|
उ.क्रि. १ भक्षणें , जेवणें . २ तनाखोरी करणें ; गिलकृत करणे ; लांच खाणें ; हरामखोरीनें किंवा लबाडीनें आत्मसात करणें . ३ गिळणें ; गटट करणें , ग्रासणें ; चट्त करणेखं . ४ घेणें ; फस्त करणें ( इमारत सामानसुमान संपविते तसें ). ' त्या घरानें हजार वांसे खाल्ले ' ५ सोसणें ; सहन करणें ( मार , उष्णता , थंडी ). ' त्यानें एक छडी खालोली .' ६ आंत घेणें ( हवा ); ७ घेणें ( शपथ ); ८ ग्रासुन टाकणें ; पुर्णपणे वश करणें . ( औषध मनुष्य ). ९ पराभव करणें . ' काशीकरानें रंगनाथशास्त्र्यास एका क्षणांत खाऊन टाकलें .' १० गाळणें , टाकणें , सोडणें ( बोलण्यांत अथवा लिहिण्यांत अक्षरें ११ चावणें ; डसणें .' साप खाई पोट रितें = दुसर्यास चावल्यानें सापाचें पोट भरत नाहीं . ( कुत्री , विषारी किरडे , कोडे , जिवाणुं यांच्याहि चावण्यास लावतात . तसेंच शारीरिक अस्वच्छेतबद्दल योजतात . ' मळ खातो , उवा खातात , पिसा खातात .= उवा , पिसा ह्या माझ डोकें ( डोकसें , डोसकें , शीर ) खातात म्हणजे चावतात त्रास देतात ). १२ तोडणें ; टोचण ; मनाला बोचणें ; ( पाप , गुन्हा , मन , पाप , बुद्धि ).' कीं पापियासि निज पातक जेंवि खातें । ' १३ ( ल .) कुरतुडणें ; डवचणें ; तोडणें ( वाईट अन्न , पित्त , मानहानीचं भाषण ). १४ एखाद्याजोखमीच्याकामानें एखाद्याचा नाश करणेम ; या कंत्राटानें त्याला पुरें खाल्लें .' १५ खर्च करणें . ' तुं माझा अर्धा तास खाल्लास . १६ मारणें ; बळकावनें . ' वविरानें उंट खाल्ल .' १७ भोगणें ; सेवणें ( विसावा , चैन ). - अक्रि . १ भक्षणें ; भक्षणें आणि जगणें ; अन्न घेणें , घालणें ( भोजन करणें असा या क्रियापदाचा अर्थ होत नाहीं . ' जेवणें ' पहा .) २ दुखणें ( डोकें , डोसकें , डॊई , शीर , माथा , कपाळ इ० ) - अकर्तृक क्रि . ( ला . शीं . जोडुन ). कोणी खातो . तोडतो अशी आंत भावना वेदना , होणें . ( सं . खाइन ; प्रा खाण ; सिं ; खाइणु ; तुल० फा . खाईदन = कुरतडणें ) ( वाप्र .) खाईन खाईन करणें - अधाशीपणा करणें ; खाण्यास धाधावलेला असण ; खा खा करणें . खाऊन ढेकर देणें - दुसर्यास वस्तुचा अभिलाष धरुन ती आपलीशी करणें , गिळंकृत करणें , आत्मसात करणें , खाण्यामुळें हीनशक्त होणें - खाण्याच्या अभावामुळें अशक्त होणें . खाण्या तुटणें - क्षुधा किंवा पचशक्ति कमी होणें . खायाप्यायांच दिवस - तारुण्यांतील आनंदाचें व उल्हासाचें दिवस ; आयुष्यांतील सुखाचे दिवस जीव - प्राण - खाणें - दुसर्य़ास फार त्रास देणें . दांत ओठं खाणें - अतिशय रागावनें म्ह० १ खाई त्याला खवखवे ( खव खवणें म्हणजे घशांत कंडु सुटणें यावरुन )= जो वाईट काम करतो त्याच्या पोटांत तें डांचत असतें असा अर्थ ; चोराच्या मनांट चांदणें . २ खाईन तर तुपाशी नाहीं ता उपाशी = मी म्हणेन तें ऐकलें तर ठीक आहे , नाहीतर मी रुसुन बसणार असा हट्ट घेऊन बसणें याअर्थी . न. खाद्य ; अन्न ; खाण्याची वस्तु . ०जेवणें - न . १ ( सरसकट ) खाद्यपदार्थ ; खावयाचा माल ; अन्न . २ खाण्याची क्रिया ; भोजन . ' त्या गांवांत खाण्याजेवण्याची सोय आहे काय ? ०पिणे न. ( खाणें व पिणें .) १ खाणें जेवणें पहा . २ सुखानें असणें . हें त्याचें खाण्यापिण्याचें दिवस !'
|