Dictionaries | References

   { शून्य }
Script: Devanagari

०     

Sanket Kosh | Marathi  Marathi
शून्य   
आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् असत् आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे.
"शून्यांतील सारें चराचर" हें शून्य़ "अगणित" व "अक्षय्य" आहे. ([ज्ञा. अभंग])
शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य.
शून्यकान   
कान नाहीं असा प्राणी - - सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु : - श्रवा म्हणतात.)
शून्यचरण   
चरण नाहीं असा प्राणी - सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात.)
शून्य जिव्हा   
जिव्हा नाहीं असा प्राणी - बेडूक ([दु. श. कोश])
शून्यवाद   
जग हें केवळ शून्यापासून - अभावापासून उत्पन्न झालें. त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात. ([बौद्धदर्शन])
शून्यशिर   
शिर नाहीं असा प्राणी - खेंकडा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP