|
वि. ६ ही संख्या . [ सं . षट् ] - नअव . ( ल . ) सहा शास्त्रें . साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं । - ज्ञा ११ . ६८२ . तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरांजणा । - तुगा २५३९ . स्त्री. ( बायकी ) साय पहा . ०कमळें नअव . षट्चक्र पहा . ०गुण पुअव . षट्गुण ; सहा चांगल्या वृत्ती ; ज्ञान , वैराग्य , ऐश्वर्य , ख्याति , यज्ञश्री , औदार्य . ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ख्याति । यज्ञश्री औदार्य स्थिति । हे साही गुण वसिष्ठासी असती । - भारा बाल १५ . ३५ . ०नकार पुअव . मौन , विलंब , भ्रूभंग , अधोवदन , गमन , विषयांतर . ०मुखांचा पु. कार्तिकस्वामी . सहा मुखांचा दडाला । कपाटामाजी । - ह ३ . ७ . ०सुभे दक्षिणेंतील औरंगाबाद ( अहमदनगर ), वर्हाड , खानदेश , विजापूर , गोवळकोंडें ( हैदराबाद ) व बेदर ( कर्नाटक ) हे मोंगलांचे सहासुभे . सहा सुभे दख्दन . साडेसहासुभे - १ विजापूर , १ दौलताबाद , १ अहंमदाबाद - गुजराथ , १ बर्हाणपूर - खानदेश , १ हैदराबाद - भागानगर , १ औरंगाबाद व अर्धा नागपूर . - शिदि २० . साडेसहासुभे दक्षिण . सहा महिन्यांची जांभई - अतिशय विलंब लागणारी गोष्ट . या सोनाराजवळ दागिना करावयास दिला म्हणजे सहा महिन्यांची जांभई .
|