|
पु. १ गळिताच्या धान्यापैकी एक . यांत काळे व पांढरे असे दोन प्रकार आहेत . तिळाचे तेल निघते व त्याची पेंड गुरे खातात . रानतीळ म्हणून तिळाच्या झाडासारखे एक झाड असते . २ शरीराच्या कातडीवरील नैसर्गिक काळा डाग . तिल अर्थ ३ पहा . ३ डोळ्यांतील काळा ठिपका . तिळा करिता पुतळी । दिसो लागे । - दा ८ . ३ . ४ . का ते नेत्रद्वयांतील बाहुलाबाहुली । त्यांची तीळपुतळीने सोयरीक केली । - स्वादि ११ . १ . ५७ . - क्रिवि . तिळभर ; यत्किंचित . तरी तीळ सनदांचा उजूर न धरितां . - वाडसमा १ . १५३ [ सं . तिल ] ( हा शब्द समासांत आला असतां र्हस्व उच्चारला जातो यासाठी र्हस्व तीच सामासिक शब्द व वाक्प्रचार येथे दिले आहेत ). ( वाप्र . ) ०खाऊन मोडणे - ( एक तीळ खाल्ल्यानेहि उपवास मोडतो यावरुन ) थोडक्या लाभाकरिता वाईट गोष्ट करणे . तीळ घालून कूळ उच्चारप - ( गो . ) विकत श्राद्ध करणे . व्रत मोडणे - ( एक तीळ खाल्ल्यानेहि उपवास मोडतो यावरुन ) थोडक्या लाभाकरिता वाईट गोष्ट करणे . तीळ घालून कूळ उच्चारप - ( गो . ) विकत श्राद्ध करणे . ०तीळ १ थोडे थोडे ; जराजरा ; किंचित ; अल्प . औषध नित्य तिळतीळ खात जा . २ हळू हळू ; धीरेधीरे . म्ह ० शेजीची केली आस आणि तीळतीळ तुटे मास . ०तीळ तुटणे - सारखी काळजी , हुरहुर लागणे ; अतिशय चिंता वाटणे . तीळतीळ तुटे ग जीव सदा चैन नच पडे । - सत्यविजय . जीव तुटणे - सारखी काळजी , हुरहुर लागणे ; अतिशय चिंता वाटणे . तीळतीळ तुटे ग जीव सदा चैन नच पडे । - सत्यविजय . ०तुटणे सोयर , सुतक ( तिलांजलीचा ) संबंध तुटणे . ०दान - १ ( मृतमनुष्यास तिलांजली देतात यावरुन ल . ) तिलांजली देणे ; संबंध सोडणे ; त्याग करणे . २ एखाद्य पर्व दिवशी तीर्थाच्या ठिकाणी स्नान , तिलदान करतात ते . ऐसा श्रीकृष्णार्जुन । - संवादसंगमी स्नान । करुनि देतसे तिळदान । अहंतेचे । - ज्ञा १८ . १६१९ . देणे - १ ( मृतमनुष्यास तिलांजली देतात यावरुन ल . ) तिलांजली देणे ; संबंध सोडणे ; त्याग करणे . २ एखाद्य पर्व दिवशी तीर्थाच्या ठिकाणी स्नान , तिलदान करतात ते . ऐसा श्रीकृष्णार्जुन । - संवादसंगमी स्नान । करुनि देतसे तिळदान । अहंतेचे । - ज्ञा १८ . १६१९ . ०पापड - ( अंगाचा ) संताप होणे . माझ्या आवडत्या अंगाचा तिळपापड होऊन गेला . - नाकु ३ . ३९ . तोंडी तीळ न भिजणे - एखादी गुप्त गोष्ट तोंडात , मनांत न राहणे . तिळी असणे - १ ( एखाद्याच्या ) कह्यांत , अर्ध्या वचनांत असणे . २ ( व . ) एक रास असणे . ३ ( व . ) ऐकण्यांत असणे . तिळी थेंब पडणे - ( कपाळावरच्या तिळावर घामाचा थेंब पडणे ) संतप्त होणे ; अतिशय रागावणे . तिळी येणे - १ दुसर्याच्या कह्यांत , सत्तेत येणे . तिळागुणी होणे ; स्वाधीन होणे . देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला । - तुगा २०३८ . २ अनुकूल होणे ; सख्य , प्रेम ठेवणे . तीळखा तिळी ये गुळखा गोडसे बोल . सामाशब्द - होणे - ( अंगाचा ) संताप होणे . माझ्या आवडत्या अंगाचा तिळपापड होऊन गेला . - नाकु ३ . ३९ . तोंडी तीळ न भिजणे - एखादी गुप्त गोष्ट तोंडात , मनांत न राहणे . तिळी असणे - १ ( एखाद्याच्या ) कह्यांत , अर्ध्या वचनांत असणे . २ ( व . ) एक रास असणे . ३ ( व . ) ऐकण्यांत असणे . तिळी थेंब पडणे - ( कपाळावरच्या तिळावर घामाचा थेंब पडणे ) संतप्त होणे ; अतिशय रागावणे . तिळी येणे - १ दुसर्याच्या कह्यांत , सत्तेत येणे . तिळागुणी होणे ; स्वाधीन होणे . देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला । - तुगा २०३८ . २ अनुकूल होणे ; सख्य , प्रेम ठेवणे . तीळखा तिळी ये गुळखा गोडसे बोल . सामाशब्द - ०काट न. ( कु . ) तिळाचे काड ; पाचोळा . [ सं . तिल + काष्ठ ] ०कूट न. मोहर्या , मेथ्या , तीळ इ० कुटून केलेली पूड ; एक तोंडीलावणे . ०कोंद स्त्री. तिळाचे सारण , पुरण . कोंद पहा . ०गूळ पु. ( मकरसंक्रांतीच्या दिवशी वाटतात ते ) गूळ मिश्रित तीळ ; शर्करामिश्रित तीळ ; हलवा . तिळवण पहा . तिळगूळ घ्या . गोड बोला . ०तुल्य ल्या तिळमात्र ; तिळप्राय . तिलतूल्य नाही डगल्या । - मध्व २२० . मशारनिल्हेच्या अमलास अतःपर तिळतुल्या कजिया न करणे . - वाडशा १ . ११७ . ०पुष्प न. १ तिळाचे फूल . २ ( ल . ) डोळ्यांत पडलेला डाग , फूल . ०प्राय क्रिवि . किंचित ; थोडे ; अल्प ; सोमल तिळप्राय खाल्ला असता विकार होतो . ०भर राई मुळी देखील ; थोडे सुद्धां धर्मवासना कांही ज्याचे मानसि तिळभर नाही । - मध्व ५५२ . तुजसम अरोळी देईल तो उणी नाही तिळराई । - राला ९ . ०मांडा पु. ( बे . ) वर तीळ लावून तयार केलेला मांडा . ०वडी स्त्री. १ साखर घालून केलेली तिळाची वडी . २ ( राजा . ) तोंडीलावण्याकरिता तिळाची अनेक पदार्थ घालून केलेली वडी . तिखट तिळवडे , सारबिजवडे । - अमृत ३५ . ०वण स्त्री. ( बायकी ) लग्न झाल्यानंतर पहिल्या मकरसंक्रांतीस हलवा , तिळाचे लाडू , आहेर वगैरे नवरा - नवरीकडील माणसे परस्परांच्या घरी पाठवीत असतात तो प्रकार . संक्रांतीच्या सणातील एक कृत्य ; तिळगूळ . [ सं . तिल + वायन ; म . वाण ] ०वणी स्त्री. १ तिळगूळ . भारत कथा संक्रमणी । निरोपमरुपे तिळवणी । - मुसभा ३ . १५३ . २ तिळवण पहा . तिळवा , तिळवा लाडू पु . तीळ वगैरे घालून केलेला तिळाचा लाडू . दृढतर तिळवे हे गोड अत्यंत लाडू । - सारुह ३ . ५५ . तिळवे लाडू अमृतफळे । - वसा २६ . ०संक्रांत स्त्री. मकरसंक्रांत . २ मकरसंक्रांतीला पाटील - कुळकर्ण्यांचा तिळगूळ घ्यावयाचा हक्क . तिळसे गुळसे न . ( ना . ) संक्रांतीचा तीळगूळ . ०होम पु. तिळाच्या आहुति देऊन केलेला होम . तिळाचे कोळ न . ( माण . ) तीळ झाडून घेतल्यानंतर त्याच्या राहिलेल्या काड्या . तिळागुणी नस्त्री . सलोखा ; ऐक्य ; ऐकमत्य ; प्रेमभाव . ( क्रि० येणे ; असणे ; होणे ). तिळागुणी येणे ( कोणेकास कोणीएक ) अनुकूल होणे ; दोघांचा प्रीतिभाव होणे . तिळांजळी , तिळांजुळी , तिळांजुळ , तिळोदक तिलांजली - जुली इ० पहा . तिळांजळी देणे तिलांजली देणे पहा . पूर्णपणे संबंध सोडणे . जे विषयांसि तिळांजळी देऊनि । प्रवृत्तिवरी निगड वाऊनि । माते हृदयी सूनि । भोगितांती । - ज्ञा ८ . १२४ . तिळतांदळा वि . ( शिवामूठ , इ० स्त्रियांच्या धार्मिक विधीत तीळ व तांदूळ एकत्र करतात त्यावरुन ल . ) मनमिळाऊ तुका म्हणे कान्हो तिळ्यां - तांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या । - तुगा २५४ . [ तीळ + तांदूळ ] तिळेल , तिळ्येल न . ( को . ) तिळाचे तेल . [ सं . तिलतैल ; प्रा . तिल्लेल ; म . तिळ + एल ] तिळोदक न . १ तिलांजलि पहा . त्याचे उत्तरकार्य करि प्रभु साश्रु तिलोदक ओपी । - मो रामायणपंचशती अरण्य १२९ . २ श्राद्धामध्ये पितरांना उपचार समर्पण करण्यासाठी तीळ घालून अभिमंत्रित केलेले पाणी . ०देणे ( ल . ) संबंध तोडणे ; त्याग करणे . म्हणोनि भलतेणे एथ सद्भावे नाहावे । प्रयागमाधव विश्वरुप पहावे । येतुलेनि संसारासि द्यावे । तिळोदक । - ज्ञा ११ . १० . - एभा २३ . ४८७ .
|