Dictionaries | References

झाड

   
Script: Devanagari

झाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मुळां, खोड, खांदी आनी रसरशीत पानांनी भरिल्ल्या खूब वर्सांचें वनस्पत   Ex. झाड मनशाक खूप उपेग पडटा
HYPONYMY:
अंजीर कोडूलिंबू सायलो चंदन पोपाय आंब्याचें झाड रिठो सदांच फुलपी झाडां पळस पेर खाजूर माड पणस पिंपळ देवदार माडी फळांनी भरिल्ली वनस्पत चाफो जांबळीण आंवाळीण कचनार आंतेरीण बोधिरूख पारजत अशोक गुलफानूस ओंवळीण शिशें रिट्याचो रूख बोडकें रूमड नागकेसर बोडकें झाड ताड महोगनी बेल फरहद बाभूळ वड बदामाचो रूख मशींग शिरीश संत्रां आपोलीण अक्रोड डाळंबीण वेलची नाशपतीचें-झाड लिंबीण पिस्ता भोजपत्र रबरी रुद्राक्ष लिची खैर रक्तपुष्पी करबेलाचें झाड आंबाडो आलुबुखार मोसंबीचें झाड जांब जरदाळू फुलझाडां अर्जून बोणकी सप्ताळू लंवगाचें झाड फुलां नाशिल्लें झाड काफी ब्राजील नट कोका बिमलां माल्टा गुलमोहर हिरडो अगर कणेर पायर साजा महारूख खाजुरहट पाकड बिही गेळ तरोता म्हावळींग शमी कलमी झाड आंबट चेरी बनखोर कगेडी यगूर हावर हिंडीबादाम साकरलिंबीण घागरी तगर ज्ञानरूख राजआंवळो सुरू निलगिरी पापडी बोर सेजा बक्कम हंगोरी गंभारी बीजा अरयल अरदल रक्तचंदन अर्रा असना सतफळ मुचुकूंद भिरंड कैथ (हतयांनी खावपाचें फळ) सफेदा (रूख) महाद्रूम शहतूत ओक मलयगिरीचे रूख शाबुदाणे गुगूळ करमल जलज रुई झाडां
MERO COMPONENT OBJECT:
कांड खांदो मूळ पानां
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रूख वृक्ष
Wordnet:
asmগছ
bdबिफां
benগাছ
gujવૃક્ષ
hinपेड़
kanಮರ
kasکُلۍ
malവൃക്ഷം
marझाड
mniꯎꯄꯥꯜ
nepरूख
oriଗଛ
panਪੇੜ
sanवृक्षः
tamமரம்
telచెట్టు
urdدرخت , پیڑ

झाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To instruct an aged person or one inveterately prejudiced.

झाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A tree; a bush; a tree or plant gen.; great or small. A chandelier.
कोण्या झाडाचा पाला   (Of what tree is he, are you &c., a leaf?) A phrase used of or to in repressing impertinent officiousness.

झाड     

ना.  तरू , द्रुम , पादप , पेड , वृक्ष .

झाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष   Ex. ती दमून झाडाच्या सावलीत बसली.
HYPONYMY:
अंजीर फळझाड कवठ कडुलिंब सागवान बोधिवृक्ष पारिजात चंदन तुती पपई अशोक सीताफळ आंबा हिंताल सदाहरित वृक्ष पळस शिसवी ओक पेरू खजूर माड औदुंबर चित्रक जांभूळ फणस पिंपळ ताड बेल बाभूळ वड बदाम संत्रे साल सफरचंद अक्रोड जरदाळू लिंबू डाळिंब दालचिनी देवदार नासपती पिस्ता रबर रुद्राक्ष लिची सागू सुपारी भूर्ज कचनार कर्दळ कढिनिंब लवंग बेहडा जास्वंद शिरीष कोकम मोसंबे गोरखचिंच गेळा गुग्गुळ बकुळ आवळा रिठा शिकेकाई आलुबुखार बाहवा पपनस हिंगण अगस्ता दंती महाळुंग रुई नागकेशर मोह कॉफी हरपररेवडी शमी कण्हेर तगर ब्राझील नट धामणी धायटी कौरची निलगिरी खैर कायफळ बिब्बा कोका अगर निवळी माल्टा बिही फालसा गुलमोहर पथरी पीलू सप्तपर्णी आबनूस चिउली खोर तरवड संभालू पाने झडलेले झाड पिंपरी चीर करमळ शेवगा थोंटक फुलझाड पुआल अंकोल सावर चाफा चारोळी बिमल्या कुडा मुचकुंद महारूख अर्जुनवृक्ष हरितकी बिजा वृक्ष सुंदरफूल महोगनी पारिजातक मलयगिरी पापटी लोक्वाट डंगम शिवण साजा वृक्ष ज्ञानवृक्ष आंबट चेरी रक्तचंदन उगद कुसुंब
MERO COMPONENT OBJECT:
खोड फांदी मूळ पान एधा
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वृक्ष तरुवर द्रुम तरू पादप
Wordnet:
asmগছ
bdबिफां
benগাছ
gujવૃક્ષ
hinपेड़
kanಮರ
kasکُلۍ
kokझाड
malവൃക്ഷം
mniꯎꯄꯥꯜ
nepरूख
oriଗଛ
panਪੇੜ
sanवृक्षः
tamமரம்
telచెట్టు
urdدرخت , پیڑ
noun  भुताने पछाडलेली व्यक्ती   Ex. मांत्रिकाने भुताला हे झाड सोडून जा असे सांगितले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinभूताविष्ट व्यक्ति
kanಪ್ರೇತಬಾದಿತ ವ್ಯಕ್ತಿ
kasجِن بوٗتَن منٛز ولنہٕ آمُت شخٕص , جِن بوٗتَن منٛز رٹنہٕ آمُت شخٕص
kokभूत लागिल्ली व्यक्ती
See : अनार

झाड     

 न. १ वृक्ष ; झुडुप ; रोप ; वनस्पति ( लहान , मोठी ). तूं फिरलास झाडोझाड मीं फिरलों पानोपान . = तुझ्या पेक्षांहि मला जास्त माहिती आहे . २ शाखायुक्त वस्तु , पदार्थ ; वृक्षाकार वस्तु . ३ मेणबत्ती इ० लावण्याचें कांचेचें झुंबर ; पुष्कळशा उदबत्त्या लावण्याचें वृक्षाच्या वाकाराचें धातूचें घर . चांदीच्या झाडांतून उदबत्त्या खोंविल्या होत्या . - अस्तंभा १३६ . ४ दारूकामांतील एक प्रकार ; वृक्षाच्या आकाराचें दारूकाम . ५ भूतानें पछाडलेलें माणूस . ज्यास भूत पछाडतें त्या झाडास तें सुग्रास अन्न खाऊं देत नाहीं . - अस्तंभा ५८ . ६ वंशवृक्ष ; वंशावळ . ७ ( कु . ) बंदुकीचा लांकडी भाग , दस्ता . [ स . झाट ; प्रा . झाड ] ( वाप्र . )
०उभें   उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी .
करणें   उत्कृष्ट रीतीनें एखादें काम वठविणें . उदा० गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० इतक्या उत्तम शैलीनें करणें , रंगविणें कीं जणुं काय तें करणारा , एक विशाल व फळाफुलांनीं युक्त असा वृक्षच उभारीत आहे असें वाटावें . कोण्या झाडाचा पाला - एखाद्याचा दिमाख , नक्षा मगरूरी उतरण्याकरितां , उध्दटपणाची लुडबुड थांबविण्याकरितां , अभिमान , अधिकार झिटकारण्याकरितां योजावयाचा शब्द ; अशा माणसाविषयीं क्षुद्रता व तिरस्कार दाखविणारा शब्दसमूह . सुभेदार ? हं ; सुभेदार म्हणजे कोण्या झाडाचा पाला ? आम्ही ओळखीत नाहीं असें जाऊन सांग जा ? - नाटयकथार्णव . झाडाचे राऊत दिसणें , झाडाचे राऊत - भीति इ० कामुळें झाड घोडेस्वार इ० कांच्या आकृतीप्रमाणें दिसणें ; दोरीचा साप बनविणें ( बायबलांत सुध्दां अशीच कल्पना जजेस ९ . ३६ . मध्यें दृष्टीस पडते ). झाडावरचें भूत - ( ल . ) ज्याचा नामनिर्देश करणें अनिष्ट आहे अशा नीच , तिरस्करणीय मनुष्याबद्दल वापरावयाचा वाक्प्रचार . सुक्या झाडास वाक लावणें , सुक्या झाडास वांक लावणें - ( सुकलेलें झाड इष्ट त्या दिशेनें वांकवितां येणें शक्य नाहीं यावरून ल . ) एखाद्या वृध्दास उपदेश करणें , हट्टी , हटवादी , पूर्वग्रहदूषित माणसास बोध करणें ( पालथ्या घागरीवरच्या पाण्याप्रमाणें आहे ). सामाशब्द . झाडकी - स्त्री . किर्र झाडी .
०कुट  न. ( गो . ) वाळलेलें , मोडून पडायला आलेलें झाड , फांदी , काटकी .
०खंड  न. १ जंगल ; झाडी ; झांकर ; जुंबाड ; राई ; रान . विशाळें बहू लागलीं झाडखंडें । - राक १ . १२ . २ झुडुपें ; जाळी ; लहान झाडांचा समुदाय . [ झाड + खंड ]
०खंडा   विक्रिवि . १ ( वर दिलेल्या झाड उभें करणें ह्या वाक्प्रचाराच्या उलट अर्थी - झाडाचीं पानें , फुलें , फळें , तोडून टाकलीं असतां तें बेढब व ओबडधोबड दिसतें यावरून ) ओबडधोबड ; अर्धवट ; रुक्ष ; नीरस ; अशास्त्रीय ; अव्यवस्थित ; बेशिस्त असें ( गायन , वादन , कीर्तन , व्याख्यान इ० ). २ गुरूपाशीं अभ्यास न करतां नुसतें ऐकून आपल्याच अकलेनें वाजविणारा व त्याचें तें वादन ; स्वयंसिध्द ( गवयी , वादन ). त्याचा बाणा , वाणी , गाणें , वाजविणें , म्हणणें , झाडखंडा आहे . [ झाड + खंडणें ]
०खंडा  स्त्री. ( क्व . ) झाडें व झुडपें . दरें दर्कुटें झाडखंडी अनेकी । - दावि . - वि . अरण्यमय ; जंगलाचा ( प्रदेश ; जागा इ० ). [ झाड + खंड ]
०गळ वि.  वृक्षमय . झाडाखंडी पहा .
०झडुल्ला  पु. ( व्यापक ) लहानमोठया झाडांचा समुदाय ; वृक्ष ; झुडुपें ; रोपटीं . [ झाड द्वि . ]
०झाडोरा   झुडपी झडुल्ला झूड झुडुप - पुस्त्री . न . लहानमोठया झाडांचा समुदाय . ( समुच्चायर्थी , एकूणएक किंवा कोणतेहि ० . झाडझडुल्ला पहा .
०दस्त  पु. फळझाडांवरील कर . झाडदस्त झाडे सुमारी ३१ येकूण रुपये . - मसाप २ . २ . १४३ . [ म . झाड ; फा . दस्त = कर ]
०पंचाळ वि.  १ ( माकड अतिशय चपळ असल्यानें तें जणुं काय एकाच वेळीं पांच झाडांवर असल्याचा भास होतो यावरून ) चपळ ; तरतरीत ; टुणटुणीत ; चलाख . २ चंचल ; चळवळया ; चुळबुळया ; पायांवर भोंवरा असलेलें ( मूल इ० ).
०पदरी वि.  किनारीमध्यें रेशमाचीं झाडें , फुलें काढलेलें ( वस्त्र इ० ). [ झाड + पदर ]
०पाला  पु. १ ( व्यापक ) ( औषधाच्या उपयोगी ) वनस्पती , त्याचा पाला , मुळें इ० ( सामा . ) वृक्ष ; वनस्पति . २ ( व्यापक अर्थी ) खाण्याच्या उपयोगाचा भाजीपाला , पानें इ
००पाल्याचें  न. वनस्पतीपासून तयार केलेलें औषध ; याच्या उलट रसायनी औषध - खनिज धातु - पदार्थ इ० कांपासून केलेलें . [ झाड + पाला ]
औषध  न. वनस्पतीपासून तयार केलेलें औषध ; याच्या उलट रसायनी औषध - खनिज धातु - पदार्थ इ० कांपासून केलेलें . [ झाड + पाला ]
०पेढ   पेड पेमाड - पु . ( व्यापक ) झाडझाडोरा पहा . [ हिं . झाड + पेड = झाड ; माड ]
०झाडरूं  न. लहान झाड ; झुडूप . या वाजूस रानांतून , डोंगरावर दवणा , रामाठा , ... वगैरे झाडरूंच रगड . - खेया ४३ . [ झाड ] झाडशाई - स्त्री . वस्त्रांवर काढलेलीं झाडाझुडपांचीं चित्रें . - वि . झाडांचीं चित्रें ज्यावर आहेत असें ( वस्त्र , भिंत , जमीन ). झाडझवा - वि . ( शब्दश : अश्लील , पण तो अर्थ मनांत येत नसल्यानें रूढ ) उनाड ; भटक्या ; भणंग ; भटकभैरव ; उडाणटप्पू . [ झाड + झवणें ] झाडळ , झाडळी - स्त्री . दाट झाडी ; राई . जीवधर्माचिया झाडळी । मनोरथाचिया वंशजाळी । - ज्ञाप्र २६६ . झाडसुनें - न . झाडकुत्रा ; कुत्र्याची एक जात . पाणसुनीं झाडसुनीं । नाना प्रकारींचीं सुनीं । - दावि २४४ . [ झाड + सं . शुन = कुत्रा ]

झाड     

झाड उभें करणें
एखादे काम उत्‍कृष्‍ट रीतीने वठविणें
बहार करणें. छत उभारणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP