितां खावी माती जातीचें लेकरूं - न . ( ल . ) लुच्चा माणूस ; लबाड माणूस . ०पुती पूत - स्त्री . वंश ; कुळी , जातपूत पहा . म्ह० जाती तशी पुती , खाण तशी माती . ०पुतीचा वि. खानदानीचा ; कुलीन . जातीय - वि . जातीसंबंधाचा ; जातीचा . साधूस स्वजातीय व विजातीय सर्वसमान आहेत . वृक्ष - ब्राह्मण - पाषाण जातीय इ०
|