|
वि. ( अन्य अप . ) दुसरा - रें . देवावांचूनि नेणे अन्न । - दा १४ . ५ . ३० . [ सं . अन्य ] न. - धान्य वगैरेचा तयार केलेला खाण्याचा पदार्थ ; ( विशेषत : भात , भाकरी , भाजी , पक्वान्नें वगैरे नेहमींच्या खाद्यांतील जिन्नस ); आहार ; भक्ष्य ; भोज्य . मृत्यूचें आघवेंचि अन्न । - ज्ञा १८ . ५६३ . म्ह०
अन्नासारखा लाभ ( नाहीं ) मरणासारखी हानि ( नाहीं ). अन्न तारी , अन्न मारी , अन्नासारखा नाहीं वैरी . अन्नाची वाण , शरीराची घाण . - ( सामान्यत : ) धान्य .
- चरितार्थाचें साधन ( रोजगार , नोकरी ).
- पक्वान्न ; जेवण्याचा पदार्थ . विचित्र अन्नें वाढिलीं पात्रीं ।
अंगीं लागणें पक्वान्न ; जेवण्याचा पदार्थ . विचित्र अन्नें वाढिलीं पात्रीं । अंगीं लागणें - पचणें ; कामीं येणें ; उपयोगी पडणें . खाल्लें अन्न अंगीं लागत नाहीं = केलेल्या कर्मापासून किंवा संपादलेल्या वस्तूपासून कांहीं लाभ होत नाहीं . ०अन्न करणें, करीत फिरणें अन्नाकरितां भिक्षा मागणें , दारोदार फिरणें . तुकयाची जेष्ठ कांता । मेली अन्नअन्न करतां । ०कडे, कांठास ठेवणें भुकेच्या अंदाजाप्रमाणें ताटांत अन्न वाढून घेतल्यानंतर जरुरी लागल्यास घेतां यावें म्हणून बाजूस काढून ठेवणें . ०चारणें खाऊं घालणें ; जेवूं घालणें ; पोसणें . ०जाणें भूक असणें ; अन्न पचणें ; तोंडाला चव असणें . परब्रह्म न . अन्न हेंच परब्रह्म ; ( ल . ) अन्नाशिवाय दुसरें कांहीं महत्वाचें नाहीं ( असा माणूस ); खादाड . ०पाणी राहणें, तुटणें, सोडणें - अन्नावर वासना नसणें ; तोंडास चव नसणें ; भूक कमी होणें .
- अन्न न खाणें ; अन्नपाणीं टाकणें ; उपाशी राहणें .
०अन्न व खोबरें बरोबर असणें श्रीमंत पण कंजुष माणसाला लावतात . अन्नावर अन्न , वस्त्रावर वस्त्र - अन्न जिरलें नाहीं तोंच पुन्हां अन्न सेवन करणें व एकाच्या ठिकाणीं अनेक वस्त्रें पेहेरणें . ( केव्हांहि अहितकारक आहे ; यावरुन कोणतीहि वस्तु चांगली असली तरी मितपणा सोडून एकसारखें अधिक सेवन करुं नये ). आड येणें , वर उठणें - एकाद्याच्या उदरनिर्वाहाच्या साधनास व्यत्यय आणणें किंवा तें साधन नाहीसें करणें ; पोटावर पाय आणणें . चा , अन्नानें पोसलेला , वाढलेला - दास म्हणे तुझ्या अन्नाचा वाढलों साचा । - दावि १७ . अन्नाचा मारलेला खालीं पाही - ( तरवारीचा मारलेला वर पाही )= अन्न खाऊं घातल्यास तो नेहमीं आपल्याशीं नम्र आज्ञाधारक राहतो , परंतु मनुष्यावर प्रहार केल्यास तो उलट प्रतिकार करण्यासाठीं मगरुरपणें टंवकारुन वर पाहूं लागतो . ( ल . ) दयेनें , सौम्यतेनें माणूस जिंकला जातो , कठोरतेनें मनुष्य शत्रु बनतो . अन्नाचा किडा पु . - खादाड ;
- नुसता खाऊन स्वस्थ बसणारा इसम ; वृध्द इसम किंवा लहान मूल
अन्नाचा पिंड - पोषणाची योग्य काळजी घेऊन वाढविलेला ( इसम - प्राणी ); आश्रित ; पोष्य ; पोसणा .
- अन्न बंद केलें असतां ताबडतोब मरणारा - म्हातारा , लहान मूल ; अन्नाचा किडा .
०अन्नाची क्रिया स्त्री . - एखाद्याचें अन्न खाल्ल्यामुळें भासणारें त्याबद्दलचें कर्तव्यकर्म ; उपकार ; ( क्रि० टाकणें , धरणें , सोडणें ).
- शपथ ; भाक . ( क्रि० करणें )
अन्नाची लाज धरणें खाल्लेल्या अन्नाबद्दल उतराई होणें ; कृतज्ञता वाटणें . अन्नाचें खोबरें होणें - अन्नाची वाण किंवा दुष्काळ होणें - पडणें ; ( ज्या देशांत खोबरें फार कमी व महाग तेथील लोकांच्या तोंडांत असलेली म्हण ). अन्नाचे पाठीं लागणें - निर्वाहाच्या साधनांच्या मागें लागणें ; नोकरी पहाणें - करणें . अन्नाचें पाणी करणें , अन्नाचे पाणी होणें - अन्नांतील पौष्टिकपणाचा व चवीचा नाश करणें , होणें ; अन्न नि : सत्व व बेचव करणें ; ( खाण्याच्या वेळीं कांहींतरी अभद्र , अनिष्ट किंवा भीतिप्रद बोलण्यामुळें ). अन्नाच्या गारगोट्या - ( गारगोट्यांसारखें थंड झालेलें ) अगदीं निवालेलें अन्न . अन्नात माती कालविणें , घालणें - एखाद्याच्या निर्वाहाच्या साधनांचा नाश किंवा बिघाड करणें ; पोटावर पाय आणणें ; अन्नाआड येणें ; नोकरी घालविणें . अन्नात माशी पडणें - माशी अन्नाबरोबर पोटांत गेली असतां अन्न ओकून पडतें त्यावरुन अगदीं सिध्द होत असलेल्या कामांत अवचित कांहीं अनिष्ट गोष्ट घडून कार्यनाश होणें . त्यागमति असी कोठुनि आली या भोजनांत हे मासी । - मोआश्रम ३ . २९ . अन्नामुळें वाळणें - अन्नाच्या अभावामुळें रोड किंवा कृश होणें ; खगणें . अन्नावर वाढणें - आश्रयावर लहानाचें मोठें होणें . पेशव्यांच्या अन्नावर वाढलेलीं व पेशव्यांमुळें नांवारुपास आलेलीं शेंकडों घराणीं जेथें हयात आहेत तेथें पेशव्याचा शेवटला वंश बंडखोर ठरतो तरी आम्हांस बिलकुल पर्वा नाहीं . - टि ४ . १७९ . - अन्नास जागणें - ( पोपिंद्याला ) कृतज्ञ राहणें ; ऋणी असणें ; उपकार स्मरुन उतराई होणें . अन्नास महाग , अन्नास मोताद - अत्यंत दरिद्री ; कंगाल ; नेहमींच्या सामान्य गरजांची वाण असलेला ; बुभुक्षित . अन्नास लावणें , अन्न लावणें - निर्वाहाचें साधन मिळवून देणें ; काम , उद्योग , धंदा देणें .
|