|
अ.क्रि. न , एखाद्याकडून यावयाचा असलेला पैसा , यावयाची रक्कम , उगवावयाचें कर्ज . अ.क्रि. ( व . अप्र .) विणे ; जनणें . ' बाई पंढपुरांत । कपीला गाय येली । ' - वलो ८ . ( विणे . अप .) आगमन करणें ; आलेला असणें ; दाखल असणें . विद्यमान झालेला असणें ; प्राप्त होणें . एखाद्याजवळ , कडे ओढवणें ; समीप जाणें . एखाद्याला माहीत असणें , एखाद्याकडून करण्याजोगें असणें ; अवगत होणें ; जाणणें . याला लिहिणें येतें पण पढणें येत नाहीं . उद्भवणें ; उत्पन्न होणें ( राग , लोभ , विषयवासना , दया इ० . ) बितणें ; प्राप्त होणें . उत्पन्न होणें ; उद्भवणें ( फुलें , फळें , पानें इ० ). भरणें ; मिळून होणें , बराबर असणें . ही अंगठी तोळाभर वजन येईल . तो गांव एथून चार कोस येईल . उतरणें ; योग्य आकारांत , स्थितींत दिसणें . हें पागोटें चांगलें आलें नाहीं , आणखी बांध . होणें ; एखाद्या स्थितीला , अवस्थेला प्राप्त झालेला किंवा पोंचलेला असणें . घर अगदीं मोडकळीस आलें आहे . संभाव्य , जरुर , उपयोगी , योग्य , उचित होणें . ते धनी पडले त्यासीं उत्तर करतां येत नाहीं . प्रसंग पाहून बोलावयास येईल . अवलंवणें ( मार्ग इ० ). वडील वर्तत आले त्याप्रमाणें आम्ही करीत आलों . पासून निघणें , उत्पन्न होणें , तयार होणें . ( दुधापासून लोणी इ० ). प्रवासादिसमयीं जाण्याकरितां निरोप घेतांना जाणें , ह्या अर्थीं येणें ह्या शब्दाचा उपयोग करितात . कारण ह्या प्रसंगीं जाणें शब्दाचा उपयोग अशुभ मानतात . आतां आम्हीं येतों कृपा असो द्यावी । येतों बसा , प्रसन्न प्रभु तुम्हां , हो । - मोवन १३ . २ . [ सं . यान = गमन करणें ] म्ह० ( दुखणें ) येतें हत्तीच्या पायानें , जातें मुंगीच्या पायानें . ( वाप्र ) येणें जाणें - न . येणें व जाणें म्हणजे भेटीला जाणें किंवा येणें ; राबता , दळण वळण . श्रीमंताकडे त्यांचें येणेंजाणें आहे . येणें व देणें अस लेला पैसा ; उकळण्याचें कर्ज व फेडावयाचें कर्ज ; देण्याघेण्याचा व्यवहार . तुम्ही जा म्हणून सांगतां पण लोकांकडे आमचें येणेंजाणें आहे त्याची काय वाट ? येता - वि . येणारा . येती यासी पुसे - नामना २ . येताजाता - पु . उतारु ; मार्गस्थ ; प्रवासी . मार्गावरचा आंबा हा येत्याजात्याचा . येतांजातां - क्रिवि . नेहमीं ; एकसारखें ; सतत . सदा येतां जातां बसत उठतां कार्य करतां । तो येतां जातां बायकोस शिव्या येतो . [ येणें + जाणें ] येता पाय - पु . प्राप्तीचा किंवा अनुकूल काळ . येतापाया - पु . चलती ; भरभराट . [ येणें + पाया ] येतेकरी - पु . येणारा . शास्त्र , कला इ० त्वरित संपादन करणारा मनुष्य . येतें द्वार - न . येण्याचा रस्ता . येतें द्वार बुजवावें । - एरुस्व १८ . ४७ . आल्या वर्षास , आल्या महिन्यास , आल्या दिवसास , आल्या वारास - वर्ष , महिना इ० येतें तसें म्हणजे सतत , नियमितपणें .
|