पु. - ( खा . भिल्ली ) राग .
- मोठे दुखणे ; आजार ; प्रकृतीतील बिघाड ; शरीरप्रकृतीत उत्पन्न होणारी विकृति .
- रंग .
- शरीर प्रकृतीत बिघाड उत्पन्न करणारे कारण . त्याचे पोट दाबून पाहिले , चांगला आंब्याएवढा रोग हाताला लागला .
- ( फळांफुलांतील ) नासका अगर किडका भाग ; रोगोत्पादक किंवा प्रकृतीत
बिघाड करणारा भाग . अगस्त्याचे फुलांतील मधली काडी तो रोग आहे , तो काढून
टाक .
- विकृतिकारक पदार्थ ; रोगकारक वस्तु , अन्न इ० हे धडधडीत किडके तांदूळ दिसतात आणि पैसा खर्चून हा रोग कशाला आणिलास ?
- दुसर्याचे चांगले पाहून होणारे दुःख किंवा त्रास ; ज्यामुळे अंतःकरणास व्यथा होते असा रोग ( चिंता , मत्सर इ० ).
- तिरस्करणीय ; घाणेरडा ; रोगट , कुसकट पशु किंवा मनुष्य . [ सं . रुज = रोग होणे ]
०ग्राम पु. रोगाचे वसतिस्थान ; शरीर .
०निदान न. रोगाची परीक्षा ; कोणता रोग झाला आहे हे ठरविणे .
भावना स्त्री . - रोगांची लक्षणे ; उदा० क्षयरोग - भावना ; पित्तज्वरभावना ; पांडुरोगभावना .
लक्षणे दिसू लागली आहेत असा रोग .
- रोगपरीक्षा ; रोग ठरविणे .
- पिशाचबाधा .
०मल्ल पु. सदां रोगी ; रोग व दुखणी यांनी जर्जर झालेला मनुष्य ; रोगिष्ट माणूस .
०मसाला वि. ( ना . ) रोगानी जर्जर झालेला ; रोगेल ; मरतुकडा ( तिरस्कारार्थी उपयोग ).
०राई स्त्री. - लहानमोठे रोग ; दुखणीपाखणी .
- वाईट गुण ; उपद्रवकारक धर्म ; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण
. ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते . [ रोग + राई .
सं . राजि = ओळ ]
वाईट गुण ; उपद्रवकारक धर्म ; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण . ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते . [ रोग + राई . सं . राजि = ओळ ]
लक्षण न . - एखादा दुखण्याची लक्षणे ; रोगाची भावना .
- रोगाची पूर्वसूचक लक्षणे ; होणार्या रोगाचे सूचक चिन्ह .
रोगवणी न . - रोगाची बीजे बरोबर वाहून नेऊन कोठा स्वच्छ करणारे रोग्याचे पोटांतून बाहेर पडणारे पाणी , मल , ओकारी इ०
- भाजीपाल्यांतील शिजवून किंवा आंबवून काढलेला अहितकर रस , पाणी .
- रोग आणणारा पाऊस . उदा० आश्लेषा नक्षत्राचा पाऊस ; पिकावर रोग आणणारा पाऊस . [ रोग + पाणी ]
०वारे न. रोगराई ; क्षुल्लक दुखणे . समर्था कदा रोगवारे नको रे । - वेसीस्व ( प्रस्तावना १२ ).
०वेळ, -ळा स्त्री . तीस घटकांपैकी विशिष्ट ३॥ घटका . वेळ शब्द पहा .
रोगाने किंवा दुखण्याने पछाडलेला ; आजारी .
खुरटलेला ; मुरडलेला ; रोग झालेला ( भाजीपाला , फळे इ० )
रोगटणे अक्रि . रोग होणे ; विकृती जडणे ; आजारी पडणे .
( झाड , वेल , फळ , फूल इ० ) खुरटणे ; मुरडणे ; कीड लागणे . [ रोगट ]
रोगणे - अक्रि . ( कों . ) रोगाने झिजणे ; क्षीण होणे ; रोड होणे .
रोगपणे - अक्रि . रोगाने पीडणे ; रोग होणे . नव्हे पचपचीत तनु रोगपली । - प्रला २१९ .
रोंगा - वि . ( राजा . )
रोडका ; कृश अंगाचा ; रोगट ; आजारी दिसणारा .
सुकट व आंबट चेहर्याचा ; रुसलेल्या चेहर्याचा .
रोगड्या - ळ्या - वि . आजारी ; रोगाने अशक्त होणे .
रेंगाळणे ; झिजणे . [ रोंगा ]
रोगिष्ट - ष्ठ - वि . रोगी ; आजारी ; कांही तरी रोग जडलेला ; सतत आजारी ; रोगट शरीराचा . [ सं . रोगिष्ट ]
रोगी , रोगिया - वि . ( काव्य )
ज्याला पंडू , क्षय , दम , कुष्ट , मेह इ० चिरस्थायी रोग जडला आहे असा ; रोगिष्ट ; प्रकृतिस्वास्थ्य बिघडलेला ; आजारी ; दुखणाईत . का जिव्हालंपट रोगिया । अन्ने दूषी धनंजया । - ज्ञा १८ . १३६ .
अहितावह ; अपथ्यकर ; रोगकारक .
रोगीण - स्त्री . देवीची भक्तीण . या नेहमी आजारी असतात . भावीण पहा .
रोगेणे , रोंघणे - अक्रि . ( राजा . कों . ) रोगणे पहा .
रोगेल , रोगेला , रोगलेला , रोग्या - वि . रोगट ; नाजूक प्रकृतीचाअ ; रोगिष्ट ; सदा रोगी ; रोगाड्या .
रोगी - वि . ( कु . ) आळशी .