Dictionaries | References

कांहीं

   
Script: Devanagari

कांहीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. कांहीं करतां कांहीं होणें To arise one thing where another thing is done or designed. कांहीं करून By some means or other.

कांहीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A few. Something. A portion. Some.

कांहीं     

वि.  १ किंचित . थोडें अल्प ; लहान ( संख्या किंवा परिणाम ); थोडेसें ( वस्तु किंवा युक्तीपैकीं ). २ विवक्षित समुदायांतून अंश अंशमात्र ; थोडा किंवा कांहीं भाग ; कित्येक ; थोडा किंवा पुष्कळ ; कमी किंवा जास्त .' आंबे कांहीं खाल्ले कांहीं लोकास दिल्हे , काम्ही ठेविलें .' ३ फार नव्हे परम्तु थोडेसें ; अल्प प्रमाणांत . ' केवळ उपाशी जाऊं नको कांहीं खा ! ४ एखादी अनिश्चित गोष्ट किंवा काम वगैरे . ' तुम्हापांसी कांहीं बोलावयाचें आहे .' - क्रिवि . १ अवर्णनीय प्रकारचें तर्‍हेचें ; ज्याची फोड करतां येत नाही . अशा तर्‍हेचें .' ब्रह्मप्राप्तीचें सुख कांही विलक्षण आहे .' २ अर्थ स्पष्ट करण्याकरितां .' तो कांहीं गवत खात नाहीं अन्न खातो .' ३ ( निषेधपर ) मुळींच नाहीं ; केव्हांही नाहीं . ' राहेन मी हें न घडेचि कांहीं . । ' ४ भलतेंच ; मनांत नसलेलें ; अकल्पित . ' काम्हीं करतां कांहीं होणें .' ५ कोणतीही उयुक्ति शक्कल ' काहीं तरी करुन ' ( सं . किम् , किम् + हि )
०एक वि.  १ थोडेंसें ; कित्येक ( मनुष्य , वस्तु ). २ ( निषेधपर ) एकहिः मुळींच ; तिळभरहि नाहीं . ' पेढ्यांर्‍यांनी कांहींएक भांडें घरांत नाहीं .'
०काहीं वि.  १ अल्पस्वरुप येथें थोडें तेथें थोडें ; सार्‍या समुदायापैकीं कांही व्यक्ति . ' कांहीं कांही शेतें बरीं आहेत कांही कांही वाईट आहेत . - क्रिवि . २ ( अतिरेक बाहुल्या दाखविणार्‍या शब्दाशीं जोडुन ) अवर्णनीयप्रकारें ; अतिशय कमालीचा ; ' आज पावसानें कांही काहीं शर्त्य केली .'
०काहींचें   - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .
बाहीं   - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .
०न   होतेला नव्हतेला - क्रिवि . जणूं कांहींच घडलें नाहीं अशा अर्थानें . ' रात्रीं चोर्‍याकरुन दिवसास कांहीं नव्हतेल्या गोष्टी सांगतो .'
०बाहीं वि.  थोडा अंश ; थोडेसें . ' आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे । ' - ज्ञा १८ . ४१२ . ' औषध घेतांच कांहीबाहीं दिसू लागलें ' कांहीबाहीं गुळ घेतला कांहीबाहीं घ्यावयाचा आहे .' ( कांही द्वि .) क्रिवि . भलतेच ; अवास्तविक ; अनियमित ; असंबद्ध कांहींबाही बोलतां मंदवचनी .' - मराठी ६ वें पुस्तक पृ १७३ .
०तरी वि.  वाटेल तें ; ब्राह्मत ; असंबद्ध .

कांहीं     

कांहीं एक
१. कित्‍येक. ‘काही एक माणसे. २. मुळीच
यकिंचत्‌हि
थोडे सुद्धां
तिळभरहि. ‘मी त्‍याचे काही एक चालूं देणार नाही.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP