Dictionaries | References

म्हातारा

   
Script: Devanagari

म्हातारा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   We ought always to have some senior with us as our counselor.

म्हातारा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Old, aged; the old fellow.

म्हातारा

 वि.  जरठ , बुढ्ढा , वयस्क , वयातीत , वयोवृद्ध , वृद्ध .

म्हातारा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : वृद्ध, वृद्ध

म्हातारा

 वि.  
   वृद्ध ; वयोवृद्ध ; वयस्क . म्हातार्‍यानें केलें नांव .
   पुनर्वसु नक्षत्राबद्दल शेतकरी लोक म्हणतात . तसेंच पुष्य नक्षत्राला तरणा अशी संज्ञा देतात .
   एक प्रकारचें गवत . - बदलापूर १६१ . [ सं . महत्तर ] म्हातार्‍यास पिपांत ठेविलें पाहिजे किवा पेटींत अगर कंठाळीत घालून नेलें पाहिजे - आपणाला सल्ला देण्यासाठीं आपणाबरोबर नेहमी वयोवृद्ध माणसें असावयास पाहिजेत . म्हातारपणीं ढोवळा मणी - ( व . ) म्हातारपणीं कशाला शृंगार हवा . म्हातार्‍याबगर काणी जायना - ( गो . ) म्हातारा मनुष्य असल्याशिवाय कहाणीसारख्या ठराविक गोष्टी पार पडत नाहींत . म्हातार्‍याच्या बायकोस तांबटाच्या रोट्या - म्हातारील धड खाण्यास अन्न व नेसण्यास वस्त्र मिळत नाहीं . तिला उरलेंसुरेंलच खावें लागतें . म्हातार्‍या माणसाचें लोणचें घालून ठेवावें - सदुपदेश पाहिजे असेल तर म्हातार्‍या माणसाचा सल्ला घ्यावा . म्हातारखंड - न . म्हातारा शब्दाचें तुच्छतेचें रुप ; निंदेनें म्हातार्‍यास म्हणतात . म्हातारचळ - पु . म्हातारपणीं बुद्धीस होणारी विकृति ; म्हातारपणीं होणारा बुद्धिभ्रंश ; साठी बुद्धि नाठी ; पिसें ; चाळे ; तारे ; म्हातारपणीं बुद्धि बावचळणें . म्हातारडा , म्हातारडुक - वि . थेरडा ; मूर्ख म्हातारा अशा अर्थी ; तुच्छतादर्शक म्हातारा या अर्थी ( स्त्री , पुरुष या दोहोंबद्दल उपयोग ); म्हातारखंड . म्हाताराकोतारा - वि . म्हातारा ( द्विरुक्तीनें ); वृद्ध आणि वयस्क ; म्हातारा आणि अशाचसारखा . म्हातारी - स्त्री .
   वृद्ध स्त्री ; वृद्ध आई ; जरठ स्त्री .
   बोडकी ; केस भादरलेली विधवा स्त्री ( तरुण किंवा म्हातारी कशीहि असो इजबद्दल उपहासार्थी योजावयाचा शब्द )
   कापसाचा हलका पुंजा किंवा हलकें पीस ( हवेंत उडणारें ) याजबद्दल योजावयाचा शब्द . रुईच्या फळांतील तंतुसमुदाय . ( वाप्र . ) मुलें खेळतांना म्हातार्‍या उडवितात . - मराठी ६ वें पुस्तक पु . २४३ . म्हातारी मेलीसें होणें - ( ल . ) अतिशय दुःख होणें . म्हातारीनें कोंबडें झांकून ठेवलें म्हणून उजेडावयाचें रहात नाहीं - कोंबडा उजेडण्याचे अगोदर आरवतो . यावरुन कोंबड्याच्या आरवण्याचा आणि उजेडण्याचा कांहीं कार्यकारणभाव आहे असें मात्र नाहीं . उजाडूं नये म्हणून म्हातारीनें कोंबडें झांकून ठेविलें तरी उजाडावयाचें तें उजाडतेंच . सृष्टिक्रमाप्रमाणेंग गोष्टी होऊं नयेत म्हणून कितीहि प्रयत्न केला तरी त्या गोष्टी थांबावयाच्या नाहींत .

Related Words

म्हातारा   म्हातारा जाल्यारि आजो जागवे?   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता   लग्नला आले वर्‍हाडी, आणि म्हातारा दम काढी   आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार   राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला   मोरा म्हातारा   म्हातारा कोतारा   म्हातारा होणे   सातारा, बहूत म्हातारा   म्हातारा दादला कुंकवाला आधार   म्हातारा दादला जिवाला आधार   म्हातारा पिकला, शहाणपणाला मुकला   म्हातारा बसे, आपोआप वासे   येलपाडी गौरा, म्हातारा नवरा   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   aged   golden ager   senior citizen   old person   oldster   elderly   senior   older   खूर्दसालह   खबु   ढोकरो   धोकरा   धलडा   धडला   खटार्‍या   वाडगी   टवसण   बुझर्ग   म्हातारखंड   हळब   जख्वल   वृद्धा नारी पतिव्रता, ढवळा नंदी (म्हातार्‍या बैला) गुणवंता   व्हएल   जख्खड   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   म्हातारचाळा   जख्ख   अतिवयस्क   काऊर   इवाई   इवाय   इवाही   इव्हाई   जरंड   बुडगा   महातारचळ   महातारडा   निवाळणे   निवाळलें लोखंड   पांढर्‍याचेंण काळे होणें   कडाडोंगर   बुढ्ढा   भोंडा   कोबाळ   डोकरा   ढळेपंज   म्हातारडा   महातारा   सुडकें   जांबुवंत   आर्जवशक्ति   आळसभोंडारा   चंचकरणें   चंचणें   चंचरणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   चालतबोलत असतां   चालतांबोलतां असतां   सुडका   खप्पड   आम्ही आलो सळा सळा, मामंजी तुम्ही पळा पळा   खडसा   खब्बू   विचळणें   जैफ   जयफ   बलदंड   लुडाखुडा   म्हातार्‍या बैला गुणवंता   धट्टाखट्टा   हातास काय केंस आले?   आधाराला मधार   खुडखुडीत   खडस   गिळंकृत   गिळंकृतत्वा   दांत ना दाढा, चबिना गाढा   जईफ   जखड   जरजर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP