Dictionaries | References

आईच्या पोटास रोग येणें

   
Script: Devanagari

आईच्या पोटास रोग येणें     

जो मनुष्य जन्मास येऊन कोणताहि पराक्रम करीत नाही, किंवा उलट एखादे दुष्कृत्य करतो त्याच्या जन्मास येण्यानें कोणताहि कार्य भाग साधत नाही. तो जन्मास येणें हे आईला पोटांत एखादा रोग होऊन तो बाहेर पडण्यासारखे आहे. त्याने आपल्या मातेची कूस व्यर्थ शिणविली असे मानण्यांत येते. ‘युद्धी परमार्थ मिळे निश्र्चित मिळणें पलायनें तोटा। हे जाणोनि पळे तो मातेच्या रोग पातला पोटा।।’ -मो कर्ण ३१.३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP