|
पु. १ नृप ; नृपति ; भूपाल ; नरेंद्र ; छत्रपति ; लहान राज्यें व थोडक्या प्रजा असलेले संस्थानिक व सरदार यांसहि हा शब्द लागतो . २ ( मंडळीचा , टोळीचा ) नायक ; मुख्य . ३ सजातीय पदार्थसमुच्चयांत श्रेष्ठ मानलेला तो . ४ अन्न , वस्त्र इ० पदार्थ यथास्थित असल्यामुळें ते मिळविण्याचे कष्ट किंवा काळजी ज्यास करावी लागत नाहीं असा मनुष्य . ५ गंजिफांच्या बाजूंतील मुख्य . पत्त्यांतील एक चित्राचें पान . ६ बुध्दिबळाच्या खेळांत डावांतील मुख्य मोहरा . ७ वर्षाचा शास्ता म्हणून मानलेला ग्रह ; वर्षेशग्रह . ८ ( ल . ) वेडा ; मूर्ख ; स्वेच्छ वर्तन करणारा मनुष्य . ९ कसरीच्या राणीस म्हणतात . ( समासांत ) राजपत्नी ; राजपुत्र ; राजकन्या ; राजगुरु ; राजपुरोहित ; राहोपाध्याय ; राजसभा इ० ह्याचे मराठी शब्दाशींहि समास झाले आहेत . जसें . राजपसंत ; राजदरबार इ० . राजपद उत्तरपदीं येणारे नायक या अर्थाचे कांहीं सामासिक शब्द - मृगराज = मृगश्रेष्ठ ; तीर्थराज = तीर्थापैकीं मुख्य , सागर किंवा प्रयाग ; तसेंच गजराज ; सर्पराज ; अश्वराज ; द्विजराज ; देवराज ; कविराज ; वैद्यराज ; पंडितराज ; स्वामिराज ; गणराज ; भूतराज ; यक्षराज ; वनराज ( आपटा किंवा शमी ), वृक्षराज . राजपद पूर्वपदीं असलेले कांहीं सामासिकशब्द - राजक्रांति ; राजशोभा ; राजकृपा ; राजचित्त ; राजमित्र ; राजप्रिय ; राजाश्रय ; राजाश्रित ; राजबुध्दि ; राजसखा ; राजरंग ; राजमहाल ; राजवटी इ० [ सं . राज् = प्रकाशणें ] ( वाप्र . ) राजापासून रंकापर्यंत - श्रीमंतापासून तों गरीबापर्यंत ; सर्व दर्जाच्या लोकांत . ब्राह्मणाला राजापासून रंकापर्यंत मान मिळत असे . राजा याचें राज असें रूप होऊन झालेले कांहीं सामाशब्द - ०अंबीर पु. १ ( शृंगारिक काव्य ) गंभीर स्वभावाचा , सभ्य नायक . - वि . बादशाही ; भव्य ; नामी ; उत्कृष्ट ( मनुष्य , देश , पोषाख , बोलण्याची ढब , कोणतीहि गोष्ट ). [ सं . राजा + अर . अमीर ] ०आवळी स्त्री. आवळीचा एक प्रकार . या झाडास फळें लहान येतात . हीसच हरपररेवडी , रानाअवळी असेंहि म्हणतात . ०कडी स्त्री. विशिष्ट प्रकारची कानांतील कडी ; एक कर्णभूषण . ०कवि पु. दरबारी कवि . [ सं . ] ०काज कारभार - नपु . राज्यकारभार ; राज्यासंबंधीं सर्व प्रकारचें काम . ०कारण १ राज्यासंबंधीं मसलत ; खोल व गूढ मसलत , कल्पना . राजकारण बहुत करावें । - दा ११ . ५ . १९ . २ गुप्त निमित्त , गूढ ( एखाद्या गोष्टीचें ). भिंतीस किती सारवलें , लिंपलें तरी चीर पडते याचे राजकारण कांहीं समजत नाहीं . ३ शासनसंस्थेसंबंधीं गोष्टी ; राजनीति ; ( इं . ) पॉलिटिक्स . बिझांटबाई तरुण मुलांनीं राजकारणांत पडूं नये असें सांगतात . - केले १ . १९ . ०कारणी वि. खोल मसलत करणारा ; मुत्सद्दी . ०कारभार पु. राज्यव्यवस्था . ०कारस्थान न. राजकीय मसलत , कल्पना , बेत , चतुराई ; राज्याची मसलत . ०कार्य न. १ राजकीय कर्तव्यें , काम ; राज्याचीं कामें . २ राजाचें काम . ३ राजाचें शासन , कायदा , कृत्य . [ सं . ] ०किंकर पु. राजाचा चाकर ; सरकारी नोकर , शिपाई , जासूद इ० [ सं . ] ०किशोर पु. राजाचा मुलगा . [ सं . ] राजकी - पु . राजाचा नोकर . राजकी म्हणती आमुचें घर । - दा १ . १० . ४६ . - वि . राजापासून उत्पन्न होणारी ; राजाच्या संबंधाची ( सत्ता , जुलूम , कृत्यें ). याच्या उलट देवकी . दुसर्या राज्यांत गेल्यानें राजकी उपद्रव टाळायास येईल पण देवकी उपद्रवापुढें उपाय चालत नाहीं . [ राजीक ] राजकीय - वि . राजासंबंधीं ; राजाचा ; राजविषयक ( व्यवहार , कारभार , मनुष्य इ० ) [ सं . ] ०कीय पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कैद केलेला राजकारणी पुरुष ; सरकारविरुध्द अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य . कैदी पु. राजद्रोहामुळें तुरुंगांत कैद केलेला राजकारणी पुरुष ; सरकारविरुध्द अराजकता माजविणारा म्हणून कैद केलेला मनुष्य . ०कीय पु. सरकारी कैदेंत अडकलेला कैदी ; राजद्रोही बंदिवान . बंदी पु. सरकारी कैदेंत अडकलेला कैदी ; राजद्रोही बंदिवान . ०कीय पु. १ राज्याचें काम . २ राजनीति . [ सं . ] व्यवहार पु. १ राज्याचें काम . २ राजनीति . [ सं . ] ०कीय स्त्री. राजकारणासंबंधीं सभा ; ( इं . ) पोलिटिकल मीटिंग . क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रतिबंध करतो . - केले १ . २३३ . [ सं . ] सभा स्त्री. राजकारणासंबंधीं सभा ; ( इं . ) पोलिटिकल मीटिंग . क्वचित एखादा सरकारी नोकर आपल्या मुलांना राजकीय सभांना जाण्यास प्रतिबंध करतो . - केले १ . २३३ . [ सं . ] ०कुमर कुंवर कुमरी कुंवरी कुमारी - स्त्री . राजाची कन्या . [ प्रा . ] ०कुमार कुंवर - पु . १ राजाचा मुलगा ; राजपुत्र . २ पुनर्वसु नक्षत्र . [ सं . ] ०कुल न. राजघराणें ; राजवंश . [ सं . ] ०केळ केळी केळें - स्त्रीन . केळीची एक जात व तिचें फळ . ०क्रांत क्रांती - स्त्रीन . १ राज्याची उलथापालथ ; राज्यव्यवस्थेंत मोठी उलाढाल , खळबळ , बदल . २ युध्द , शत्रूचें आक्रमण इत्यादीमुळें माजलेली गडबड , गोंधळ , वगैरे नासधूस . ३ राजाचा जुलूम , अन्याय . [ सं . ] ०गादी स्त्री. राजाची गादी ; सिंहासन . ०गुह्य न. राजाचें किंवा राज्यासंबंधीं गुपित , गुढ ; गुप्त गोष्ट . ०गोंड स्त्री. ( शहराचा , गांवचा ) मोठा रस्ता . ०गोंड पु. गोंडांतील एक श्रेष्ठ जात . ०गोंडा पु. पालखीच्या दांडीला मध्यभागीं लोंबता बांधलेला , हातांत धरावयाचा गोंडा . ०घोस स्त्री. एक वेल . हिच्या पानांच्या काढयाचा देवी इ० आजारांत उपयोग करितात . ०घोळ स्त्री. घोळ नामक भाजीची एक जात . ०चिन्ह न. राजेपणाचें चिन्ह ; राजाचें छत्र , चामर इ० वैभव . २ ( सामुद्रिक ) नशीबीं सिंहासनावर बसण्याचा योग आहे असें दाखविणारी खूण , लक्षणविशेष किंवा विशेष गोष्ट . ( आजानुबाहुत्व इ० ) ३ राजाची मोहोर , शिक्का , किंवा सही ( नाणें , पत्र इ० कांवरील ). ४ ( राजाच्या सह्या अस्पष्ट , वाचण्यास कठिण असतात यावरून ल . ) फरपटयांचें , बिरखुडी , वाईट लपेटीचें , दुर्बोध अक्षर . [ सं . ] ०टिटवी स्त्री. पिवळसर रंगाची टिटवी . ०तिलक पु. १ राजांमध्यें श्रेष्ठ ; सार्वभौम राजा . २ राजटिळा . ३ राज्याभिषेक . [ सं . राजा + तिलक ] - तुरा - पु . एक फुलझाड व त्याचें फूल . ०तेज न. राजाचें सिंहासन . २ राजधानी . किल्ला रायगड राजतख्त . - चित्रगुप्त १६७ . ०त्व न. राजेपणा ; राजाधिकार ; राजपद . [ सं . ] ०दंड पु. १ राजानें केलेली शिक्षा . २ राजानें बसविएला दंड . ३ जातिबहिष्कृत केलेल्या मनुष्यास जातींत परत घेतांना त्यानें राजास द्यावयाच्या दंड . ४ राजाच्या हातांतील अधिकारदर्शक काठी . ०दंत पु. चौकडीचे दांत ; पदार्थ तोडावयाचे दांत ; पुढील दांत . [ सं . ] ०दरबार १ राजाची कचेरी ; न्यायसभा . २ प्रजेचीं गार्हाणी ऐकण्याकरितां बसावयाची राजाची जागा . ०दरबारी वि. राज्यासंबंधी . ०दर्शन न. राजाचें दर्शन ; राजाची भेट . राजदर्शन म्हणजे मोठा लाभ . [ सं . ] ०दुहिता स्त्री. राजाची मुलगी . वर शिशुपाळ ऐकतां । दचकली ते राजदुहिता । - एरुस्व २ . ४१ . [ सं . ] ०दूत पु. राजाचा नोकर , हुजर्या , सेवक ; जासूद . [ सं . ] ०द्रोह पु. १ सरकाराबद्दल अप्रीति ; राजाविरुध्द कट , बंड ; फितुरी . २ राज्य व राजसत्ता याविरुध्द गुन्हा . ३ ( कायदा ) बादशाहाविरुध्द किंवा ब्रिटिश अमलाविरुध्द द्वेष , तिरस्कार किंवा बेदिली बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांनीं किंवा खुणानीं किंवा इतर रीतीनीं उत्पन्न करणें ; ( इं . ) सिडिशन ०द्वार न. १ न्यायाच्या कचेरीचा राजवाडा ; राजदरबार . २ राजवाडयाचा दरवाजा . [ सं . ] ०धन न राजाचा महसूल , उत्पन्न . [ सं . ] ०धर्म पु. १ राज्यकारभार चालविण्याकरितां मार्गदर्शक असा शास्त्रांत सांगितलेला कायदा , अनुशासन . २ राजास योग्य किंवा शोभणारा गुण , राजगुण . कार्योपदेशकौशल्य , प्रागल्भ्य इ० ). जे राजधर्म सुरतरू सख मखसे सुखद उत्सवद नाकीं । - मोसभा १ . १५ . ३ राजाचें कर्तव्य विशेष काम . [ सं . ] ०धातु पु. कित्येक कवींनीं लोखंडास हें नांव दिलें आहे . ०धानी नगरी - स्त्री . राजाचें राहण्याचें मुख्य शहर . [ सं . ] ०धान्य न. एक धान्य ; सांवा . [ सं . ] ०धारी पु. एक प्रकारचा तमाशा . - कलावंतखातें ( बडोडें ) १३८ . ०निष्ठ स्त्री. राजाविषयीं , सरकारविषयीं आदर दाखविणारा . ०निष्ठा स्त्री. राजासंबंधीं , सरकारसंबंधीं आदर , पूज्यबुध्दि . राज्यपध्दतींतील दोष अधिकार्यांच्या नजरेस आणणें हीच खरी राजनिष्ठा . - टिसू २१५ . [ सं . ] ०नीति स्त्री. १ राजव्यवहारशास्त्र . आन्वीक्षिकी किंवा तर्कविद्या , त्रयी किंवा धर्म विद्या , वार्ता किंवा अर्थविद्या व दंडनीति असे चार राजनीतीचे भेद आहेत . २ नीति ; नीतिशास्त्र . [ सं . ] ०नील नीळ - न . नीलमणी . [ सं . ] पंचक - न ज्यांत राजापासून जुलूम किंवा नासधूस होते असा ज्योतिषीय गणितानें येणारा काल . अग्निपंचक , चौरपंचक , मृत्युपंचक , हानिपंचक इ० पहा . [ सं . ] ०पट्ट पु. राजाचा शिरताज ; राजाचें ललाटपट्ट . [ सं . ] ०पत्नी स्त्री. राजाची स्त्री ; राणी . [ सं . ] ०पत्र न राजाचें पत्र ; देणगीपत्र , सनद . ब्राह्मण स्थापिले वृत्तिक्षेत्रीं । ते ते अक्षयीं राजपत्रीं । - मुसभा ६ . ५६ . [ सं . ] ०पद न. राजाचा अधिकार , दर्जा ; राजत्व . ०पध्दति पध्दत - स्त्री . राजास योग्य अशी रीति , चाल , वहिवाट . [ सं . ] ०पसंत पसंद - वि . राजे व अमीर उमराव यांस मान्य असणारा ; सर्वोत्कृष्ट ; उंची ; खासा ; नामी . [ सं . राजा + फा . पसन्द ] ०पिंडा पु. देखणा व छबीदार मनुष्य ; राजबिंडा . [ सं . राजा + पिंड ] ०पीठ न. १ राजाचें आसन ; राजाचें सिंहासन . २ राजधानीचें शहर . [ सं . ] ०पीढी पु. ( महानु . ) राजपुरुष . रवमदें पातले राजपीढी । - गस्तो ४३ . [ राजा + पिढी ] ०पुत्र पु. १ राजाचा मुलगा . २ क्षत्रिय . [ सं . ] ०पुरी स्त्री. बादशाही शहर ; राजधानी . [ सं . ] ०पुरुष पु. १ सरकारी अधिकारी , नोकर . २ राजाच्या चाकरींतील कोणीहि लहानमोठा मनुष्य . [ सं . ] ०बंदी पु. राजकैदी ; राजकीय गुन्हेगार , बंदिवान . ०बनसी वि. राजवंशाचा . हा हिंदुस्थानी शब्द मराठी लावण्यांतून नेहमीं येतो . [ राजवंशी ; हिं . राजबनसी ] ०बाबती स्त्री. राजास द्यावयाचा वसुलाचा चौथा भाग . चौथा पहा . ०बिंडा वि. अतिशय अत्यंत देखणा , सुंदर आणि तेजस्वी ( मनुष्य ). [ राज + पिंड ] ०बिदी स्त्री. राजमार्ग . इंद्रियग्रामींचा राजबिदीं । - ज्ञा ७ . १०६ . ०बीज वि. १ राजाच्या बीजाचा , वंशाचा . २ ( ल . ) सुस्वभावी व सुंदर मुलास म्हणतात . ०बीध स्त्री. ( शहराचा ) मुख्य ; मोठा रस्ता ; राजबिदी . ०बेत ( को . ) राजदंड . [ राजवेत्र ] ०भाग पु. राजाचा भाग ; सरकारास द्यावयाचा कोणत्याहि उत्पन्नाचा भाग . [ सं . ] ०भार्या भाजा - स्त्री . राजाची पत्नी ; पट्टाभिषिक्त राणी . येरु बोले पाहीन पिता माझा । नको जाऊं मारील राजभाजा । - ध्रुवाख्यान ४ ( नवनीत पृ . ४११ ). [ सं . ] ०भोग पु. सरकाराचा हक्क . [ सं . ] ०भ्रष्ट वि. राज्यावरून निघालेला . ०मंडल मंडळ - न . १ राजांचा समुदाय . २ राजकीय मंडल ; राजभृत्य ; राजपुरुष ; बादशाहा भोंवतालचे अमीरउमराव इ० [ सं . ] ०मंत्र पु. राजाचा बेत , उद्देश . [ सं . ] ०मद पु. राज्याचा गर्व , दर्प . [ सं . ] ०मंदिर न. १ सौध ; राजवाडा . २ ( लावणी , शृंगारविषयक काव्य इ० कांत ) विलासमंदिर ; रंगमहाल ; अंतःपुर इ० [ सं . ] ०महाल पु. राजवाडा . ०मान्य वि. १ राजानें मान देण्यास योग्य ; पूज्य ; श्रेष्ठ ; वरिष्ठ ; २ ज्याला पत्र पाटवावयाचें असतें किंवा ज्याचा उल्लेख करावयाचा असतो त्याला सन्मानार्थ कागदोपत्रीं हें विशेषण लावतात . ३ सर्वोस पसंत पडेल असें . हा एक राजमान्य उपाय आहे . [ सं . ] ०मार्ग पु. १ राजाचा हमरस्ता ; सार्वजनिक रस्ता . २ ( ल . ) सर्व लोकांनीं मान्य व पसंत केलेली चाल , वहिवाट , रहाटी . [ सं . ] ०माष पु. एक कडधान्य . [ सं . ] ०मुद्रा स्त्री. १ राजाची मोहोर ; तिचा शिक्का ; ठसा . २ राजाच्या छापाचें नाणें . [ सं . ] ०मोहरा मोहोरा - वि . १ शहाणा ; शूर किंवा विद्वान ( मनुष्य ); विद्या , शौर्य इ० गुणांनीं प्रसिध्द असलेला , तेजस्वी ( पुरुष ). या राज्यांत नानाफडनवीस एक राजमोहरा होता . २ देखणा व छबीदार ( मनुष्य ); राजबिंडा . ०यश न. राजाचें , राज्याचें यश ; कीर्ति . राजयश वर्णितां वर्णितां भाट शिणले । [ सं . ] ०यक्ष्मा पु. क्षयरोगाचा एक भेद ; कफक्षय . [ सं . ] ०योग पु. १ हठयोगाहून भिन्न असा योगाचा साधा व सोपा प्रकार ; प्राणनिरोध इ० न करितां अंतःकरण एकाग्र करून भगवत्स्वरूपीं लावण्याचा उपाय . राजयोगतुरंगीं । आरूढला । - ज्ञा १८ . १०४७ . २ राज्य मिळवून देणारा पत्रिकेंतला ग्रहयोग . ३ श्रेष्ठ , सर्वोत्कृष्ट योग ; प्रापंचिक वैभव व संपत्ति हीं उपभोगीत असतांहि त्यांहून आत्म्याची भिन्नता ओळखून आत्मचिंतनाचा अभ्यास चालू ठेवणें . [ सं . ] ०योगी पु. राजयोग करणारा मनुष्य ; हठयोगीच्या उलट . [ सं . ] ०रा स्त्री. ( नेहमीं अनेकवचनी उपयोग ) कुलाचाराच्या प्रसंगीं तबकांत ठेविलेल्या देवीच्या सात मूर्ती . [ सं . राजेश्वरी = एक देवी ] ०राज पु. राजधिराज ; राजांचा राजा ; बादशहा . [ सं . ] ०राजेश्वर पु. सम्राट ; बादशहा ; सार्वभौमराजा . [ सं . ] ०राणी स्त्री. राजाची मुख्य पत्नी ; पट्टराणी . [ सं . ] ०रीति स्त्री. १ राजांस योग्य अशा रीति , पध्दति , सरणी , मार्ग . २ सर्वमान्य पध्दति . [ सं . ] ०रुशी रोशी - स्त्री . सार्वजनिक आणि स्वतंत्र परवानगी ; उघड व पूर्ण स्वतंत्रता ; मुभा . पोरांस सुटीच्या दिवसीं खेळायास राजरूशी असती . [ सं . राजा + फा . रूशन ] ०रूस रोस रूश रूष - क्रिवि . उघडपणें ; प्रसिध्दपणें ; स्वतंत्रपणें ; अनियंत्रितपणें ; बेधडक . तो राजरोस इराणीच्या दुकानांत जाऊन चहा पितो २ दिवसाढवळया . [ सं . राजा + फा . रूशन ; रोश - इ - रौशन ] राजर्षि - पु . तपश्चर्येनें ज्यानें ऋषि ही उच्च पदवी मिळविली आहे असा क्षत्रिय ; तपस्वी क्षत्रिय ; राजांमधील ऋषि . राजर्षि महर्षि सकळ येथें न्यूनाचि भूमिपाळ सभा । - मोसभा १ . १० . [ सं . राजा + ऋषि ] ०लव्हा न. १ पक्षिविशेष . याचे मोठा व लहान असे दोन भेद आहेत . ०लक्षण न. १ राजत्वाचें सूचक एखादें स्वाभाविक चिन्ह . २ ( छत्र , चामर इ० ) राजचिन्हांपैकीं कोणतेंहि चिन्ह . [ सं . ] ०लेख पु. राजाचें पत्र ; सनद . [ सं . ] ०वट वटा वटी - पुस्त्री . १ एखाद्या राजाचा , राज्याचा , अंमलाचा , कारकीर्दीचा काल ; कारकीर्द . विक्रमाचे राजवटयांत सर्व लोक सुखी होते . २ अंमलाचा , वजनाचा काल ; ( सामा . ) चलतीचा काल . ३ सामान्य चाल , रीत , संप्रदाय , वहिवाट . आमचा सकाळीं जेवण्याचा राजवटा नाहीं . - क्रिवि . राज्यांत ; अमलांत ; कारकीर्दीत . वडिलांचे राजवटा ही गोष्ट घडली नाहीं . [ राज्य + वर्ति ] ०वटा पु. हमरस्ता ; राजमार्ग . [ राजा + वाट ] राजवर्खी बांगडी - स्त्री . एक प्रकारची बांगडी . ०वंश पु. राजाचें कुल . [ सं . ] ०वंश्य वि. राजाच्या कुळांतील , वंशांतील . [ सं . ] ०वनसी वि. राजघराण्यांतील . [ सं . राजवंशी ] ०वळ राजावळी - स्त्री . राजाचीं अक्षरें ( सही ); राजाचा शिक्का ; राजमुद्रा . तर्ही राजावळीचीं अक्षरें । - ज्ञा १७ . ३२२ . ०वांटा पु. १ मुख्य वांटा , मोठा हिस्सा . तो सुखदु : खाचा राजवांटा । - ज्ञा ८ . १८४ . २ राजाचा भाग . ०वाडा पु. राजाचा वाडा ; राजमंदिर ; प्रासाद . ०विद्या स्त्री. सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ विद्या . या दोन्ही कारणांमुळें राजविद्या शब्दानें भक्तिमार्गच या ठिकाणीं विवक्षित आहे असें सिध्द होतें . - गीर ४१५ . [ सं . ] ०विलास पु. राजाचीं सुखें व करमणुकी ; उच्च प्रकारचीं सुखें व क्रीडा . [ सं . ] ०वैद्य पु. १ वैद्यशास्त्रपारंगत असा उत्तम वैद्य . २ राजाचा वैद्य . [ सं . ] ०व्रत स्त्री. बांगडीची एक जात . बांगडी स्त्री. बांगडीची एक जात . ०शक पु. ज्येष्ठ शुध्द १३ , आनंदनाम संवत्सर , शके १५९६ . या वर्षी शिवाजी महाराजांनीं आपल्या राज्यारोहणानिमित्त सुरू केलेला शक . कोल्हापूर व इतर कांहीं संस्थानांत हा चालतो . [ सं . ] ०शय्या स्त्री. सिंहासन ; राजाची शेज . [ सं . ] ०शासन न. १ राजाची आज्ञा . २ राजा अपराध्यांना जें शासन करतो तें . [ सं . ] ०शोभा स्त्री. राजाची शोभा ; राजाचें तेज , कांति इ० . [ सं . ] ०श्रियाविराजित वि. १ राजाच्या तेजानें व शोभेनें विभूषित ; लक्ष्मीनें राजासारखा सुशोभित असा . २ बरोबरीच्या गृहस्थास पत्र लिहावयाचें असतां त्याच्या सन्मानार्थ हा शब्द त्याच्या नांवापूर्वी विशेषणाप्रमाणें योजतात ; पत्राचा मायना . [ सं . ] ०श्री पु. १ राजाची पदवी ; राजाचें वैभव ; राजासंबंधीं बोलतांना सन्मानार्थ योजावयाचा शब्द . एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे . २ सामान्य माणसास पत्र लिहितांना त्याच्या नांवापूर्वी हा शब्द आदरार्थ योजतात . ३ ( विनोदार्थी ) विचित्र , तर्हेंवाईक माणूस . ४ ( सामा . ) गृहस्थ . आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून । - मोस्त्री २ . २९ . ०सत्ता स्त्री. १ राजाची सत्ता , कायदेशीर अधिकार . २ राजाची थोरवी , कदर , भारदस्ती . [ सं . ] ०सदन न. राजवाडा . [ सं . ] ०सभा स्त्री. राजाची सभा , कचेरी ; राजाचा दिवाणखाना ; दरबार . [ सं . ] ०स्थान न. राजाची राहण्याची जागा . ०सूय पुन . सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ ( हा यज्ञ सार्वभौमत्वाच्या द्योतनार्थ राज्याभिषेक समयीं मांडलिक राजांसह करावयाचा असतो ). अथवा राजा ( सोमलता ) याचें सवन , ( कंडन ) ज्यांत करतात तो यज्ञ . देवर्षि म्हणे नृप तो सम्राट प्रभु राजसूयमखकर्ता । - मोसभा १ . ४६ . [ सं . ] ०हत्या स्त्री. राजाची हत्त्या ; खून . [ सं . ] ०हत्यारा वि. राजहत्त्या करणारा . ०हंबीर पु. राजअंबीर पहा . ०हंस पु. १ चोंच आणि पाय तांबडे व वर्ण पांढरा असा पक्षी . दूध व पाणी एकत्र केलीं असतां त्यांतून दूध तेवढें वेगळें करण्याची शक्ति याला आहे असें मानितात . राजहंसाचा कळप पोहताहे । - र ९ . २ ( लावण्या , शृंगारिक काव्य ) प्रियकर ; नायक . ३ एक झाड . हीं झाडें लहान भुइसरपट असतात ; पानें बारीक व जोडलेलीं ; यास तांबूस रगाचीं बारीक फुलें व बारीक शेंगा येतात . [ सं . ] राजांगण , राजांगणें - न . १ राजाच्या , श्रीमंत लोकांच्या वाडयापुढें रिकामी राखलेली मोकळी जागा . २ राजवाडयाच्या समोरचा चौक . ३ चौसोपी घरास मध्यें असलेलें चतुष्कोणी अंगण . पैस नाहीं राजांगणीं । - दावि ५०४ . [ सं . ] राजागर - न . १ राजाचा बाग . सुटली तरी राजागरीं मरें । - एभा ११ . ५५८ . २ रायभोग तांदुळाचें शेत . तेणें पिकती केवळ राजागर । - एभा २७ . २०२ . ०धिकार पु. राजाचा अधिकार . [ सं . ] राजाधिपति , राजाधीश - पु . राजाधिराज . [ सं . ] राजाधिराज - पु . राजांचा राजा ; सार्वभौम ; अनेक मांडलिकांवरचा मुख्य राजा . [ सं . ] राजानुकंपा - स्त्री . राजाची कृपा , दया . [ सं . ] राजानुग्रह - पु . राजाची प्रसन्नता . [ सं . ] ०पुरी वि. राजापूर गांवासंबधीं ( गूळ , हळद , भाषा इ० ). राजाप्रधान सोडणें - ( बायकी ) चातुर्मासांत भात व वरण हे मुख्य पदार्थ वर्ज्य करणें . राजाभिषेक - पु . राज्यारोहणप्रसंगीं महानद्या , समुद्र इ० कांचें पाणी आणून त्यानें अमात्य , पुरोहितादिकांनीं मिळून राजावर विधिपूर्वक अभिषेक करावयाचा , राजाला गादीवर बसविण्याचा समारंभ . [ सं . ] राजाम्लक , राजाम्लकी - पुस्त्री . रायाअवळा - ळी पहा . [ सं . ] राजावर्त , लाजवर्द - पु . हलका , कमी प्रतीचा हिरा ( इं . ) लापिसलॅझूली . याचा मुख्य रंग निळा ; कधीं तांबूस पिवळाहि सांपडतो . [ सं . ] राजावली - स्त्री . राजांची परंपरा ; राजाचें घराणें ; राजवंश . [ सं . ] राजावळ - स्त्री . १ तांदुळाची एक जात . २ तांबडया रंगाच्या लुगडयाचा एक प्रकार . ३ वर्षाचा अधिपति ; मंत्री इ० ग्रह दाखविणारा पचांगाच्या आरंभीचा भाग ; संवत्सर फल . राजावळी - वि . राजानें काढलेली ( ओळ ). तर्ही राजावळीचीं अक्षरें । - ज्ञा १७ . ३२२ . राजासन - न . राजाचें सिंहासन ; तख्त . [ सं . ] राजाळूं - न . पांढर्या अळवाची जात . ह्याच्या पानाचा देठ लांब व जाड आणि कांदा मोठा असतो . राजाळें - न . केळयाची एक जात . राजाज्ञा - पु . राजाच्या प्रधानांपैकीं ( अष्टप्रधानांपैकीं नव्हे ) एक . - स्त्री . १ राजाची आज्ञा , शासन . २ निखालस व खसखशीत हुकूम ; आदेश ; आज्ञा . राजिक - वि . राजकीय . राजिक देविक उद्वेग चिन्ता । - दा ११ . ३ . ५ . राजी - स्त्री . गंजिफांतील शब्द ; राजेरी देणी . [ राजा ] राजीक - न . १ राजाचा जुलूम ; अन्याय ; राजापासून उत्पन्न होणारीं सकटें व दु : खें ; याच्या उलट दैविक . २ सैन्याच्या स्वार्यांमुळें होणारी अव्यवस्था . ४ क्रांति ; बंड . [ राजा ] राजी बेराजी , राजीक बेराजिक - स्त्रीन . निर्नायकी ; बेबंदशाही ; एक राजा गादीवरून दूर झाल्यापासून दुसरा येईपर्यंतचा मधील काळ . [ राजीक ] राजेंद्र - पु . १ राजांचा राजा ; बलाढय राजा . २ राजअंबीर . [ सं . ] राजेरजवाडे - पुअव . राजे ; संस्थानिक ; सरदार इ० . राजेश्री - वि . १ राजश्री याचें अशुध्द रूप . २ ( ल . ) मूर्ख माणूस . हे राजेश्री दुसर्याला तोंडघशी पाडण्याऐवजीं आपणच पडले . - के २४ . ६ . ३० . राजेश्वरी - स्त्री . शिवाची अथवा ईश्वराची पत्नी ; देवी . [ सं . ] राजेळ , राजेळी , राजकेळ - स्त्री . न . केळीची एक जात व फळ . हे केळें ६ ते १२ इंच लांब व तिधारी असतें . ह्याचीं सुकेळीं करतात . राजैश्वर्य - न . राजाचें ऐश्वर्य , वैभव , थाटमाट . [ राजा + ऐश्वर्य ] राजोट , राजोटी , राजोटा - स्त्रीपु . राजवट ; राजवटा पहा . राजोटया - पु . १ कुटुंबांतील कर्ता पुरुष ; घरांतील मुख्य कारभारी . २ ( ना . ) लुडबुड करणारा , चोंबडा मनुष्य . राजोपचार - पु . १ राजत्वास योग्य असे आदर , उपचार ; राजास उचित असे उपचार ( छत्र धरणें , चवरी - मोरचेल वारणें इ० ). २ सात्विक , सौम्य औषधयोजना , शस्त्रक्रिया इ० नाजूक प्रकृतीच्या माणसास सोसण्याजोगा औषधादि उपचार . [ सं . राजा + उपचार ] राज्य - न . १ प्रजेपासून कर घेऊन तिचें पालन करणें असा राजाचा अधिकार किंवा काम . २ राजाचा अंमल ; हुकमत . ३ राजाच्या सत्तेखालचा प्रदेश . ४ राष्ट्र ; कायद्यानें राहण्यासाठीं संघटित झालेले व एका विशिष्ट देशांत राहणारे लोक ( ही व्याख्या वुड्रो विल्सन याम्ची आहे ); किंवा एका ठराविक प्रदेशांत दंडशक्तीच्या सहाय्यानें न्याय व शांतता प्रस्थापित करण्यासाठीं स्थापित केलेला मनुष्यांचा समाज . ५ कोणत्याहि व्यवहारांत दुसर्यास न जुमानतां स्वतंत्रपणें वागण्याजोगें एखाद्याचें आधिपत्य असतें तें . त्याचे घरांत सारें बायकांचें राज्य झालें आहे . ६ खेळांतील डाव , हार . [ सं . राजन् ] ०क्रांत क्रांति - स्त्री . राज्याधिकार्यांत आणि राज्यपध्दतींत जबरदस्तीनें घडवून आणलेली उलथापालथ . [ सं . ] ०घटना स्त्री. राज्यव्यवस्थेसंबंधीं ; मूलभूत कायदे वगैरे . ०घटना राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पध्दतीनें राज्यकारभार चालावा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चालेनासा होणें . - के ५ . १ . ३७ . मोडणें राज्यघटनेच्या कायद्यांत ज्या पध्दतीनें राज्यकारभार चालावा असें नमूद केलें आहे त्याप्रमाणें कारभार चालेनासा होणें . - के ५ . १ . ३७ . ०घटना मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ करावयाचाच . पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें . - के ५ . १ . ३७ . राबविणें मंत्रिमंडळास जे अधिकार दिले आहेत त्यांचा उपयोग लोकहितवर्धनार्थ करावयाचाच . पण प्रत्यक्ष कायद्याच्या कलमांतील शब्दानें जो अधिकार दिला गेला आहे असें म्हणून त्यांचाहि पायंडा पाडणें . - के ५ . १ . ३७ . ०पध्दति स्त्री. राज्यकारभाराचा प्रकार . हिचे राजसत्ताक , प्रजासत्ताक व राजप्रजासत्ताक असे तीन प्रकार आहेत . [ सं . ] ०भार पु. राज्याचा कारभार करण्याची जबाबदारी , भार , ओझें . [ सं . ] ०रीति स्त्री. शासनपध्दति . ज्या राष्ट्राची राज्यरीति उत्कृष्ट आहे त्यास धनसमृधि अपायकारक होत नाहीं . - नि ५३ . ०लोट स्त्री. राज्यक्रांति ; राज्य बुडणें . झालिया राज्यलोट । - एभा ३० . ३५९ . ०व्यवहार पु. राज्याचें काम . [ सं . ] राज्यांग - न . राज्याचीं मुख्य अंगें . हीं स्वामी , अमात्य , सुहृत् , कोश , दुर्ग , राष्ट्र व बल अशीं सात आहेत . यांतच कोणी पौरश्रेणी व पुरोहित यांचा समावेश करतात . [ सं . ] राज्याभिलाष - पु . राज्याचा अभिलाष ; दुसरे देश जिंकण्याची किंवा त्यांवर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा . [ सं . ] राज्याभिलाषी - वि . राज्याचा अभिलाष करणारा . [ सं . ] राज्याभिषिक्त - वि . सिंहासनावर बसविलेला ; ज्यास राज्याभिषेक झाला आहे असा ; राजश्रीनें युक्त केलेला . [ सं . ] राज्याभिषेक - पु . राजाला गादीवर बसविण्याच्या वेळीं विधिपूर्वक करावयाचा अभिषेक ; राज्याधिकाराचीं वस्त्रें देणें . [ सं . ] राज्यासन - न . सिंहासन ; राजासन पहा . [ सं . ] राज्योपचार - पु . सरकारी अधिकार्याचें कृत्य . [ सं . ]
|