Dictionaries | References

राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली

   
Script: Devanagari
See also:  राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली

राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली     

एक गोष्ट [ एका उंदराला उकिरडयावर एक चिंधी सांपडली. त्यानें ती कोतवालीचा धाक दाखवून परटाकडून धुवून, शिंप्याकडून शिवून, पटवेकर्‍याकडून गोंडे लावून घेतली व टोपी सुरेख झाल्यावर राजाकडे गेला व राजाला टोपी दाखवून हिणवूं लागला. राजानें ‘ घ्यारे याची टोपी हिसकावून ! ’ असें शिपायांना सांगतांच त्यांनीं तसें केलें
तेव्हां ‘ राजा भिकारी, माझी टोपी घेतली ! ’ असें उंदीर त्याला म्हणूं लागला. तेव्हां राजानें टोपी परत देवविली. तेव्हां उलट ‘ राजा भ्याला, माझी टोपी दिली ! ’ असें म्हणत नाचूं लागला.] एखाद्या क्षुद्र व्यक्तीनें मोठयाशीं बरोबरी करणें व त्याच्या उदार वर्तनाचा अर्थ भलताच लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP