|
वि. लघु ; सान ; अल्प ( वय , किंमत , सामर्थ्य इ० नी ). आखूड ; छोटा ( आकार , प्रमाण इ० नी ). अल्प ; थोडा . [ सं . लघु . प्रा . लहु ] म्ह० ( व . ) लहानशी बुटली सांजसकाळ उटली = घरी नवरा बायको दोघेच असल्यामुळे ज्यास फारसा खर्च नसतो अशास म्हणतात . ( वाप्र . ) लहान तोंडी मोठा घास घेणे - आपला लहान दर्जा न ओळखतां एखादी मोठी गोष्ट करणे ; आपल्याकडून होण्याजोगे नसलेले काम करावयास सिद्ध होणे . सामाशब्द - ०केळी स्त्री. एक वनस्पति . देवकेळी पहा . ०खुरी वि. लहान पायाची ( गाय , बैल इ० . ) लहान बांध्याची ; ठेंगणीठुसकी . लहानखुर्या ठेंगण्या देखण्या त्या कां होईना त्या राजी । - सला ४३ . [ लहान + खूर ] ०गा वि. धाकटा ; अधिक बुटका - आखूड - लहान - तरुण ; ( तारतम्याने ) कमी ( उंची , लांबी , वय इ० कांत ). छोटा ; बुटका ; आंखूड ; लहान . ( तारतम्याशिवाय ) [ लहान + गा प्रत्यय ] ०झारडी पु. ( कों . ) एक मासा . ०थोर मोठा वि . लहान आणि मोठा ; प्रत्येक आकाराचा , वयाचा व जातीचा ; एकंदर . ०पण पणा नपु . लघुता ; हलकेपणा . लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । बाळपण . [ लहान ] ०बापा पु. ( खा . ) बापापेक्षां लहान असणारा चुलता . [ तुल० कानडीत चिक्क अप्पा , दोड्ड अप्पा ( लहान बाप , मोठा बाप ) असे शब्द धाकट्या व मोठ्या चुलत्याला वापरतात . ] ०लहू लोहू लव वि . लहुलहान पहा . ०वी स्त्री. ( वयाचा , आकाराचा ) लहानपणा . ( ल . ) हलकेपणा ; लघुत्व ; थोरवी , मान्यता , गौरव यांचा अभाव . [ लहान ] ०वीरथोरवी स्त्री. तुलना करतांना दाखविले जाणारे दोन माणसांतील ( मुख्यत्वे ) वयाचे अंतर ; दोन वस्तूंमधील तुलनात्मक अंतर ; असमता . स्त्री - पुरुषाची दोहो वर्षांची लहानवी थोरवी असावी . ०सर वि. लहानसा ; कांहीसा लहान . हे घर लहानसरच आहे पण टुमदार आहे . [ लहान ] ०सहान वि. बारीकसारीक ; लहान , हलका इ० ( व्यापक व सामान्य अर्थी ). [ लहान द्वि . किंवा लहान + साना ] लहाना वि . लघु , लहान पहा . [ लहान ] लहानावळणे , लाहानावळणे अक्रि . कमी , अधिक लहान , अधिक अशक्त इ० होत जाणे ; घटणे . पाऊस लहानावला म्हणजे मग जा . क्षीणक्षीण , बारीकबारीक होणे ( विझणारा दिवा ). लहान प्रमाणांत येणे ; संकुचित होणे ( जवळचे भाग सुजले असतां , डोळा ). [ लहान ] लहानाळ - वि . ( राजा . ) सामान्य प्रमाणापेक्षा लहान बांध्याचा ( मनुष्य , पशु इ० ). [ लहान ] लहानाळणे - सक्रि . अधिक लहान - आखूड - अशक्त - मंद - कमती - करणे ( शब्दशः व ल . ). आपण भ्रमे लहानाळला । - दा ९ . ३४ . [ लहान ]
|