|
न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०३ . न. १ विशिषाट खुणांनी दर्शविलेलें अंतर ; टप्पा ; ' मिनिट कांटा एक तासांत ६० घरें चालतो .' - के २ कोष्टकांतील खण , खाना . ' मध्यें तीन घरें मोकळी टाकलेली होतीं व चवथ्या घरांत पांचचा आंकडा होता .' ( सं . गृह ) न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा ; वाडा . २ एका कुटुंबांतील ( एके ठिकाणीं ) राहणारी मंडळी ; कुटुंब . ३ गृहस्था श्रमधर्म ; संसार ; प्रपंच . त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें ४ एखाद्या पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा , भोंक , खोबण . भिंतीस घर करून मग खुंटी ठोक . ७ ( मालकाच्या इच्छेविरुध्द मिळविलेलें , बळकावलेलें ) वस्तीचें ठिकाण . कांटयानें माझ्या टाचेंत घर केलें . ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचे , लांकडाचें आवरण , वेष्टण , कोश , उ० चष्म्याचें घर . माझ्या चष्म्याचें घर चामडयाचें आहे . ९ पेटींतील , टाइपाच्या केसींतील कप्पा , खण , खाना . १० सोंगटयांच्या , बुध्दिबळांच्या पटावरील , पंचांगातील ( प्रत्येक ) चौक ; चौरस ; मोहर्याचा मूळचा चौरस ; मोहर्याचा मारा . राजा एक घर पुढें कर घोडा अडीच घरें ( एकाच वेळीं ) चालतो . ११ ( ज्यो . ) कुंडलीच्या कोष्टकांतील सूर्य , चंद्र इ० ग्रहांचें स्थान . १२ घराणें ; वंश ; कुळ . त्याचें घर कुलीनांचें आहे . त्याच्या घराला पदर आहे . = त्याच्या वंशांत परजातीची भेसळ झाली आहे . १३ उत्पत्तिस्थान ; प्रांत , प्रदेश , ठिकाण , ठाणें ( वारा , पाऊस , प्रेम , विकार , रोग इ० काचें ); सर्वज्ञतेचि परी । चिन्मात्राचे तोंडावरी । परी ते आन घरीं । जाणिजेना । - अमृ ७ . १३० . कोंकण नारळाचें घर आहे . १४ रोग इ० कांच्या उत्पत्तीचे कारण , मूळ , उगम , जन्मस्थान , खाण . वांगे हें खरजेचें घर आहे . आळस हें दारिद्रयाचें घर आहे . १५ वादांतील आधारभूत मुद्दा , प्रतिष्ठान , गमक , प्रमाण . १६ सतार इ० वाद्यांतील सुरांचें स्थान ; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर ; सतारीच्या दोन पडद्यांमधील अंतर . १७ शास्त्र , कला इ० कांतील खुबी , मर्म , रहस्य , मख्खी , किल्ली . तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं . गुणाकार , भागाकार हें हिशेबाचें घर . १८ सामर्थ्य ; संपत्ति ; ऐपत ; आवांका ; कुवत . जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें . १९ मृदंग इ० चर्मवाद्यांचा , वादी , दोरी इ० परिच्छेदानें परिच्छिन्न प्रांत , जागा . २० ( संगीत ) तान , सूर यांची हद्द , मर्यादा , क्षेत्र . २१ ( अडचणीच्या , पराभवाच्या वेळीं ) निसटून जाण्यासाठीं करून ठेवलेली योजना ; आडपडदा ; पळवाट ; कवच ; हा घर ठेवून बोलतो . २२ खुद्द ; आपण स्वत :; स्वत : चा देह . म्ह० इच्छी परा तें येई घरा . २३ ( वर्तमानपत्राचा , पत्रकाचा , कोष्टकाचा रकाना , सदर . ( इं . ) कॉलम . येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वत : चा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें . - नि १५ . २४ वयोमानाचा विभाग ; कालमर्यादा . हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता . - कोरकि ३२ . २५ ( मधमाशीचें पोळें वगैरेतील ) छिद्र . केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनीं पाहिलीं असतील - मराठी सहावें पुस्तक पृ . २२५ . ( १८७५ ) २६ ठाणें ; ठिकाण . कुबल , बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं - ऐपो ९ . २७ बायको ; स्वस्त्री . घरांत विचारा . घर उघडणें पहा . [ सं . गृह ; प्रा . घर ; तुल० गु . घर ; सिं घरु ; ब . घर ; आमेंजि . खर ; फ्रेजि . खेर ; पोर्तु जि केर . ] ( वाप्र . ) ०आघाडणें ( कों . ) घर जळून खाक होणें . ०उघडाणें १ लग्न करून संसार थाटणें . नारोपंतांनीं आतां घर उघडलें आहे , ते पूर्वीचे नारोपंत नव्हत ! २ एखाद्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मांडून देणें . सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें ०करणें १ विर्हाड करणें ; रहावयास जागा घेऊन तींत जेवण - खाण इ० व्यापार करावयास लागणें . चार महिने मी खाणावळींत जेवीत असे , आतां घर केलें आहें . २ ( त्रासदायक वस्तूंनीं ) ठाणें देणें ; रहाणें ; वास्तव्य करणें . कांटयानें माझ्या टांचेंत घर केलें . माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें . - बाय ३ . ३ . ०खालीं घर सोडून जाणें ; घर मोकळें करून देणें . गांवांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानीं आपापलीं घरें खालीं केलीं . करणें घर सोडून जाणें ; घर मोकळें करून देणें . गांवांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानीं आपापलीं घरें खालीं केलीं . ०घालणें ( एखाद्याच्या ) घराचा नाश करणें . ०घेणें १ ( सामा . ) लुबाडणें ; लुटणें ; नागविणें ; बुचाडणें . मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें । - कालिकापुराण २३ . ४० . ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपण असतो . - चंग्र ८४ . २ ( एखाद्याचा ) नाश करणें . म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें । - जै ७१ . ९९ . ३ ( त्रासदायक वस्तु ) घर करून बसणें , ठाणें देऊन बसणें ; घर करणें अर्थ २ पहा . ०चालविणें प्रपंचाची , संसाराची जबाबदारी वाहणें . म्ह० घर चालवी तो घराचा वैरी . ०जोडणें इतर घराण्यांशीं , जातींशीं , लोकांशीं इ० मैत्री , शरीरसंबंध घडवून आणणें ; मोठा संबंध , सलोखा उत्पन्न करणें . लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे । - सारुह २ . १ . याच्या उलट घर तुटणें . ०डोईवर आरडा ओराड करून घर दणाणून सोडणें ; घरांत दांडगाई , कलकलाट , धिंगामस्ती करणें . वडील माणसें घरीं नाहींत हें पाहून मुलांनीं घर डोईवर घेतलें . घेणें आरडा ओराड करून घर दणाणून सोडणें ; घरांत दांडगाई , कलकलाट , धिंगामस्ती करणें . वडील माणसें घरीं नाहींत हें पाहून मुलांनीं घर डोईवर घेतलें . ०तुटणें मैत्रीचा , नात्याचा संबंध नाहींसा होणें ; स्नेहांत बिघाड होणें . ( दुसर्याचें ) ०दाखविणें १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें ; ( एखाद्याची ) ब्याद , पीडा टाळणें . २ घालवून देणें ; घराबाहेर काढणें . ०धरणें १ घरांत बसून राहणें ; घराच्या बाहेर न पडणें ( संकटाच्या , दंगलीच्या वेळीं पळून जाणें , पळ काढणें , गुंगारा देणें , निसटणें याच्या उलट ). २ ( रोग इ० नीं शरीरावर ) अंमल बसविणे ; एखादा आजार पक्केपणानें जडणें ; दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें . ३ चिटकून राहाणें ; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें . ४ ( बुध्दिबलांत , सोंगटयांत ) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें . ०धुणें धुवून नेणें - १ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें ; हिरावून नेणें ; नागविणें ; बुचाडणें . तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका , तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं . २ नागविणें ; लुबाडणें ; लुटणें ; अगदीं नंगा करणें . शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळखा आम्हांस पटूं लागली आहे . - टिव्या . घर ना दार देवळीं बिर्हाड - फटिंग , सडा , ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्देशून अथवा ज्याला बायकानुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात . ०निघणें ( स्त्रीन ) नवर्याला सोडून दुसर्या मनुष्याबरोबर नांदणें ; ( सामा . ) दुसर्याच्या घरांत , कुटुंबांत निघून जाणें . माझें घर निघाली . - वाडमा २ . २०९ . ०नेसविणें घरावर गवत घालून तें शाकारणें ; घर गवत इ० कानीं आच्छादणें ; ( कों . ) घर शिवणें . ०पहाणें १ ( एखाद्याच्या ) घराकडे वक्रदृष्टि करणें ; ( रोगाचा , मृत्यूचा ) घरावर पगडा बसणें ; घरांत शिरकाव करणें ). कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें . म्हातारी मेल्याचें दु : ख नाहीं पण काळ घर पाहतो . २ ( बायकी ) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें . सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून ... ... ... - रजपूतकुमारी तारा . ( आनंदी रमण . ) ०पालथें ( घर , गांव इ० ) १ हरवलेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें . त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें . २ सर्व घरंत ; गांवांत हिंडणें ; भटकणें . त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहे . घालणें ( घर , गांव इ० ) १ हरवलेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें . त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें . २ सर्व घरंत ; गांवांत हिंडणें ; भटकणें . त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहे . ०पुजणें १ आपलें काम करून घेण्यासाठीं एखाद्याच्या घरीं आर्जवें , खुशामत करण्यास वारंवार जाणें . २ ( घरें पुजणें ) आपला उद्योग न करतां दुसर्यांच्या घरीं भटक्या मारणें . ०फोडणें १ संसार आटोपणें , आंवरणें . २ कुटुंबांतील माणसांत फूट पाडणें ; घरांत वितुष्ट आणणें . बायका घरें फोडतात . ३ घरास भोंक पाडून आंत ( चोरी करण्यासाठीं ) शिरकाव करून घेणें ; घर फोडतो तो घरफोडया . ०बसणें कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें , दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्नावस्थेस पोहोंचणे ; घराची वाताहत , दुर्दशा होणें . ०बसविणें संसार थाटणें ; घर मुलाबाळानीं भरून टाकणें ( स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें , म्हटलें कीं सून तरी घर बसवील . ०बुडणें १ कुटुंबाचा विध्वंस करणें ; संसाराचा सत्यानाश करणें . २ घरास काळिमा आणणें . ०भंगणें कुटुंब मोडणें , विस्कळित होणे ; कुटुंबास उतरती कळा लागणें ; कुटुंबाचा नाश होणें ; मंडळींत फूट पडणें . बापलेकांत तंटे लागल्यामुळें तें घर भंगले . ०भरणें १ दुसर्यास बुडवून , त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें . २ दुसर्याचें घर लुटणें , धुणें . व स्वत : गबर होणें . घर भलें कीं आपण भला - लोकांच्या उठाठेवींत , उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा ( मनुष्य ). ०मांडणें थाटणें - ( संसारोपयोगी जिन्नसांनीं ) घर नीटनेटकें करणें ; घराची सजावट करणें . ०मारणें घर लुटणें . घर म्हणून ठेवणें - एखादी वस्तु , सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरिता संग्रही ठेवणें ; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें . ०रिघणें घर निघणें पहा . घर रिघे जाई उठोनि बाहेरी । ०लागणें घर भयास भासणें ( एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). घराचा उंबरठा चढणें - घरांत प्रवेश करणें . जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांगशील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन . ०घराचा घरांतील माणसांची वागणूक , वर्तणूक , वर्तन , शिस्त ; घराचें पुण्य पाप . घराचा पायगुणच तसा , घरची खुंटी तशी - कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे ; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस , संवयीस उद्देशून म्हणतात . घराचा वासा ओढणें - ज्याच्यामुळें एखादें काम , धंदा चालावयांचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन , वस्तु , गोष्ट ओढणें ; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहीसें करणें ; अडवणूक करणें . आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें . आतां आम्हीं काय करूं शकूं ! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला . खाल्ल्या घराचे वासे मोजणें - कृतघ्न होणें ; केलेला उपकार विसरणें . घरांत , घरीं - ( ल . ) पतीनें पत्नीबद्दल शिष्टसंप्रदायानें वापरण्याचा शब्द . याच्या उलट पत्नी नवर्या संबंधीं बोलतांना बाहेर या शब्दाचा उपयोग करते . तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं . हा जिन्नस घरांत दाखवून आणतों . - विवि १० . ५०७ . १२७ . घरांतले - विअव . ( बायकी ) नवरा ; पति ; तिकडचे ; तिकडची स्वारी . आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें . - एकच प्याला . घरांत पैशाचा , सोन्याचा धूर निघणें , निघत असणें - घरची अतिशय श्रीमंती असणें ; घरांत समजणें - कुटुंबांतील तंटा चव्हाटयावर न आणणें ; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें ; आपापसांत समजूत घडवून आणणें . घराला राम - राम ठोकणें - घर सोडून जाणें . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला . - भा ९० . घरावर काटया घालणें , गोवरी ठेवणें , निखारा ठेवणें - एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण बदनामी करणें ; घरावर कुत्रें चढविणें - ( गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून ) १ एखाद्याच्या घरांत कलागती , भांडणें लावून देणें , तंटे उत्पन्न करणें . २ दुष्टावा करणें ; अडचणींत आणणें . घरावर गवत रुजणें - घर ओसाड , उजाड पडणें . घरास आग लावणें - ( ल . ) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें . घरास कांटी लागणें - घर उध्वस्त होणें ; घरांत कोणी न राहणें . घरास कांटी लावणें - १ घराच्या भोवतीं कांटे , काटक्या लावून येणें - जाणें बंद करणें . २ ( ल . ) घर उजाड , उध्वस्त , ओसाड करणे . घरास हाड बांधणें , घरावर टाहळा टाकणें - ( एखाद्यास ) वाळींत टाकणें ; समाजांतून बहिष्कृत करणें ; जाती बाहेर टाकणें . ( शेत , जमीन , मळा , बाग ) घरीं करणें - स्वत : वहिवाटणे . घरीं बसणें - ( एखादा मनुष्य ) उद्योगधंदा नसल्यामुळें , सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें ; बेकार होणें . तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे . ( एखाद्याच्या ) घरीं पाणी भरणें - ( एखादा मनुष्य , गोष्ट ) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणें ; त्यास पूर्णपणें वश असणें . उद्योगाचे घरीं । ऋध्दिसिध्दि पाणीभरी . घरीं येणें ( एखादी स्त्री ) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं , माहेरीं परत येणें ; विधवा होणें . कुटुंब मोठें , दोन बहिणी घरीं आलेल्या . - मनोरंजन आगरकर अंक . घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्हाडीं , घरीं दारी सारखाच - सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा ; ( सामा . ) सर्वत्र उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मूल ); जसा स्वत : च्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्याच्या घरीं उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मुलगा ). आल्या घरचा - वि . पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्यापासून झालेला ( मुलगा ). म्ह० १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात =( एखाद्या ) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी , नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुध्द उठतात . सामाशब्द - पायगुण घरांतील माणसांची वागणूक , वर्तणूक , वर्तन , शिस्त ; घराचें पुण्य पाप . घराचा पायगुणच तसा , घरची खुंटी तशी - कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे ; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस , संवयीस उद्देशून म्हणतात . घराचा वासा ओढणें - ज्याच्यामुळें एखादें काम , धंदा चालावयांचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन , वस्तु , गोष्ट ओढणें ; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहीसें करणें ; अडवणूक करणें . आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें . आतां आम्हीं काय करूं शकूं ! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला . खाल्ल्या घराचे वासे मोजणें - कृतघ्न होणें ; केलेला उपकार विसरणें . घरांत , घरीं - ( ल . ) पतीनें पत्नीबद्दल शिष्टसंप्रदायानें वापरण्याचा शब्द . याच्या उलट पत्नी नवर्या संबंधीं बोलतांना बाहेर या शब्दाचा उपयोग करते . तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं . हा जिन्नस घरांत दाखवून आणतों . - विवि १० . ५०७ . १२७ . घरांतले - विअव . ( बायकी ) नवरा ; पति ; तिकडचे ; तिकडची स्वारी . आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें . - एकच प्याला . घरांत पैशाचा , सोन्याचा धूर निघणें , निघत असणें - घरची अतिशय श्रीमंती असणें ; घरांत समजणें - कुटुंबांतील तंटा चव्हाटयावर न आणणें ; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें ; आपापसांत समजूत घडवून आणणें . घराला राम - राम ठोकणें - घर सोडून जाणें . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला . - भा ९० . घरावर काटया घालणें , गोवरी ठेवणें , निखारा ठेवणें - एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण बदनामी करणें ; घरावर कुत्रें चढविणें - ( गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून ) १ एखाद्याच्या घरांत कलागती , भांडणें लावून देणें , तंटे उत्पन्न करणें . २ दुष्टावा करणें ; अडचणींत आणणें . घरावर गवत रुजणें - घर ओसाड , उजाड पडणें . घरास आग लावणें - ( ल . ) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें . घरास कांटी लागणें - घर उध्वस्त होणें ; घरांत कोणी न राहणें . घरास कांटी लावणें - १ घराच्या भोवतीं कांटे , काटक्या लावून येणें - जाणें बंद करणें . २ ( ल . ) घर उजाड , उध्वस्त , ओसाड करणे . घरास हाड बांधणें , घरावर टाहळा टाकणें - ( एखाद्यास ) वाळींत टाकणें ; समाजांतून बहिष्कृत करणें ; जाती बाहेर टाकणें . ( शेत , जमीन , मळा , बाग ) घरीं करणें - स्वत : वहिवाटणे . घरीं बसणें - ( एखादा मनुष्य ) उद्योगधंदा नसल्यामुळें , सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें ; बेकार होणें . तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे . ( एखाद्याच्या ) घरीं पाणी भरणें - ( एखादा मनुष्य , गोष्ट ) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणें ; त्यास पूर्णपणें वश असणें . उद्योगाचे घरीं । ऋध्दिसिध्दि पाणीभरी . घरीं येणें ( एखादी स्त्री ) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं , माहेरीं परत येणें ; विधवा होणें . कुटुंब मोठें , दोन बहिणी घरीं आलेल्या . - मनोरंजन आगरकर अंक . घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्हाडीं , घरीं दारी सारखाच - सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा ; ( सामा . ) सर्वत्र उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मूल ); जसा स्वत : च्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्याच्या घरीं उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मुलगा ). आल्या घरचा - वि . पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्यापासून झालेला ( मुलगा ). म्ह० १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात =( एखाद्या ) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी , नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुध्द उठतात . सामाशब्द - ०असामी स्त्री. १ वतनवाडी ; जमीनजुमला ; मालमत्ता . २ घरकामासंबंधाचा मनुष्य ; घराकडचा माणूस . ०कज्जा पु. घरांतील तंटा ; कौटुंबिक भांडण ; गृहकलह . ०करी पु. १ पत्नीनें नवर्यास उद्देशून वापरावयाचा शब्द ; घरधनी ; कारभारी ; यजमान ; घरमालक . माझे घरकरी गांवाला गेले . ०करीण स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द ; कारभारीण . माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो . - कोरकि ३१५ . २ घरधनीण ; घरची मालकीण ; यजमानीण . ०कलह पु. घरांतील भांडण ; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण ; आपसांतील भांडण ; अंत : कलह . ०कसबी पु. आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य ; घरचा कारागीर ; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस . ०कहाणी काहणी - स्त्री . ( वाईट अर्थी उपयोग ) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन . ०कान्न स्त्री. ( गो . ) घरधनीण ; बायको ; घरकरीण . [ सं . गृह + कान्ता ]. ०काम न. घरगुती काम . घरासंबंधीं कोणतेंहि काम ; प्रपंचाचें काम . बायकांचा धंदा घरकामाचा लावतात . ०काम्या वि. घरांतील , कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर , गडी ; घरांतील काम करणारा . [ घरकाम ] ०कार कारी - पु . ( गो . कु . ) १ नवरा , पति . २ घरचा यजमान ; घरधनी ; मालक . [ सं . गृह + कार ] घरकरी पहा . ०कारणी पु. घरचें सर्व काम पाहणारा ; कारभारी , दिवाणजी ; खाजगी कारभारी . ०कुंडा पु. ( कों . ) १ पक्ष्याचें घरटें ; कोठें . २ ( ल . ) आश्रयस्थान ; आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों . - दादोबा , यशोदा पांडुरंगी . [ सं . गृह + कुंड ] ०कुबडा कुबा कोंबा घरकोंग्या कोंडा कुंडा कोंघा कोंबडा घुबडा - पु . ( घरांतला घुबड , कोंबडा इ . प्राणी ) ( दुबळया व सुस्त माणसाला - प्राण्याला तिरस्कारानें लावावयाचा शब्द ). नेहमीं घरांत राहाणारा ; एकलकोंडया ; माणुसघाण्या ; चारचौघांत उठणें , बसणें , गप्पा मारणें इ० ज्यास आवडत नाहीं असा , कधीं बाहेर न पडणारा मनुष्य ; घरबशा . ०कुल्ली वि. ( गो . ) बहुश : घराबाहेर न पडणारी ( स्त्री . ); घरकोंबडी . ०केळ स्त्री. ( प्रां . ) गांवठी केळ . घरी लावलेली केळ . ०खटला खटलें - पुन . १ घरचा कामधंदा ; गृहकृत्य ; प्रपंच , शेतभात इ० घरासंबंधी काम . २ घराची , कुटुंबाची काळजी , जबाबदारी - अडचणी इ० . ३ गृहकलह ; घरांतील भांडण . ०खप्या वि. घरांतील धुणें , पाणी भरणें , इ० सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी ; घरच्या कामाचा माणूस ; घरकाम्या पहा . [ घर + खपणें = काम करणें , कष्ट करणें ] ०खबर स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव - चौकशी ; घराकडची खबर , बातमी . उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा । - राला २२ [ घर + खबर = बातमी ] ०खर्च पु. कुटुंबपोषणाला लागणारा खर्च ; प्रपंचाचा खर्च . ०खातें न. घरखर्चाचें मांडलेले खातें ; खानगी खातें . ०खासगी खाजगी - वि . घरांतील मालमत्ता , कामें , कारखाना इ० संबंधीं ; घरगुती बाबीसंबंधीं ; घरगुती , खासगी व्यवहारबाबत . ०गणती स्त्री. १ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब . तपशील . ( क्रि० करणें ; काढणे ) [ घर + गणती = मोजणी ] ०गाडा पु. संसाराचीं कामें ; जबाबदारी ; प्रपंचाची राहाटी ; प्रपंच ; संसार ; घरखटला . ( क्रि० हांकणें ; चालवणें ; संभाळणे ) ०गुलाम पु. घरांतील नोकर ; गडी . चौदाशें घरगुलाम मुकले या निजपायांला । - ऐपो ३१३ . ०गोहो पु. चुलीपाशीं , बायकांत , आश्रितांत शौर्य दाखविणारा मनुष्य ; गेहेशूर ; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष . [ घर + गोहो = नवरा , पुरुष ] ०घरटी स्त्री. दारोदार ; एकसारखी फेरी घालणें . ( क्रि० करणें ). चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां । - आमहाबळ १९ . १ . ०घाला घाल्या घरघालू - वि . १ खोड साळ ; फसवाफसवी करणारा ; बिलंदर . भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली । - राला ४० . २ कुळाची अब्रू घालवणारा ; घरबुडव्या ; दुसर्याचें घर घरघाली रांड बसली आम्हां गिळून । - राला ४६ . ३ सर्व नाश करणारा . भयानका क्षिति झाली घरघाली रुद्रविशति जगिं फांकली । - ऐपो ३६८ . [ घर + घालणें ; तुल० गु . घरघालु = द्रोही , खर्चीक ] ०घुशा घुसा - वि . सर्व दिवसभर उदासवाणा घरांत बसणारा ; घरबशा , घरकोंबडा ; घरकुबडा पहा . [ घर + घुसणें ] ०घुशी घुसी - स्त्री . नवर्याचें घर सोडून दुसर्याच्या घरांत नांदणारी ; दुसर्याचा हात धरून गेलेली विवाहित स्त्री . कोण धांगड रांड घरघुशी । - राला ७८ . [ घर + घुसणें ] ०घेऊ घेणा - वि . घराचा , कुटुंबाचा नाश , धुळधाण करणारा ; घरघाला ; घरबुडव्या ; दुसर्यास मोह पाडून , फसवून त्याचें घर बळकावणारा . जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी । - दंप ८० . लांबलचक वेणी , विणुन त्रिवेणी , घरघेणी अवतरली । - प्रला १११ . [ घर + घेणें ] ०चार घराचार - पु . १ कुटुंबाची रीतभात ; घराची चालचालणूक ; कौटुंबिक रूढी , वहिवाट . म्ह० घरासारखा घरचार कुळाखारखा आचार . २ गृहस्थधर्म ; संसार ; प्रपंच . - जै १०६ . दुं : खाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें । - किंसुदाम ५० . [ सं . गृहाचार ; म . घर + आचार = वर्तन ] ०चारिणी ०चारीण स्त्री. ( काव्य . ) गृहपत्नी ; घरधनीण ; यजमानीण ; घरमालकीण . शेवटी नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे । [ सं . गृहचारिणी ] ०जमा स्त्री. घरावरील कर ; घरपट्टी . घरजांवई , घरजांवाई - पु . बायकोसह सासर्याच्या घरीं राहणारा जांवई ; सासर्याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई . तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपण मांडिले ॥ - एभा २२ . ५९२ . [ घर + जांवई ] ०जांवई सक्रि . १ ( एखाद्यास ) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें ; जांवयाला घरीं ठेवून घेणें , त्याला आपली जिंदगी देणें . त्याला त्यांनीं घरजांवईच केला आहे . - इंप २७ . २ ( उप . ) एखादी उसनी घेतलेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें , मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत , ठेवून घेणें . करणें सक्रि . १ ( एखाद्यास ) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें ; जांवयाला घरीं ठेवून घेणें , त्याला आपली जिंदगी देणें . त्याला त्यांनीं घरजांवईच केला आहे . - इंप २७ . २ ( उप . ) एखादी उसनी घेतलेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें , मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत , ठेवून घेणें . ०जांवई बसणें - अक्रि . आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें , आपणच घेऊन टाकणें . होऊन बसणें - अक्रि . आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें , आपणच घेऊन टाकणें . ०जिंदगी जिनगानी - स्त्री . १ घरांतील सामानसुमान , उपकरणीं , भांडीकुंडीं , द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता ; घरातील जंगम चीजवस्तु ; मिळकत . २ ( सामा . ) मिळकत ; इस्टेट . पादशहाची घरजिनगानी समग्र लुटून . - ख ८ . ४२२४ . [ घर . फा . झिंदगी , झिंदगानी = मालमत्ता , जन्म , संसार ] ०जुगूत जोगावणी - स्त्री . १ काटकसर ; मितव्यय ; थोडक्यांत घराचा निर्वाह . २ घरांतील जरूरीची संपादणी ; कसाबसा निर्वाह . एक म्हैस आहे तिणें घर जुगूत मात्र होत्ये . - शास्त्रीको [ घर + जुगूत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी ] ०टका टक्का - पु . घरपट्टी घरजमा ; घरावरील कर . ०टण टणा - घरठाण अर्थ २ घरबंद पहा . ०टीप स्त्री. १ गांवांतील घरांची गणती . ( क्रि० करणें ; काढणें ). २ घरमोजणीचा हिशेब , तपशील ; घरगणती पहा . [ घर + टीप = टिपणें , लिहिणें ] ( वाप्र . ) ०टीप , टीप करणें , टीप घेणें - ( ल . ) ( शोधीत , लुटीत , मोजीत , आमंत्रण देत ) गांवांतील एकहि घर न वगळतां सर्व घरांची हजेरी घेणें ; कोणतीहि क्रिया , रोग , प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें . यंदा जरीमरींनें ह्या गांवाची घरटीप घेतली . काढणें , टीप करणें , टीप घेणें - ( ल . ) ( शोधीत , लुटीत , मोजीत , आमंत्रण देत ) गांवांतील एकहि घर न वगळतां सर्व घरांची हजेरी घेणें ; कोणतीहि क्रिया , रोग , प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें . यंदा जरीमरींनें ह्या गांवाची घरटीप घेतली . ०टोळ स्त्री. ( कों . ) प्रत्येक घराचा झाडा , झडती . त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला . घरडोळ पहा . ०ठाण ठण - न . १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग . - लँडरेव्हिन्यू कोड . २ मोडलेल्या घराचा चौथरा ; पडक्या घराची जागा . घरबंद पहा . [ सं . गृहस्थान ; म . घर + ठाणा - ण ] ०ठाव पु. १ नवरा ; पति ; संसार . मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन . २ अनीतिकारक आश्रय ; रखेलीचा दर्जा ; रखेलीस दिलेला आश्रय . नीरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता . - बहकलेली तरुणी ( हडप ) ८ . ०डहुळी डोळी डोळ - स्त्री . १ घराचा झाडा , झडती ; बारीक तपासणी . मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । - ज्ञा ६ . २१६ . तया आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । - ज्ञा ११ . ५८६ . २ प्रत्येक घराची केलेली झडती . ( क्रि० घेणें ). [ घर + डहुळणें = ढवळणें ] ०डुकर न. १ गांवडुकर ; पाळीव डुकर . २ निंदाव्यजक ( कुटुंबांतील ) आळशी , निरुद्योगी स्त्री . [ घर + डुकर ] ०तंटा पु. गृहकलह ; घरांतील भांडण . [ घर + तंटा ] ०दार न. ( व्यापक ) कुटुंब ; घरांतील माणसें , चीजवस्तु इ० प्रपंचाचा पसारा , खटलें ; [ घर + दार ] ( वाप्र . ) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें - सारी धनदौलत नासून , फस्त करून कफल्लक बनणें ; ०दार घर व त्यांतील मालमत्ता विकणें ; सर्व स्थावर जिंदगी घालविणें . म्ह० एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें . विकणें घर व त्यांतील मालमत्ता विकणें ; सर्व स्थावर जिंदगी घालविणें . म्ह० एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें . ०देणें न. घरपट्टी ; घरटका . धणी , धनी - पु . १ यजमान ; गृहपति ; घरांतील कर्ता माणूस . निर्वीरा घरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं । - आसी ५२ . २ पति ; नवरा ; घरकरी . मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये . - बाय २ . २ . ०धंदा पु. घरांतील कामधाम ; गृहकृत्य . [ घर + धंदा ] ०धनीण स्त्री. १ घरमालकीण ; यजमानीण . २ पत्नी ; बायको ; घरकरीण . माझी घरधनीण फार चांगली आहे . - विवि ८ . २ . ४० . ०नाशा वि. घराचा , कुटुंबाचा नाश , धुळधाण करणारा ; घरघाल्या . [ घर + नासणें ] ०निघणी निघोणी - स्त्री . १ घरनिधी पहा . २ ( क्क . ) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापरतात . केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात . [ घर + निघणें ] ०निघी स्त्री. वाईट चालीची , दुर्वर्तनी , व्यभिचारिणी स्त्री ; घरांतून बाहेर पडलेली , स्वैर , व्यभिचारिणी स्त्री . कीं घरनिघेचें सवाष्णपण । - नव १८ . १७२ . [ घर + निघणें = निघून जाणें , सोडणें ] ०निघ्या पु. १ स्वत : चें कुटुंब , घर , जात सोडून दुसर्या घरांत , जातींत जाणारा ; दुर्वर्तनी , व्यभिचारी मनुष्य . २ एखाद्या व्यभिचारणी स्त्रीनें बाळगलेला , राखलेला पुरुष ; जार . [ घर + निघणें ] ०पटी पट्टी - स्त्री . १ घरटका ; घरदेणें ; घरावरील कर ; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वी असे . मात्र ती सरकारांत वसूल होई . पुणें येथें शके १७१८ - १९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु . घरपट्टी घेत . मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवल्यास घेत . स्वत : चें दुकान असल्यास , किंवा भाडेकरी नसल्यास घेत नसत . - दुसरा बाजीराव रोजनिशी २७९ - ८० . पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला . - के १६ . ४ . ३० . २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी . [ घर + पट्टी = कर ] ०पांग पु. निराश्रितता ; आश्रयराहित्य . तंव दरिद्रियासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ॥ - ह २९ . ३५ . [ घर + पांग = उणीव ] ०पांडया पु. घरांतल्याघरांत , बायकांत बडाबडणारा , पांडित्य दाखवणारा . [ घर + पांडया = गांवकामगार ] ०पाळी स्त्री. ( सरकारला कांहीं जिन्नस पुरविण्याची , सरकारचा विवक्षित हुकूम बजावण्याची , भिकार्यांना अन्न देण्याची इ० ) प्रत्येक घरावर येणारी पाळी , क्रम . [ घर + पाळी ] ०पिसा वि. ज्याला घराचें वेड लागलें आहे असा ; घरकोंबडा ; घरकुंडा ; [ घर + पिसा = वेडा ] ०पिसें न. घराचें वेड ; घरकुबडेपणा ; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें . [ घर + पिसें = वेड ] ०पोंच पोंचता - वि . घरीं नेऊन पोंचविलेला , स्वाधीन केलेला ( माल ). [ घर + पोहोंचविणें ] ०प्रवेश पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि . ( प्र . ) गृहप्रवेश पहा . [ म . घर + सं . प्रवेश = शिरणें ] घरास राखण - स्त्री . १ घराचें रक्षण करणारा मनुष्य . २ थोडासा संचय , शिल्लक , सांठा , संग्रह . सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव . घर म्हणून पहा . ०फूट स्त्री. आपसांतील दुही , तंटेबखेडे ; गृहकलह ; घर , राज्य इ० कांतील एकमतानें वागणार्या माणसांमध्ये परस्पर वैर . द्वेषभाव . [ घर + फूट = दुही , वैर ] ०फोड स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें , कलागती उत्पन्न करणें . [ घर + फोडणें = फूट पाडणें ] ०फोडी स्त्री. १ ( कायदा ) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप - कडी काढून , मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून ( चोरी करण्याकरितां ) प्रवेश करणें ; ( पीनलकोडांतील एक गुन्हा ). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी . ( इं . ) हाउस ब्रेकिंग . [ घर + फोडणें ] ०फोडया वि. १ घरांत , राज्यांत फूट पाडणारा , दुही माजविणारा ; घरफूट करणारा . २ घरें फोडून चोरी करणारा . [ घर + फोडणें ] ०बंद पु. १ ( कों . ) घरांची वस्ती , संख्या . त्या शहरांत लाख घरबंद आहे . [ घर + बंद = रांग ] २ घराचा बंदोबस्त ; घरावरील जप्ती ; घर जप्त करणें , घराची रहदारी बंद करविणें ; चौकी - पहारा बसविणें . ऐकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहरा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं । - दावि ४५६ . [ घर + बंद = बंद करणें ] ०बशा वि. उप . घरकोंबडा ; घरांत बसून राहणारा . [ घर + बसणें ] ०बसल्या क्रिवि . घरीं बसून ; नोकरी , प्रवास वगैरे न करतां ; घरच्याघरीं ; घर न सोडतां . ( ल . ) आयतें ; श्रमाविना . ( क्रि० मिळणें ; मिळवणें ). तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील . ०बाडी स्त्री. बेवारसी घरांचें भाडें ( ब्रिटिशपूर्व अमदानींत कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे ). घरवाडी पहा . ०बार न. घरदार ; घरांतील मंडळी व मालमत्ता ; संसार ; प्रपंचाचा पसारा . तेवि घरबार टाकून गांवीचे जन । - दावि ४१२ . घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्याजिले । - देप २७ . [ सं . गृह + भृ ; म . घर + भार ; हिं . घरबार ; गु . घरबार ] ०बारी पु. १ कुटुंबवत्सल ; बायकोपोरांचा धनी ; गृहस्थाश्रमी ; संसारी . भार्या मित्र घरबारिया । - मुवन १८ . ७१ . २ घरधनी ; घरकरी ; नवरा ; पति . कां रुसला गे माझा तो घरबारी । - होला १४८ . [ सं . गृह + भृ ; म . घरबार ; हिं . घरबारी ; गु . घरबारी ] म्ह० ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं की बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात . ०बारीपणा पु. गृहस्थपणा ; कर्तेपणा . पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो . - विवि ८ . २ . ३५ . [ घरबारी ] ०बुडवेपणा पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म . २ देशद्रोह ; स्वदेशाशीं , स्वदेशीयाशीं , स्वराज्याशीं बेइमान होणें . हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घरबुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच . - टि १ . ५४८ . [ घर बुडविणें ] ०बुडव्या वि. अत्यंत त्रासदायक ; दुसर्याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा ; देशद्रोही . [ घर + बुडविणें ] ०बुडी ०बूड स्त्री. १ ( एखाद्याच्या ) संपत्तीचा , दौलतीचा नाश ; सर्वस्वाचा नाश . २ एखादें घर , कुटुंब अजिबात नष्ट होणें ; एखाद्या कुळाचें , वंशाचें निसंतान होणें . [ घर + बुडणें ] ०बेगमी बेजमी - स्त्री . कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला साठा , पुरवठा , संग्रह ; प्रपंचासाठीं केलेली तरतूद . [ घर + फा . बेगमी = सांठा ] ०बेत्या पु. ( राजा . ) घराची आंखणी करणारा . ( इ . ) इंजिनिअर . [ घर + बेतणें ] ०बैठा वि. १ घरीं बसून करतां येण्यासारखें ( काम , चाकरी , धंदा ); बाहेर न जातां , नोकरी वगैरे न करतां , स्वत : च्या घरीं , देशांत करतां येण्याजोगा . २ घरांत बसणारा ( नोकरी , चाकरीशिवाय ); बेकार . - क्रिवि . ( सविभक्तिक ) घरीं बसून राहिलें असतां ; घरबसल्या पहा . [ घर + बैठणें ] ०भंग पु. १ घराचा नाश , विध्वंस . जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग । - दा ३ . २ . ६० . २ ( ल . ) कुळाचा , कुटुंबाचा नाश ; कुलनाश . [ घर + भंग ] ०भर वि. ( कर्तृत्वानें , वजनानें ) घर , कुटुंब भरून टाकणारा - री ; घरांत सर्व ठिकाणीं , सर्वजागीं . त्यानें तुला घरभर शोधलें . [ घर + भरणें ] ०भरणी स्त्री. १ गृहप्रवेश ; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि ; वास्तुशांति ; घररिघणी पहा . २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होतांना करण्याचा विधि ; नववधूचा गृहप्रवेश ; गृहप्रवेशाचा समारंभ ; वरात ; घररिगवणी ; घररिघवणी . वधूवरें मिरवून । घरभरणी करविली । - र ४८ . ०भरवण भरवणी - स्त्री . ( गो . कु . ) गृहप्रवेश ; वरात ; घरभरणी अर्थ २ पहा . [ घर + भरवणें ] ०भाऊ पु. कुटुंबांतील मनुष्य ; नातलग ; कुटुंबाच्या मालमत्तेचा , वतनवाडीचा वांटेकरी ; हिस्सेदार ; दायाद . ०भाट पु. १ ( कु . ) घराच्या आजूबाजूची आपल्या मालकीची जागा , जमीन ; घरवाडी ; विसवाट . २ ( गो . ) घराशेजारचा , सभोंवारचा नारळीचा बाग . [ घर + भाट ] ०भांडवल न. १ कुटुंबांतील मालमत्ता , जिंदगी , इस्टेट . २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि , ठेव ; उसना काढलेला , कर्जाऊ काढलेला पैसा , द्रव्यनिधि याच्या उलट . [ घर + भांडवल ] ०भांडवली वि. घरच्या , स्वत : च्या भांडवलावर व्यापार करणारा . [ घरभांडवल ] ०भाडें न. दुसर्याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा , भाडें . [ घर + भांडें ] ०भारी पु. ( प्र . ) घरबारी . १ घरबारी पहा . २ ब्रह्मचारी , संन्यासी याच्या उलट ; गृहस्थाश्रमी . ०भेद पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण , तंटा ; फाटाफूट ; घरफूट . ०भेदी भेद्या - वि . १ स्वार्थानें , दुष्टपणानें परक्याला , शत्रूला घरांत घेणारा ; फितूर ; देशद्रोही . २ घरचा , राज्याचा , पक्का माहितगार ; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा . म्ह० घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळणार्या मारुतीप्रमाणें असतो . ३ घरांतील , राज्यांतील कृत्यें , गुप्त बातम्या बाहेर फोडणारा ; घर फोडणारा . घरभेद्या होऊनि जेव्हां । - संग्रामगीतें १४० . ४ घरांत , कुटुंबांत , राज्यांत , तंटे , कलह लावणारा . ०भोंदू वि. १ लोकांचीं घरें ( त्यांना फसवून ) धुळीस मिळवणारा . २ ( सामा . ) ठक ; बिलंदर ; प्रसिध्द असा लुच्चा ; लफंगा ( मनुष्य ). [ घर + भोंदू = फसविणारा ] ०महार पु. राबता महार . ०मारू मार्या - वि . शेजार्यास नेहमीं उपद्रव देणारा ; शेजार्याच्या नाशाविषयीं नेहमीं खटपट करणारा . ०माशी स्त्री. घरांत वावरणारी माशी ; हिच्या उलट रानमाशी . ०मेढा मेढया - पु . घरांतील कर्ता , मुख्य मनुष्य ; कुटुंबाचा आधारस्तंभ ; घराचा खांब पहा . [ सं . गृह + मेथि ; प्रा . मेढी ; म . घर + मेढा = खांब ] ०मेळीं क्रिवि . आपसांत ; घरीं ; खाजगी रीतीनें ; आप्तेष्टमंडळीमध्यें ( तंटयाचा निवाडा , तडजोड करणें ). घरमेळीं निकाल केला . [ घर + मेळ ; तुल० गु . घरमेळे = आपसांत ] ०मोड स्त्री. घर मोडून तें विकणें . कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता . - टि १ . १६९ . [ घर + मोडणें ] ०राखण स्त्री. १ ( प्रां . ) घराची पाळत ; रक्षण ; पहारा . २ घरराखणारा ; घरावर पहारा ठेवणारा . [ म . घर + राखणें ] ०राख्या वि. घराचें रक्षण करणारा ; घराचा पहारेकरी ; घरराखण . [ घर + राखणें ] ०रिघणी रिघवणी - स्त्री . १ नवीन बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिकविधि ; घरभरणी अर्थ १ पहा . २ घरचा कारभार ; घरकाम . रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी । - विपू ७ . १२८ . [ घर + रिघणें = प्रवेश करणें ] ०रिघणें घरांत येणें , प्रवेश करणें . घररिघे न बाहतां भजकाच्या । - दावि १६१ . ०लाठया वि. ( महानु . ) घरांतील लाठया , लठ्ठया ; घरपांडया ; गृहपंडित ; घरांत प्रौढी मिरविणारा ; रांडयाराघोजी . ऐसेआं घरलाठेआं बोलां । तो चैद्यु मानवला । - शिशु ८९९ . [ घर + लठ्ठ ? ] ०वट वड - स्त्री . १ ( कु . गो . ) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारन , समायिक जिंदगी , मालमत्ता ; कुटुंबाचें , संस्थेचें सर्वसाधारण काम , प्रकरण . घरोटी पहा . २ ( गो . ) कूळ ; कुटुंब ; परंपरा . ३ आनुवंशिक रोग , भूतबाधा इ० आनुवंशिक संस्कार . [ सं . गृह + वृत्त ; प्रा . वट्ट ] ०वण न. ( कों . ) घरपट्टी ; घरासंबंधीं सरकार देणें . ०वणी न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी . याचा धुण्याकडे उपयोग करतात . [ सं . गृह . म . घर + सं . वन , प्रा . वण = पाणी ] ०वंद पु. ( राजा . ) घरटणा ; पडक्या घराचा चौथरा ; पडलेल्या घराची जागा . - वि . घरंदाज ; कुलीन ; खानदानीचा . शहर पुणें हरहमेष भरलें वाडे बांधिती घरवंदानी । - ऐपो ४२० . [ गृहवंत ? ] ०वरौते स्त्री. १ घरवात ; प्रपंच ; संसारकथा ; घरवात पहा . २ - न . नवराबायको ; दांपत्य ; जोडपें . तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें । - विउ ६ . ५ . पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये । - अमृ १ . ४९ . [ गृह + वृत - वर्तित ] ०वसात वसाद - स्त्री . १ वसति ; रहाणें ; वास ; मुकाम . २ घराची जागा ; घराची जागा आणि सभोंवतालचें ( मालकीचें ) आवार , परसू , मोकळी जागा , अंगण . [ घर + वसाहत ] ०वांटणी ०वाटा ०हिस्सा स्त्रीपु . घराच्या मालमत्तेंतील स्वत : चा , खाजगी , हिस्सा , भाग . [ घर + वांटणी ] ०वाडी स्त्री. ( को . ) ज्यांत घ्र बांधिलेलें असतें तें आवार ; वाडी . कोणाच्या अनेक वाडया असतात , त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी . [ घर + वाडी ] ०वात स्त्री. संसार ; प्रपंच ; संसाराच्या गोष्टी ; प्रपंचाचा पसारा ; घरवरौत ; घरकाम . घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ - अमृ १ . १३ . ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं । - दा ३ . ४ . ६ . [ सं . गृहवार्ता ] ०वाला वि. १ घराचा मालक . २ ( खा . ) नवरा ; घरधनी ; पति . [ घर + वाला स्वामित्वदर्शक प्रत्यय ; तुल० गु . घरवाळो ] ०वाली वि. ( खा . ) बायको ; पत्नी ; घरधनीण . माझ्या घरवालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें । - राणी चंद्रावती ५३ . [ घर + वाली ; गु . घरवाळी ] ०वासी वि. कुटुंबवत्सल ; प्रपंचांत वागणारा . [ घर + वास = राहणे ] ०वेडा वि. १ घरपिसा . २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला ; ( इं . ) होमसिक . ०शाकारणी ०शिवाणी स्त्री. घरावरील छपराची दुरस्ती करणें ; घरावर गवत वगैरे घालून पावसापासून संरक्षणाची व्यवस्था करणें ; घराच्या छपराचीं कौलें चाळणें . [ घर + शाकरणें , शिवणें ] ०शोधणी स्त्री. १ स्वत : चीं खाजगी कामें पहाणें . २ स्वत : च्या साधनसामर्थ्याचा विचार करणें ; स्वत : ची कुवत अजमावणें . [ घर + शोधणें ] ०संजोग पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा सरंजाम . त्या हरदासाचा घरसंजोग आहे . = कीर्तनास लागणारीं साधनें तबला , पेटी , टाळ इ० हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत . २ काटकसरीचा प्रपंच ; घरजुगूत ; घरव्यवस्था . ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी , समृध्दता . [ घर + सं . संयोग , प्रा . संजोग = सरंजाम ] ०संजोगणी स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा . घरजुगूत ; काटकसर ; मितव्यय . ०समजूत स्त्री. घरांतल्याघरांत , आपाअपसांत स्नेहभावानें , सलोख्यानें केलेली तंटयाची तडजोड , समजावणी . ०संसार पु. कुटुंबासंबंधीं कामें ; घरकाम ; प्रपंच . ०सारा पु. घरावरील कर ; घरपट्टी ; घरटक्का . [ घर + सारा = कर ] ०सोकील वि. घरीं राहून खाण्यास सोकावलेला ; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा ; घराची चटक लागलेला ( बैल , रेडा इ० पशु ). [ घर + सोकणें ] ०स्थिति स्त्री. १ घराची स्थिति ; घरस्थीत पहा . २ गृहस्थाश्रमधर्म ; संसार ; प्रपंच . ॠषीस आर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति । - कथा ३ . ३ . ६३ . [ सं . गृहस्थिति ] ०स्थीत स्त्री. घराची , कुटुंबाची रीतभात , चालचालणूक , वर्तन , आचार , स्थिति . म्ह० अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घरांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें . शितावरून भाताची परीक्षा या अर्थी . [ घर + स्थिति अप . ] घराचा खांब , घराचा धारण , घराचें पांघरूण - पुन . ( ल . ) घरांतील कर्ता माणूस ; घरांतला मुख्य ; घरमेढया . घराचार - पु . १ संसार ; प्रपंच ; गृहस्थाश्रमधर्म ; घरकाम . परी अभ्यंतरीं घराचार मांडे । - विपू ७ . १३८ . यापरी निज नोवरा । प्रकृती गोविला घराचारा । - एभा २४ . ३२ . - कालिकापुराण ४ . ३५ . २ ( ल . ) पसारा ; व्याप तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं । - सिसं ४ . २०७ . ३ घरांतील मंडळींची राहाटी , रीतभात , आचरण , वागणूक , व्यवहार . वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार । - एभा २६ . ३० . [ सं . गृह + आचार ] घराचारी - वि . १ घरंदाज . २ नवरा ; पति ; घरकरी ; दादला . ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती । - एभा १३ . २१४ . [ घराचार ] घरास राखण - स्त्री . १ घराचें रक्षण करणारा मनुष्य . २ थोडासा संचय , शिल्लक , सांठा , संग्रह . सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव . घर म्हणून पहा . घरींबसल्या - क्रिवि . घरबसल्या पहा . घरोपाध्या - पु . कुलोपाध्याय ; कुलगुरु ; कुलाचा पुरोहित , भटजी . [ घर + उपाध्याय ; अशुध्द समास ]
|