|
वि. ज्यास अंत नाहीं असा ; शाश्वत ; अमर्याद ; देशकाल - परिच्छेदशून्य ; असंख्य ; अपार ( काळ , स्थळ , संख्या , ब्रह्म ). मी जैसा अनंतानंदु । - ज्ञा १४ . ५३ . - पु विष्णूच्या असंख्य नांवांपैकीं एक . आपुलिये चाडे श्री अनंता । उमगु नोहे ॥ - ज्ञा ५ . ३ . सर्पांचा राजा - नागांपैकीं एक - शेष . नागांमाजीं समस्तां । अनंतु , तो मी । - ज्ञा १० . २४२ ; अनंतासी ( शेष ) म्हणे अनंत ( विष्णु ) । - ह ३ . १४ . अनंतचतुर्दशी ( संक्षिप्त रुप ). भाद्रपद शु॥ १४ च्या दिवशीं पूजा करुन उजव्या हातांत बांधावयाचा चौदा गांठींचा रेशमी गोफ - दोरा . तूं आताराकडून अनंत घेऊन ये ; पूजेची वेळ झाली . कानांत घालण्याचा एक दागिना . एक फुलझाड ; अनंत तगर ; याचीं फुलें शोभिवंत , वास मधुर ; पांढरा व तांबडा अशा दोन जाती . ( गणित ) अमर्याद संख्या ; अगणित संख्या ; अनंतराशि पहा . ( सामान्यत : ) परमेश्वर ; परब्रह्म . जैन लोकांतील चौदावा तीर्थंकर . [ सं . अ + अंत ] ०ख्याल पु. अव . अपार , विनोदी - लहरी - मौजा - गमती - युक्त्या - चाळे . ख्याली वि . अनंतख्याल किंवा अमर्याद , अपार विनोद करणारा . ०गांठ्या पु. एक किड्यासारखा बारीक व विळविळीत समुद्रांतील मासा . चतुर्दशी , व्रत स्त्री . न . भाद्रपद शुध्द चतुर्दशी या दिवशीं करावयाचें ( विष्णू प्रीत्यर्थ ) व्रत . चौदा प्रकारचीं फुलें , फळें , नैवेद्यास चौदा पक्वान्नें , अनंत दोर्याला चौदा गांठी , व चौदाव्या तिथीला पूजा हा चौदांचा मेळ अभ्यसनीय वाटेल . ०तगर पु. एक फूल , अनंत . ०पाद पु. ( प्राणि . ) घोणवर्गांतील अनेक पाय असणारा प्राणी ; ( इं . ) मिरिआपोडा . ०पार पु. ज्यास अंत किंवा पार नाहीं असा ; अमर्याद ; अफाट . अनंतपारं किल शब्दशास्त्रम । - पंच तत्र . ०भट्टी स्त्री. प्राचीन काळीं अनंत नांवाच्या एका विद्वानानें केलेल्या ग्रंथाचें नांव ; यावरुन ( ल . ) विद्वत्तेचें किंवा बुध्दीचें खोटें प्रदर्शन ; घमेंड ; रिकामा डौल , प्रतिष्ठा . ( क्रि० दाखवणें , मिरवणें ). मूळ न . एक वनस्पति ; इंग्रजी सार्सापरिल्याच्या तोडीचा रक्तशुध्द करण्याचा गुण हींत आहे . काढा किंवा पाकाच्या स्वरुपांत अनंतमूळ देतात . अग्निमांद्य , ज्वर , रक्तदोष , उपदंशादि विकार यांवर हा गुणकारी आहे . पर्यायनामें :-( कों . ) उपळसरी ; तुणतुणी . ( खा . ) दुधी . ०राशी स्त्री. ( गणित . ) अगणित संख्या , रक्कम , राशी . ०वात स्त्री. चार बोटांवर १४ दोरे घेऊन केलेली कापसाच्या सुताची वात . ह्या अनंतचतुर्दशीपासून दररोज दोन वाती अशा वर्षभर लावतात अगर एकदम लक्ष वाती लावतात . [ सं . अनंत + वर्ति ; प्रा . वट्टि ; म . वात ]. त्रिदोषजन्य डोळे , भुंवया व आंख या ठिकाणीं होणारा एक विकार - योर २ . ५१२ . ०व्रत न. अनंतचतुर्दशीच्या दिवशीं करण्याचें व्रत ; अनंतचतुर्दशी पहा . ०लोम पु. ( प्राणि . ) अंगावर पुष्कळ केंस असलेला प्राणी . ०श्रेणी स्त्री. ( बीज . ) अंत न पावणारी श्रेणी .
|