|
पु. मालक ; अर्क . - मुधो . ( अर ._ वि. उत्पन्न केलेला ; विशेषत : सामासांत उपयोग . उदा० वृक्ष - फल - जल - कमल - जात . लक्ष्मीपासून जात जो अभिभान तो दारिद्रयानें जातो . जेव्हां जा हें समासामध्यें दुसरें पद असतें तेव्हां त्याचा अर्थ - च्यापासून उत्पन्न झालेला , जन्मलेला असा होतो . परंतु जेव्हां पहिलें पद असतें तेव्हां - ला झालेला असा अर्थ होतो . जसें - पक्षी जातपक्ष झाले म्हणजे आईला सोडतात . याप्रमाणें जातक्रोध , जातकाम , जातलोभ = क्रोधानें , कामानें , लोभानें आविष्ट व क्रोधजात , कामजात , लोभजात = क्रोधापासून इ० झालेला . असे दोन्ही प्रकारचे समास वाटेल तितके होतात . जसें - जात - गर्भ - भोजन - अभ्यंग - संस्कार - आनंद - रोमांच - दु : ख - सुख . इ० . स्त्री. स्वत : आतां मदार नाना यांचे जातीवर आहे . - ऐटी १ . २५ . [ अर . झात ] ( वाप्र्र . ) आपले जातीवर करणें , जातीवर करणें - स्वत : च्याच अकलेनें , शक्तीनें आणि साधनांनीं कोणतेंहि कृत्य करणें वडिलांचा पैका न वेचतां यानें आपले जातीवर लग्न केलें . जातीवर करणें , जातीवर घेणें , जातीवर देणें , जातीवर करणें , जातीवर भांडणें = स्वत : च्या शक्तीनें , सामर्थ्यानें करणें सामाशब्द - क्रि.वि. गुणविशेषणाचे पूर्वी जोर येण्यासाठीं एक या शब्दासह लाविलेला उपसर्ग . जसें - एकजात पांढरा - पिवळा - मऊ = पूर्ण पांढरा पूर्ण पिवळा , पूर्ण मऊ . [ जात = कार ] स्त्री. १ प्रकार ; वर्ग ; कूळ . वंश याचे गाण्याची जात निराळी , त्याचे निराळी . २ जन्मस्वभाव . मूळस्वभाव , अंगचागुण तो अट सोडणार नाहीं त्याची जातच अशी . ३ चातुर्वर्ण्यांतील ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र या चार किंवा यांच्यांतील अनेक पोटजाती . जाति पहा . ४ रज : कण ; बिंदु ; तिळमात्र ( नकारार्थी उपयोग ). ( तुल० इं . जॉट ). त्याचे अंगीं शहाणपणाची जात नाहीं . - न . समुदाय ; जमाव ; समूह ; समुच्चय ; संघ . तैसा विषय जातांचा गरा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । - ज्ञा १६ . ९० . नेहमीं समासांत उपयोग . याचीं उदाहरणें असंख्य आहेत जसें - वस्त्रजात = सर्व प्रकारचीं वस्त्रें ; वस्त्रांतील सर्वप्रकार , नमुने ; वस्त्र या नांवाखालीं येणारे सर्व ; याचप्रमाणें धातु - शब्द - गुण - अर्थ - द्रव्य - जात इ० . [ सं . जात ] ( वाप्र . ) जातीवर जाणें , जातीवर येणें - मूळस्वभावाप्रमाणें करणें ; स्वभावांत बदल न करणें ( निंदार्थी योजतात ) म्ह० १ जात बाटली म्हणून जात थोडीच बाटली . सामाशब्द - ०इनाम न. स्वत : च्या हयातीपुरतें , वंशपरंपरेचें नव्हे असें , सरंजामी नव्हे असें इनाम . ०करी पु. जातींतला माणूस , ज्ञातिबाधव . ०कतबा पु. ( कायदा ) जातमुचलका ०कुळी कूळ - स्त्रीन . जात आणि वंश यासंबंधीं सर्व माहिती ( लग्नाच्यावेळीं ही शोधून काढून हिचा विचार होतो ). मुलगी सुरूप नव्हे पण जातकुळी चांगली म्हणून करितों . ०गंगा जमात - स्त्री . एकंदर सर्व जात ; एकत्र जमलेली सर्व जात ( जातींत घेणें , बाहेर टाकणें इ० प्रश्नांचा विचार करण्यासाठीं ). जातगंगेला व लोकगंगेला भ्यालें पाहिजे . - भाऊ १९ . [ जात + गंगा ; जात अर . + जमाअत ] ०खूद क्रिवि . ( अप . ) जातखत - द : स्वत : संबंधीं . जातनिशीं - क्रिवि . खास स्वत :; खुद्द आपण ; जातीनें . निसबत - स्वत : लिहून दिलेला लेख . क्रिवि . स्वत : खुद्द ; जातीनें . ०गोत न. स्वत : ची जात आणि स्वत : च्या गोत्रांतील माणसें याबद्दल समुच्चयार्थी आपल्या जातीचीं माणसें . त्याला प्रायश्चित्त दिलें तेथें सर्व जातगोत मिळालें होतें . ०पत्र मुचलका - नपु . स्वत : च्या नांवानें केलेला करार , करारनामा ; स्वत : ची लेखी जबानी ; स्वत : संबंधी करारपत्र . [ अर . झात ; तुर्की मुच्छका , मुचल्का ] मुखतार - वि . १ स्वैर ; अगदीं स्वतंत्र ; बंधनापासून मुक्त . २ कुलमुखत्यार ; कुलकारभारी . ३ जातचौगुला - पाटील . ०चावडी स्त्री. सरकारी गांवचावडीखेरिज स्वतंत्र एखाद्या जातीनें बांधलेली चावडी , निवाडाकचेरी . सार्वजनिक कामासाठीं गांवचावडयाखेरीज स्वतंत्र जातचावडया बांधल्या . - गांगा ५५ ०मुबारक स्त्री. खुद्द ; श्रीमंत ; राजा ; स्वामी . सरकारचें जात - मुबारकेचें लक्ष सोडून जे असतील त्यांचा बंदोबस्त मनोदयानुरूप केला जाईल . - रा ७ . २९ . ०चौगुला पु. जातींतल्या , जातपंचायतींतल्या अम्मलदारांतील प्रमुख - गांगा २८ . जेवण - न . सर्व जातीला दिलेलें जेवण ; जातींतील सर्व माणसांची पंगत ; ज्ञातिभोजन . ०व्यवहार पु. जातीनें व्यवहार करण्यास योग्य , पंधरावर्षानंतरचा तरुण माणूस ; कायद्यांत आलेला ; सज्ञान ( सांप्रत एकवीस वर्षाचा ). ०सरंजाम जागीर - पु . लष्करी चाकरीबद्दल स्वत : चा पगार म्हणून मिळालेली नेमणूक किंवा इनाम ; जेवढा उत्पन्नाचा भाग शिलेदाराचे , सरदाराचे अगर मुत्सद्याचे जातीचे निर्वाहार्थ दिला असतो तो ; जातीनिशी लष्करी चाकरी केली पाहिजे या करारावर दिलेला सरंजाम . जातीनें - क्रिवि . १ स्वभावत : जन्मस्वभावानें ; प्रकृत्या . २ स्वत : खुद्द . लढाई घेऊं जातीनें - ऐपो ३९१ . तो जातीनें बोलावूं आला त्यापेक्षा भोजनास गेलें पाहिजे . जातीचा - स्वत : चा . इंद्रोजी कदम ... जातीचे घोडयास चांदीचे नाल करून नालबंदी करीत होता . - मदरु १२५ . ०पंच पु. जातींतील प्रमुख अधिकारी . वडर , कैकाडी , कोल्हाटी कुंचेवाले वगैरे जातींत ब्राह्मणाला न बोलावतां जातपंच लग्नें लावितात - गांगा ११३ ०पाटील पु. जातीनें नेमून दिलेला मुख्य अम्मलदार ; जातचौगुला पहा . ०पात स्त्री. १ जातकुळी , जातगोत पहा . त्याची जातपात समजल्यावांचून आम्हीं पंक्तीस घेणार नाहीं . २ जातगंगा पहा . ३ बहिष्कृत माणसानें जातींत परत यावयाच्यावेळीं जातीला घातलेलें जेवण . जातजेवण . ०पूत स्त्री. जात आणि वंश . जातकुळ . जातगोत पहा . [ सं . जाति + पुत्र ] जातपूतचा - वि . शुध्द वंशाचा , बीजाचा , कुलीन . ०भाई भाऊ - पु . जातिबांधव ; स्वजातीय माणूस . आपल्या जातभाईच्या हिताकरितां सरकार त्या सवडीचा कसा दुरुपयोग करिते ... - टि १ . ५०२ या गांवांत त्याचा कोणी जातभाऊ असता तर उपयोगी पडता . ०लग वि. १ मोठया कुळांतील , जातींतील ( जनावरें , फळें ) त्या गईपेक्षां - पेरूपेक्षां - ही - हा जातलग आहे . २ ( क . ) स्वत : च्या जातीचा ; जातीसंबंधाचा . ०वार क्रिवि . जातीप्रमाणें निरनिराळे ( कर , नोंद , निवडणूक , प्रतिनिधि )
|