|
पु. १ चावण्याच्या , फाडण्याच्या उपयोगी तोंडांतील दृश्य अस्थिविशेषांपैकी प्रत्येक ; दंत . २ ( ल . ) ( फणी , करवत , दंताळे इ० कांचा ) दांता ; फाळ ; नांगराचे टोंक ; डंगाचे टोंक . ३ हस्तिदंत . सहदेव नकुळ घेउनि दांती सिंहासनी पृथा बसली । - मोशांति ५ . ४३ . ४ द्वेषबुद्धि ; मत्सर ; दावा ; डाव ; दंश . त्याचा दांत आहे . तो दांत राखितो . [ सं . दंत ; पहा . हिं . दांत ; सिं . डंदु ] ( वाप्र . ) - उठणे - दांतांनी धरलेल्या पदार्थावर दांताच्या खोलगट खुणा उमटणे . वि. १ दमन केलेला ; जिंकलेला . २ ज्याने इंद्रियांवर ताबा मिळविला आहे असा ; संयमी . बहु शांत दांत विषयविरत तापसी महा । - शापसंभ्रम अंक १ . शांतदांत तपस्वी पूर्ण । शुची दर्मिष्ट हरिभजनी मन । [ सं . ] ०ओठ - चावणे - रागाने दांतांवर दांत घासणे ; दांतांनी ओठ चावणे ; अतिशय चिडणे ; रागावणे . खाणे - चावणे - रागाने दांतांवर दांत घासणे ; दांतांनी ओठ चावणे ; अतिशय चिडणे ; रागावणे . ०काढणे दाखविणे दांत विचकून , फिदिफिदी हंसणे . ०किची - ( ना . ) ( राग इ० कानी ) कचाकच , कडकड दांत चावणे . खाणे - ( ना . ) ( राग इ० कानी ) कचाकच , कडकड दांत चावणे . ०किरकिटीस - विपन्नावस्था , अन्नान्नदशा प्राप्त होणे ; अति निकृष्ट परिस्थितीने ग्रस्त होणे . येणे - विपन्नावस्था , अन्नान्नदशा प्राप्त होणे ; अति निकृष्ट परिस्थितीने ग्रस्त होणे . ०खाऊन ओठ खाऊन मोठ्या रागाने व अवसानाने . नरवर गरधरखतर शर करकर दांत खाउनी सोडी । - मोशल्य २ . ८४ . ०खाऊन चावून अवलक्षण करणे ( प्रतिकार करण्याचे सामर्थ्य नसता ) रागाचा दुबळा आविर्भाव आणून , शिव्याशाप देऊन स्वतःचे हंसे करुन घेणे . ०खाणे चावणे ( रागाने चडफडून , झोपेंत ) दांतांवर दांत घासणे . कोपे खातात दांत बा हेर । - मोस्त्री ४ . २६ . ०खीळ खिळी बसणे १ ( सन्निपातादि दोषांमुळे ) वरील दांत व खालचे दांत एकमेकांस घट्ट चिकटून बसणे . रामनाम घेत्गा तुझी बैसे दांतखीळ । - एकनाथ २ ( ल . ) निरुत्तर होणे ; एखाद्या पुढे बोलतां न येणे . ०खोचरणे दांताच्या फटीत , खळग्यांत काडी , कोरणी घालून अडकलेले अन्नाचे कण इ० काधणे . ०झिजणे ( ल . ) निष्फळ उपदेश केल्याने , केलेल्या विनवण्या व्यर्थ गेल्याने , शिकविलेला विषय मूर्ख विद्यार्थ्यास न समजल्याने तोंडाला फुकट शीण , श्रम होणे . ०धरणे असणे ठेवणे राखणे बाळागणे ( एखाद्याशी ) द्वेष , अदावत , मत्सर करणे ; ( एखाद्यावर ) डाव धरणे ; पूर्वीचे शल्य मनांत ठेवून ( एखाद्याच्या ) नाशासाठी टपून बसणे . ०निसकीस - त्वेष , स्फुरण , आवेश इ० कानी युक्त होणे ; जिवावर उदार होणे . मल्हारराव यांचे इरेने दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली . भाब ११ . [ दांत + सं . निकष = घासणे ] येणे - त्वेष , स्फुरण , आवेश इ० कानी युक्त होणे ; जिवावर उदार होणे . मल्हारराव यांचे इरेने दातनिसकीस येऊन मोठेमोठे खेतांत येऊन जीवाअधिक केली . भाब ११ . [ दांत + सं . निकष = घासणे ] ०पडणे ( एखाद्याची ) फटफजिती , नाचक्की होणे ; पराजित फजित होणे . ०पाजविणे एखादी वस्तु ( विशेषतः खाण्याची वस्तु ) मिळण्याजोगी नसतां तिच्याबद्दल उत्कंठिट , आतुर होणे . ०पाडणे ( एखाद्याची ) फजिती करणे ; ( एखाद्यास ) वादांत पराजित करणे ; टोमणा मारणे ; निरुत्तर करणे . इतका खोटे बोलणारा तूं असशील असे मला वाटले नव्हते . नाहीतर दोन चार साक्षी ठेवून तुझे चांगले दात पाडले असते . - त्राटिका अंक ४ , प्र . ३ . ०पाडून देणे - ( अशिष्ट ) ( एखाद्याची ) कंबख्ती काढणे ; पारिपत्य करणे ; उट्टे फेडणे ( विशेषतः धमकावणी देतांना उपयोग ). हातावर देणे - ( अशिष्ट ) ( एखाद्याची ) कंबख्ती काढणे ; पारिपत्य करणे ; उट्टे फेडणे ( विशेषतः धमकावणी देतांना उपयोग ). ०लागप ( गो ) पैसे पदरी असणे ; गबर असणे ; खाउन पिऊन सुखी असणे . ०वठणे लागणे ( उच्चारलेला शाप एखाद्यावर ) फलदूप होणे . त्याच्यावर त्या चेटकीचा दांत वठला = त्याला चेटकीच्या शापाचे वाईट फळ मिळाले , त्याला शाप भोंवला . ०वासणे ( ल . ) हाती घेतलेले कार्य शेवटास नेववत नाही म्हणून निराश होऊन स्वस्थ बसणे . ०वासून - आजाराने अशक्त होऊन अंथरुणास खिळणे . २ मेहनत फुकट गेल्याने हिरमुसले होऊन बसणे . दांत वांसणे पहा . वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमी पचली । - वामन - सीतास्वयंवर ११ . पडणे - आजाराने अशक्त होऊन अंथरुणास खिळणे . २ मेहनत फुकट गेल्याने हिरमुसले होऊन बसणे . दांत वांसणे पहा . वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ तमी पचली । - वामन - सीतास्वयंवर ११ . ०विचकणे १ उपहास अक्रुन हंसणे . जो ऐसा प्रभु त्या जना न विचकूं दे दांत , बाहे रहा । वैकुठीच सदा .... - मोरोपंत . प्रेमदांत पावुनियां श्रम दांत क्षुद्र विचकिती की जे । - भक्तमयूरकेका ६५ . २ याचना करणे ; कांही जिन्नस मिळविण्याकरिता एखाद्यास विनविणे . ०होंठ - चावणे - दांत ओंठ खाणे पहा . दातांओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे . दातांखाली घालणे - धरणे - ( एखाद्यावर ) करडा , सक्त अंमल चालविणे ; कडकपणाने वागविणे ; अतिशय छळणे ; गांजणे . दांतांची मिरवणूक काढणे - ( कर . ) ( एखाद्याने ) स्वतःचे हंसे करुन घेणे . दांताचे विष - न . मत्सराने , जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार ; शाप ; अभिशाप ; शिव्याशाप . दांताचे विष बाधणे - १ ( एखाद्याचे ) शापोद्गार फलद्रूप होणे ; दांत वठणे लागणे पहा . २ दुसर्यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे . दातांच्या कण्या करणे - १ विनवण्या , याचना करुन व्यर्थ उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करुन दांत झिजविणे ; तोंड शिणविणे . २ अनेकवार सांगणे , विनविणे . एक कांबळा पासोडी द्या म्हणून दांतांच्या कण्या केल्या . - नामना ५४ . दांतांच्या - कण्या घुगर्या होणे - व्यर्थ याचना करुन , उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक करुन तोंड शिणणे ; फार व निरर्थक बोलावे लागणे . हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या . - पकोघे . दांतावर मारावयाला पैसा नसणे - अगदी अकिंचन , निर्धन असणे , होणे , बनणे ; जवळ एकहि पैसा नसणे दांतावर मांस नसणे - दारिद्र्याने ग्रस्त होणे . २ ( दुसर्याशी ) भांडण्याचे , ( दुसर्यास ) इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे . उगीच भरीस भरल्याप्रमाणे लग्नांत खर्च केला . आपल्या तर दांतांवर मांस नाही . कुटुंब एवढे थोरले ... असे शंकर मामंजींचे रडगाणे चालू होते . पकोघे . दातांस दांत लावून असणे - निजणे - बसणे - रहाणे - तोंड मिटून , कांही न खाता , उपाशी असणे , निजणे , बसणे इ० . दांती घेणे , दांतावर येणे - ( एखाद्या ) कार्यात अपयश येणे ; ( व्यापार इ० कांत ) नुकसान , तोटा येणे . दांती तृण - तण - कड्याळ धरणे - मान तुकविणे ; नम्रपणा स्वीकारणे ; शरण येणे ; पराजय कबूल करणे . दांती बळ धरणे - अतोनात मेहेनत , धडपड , नेट करणे ; प्रयासाने , नेटाने काम करणे . दांती येणे - १ ( एखाद्यावर ) रागाने दांतओठ खाणे ; दांत ओठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणे . येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांती । - सारुह ७ . ६० . २ फार अडचणीत , पेचांत , येणे , सांपडणे . ( एखाद्याचे ) दांत त्याच्याच घशांत घालणे - ( एखाद्याची ) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणे ; ( एखाद्याची ) लबाडी त्याच्यावर उलटविणे . सोन्याचे दांत किसणे - ( ल . ) पैशाच्या राशींत लोळणे . हसतां हसतां दांत पाडणे - हंसून , गोड गोड बोलून फजिती करणे , टोमणा मारणे , निरुत्तर करणे , कुंठित करणे . दांत कोरुन कोठे पोट भरत नसते - भलत्याच कामी चिक्कूपणा करुन चालत नाही . मोठ्या कार्यास क्षुद्र साधन पुरत नसते ; क्षुल्लक बाबीत काटकसर करुन मोठा खर्च भागत नसतो . आपलेच दांत आपलेच ओंठ - १ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यातलांच अशी स्थिति असते तेव्हा भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा , शिक्षा करणाराला सारखे जवळचे स्वकीय असल्यामुळे दोहोंपैकी कोणाचेहि बरेबाईट करता येत नाही अशा वेळी योजतात . २ स्वतःच्याच दुष्कर्माचे फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो . खावयाचे दांत वेगळे , दाखवावयाचे दांत वेगळे - हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्याकरितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत असतात त्यावरुन वर दाखवावयाचे एक आणि मनांत भलते असावयाचे अशा रीतीचे ढोंग . म्ह ० दांत आहेत तर चणे नाहीत . आणि चणे आहेत त्र दांत नाहीत = पूर्ण सुदैव कधीहि लाभत नाही , त्यांत काही तरी कमीपणा असतोच . एक गोष्ट अनुकूल आहे , पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळी योजतात . सामाशब्द - खाणे - चावणे - दांत ओंठ खाणे पहा . दातांओठांवर जेवणे - चोखंदळपणाने जेवणे . दातांखाली घालणे - धरणे - ( एखाद्यावर ) करडा , सक्त अंमल चालविणे ; कडकपणाने वागविणे ; अतिशय छळणे ; गांजणे . दांतांची मिरवणूक काढणे - ( कर . ) ( एखाद्याने ) स्वतःचे हंसे करुन घेणे . दांताचे विष - न . मत्सराने , जळफळाटाने काढलेले विषारी उद्गार ; शाप ; अभिशाप ; शिव्याशाप . दांताचे विष बाधणे - १ ( एखाद्याचे ) शापोद्गार फलद्रूप होणे ; दांत वठणे लागणे पहा . २ दुसर्यास बाधेल असा शाप देण्यास समर्थ असणे . दातांच्या कण्या करणे - १ विनवण्या , याचना करुन व्यर्थ उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक खटाटोप करुन दांत झिजविणे ; तोंड शिणविणे . २ अनेकवार सांगणे , विनविणे . एक कांबळा पासोडी द्या म्हणून दांतांच्या कण्या केल्या . - नामना ५४ . दांतांच्या - कण्या घुगर्या होणे - व्यर्थ याचना करुन , उपदेश करुन , शिकविण्याचा निरर्थक करुन तोंड शिणणे ; फार व निरर्थक बोलावे लागणे . हांका मारतां मारतां माझ्या दांतांच्या कण्या झाल्या . - पकोघे . दांतावर मारावयाला पैसा नसणे - अगदी अकिंचन , निर्धन असणे , होणे , बनणे ; जवळ एकहि पैसा नसणे दांतावर मांस नसणे - दारिद्र्याने ग्रस्त होणे . २ ( दुसर्याशी ) भांडण्याचे , ( दुसर्यास ) इजा करण्याचे सामर्थ्य अंगी नसणे . उगीच भरीस भरल्याप्रमाणे लग्नांत खर्च केला . आपल्या तर दांतांवर मांस नाही . कुटुंब एवढे थोरले ... असे शंकर मामंजींचे रडगाणे चालू होते . पकोघे . दातांस दांत लावून असणे - निजणे - बसणे - रहाणे - तोंड मिटून , कांही न खाता , उपाशी असणे , निजणे , बसणे इ० . दांती घेणे , दांतावर येणे - ( एखाद्या ) कार्यात अपयश येणे ; ( व्यापार इ० कांत ) नुकसान , तोटा येणे . दांती तृण - तण - कड्याळ धरणे - मान तुकविणे ; नम्रपणा स्वीकारणे ; शरण येणे ; पराजय कबूल करणे . दांती बळ धरणे - अतोनात मेहेनत , धडपड , नेट करणे ; प्रयासाने , नेटाने काम करणे . दांती येणे - १ ( एखाद्यावर ) रागाने दांतओठ खाणे ; दांत ओठ खाऊन भांडण्यास प्रवृत्त होणे . येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि एक दांती । - सारुह ७ . ६० . २ फार अडचणीत , पेचांत , येणे , सांपडणे . ( एखाद्याचे ) दांत त्याच्याच घशांत घालणे - ( एखाद्याची ) लबाडी बाहेर काढून त्याच्या पदरांत माप घालून त्याची फजिती करणे ; ( एखाद्याची ) लबाडी त्याच्यावर उलटविणे . सोन्याचे दांत किसणे - ( ल . ) पैशाच्या राशींत लोळणे . हसतां हसतां दांत पाडणे - हंसून , गोड गोड बोलून फजिती करणे , टोमणा मारणे , निरुत्तर करणे , कुंठित करणे . दांत कोरुन कोठे पोट भरत नसते - भलत्याच कामी चिक्कूपणा करुन चालत नाही . मोठ्या कार्यास क्षुद्र साधन पुरत नसते ; क्षुल्लक बाबीत काटकसर करुन मोठा खर्च भागत नसतो . आपलेच दांत आपलेच ओंठ - १ शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यातलांच अशी स्थिति असते तेव्हा भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा , शिक्षा करणाराला सारखे जवळचे स्वकीय असल्यामुळे दोहोंपैकी कोणाचेहि बरेबाईट करता येत नाही अशा वेळी योजतात . २ स्वतःच्याच दुष्कर्माचे फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो . खावयाचे दांत वेगळे , दाखवावयाचे दांत वेगळे - हत्तीला देखाव्याचे बाहेर आलेले मोठे सुळे आणि चावण्याकरितां तोंडांत निराळे असलेले असे दोन प्रकारचे दांत असतात त्यावरुन वर दाखवावयाचे एक आणि मनांत भलते असावयाचे अशा रीतीचे ढोंग . म्ह ० दांत आहेत तर चणे नाहीत . आणि चणे आहेत त्र दांत नाहीत = पूर्ण सुदैव कधीहि लाभत नाही , त्यांत काही तरी कमीपणा असतोच . एक गोष्ट अनुकूल आहे , पण तिचा उपयोग होण्यास जी दुसरी गोष्ट आवश्यक असते ती अनुकूल नसते अशा वेळी योजतात . सामाशब्द - ०इळा पु. दांतरा , दांते पाडलेला कोयता . ०कडी स्त्री. ( राजा . ) दांतखिळी . ( क्रि० बसणे ). ०कस स्त्री. ( तोंडातून निघालेले ) शब्द ; उद्गार ; भाषण ; विशेषतः अशुभसूचक शब्द , भाकित इ० बत्तिशी पहा . ( क्रि० बाधणे ; लागणे ). [ दांत + कस ] ०कसई कसाई - पु . नेहमी अशुभ भविष्ये सांगणारा व ज्याची तसली अशुभ भविष्ये खरी ठरतात असे मानले जाते असा मनुष्य . [ दांत + कसाई = खाटिक ] - कसळ - ळी - कसाळ - ळी किसळ - ळी - स्त्री . १ एक सारखे , नेहमी दांत खाणे , शिव्याशाप देणे , ताशेरा झाडणे इ० युक्त दुर्भाषण . २ अभद्रसूचक , अशुभ भाषण , अमंगल भाषण , बत्तिशी . ( क्रि० बांधणे ). - वि . १ नेहमी दांत खाणारा ; शिव्याशाप देणारा ; ताशेरा झाडणारा . २ नेहमी अनिष्ट , अभद्र , अशुभ भविष्य सांगणारा . बत्तिशी वठविणारा - रे ( व्यक्ति , भाषण ) दांतकसाळीस येणे - दांत खाऊन असणे , येणे . दांत कसाळीस येऊन .... इंग्रज ... आला . - रा १० . ८१ . [ दात + कसाला = आयास , श्रम , छळ ] ०किरकंड्या स्त्रीअव . ( व . ) दांत खाणे ; शिव्याशाप देणे ; दांत किरकीट अर्थ १ पहा . दांतकिरकंड्या खाल्ल्या माझ्यावर ०किरकीट किरकिटी स्त्री . १ दांत खाणे ; शिव्याशाप देणे . ( क्रि० देणे ). २ ( ल . ) हट्टाने , घुमेपणाने मौन धरुन स्वस्थ बसणे . ( क्रि० देणे . ) ३ ( बायकी भाषा . ) आर्जव , विनवण्या , गयावया करुन उसने मागणे ; दांतांच्या कण्या करणे ( तिन्ही अर्थी अनेकवचनी प्रयोग ). ०केणे न. ( एखाद्याचे ) नेहमीचे , नित्याच्या जेवणाचे अन्न , भक्ष . [ दांत + केणे = धान्य , भाजीपाला इ० धातूची अणकुचीदार , लहान व बारीक सळई . ०खिळी खीळ स्त्री . १ सन्निपातामुळे वरचे व खालचे दांत परस्परांत घट्ट बसून तोंड उघडता न येणे . ( क्रि० बसणे ; मिटणे ; लागणे ; उघडणे ). २ न . बोलणे ; मौनव्रत . [ दांत + खीळ = खिळा ] ०घशी क्रिवि . तोडघशी . या रांडा घरघाल्या सख्या तूं पडशी दांतघशी । - सला १० . [ दांत + घसणे ] ०चिना पु. दांत घट्ट करण्याचे औषध ; दंतमंजन ; ( विरु . ) दारशिणा ; ( व . ) दाच्छना पहा . [ सं . दंत + शाण ] ०पडका गा पड्या वि . १ ज्यांचे दांत पडले आहेत असा . २ दांत पडल्यामुळे विरुप दिसणारा . [ दांत + पडणे ] ०वडा पु. ( गो . ) लहान मुलास दांत आल्यानंतर , त्याच्यावरुन ओंवाळून मुलांकडून लुटावयाच्या वड्यांपैकी प्रत्येक . ०वडे - ( गो . ) मुलांस दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरुन ओंवाळून ते मुलांकडून लुटविणे . काढप - ( गो . ) मुलांस दांत आल्यानंतर लहान लहान वडे त्याच्यावरुन ओंवाळून ते मुलांकडून लुटविणे . ०वण न. १ एक टोंक चावून शेवटास गोंडेदार केलेली , दात घासण्याची बाभळ , निंब इ० झाडाची लहान काडी . २ दंतमंजन ; दांत घासण्यासाठी केलेली पूड . ( व . ) दातवन . ३ दांतचिना ; दांतांस लावून ते काळे करण्याचे औषध . [ सं . दंतवर्ण ; प्रा . दंतवण ; गुज . दांतवण ] ०वाके न. शेतीच्या कांही आउतांचे , अवजारांचे दांते आंत वांकविण्याचे एक हत्यार . [ दांत + वांकणे ]
|