|
न. १ एक भयंकर मारक द्रव्य ; जहर ; वीख . याचे नऊ प्रकार मानतात ते - कालकूट , हलाहल ; सौराष्ट्रिक , ब्रह्मपुत्र , प्रदीपन , काकोल ( शृंगक ), वत्सनाभ ( बचनाग ), शौक्तिकेय , ( सक्तुक ), दारद ( हरिद्र ). तसेच याचे स्थावर व जंगम असे भेद आहेत . २ ( ल . ) अत्यंत कडू पदार्थ ; घातक , मारक , बाधक अहितकारक पदार्थ . ३ ( ल . ) ज्यापासून अपाय , घात होण्याचा संभव आहे असें द्रव्य , संपत्ति वगैरे पदार्थ . [ सं . विष् = पसरणें ] विष मानणें - अत्यंत तिरस्कार , तिटकारा करणें . विषाची परीक्षा पाहणें - एखादा भयंकर प्रयोग , साहस , धाडस करणें . सामाशब्द - ०कंठ पु. शिव ; शंकर . [ सं . विष + कंठ ] ०घटी स्त्रीअव . ( ज्यो . ) नक्षत्रांच्या अशुभ मानलेल्या चार घटिका . घ्न - वि . विषमारक ; विषनाशक ; विषहारक ; विष उतरणारें . ०द वि. विष देणारा . ०दग्ध दिग्ध - वि . विषयुक्त ; विष लावलेलें . राजा सुधन्वा आमच्या हृदयांत विषदग्ध बाणाप्रमाणें सलत आहे . - सुधन्वा नाटक ६ . ०दृष्टि स्त्री. घातक , मारक , नाशक नजर ; ज्यावर पडेल त्याचा नाश करणारी नजर . - वि . घातक नजर असलेला . ०नाशक वि. विष उतरणारें ; विषाचा परिणाम कमी करणारें . ०पदार्थ पु. विषारी , घातक , मादक पदार्थ ; विष . ०प्रयोग पु. विषाचा उपयोग ; विष देऊन , चारून , घालून मारण्याची क्रिया ; विषाची योजना . ०वल्ली स्त्री. १ विषारी वेल . २ ( ल . ) दुष्ट , द्वेषी मनुष्य . वैद्य - पु . विषबाधेवर उपचार करणारा ( वैद्य , मांत्रिक ). ०व्रतति स्त्री. विषवल्ली . ०हर हारक अपहारक - वि . विषाचा परिणाम नाहींसा करणारा ; विष उतरणारा . विषाचा मोहरा - पु . जहरी मोहरा . ( इं . ) बेझोर .
|