Dictionaries | References

संधी

   
Script: Devanagari
See also:  संधि

संधी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दोन अक्षरां लागीं आयिल्ल्यान तांच्या मेळांतल्यान जावपी व्याकरणांतलो विकार   Ex. रमा आनी ईश हातूंत संधी जातकच रमेश जाता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कांय वेळा खातीर झूज थांबोवपाचो करार   Ex. दुस्मान झूजविराम मोडून आक्रमण केलें
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

संधी

संधी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादे काम वा उद्दीष्ट साधण्यासाठी सोयिस्कर अशी वेळ वा प्रसंग   Ex. हे काम करण्याची संधी चालून आली आहे
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  दोन वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ आले असता त्यांत होणारा बदल   Ex. आणि इ ह्यांचा संधी ए असा होतो उदाहरणार्थ गण + ईश = गणेश
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokसंधी
urdحرف ربط , حرف عطف
   see : तह

संधी

   पुस्त्री . १ जोडणी ; ऐक्य ; मिलाफ . २ सांधा ; जोड ; शिवण ; सांध्यांची रेषा , बिंदू . अस्ति यंत्र कीडिकीडी । संधि कळासु कडकडी । - भाए २०४ . बैसलो संधि भागीं तुज धरूनि चित्तीं - तुगा ३२० . ३ चीर ; भेग ; फट ; खांच ; खंड . भयें दडताती संधींत - नव २४ . १३४ . ४ अवघि ; मधील काल ; अवसर ; अवकाश . ५ गांठ ; पेर ; कांडें ; जोडवर्णाचा योग ; स्वर किंवा व्यंजनें यांचा जोड , मीलन ; सामासिक शब्दाच्या अंत्य व प्रारंभींच्या वर्णाचें मेलन . ७ लक्ष्य ; दृष्टि ; डोळा ; इच्छा ; उद्देश . भिक्षुक पैक्यावर संधि ठेवून यजमानाचें आर्जव करितो . करून आले दक्षिण संधी । - ऐपो २६७ . ८ युग , मन्वंतर , कल्प वगैरेपैकीं एक संपूर्ण होऊन दुसरें लागण्याच्या मध्यंतरींचा काल ; संधिकाल . ९ चोरानें भिंतीस पाडलेलें भोंक , बीळ , विवर , भुयार , खिंड , भगदाड . १० योग्य वेळ ; योग्य समय ; ऐन वेळ ; आणिबाणीची वेळ ; अनुकूल वेळ . यास्तव मोठया संधीस सूज्ञांनीं दोहोंच्या स्थितीकडे लक्ष्य द्यावें . - नि १ . ११ ( ल . ) समेट ; तह ; सलाह ; ऐक्य ; मिलाफ ; तडजोड ( मैत्री , नातें , सख्य वगैरेची ). मज बरोबर संधि करावयास आली होती . - कमं २ . - एभा १९ . १५६ . [ सं . सम् ‍ - धा = ठेवणें ]
   संधि पहा .
०काल  पु. दोन कालांच्या मधील अवधि . आयुष्याच्या अशा संधिकालावर तुम्ही उभे आहांत . - केले १ . ३७३ .
०ग वि.  प्रत्येक सांध्यांतून जाणारें , भिनणारें ( रोग , विष , औषध वगैरे ).
०गत वि.  सांध्यांत असलेला , शिरलेला ( वायु , वात , रोग वगैरे ).
०पाद  पु. ज्यांच्या पायांस सांधे असतात असे प्राणी . उदा० डांस , ढेंकूण , उवा , पिसवा , मुंग्या , खेकडा वगैरे . ( इं . ) अँथ्रोपोडा .
०प्रकाश  पु. सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर बराच वेळ जो प्रकाश दिसतो तो .
०प्रकाशराग  पु. ( संगीत ) संधिप्रकाशाच्या वेळीं गाइला जाणारा राग . यांत ऋषभ कोमलगांधार , निषाद हे स्वर तीव्र असतात .
०फुटणी  स्त्री. १ संधिवाताचा रोग , कळा . २ ( सढळपणें ) सांध्यांत झालेलें गळूं , उठाणूं .
०बंध   बंधन - पुन . स्नायुरश्मि ; सांध्यांना बांधणारे स्नायूचे दोर . ( इं . ) लिगॅमेंट .
०भंग  पु. १ संधिवातामुळें सांधे धरणें , दुखणें . २ सांधा मोडणें , निखळणें .
०वात   वायु - पु . ज्यामुळें शरीराचे सांधे धरतात , दुखतात असा रोग . ( इं . ) र्‍हुमॅटिझम् ‍ .
०विग्रह  पु. तह किंवा युध्द ; मैत्री किंवा कलह ; मिलाफ अथवा बिघाड ; जोड किंवा तोड .
०वेला  स्त्री. संधिकाल ; दिवसरात्र यांच्या मधील काल ; कोणत्याहि दोन कालावधींमधील अवकाश . उदा० पौर्णिमा , अमावास्या ; कालाचा कोणताहि अवधिदर्शक शब्द . उदा० सकाळ ; दुपार ; संध्याकाळ .
०संकोच  पु. सांधे धरण्याचा रोग ; संधिवात .
०स्फोट  पु. १ सांध्यांस फूट , कळ लागणें . २ सांध्यांच्या ठिकाणीं फोड , सूज , आवाळू होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP