|
न. १ एखादें काम , कृत्य . ' हे कर्म झालें समरांत जेव्हां । होतात कोठें रणभीरु तेव्हां । ' - वेणीसंहार ३ . २ स्नानसंध्या , यज्ञयागादि धार्मिक विधि ; याचे नित्य , नैमित्तिक व काम्य असे तीन भेद आहेत . ३ सांरतच्या आयुष्यातील कृति चाल , आचार , वर्तणुक ; यावरून दैव किंवा नशीब अशा अर्थानें योजतात - येथें दैव म्हणजे पूर्वजन्मार्जित पापपुण्याचा भोगवटा होय ; पुर्वजन्मकृत आचरण ; संचित .' अरे अरेकर्मा । बारा वर्ष झाली याच धर्मा ॥ ' या व्यापारांत मीं साफ बुडालो . माझें कर्म । दुसरें काय ?' ' कर्मबलिवंत ', कर्मबलत्तर ', ' घोर - कठिण कर्म ' या संज ` जा कर्माचें ( दैवाचें ) वर्चस्व , काठिण्य , निष्ठुरता दाखवितात . ४ विशिष्ट काम ; नैतिक कर्तव्य ; जाति , धंदा वगैरेनी मानलेलें आवश्यक कृत्य . ५ ( व्या .) कर्त्यानें अमुक क्रिया केली हें दाखविणारा शब्द ; कर्तृविषयक व्यापाराचें कारक ; कर्माची विभक्ति प्राय ; द्वितीया असते . ' रामा गाय बांधतो ' यांत गाय हें कर्म . ६ उद्योग ; कामधम्दा ; नेमलेलें , विशिष्ट प्रकारचें काम . ७ सुरतक्रीडा ; मैथुन ; रतिसुख ; संभोग .' त्यानें तिच्याशी कर्म केलें . ८ सामान्य क्रिया ; ऐहिक व्यापार ; मायिक क्रिया . ' माया हा सामान्य शब्द असुन तिच्याच देखाव्याला नामरुपें व व्यापाराला कर्म हीं विशिष्टार्थ नामें आहेत .' - नीर २६० . ( सं ,) ( वाप्र .) कर्म दोन पावलें पुढें - नशीब नेहमी आपल्यापुढें धांवत असतें . ०आड कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द ) ठाकणें कर्म आडवें येणें ; आपत्ति ओढवणें . ' अन्न घेवोनि जों निघाली । तो कर्म आड ठाकलें । ' - ह १६ . १३० . कर्मानें ओढणें - ओढवणें - दैवाचा पाश येऊन पडणें ; दैवाधीन होणें . - नें जागें होणें - दैव अनुकूल होणें . - नें धांव घेणें - दैव पुढें येणेंज ; दैवाकडुन प्रतिबंध , अडथळा होणें . - नें पाठ पुरविणें - उभें राहणें - दैवानें मोडता , अडथळा घालणें ; कर्म ओढवणें . - नें मागें घेणें - सरणें - दैवानें साहाय्यंन करणें ; केल्या कर्माचें फळ - न . केलेल्या कृत्याचा परिणाम . ' केल्या कर्माचें फळ बापा । ऐश्वर्य तुज देतील । ' अमृत , नव ४४३ . ( सामाशब्द ) ०कचाट न. प्रारब्धामुळें मागें लागलेलें दुदैव . संकट , विपन्नावस्था ; कर्मकटकट ; पूर्व जन्मीचें पाप , भोग , ' प्राणी कष्टकष्टोंचि मेले । कर्मकचाटें । ' - दा १८ . ८ . २ . ( सं . कर्म + म . कचाट ) ०कटकट खटखट - स्त्री . १ प्रारब्धयोगानें वाट्यांस आलेलें किंवा गळ्यांत पडलेलें व कंटाळा येण्याजोगें कोनतेंहि काम ; वरचेवर त्रास देणारें , डोकें उठविणारे , अडथळा आणणारें काम किंवा व्यक्ति ; कोणतीहि नशीबीं आलेली पीडा , त्रास , छळ , जाच वगैरे . २ ( ल .) जिकिरीचें , नावडतें काम ; व्याद . ' मी म्हतारा झालों माझ्यामागें ही शिकविण्याची कर्म कटकट कशाला ?' ' आतां त्यांची कर्मकटकट आपणांस कशाला हवी ' - नि . ६७ . ३ ( ल .) भांडण ; तंटा ; कटकट . ' तुम्हा दोघांत नेहमीं इतकीं कर्मकटकट चालत असतें .' - भा . ३७ . ०कट्टी वि. ( गो .) हतभागी ; कर्मकरंटा . ०कथन नी - न . १ कर्मकथा ; कर्माची कहाणी . २ ( ल .) दुदैवी प्रसंगकथन ; दुःखदकथा ; कर्मकथा पहा .' ऐसी आमुची कर्मकथनी । तें अनायासें आलें सर्व घडोनी । ' - मक २६ . १८५ . ( सं .) ०कथा स्त्री. १ प्रारब्धामुळें भोगलेल्या दुःख , त्रास , दगदग , वगैरेची दुसर्याजवळ संगितलेली गोष्ट , वृत्तांत , कहाणी . २ आत्मश्लघेचें किंवा रिकामटेकडें भाशण ; बाता . ३ एखाद्या प्रसंगाची किंवा कृत्यांची खरी व इत्थंभूत हकिकत . ४ कंटाळवाणें , निरर्थक भाषण बडबड . ( सं .) ०कपाट न. कर्मकचाट पहा . ( सं .) ०कहाणी स्त्री. कर्मकथा पहा . ०कांड न. त्रिकांड वेदांतील यज्ञासंबंधीचा कर्ममार्गदर्शक व आचारनिदर्शक भाग ;- मंत्र व ब्राह्माणें मिळून जो वेदभाग त्यास कर्मकांड व उपनिषदांस ज्ञानकांड म्हणतात . ' कर्म कांड तरी जाणें । मुखोद्गत पुराणें । ' - ज्ञा १३ . ८२८ . २ धर्मकर्मे , आचारविचार , संस्कार वगैरेना व्यापक अर्थानें हा शब्द लावितात . ( सामा .) आन्हिक ; नित्यनैमित्तिक आचार . ' कृष्णगीत रुचतां श्रवणांतें । कर्मंकाड रुचि न दे कवणातें ॥ ' ' आतां आपलें कर्मकांड अगदीं एकाबाजूस ठेवावें .' - चंद्रगुप्त ३५ . ३ कंटाळवाणी , निरर्थक बडबड , कर्मकथा . ( क्रि० गाणें ; सांगणें ; बोलणे ). ०कार वि. १ ( गो .) कर्मनिष्ठ २ शिल्पी ; लोहार . ( सं .) ०काल ळ - पु . धर्मकार्य करण्यास उचित असलेला काळ , विळ , समय . ( सं .) ०केरसुणी स्त्री. कर्मरुपी केर सरसकट झाडणारी , कर्मापासून , कर्मापासून सोडविनारी केरसुणी . ' तेव्हा तेंचि श्रद्धा होय । कर्मकेरसुणी । ' - ज्ञा . १७ . ६४ . ०गति स्त्री. दैव . प्रारब्ध ; नशीब . दैवगति पहा . ( सं .) ०चंडाळ चंडाळा - पु . ( कृत्यानें ) निवळ चांडाळ . १ अति कूर . पाषाणहृदयी माणुस . २ स्वैर वर्तनी ; धर्मलंड ; दुरात्मा . ( सं .) ०चोदना स्त्री. कर्म करण्याची प्रेरणा . ' कर्मचोदना व कर्मसंगरह हे शब्द पारिभाषिक आहेत .' - गीर ८३५ . ( सं .) ०ज वि. कर्मापासून उप्तन्न झालेलें . ' सकळ यज्ञ कर्मज ' - ज्ञा . ८ . ४६ . ( सं .) ०जड पु. कर्मठ लोक . ' तिन्हीं लोकांचा शास्ता । इश्वर तो मी नियंता । येणें कर्मजडांची वार्ता । अनीश्वरता छेदिली । ' एभा १० . ६२१ . ०जात न. सर्व प्रकारचें कर्म ; सर्व तर्हेचें व्यापार . ' मग सस्य फळपांकांत । तैसें निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसित । अपैसें ये । ' - ज्ञा . १८ . १२९ . ( सं .) ०जीव वि. ( गो .) बारीक , लहान प्राणी . ०दक्ष वि. धर्माचार व विधि यांत निपूण ; कर्मठ ; कर्मशील ; कर्मनिष्ठ , कर्मिष्ठ यांसारख्या उपयोग . कर्मदक्शा कर्ममोचका । जयराम कोंदड भंजना । ' ( सं .) ०धर्म न. ( क्व .) पु . ( आयासमासांतील धर्म शब्द जरी पुल्लिंगी असला तरी बहुतेक सर्व सामान नपुसलिंगीच आहेत ; कारण यांतील अप्रधानार्थ कर्म शब्दापासूनच निघालेला असून धर्म शब्द केवळ जोडशब्द आहे ) वर्तन ; वर्तनक्रम ; कृत्य ; आचरण . ' जसें ज्याचें कर्मधर्म तशी त्यास फलप्राप्ति .' ' कर्माधर्मानें कोण्ही संपत्ति भोगतो आणी गादीवर बसतो , कोण्ही फांशी जातो .'; कोण्हाच्या कर्मधर्मात कोण्हाचा वांटा नाही .' = प्रत्येकाला स्वतःच्या कृत्याबद्दल झाडा दिला पाहिजे . ०धर्मगुण पु. कर्मधर्माचा प्रभाव , शक्ति . कर्मधर्मसंयोग पहा . ( सं .) ०धर्मविरहित वि. धर्माज्ञा . धर्मिक व्रतें व कृत्यें ज्यानें सोडलीं आहेत . किंवा जो त्यापासुन मुक्त झाला आहे असा ; ऋषि किंवा साधुजन यांना चांगल्या अर्थी उच्छृंखल व धर्मलंड यांना वाईट अर्थी लावतात . ' आम्हीं कर्मातीत झालों म्हणती ' या शब्दाचा अर्थ दोन्हीं प्रकारचा म्हणजे चांगला व वाईटहि आहे . ' झालों कर्मधर्मविरहित । मना आवडे तो भोग भोगित । ' ( सं .) ०धर्म धर्मयोग - पु . १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग ; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य ( पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळुन ) २ अकल्पित मेळ ; यदृच्छा ; प्रारब्धायोग . संयोग धर्मयोग - पु . १ स्वतःचें दैव आणि सत्कर्म यांचा संयोग ; भाग्य व सदाचार यांचें ऐक्य ( पूर्वजन्मार्जित आणि इहजन्मार्जित सत्कृत्यांचें फळ मिळुन ) २ अकल्पित मेळ ; यदृच्छा ; प्रारब्धायोग . ०धर्मसंयोगानें क्रिवि . अचानक ; चमत्कारिक किंवा अकल्पित मेळ मिळून येऊन ; प्रसंगोपात्त ; प्रारब्ध योगानें . कर्मधर्मसंयोगानें मी अगदीं सहज बाहेर गेलों तों माझी नजर तिच्याकडे गेली .' - मायेचा बाजार .' कर्मधर्मसंयोगानें तुमची गांठ पडली आहे तर गोड बोलून काळ लोटावा .' ०धारय पु. ( व्या .) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उपमानोपमेभावसंबंध ज्यांत असतो तो ; विशेष्य - विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो ; उदा० ' भक्तिमर्ग = भक्ति तोच मार्ग , किंवा भक्तिरुप जो मार्ग तो ; भवसागर ; संसारा टावि ; काळपुरुष .' - मराठीभाषेचेंव्या . २७५ . तत्पुरुषसमासाचा एक भेद . ( सं .) समास पु. ( व्या .) वक्त्याच्या मनांत उभय शब्दांचा भाव ज्यांत समान असतो किंवा उभय शब्दांचा परस्पर उपमानोपमेभावसंबंध ज्यांत असतो तो ; विशेष्य - विशेषणांचें सान्निध्य असून त्यांचा जो समास घडतो तो ; उदा० ' भक्तिमर्ग = भक्ति तोच मार्ग , किंवा भक्तिरुप जो मार्ग तो ; भवसागर ; संसारा टावि ; काळपुरुष .' - मराठीभाषेचेंव्या . २७५ . तत्पुरुषसमासाचा एक भेद . ( सं .) ०निष्ठ वि. कर्मठ पहा . ' जया लाभचिया आशा । करूनि धैर्यबाहुंचा भरवंसा । घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ । - ज्ञा ६ . ४७४ . ( सं .) ०निष्ठा स्त्री. १ कर्मावर निष्ठा . २ कर्मयोग . वैदिक धर्मांत ... दोन मार्ग ... असतें , पैकीं एका मार्गास ... ज्ञाननिष्ठा व ... दुसर्यास कर्मयोग किंवा संक्षेपानें नुसता योग अगर कर्मनिष्ठा असें म्हणतात . - गीर ३०१ . ( सं .) ०न्यास पु. १ कर्म किंवा कृत्यें यांचा त्याग ( पुढील जन्मी हित व्हावें ; किंवा फ्ळ मिळावें म्हणुन ). २ फलन्यास ; कर्मापासून मिळणार्या फलाविषयींच्या इच्छेचा किंवा आशेचा त्याग ; निष्कामकर्म . ( सं .) ०फल न. प्रारब्धापासून मिळणारें फळ ; पूर्वजन्मीं केलेल्या पापपुण्याचें चांगलें अगर वाईट असं या जन्मीं भोगावें लागणारं फळ . ' सांडुनि दुधाचि टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी । किंबहुना कर्मफळी । तैसें कीजे । - ज्ञा . १८ . १७४ . ( सं .) ०फुटका वि. भाग्यहीन ; दुदैवी ; कमनशिबाचा ; अभागी . ( कर्म + फुटणें ) ०फुटणें सक्रि दुदैव ओढवणें ; गोत्यांत येणें ; नुकसान होणें . ०बंध पु. फलशेनें केलेल्या कर्मामुळें प्राप्त झालेलें बंधन ; प्रारब्धाप्राप्त स्थिति ; मायिक पसारा ; ऐहिक मायापाश ; प्रपंच संसार .' जो पहुडला स्वानंदसागरीं । कर्मबंधीं न पडे तो । ' ( सं .) ०बंधु पु. व्यवसायबंधु ; समव्यवसायी ; एकाच प्रकारचें काम करणारा . ( सं .) ०भुवन न. कर्मरुप घर . ' तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधुनि आवो । उभवितां न लवी खेंवो । कर्मभुवनें । ' - ज्ञा . १८ . ४५५ . ( सं .) ०भूमि भूमिका - स्त्री . १ इहलोक ; मृत्युलोक ; यज्ञादि धार्मिक कृत्यें जेथें करतां येतात ती जागा कर्म करावयाचें क्षेत्र ; रंगभूमि ( मर्त्यांची ). जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसें स्वइच्छा विचारितां महीं । आलें ते पाही कर्मभूमीस ' - एभा २ . १८४ . ' परम प्रतापी दशरथपिता । कर्मभूमीस येईल मागुता । ' - रावि १६ . ८६ . ( सं .) २ प्राधान्यानें भारतवर्ष . - हंको . ०भोग पु. भवितव्यतेच्या नियमानुरुप मिळणारी सुखदुःखें सोसणें ; दैवाची भरपाई ; पूर्वसंचितानुरुप या जन्मीं प्राप्त होणारी स्थिति . ' माझा कर्मभोग चुकत नाही .' ( सं .) ०भ्रष्ट वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक कर्माचें आचरण न करणारा . धर्माज्ञा व धर्मकर्म परिपालनाविषयीं उदासीन ; कर्तव्यपराड्मुख . ( सं .) ०मार्ग पु. १ स्नानसंध्या इ० कर्में करण्याची रीत ; यज्ञयागादि कर्मरुप ईश्वरप्राप्तीचा किंवा मोक्षाचा साधनीभूत मागें ; सत्कृत्यें केल्यानें व धर्माचरणानें मोक्षाला जाण्याचा मार्ग . २ धर्मकृत्यें करण्याचा खरा मार्ग . ३ श्रौत म्हणजे यज्ञयागादि कर्माचा मार्ग . ' भारतीय तत्त्वज्ञानांत मोक्षाचें कर्ममार्ग . ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असें तीन मार्ग सांगितलें आहेत . '- ज्ञाको क १३२ . ( सं .) ०मार्गी वि. मार्ग कर्ममार्गानें जाणारा ; जो निष्ठापुर्वक धर्माचारण करून . परमेश्वरकर्मकर्मानें जाणारा ; जो निष्ठापूर्वक धर्माचरण करून परमेश्वरप्राप्तीविषयी झटतो तो . ( सं .) ०मुक्ति स्त्री. स्नानसंध्यादि नित्य नैमित्तिक कर्में करण्याची आवश्यकता ज्या स्थितींत उरत नाहीं . अशी अवस्था नैष्कर्म्यसिद्धि ( सं .) ०मोचक वि. कर्ममार्गापासून मुक्त करणारें ; ऐहिक सुखदुःखापासून सोडविणारें . ' कर्मदक्षा कर्ममोचका । जयराम कोदंडभंजना । ' ( सं .) ०मोचन न. कर्ममार्गापासून मुक्तता . ०योग पु. १ प्रारब्ध ; दैव ; यदृच्छा ; योगायोग . २ दैवगतीनें घडणारी गोष्ट . - शर . ३ व्यापार ; चळवळ किंवा कार्य करण्याचें तत्त्व . - झाकों क १३५ . ४ ज्ञान हें जरी किंवा कार्य करण्याचें तत्व . - ज्ञाको क १३५ . ४ ज्ञान हेंच जरी मोक्षसाधन असलें तर कर्मशुन्य राहणें कधींच शक्य नसल्यामुळें त्याचें बंधकत्व नाहीसें होण्यास कर्में कधींही न सोडतां शेकटपर्यंत तींच निष्कामबुद्धीनें करीत राहण्याचा जो योग तो . - टिसू ४७ - ४८ ; याला इंग्रजींत एनर्जीझम असा प्रतिशब्द गीतरहस्यांत सुचविला आहे . - गीर ३०१ . वरील टीप . या योगाचें जें शास्त्र त्यास कर्मयोग म्हणतात व तें आचरणारा तो कर्मयोगी ). ' बलवंत ( टिळक ) कर्मयोगी ' - सन्मित्रसमाज मेळा पद्मावली १९२९ , पद १ . ( सं .) ०लंड वि. धर्मशास्त्रविहित नित्यनैमित्तिक विधीचें पालन न करणारा ; धर्मभ्रष्ट ; धर्मविधि व धर्माज्ञेचा धिक्कार करणारा , उपहार करणारा . ( सं .) ०लोप पु. नित्य धार्मिक क्रमांतील एखादें कार्म सोडणें , न करणें ; दीर्घकालपर्यंत नित्य आगर नैमित्तिक कर्मविधि न करणें . ( सं ) ०वाचकधातुसाधित न. मुळ धातूस ' ल ' किंवा ' लेला ' हें प्रत्यक लाविले अस्तां होणारे धातुसाधित . उ०केलेला दिलेल्या . परंतु यांत ' पढ ' धातूचा गज वर्ज्य करुन हे प्रत्यय लावितेसमयीं सकर्मक धातूस ' इ ' आगम होतो . उदा० ठेविला , अर्पिला , आकर्षिलेला . - मराठी - भाषेचें व्याकरण १७३ . ( सं .) ०वाद पु. १ धर्मवहित कर्मा नीच मोक्षप्राप्ति होतें असें मत . २ मनुष्यास विशिष्ट जन्मांत जें सुखदुःख मिळतें तें त्याच्या पूर्व जन्मांतील कृत्याचें फल होय असा युक्तिवाद ; कर्माचें फळ भोगणें ही कल्पना . - ज्ञाको क १३६ . ( सं .) ०वादी - पु . कर्मवादावरच भिस्त ठेवून त्याचें समर्थन करणारा माणुस ( सं .) ०वासना स्त्री. दैनिक धर्मकृत्याबद्दलचीं इच्छा , आवड . ( सं .) ०विधि पु. ( अनेकवचनींही प्रयोग होतो ) धर्मसंबंधी कृत्यें वगैरेचे नियम , पद्धति , रिती मार्ग ; कोणत्याही विशिष्ठ प्रकारच्या धर्मकृत्याचें सुत्र किंवा विधान . ( सं .) ०विपाक पु. १ पूर्व जन्मीम केलेल्यां पुण्य , पाप वगैरे कृत्याचें फल पुढील जन्मीं हटकून यावयाचें हा सिद्धांत . २ कर्माची फलनिष्पत्ति ; परिणाम . ( सं .) ०वीर पु. कार्यकर्ता ; पराक्रमी मनुष्य . ' कर्मवीर निघूनी गेला ' - संग्राम ४९ . ( सं .) ०वेग कर्माचा वेग - पु . दैवाचा किंवा प्रारब्धाचा जोर , झपाटा , सामर्थ्य धक्का ; पुर्वसंचिताचा प्रभाव . ;' कलालचा भोवरा । जैसा भत्रें गरगरा । कर्मवेगाचा उभारा । जोंवरी। ' जेथें कर्माचा वेग सरे । तेथें धांव पुरे । ' ( सं .) २ ( अनेक वार केलेल्या ) कृत्यांचा जोर , समर्थ्य , प्रचोदन ; संवयीचा जोर ; स्वाभाविक प्रेरणा ; कर्मवेग भलत्याकडे ओढून नेईल ' ०शील वि. कर्मासक्त ; धर्मानें वागणारा ; शास्त्रानें संगितलेलीं सर्व धर्मकर्में जो मनापासून काळजीपुर्वक करतो तो . ( सं .) ०संगी वि. कामांत , धर्मानुष्ठांनांत , व्रतनियमनांत सतत गढलेला ; याच्या विरुद्ध ज्ञानाभ्यासी ( सं .) ०संग्रह पु. निरनिराळे व्यवसाय . व्यापार ; आपण ज्या क्रिया . ' कर्मसंग्रह या शब्दानें त्याच मानसिक क्रियेच्या तोडीच्या बाह्म क्रिया दाखविल्या जातात .' - गीर ८३६ . ( सं .) ०संचय पु. कर्मसंग्रह ; मनुष्याचें अनेकविध व्यापार , क्रिया ; चलनवलनादि कृत्य ' तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो । ' - ज्ञा . १८ . ५१२ . ( सं ) ०संन्यास पु. १ अक्र्माचा त्याग ; नित्य नैमित्तिकादि कर्में करण्याचें सोडुन देणें . २ शारीरिक सोडुन इतर सर्व कर्मांचा त्याग ( शांकरमत ). ' शंकराचार्यांच्या ग्रंथात कर्मसंन्यासच प्रतिपाद्य आहे .' - टिसू ५ . ( सं .) ०सूत्र न. नित्य धर्मकर्माची व त्यासंबंधी नियमांची मालिका ; कर्तव्यकर्म . परंपरा . ' भवपाश तोडिते शस्त्र । ज्ञान ईश्वराचें विचित्र । परि जिवाचें कैसें कर्मसुत्र । जे अनावडी तेथें विषयीं । ०हीन वि. धार्मिक नियम , विधि न पाळणारा ; धार्मिक नियमाबद्दल काळजी न करणरा ( सं .) म्ह० कर्मणो गहना गति = नशिबाची गति जाणणें शक्य नाहीं . ( एखादी वाईट गोष्ट अकल्पित घडली म्हणजे दैववादी मनुष्य ही म्हण म्हणतो )
|