Dictionaries | References

तरळणे

   
Script: Devanagari

तरळणे     

क्रि.  चलबिचल होणे , चळणे , दिपणे , भांबावणे ,

तरळणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  अस्पष्टरीत्या भासू लागणे   Ex. तिच्या डोळ्यापुढे उज्जयिनीतली सकाळ तरळली.

तरळणे     

अ.क्रि.  ( दृष्टि , विचार , बुद्धि इ० ) भांबाबणे ; चंचल होणे ; भ्रमणे ; चळणे ; दिपणे . प्रमाणदिवेयांचेनि बंबाळे । पांतां तरळैले वेदांचे डोळे । - शिशु ९ . मुग्धा पतिस पहाया तसि माजी दृष्टि तरळली लाजे । - मोअनु ३ . ६३ . २ चंचलपणाने भासणे ; प्रकाशणे ; चमकणे . की नेत्री बाहुली देखिली । कां ते जळी प्रतिभा भासली । की अकस्मात दृष्टि तरळली । तैसी ब्रह्मी मूळमाया । - स्वादि १३ . २ . ९५ . ३ खेळणे . जे इंद्रियां आणि बुद्धी । माझारिलिये संधी । रजोगुणाच्या खांदी । तरळत असे । - ज्ञा १३ . १०४ . [ सं . तरल ]
अ.क्रि.  १ तरळाच्या , मोडशीच्या विकाराने युक्त होणे . २ ( ल . ) कंटाळा , वीट , किळस इ०नीं युक्त होणे ; ओकारी येणे . [ तरळ = मोडशी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP