Dictionaries | References

घरचा म्‍हाली, घर घाली

   
Script: Devanagari

घरचा म्‍हाली, घर घाली     

(व.) घरी नेहमी हजामतीला येणार्‍या म्‍हाल्‍याला म्‍हणजे न्हाव्याला आपल्‍या घरातील सर्व बित्तंबातमी असते. तो जर चोराला सामील झाला तर तो आपले घर सर्वस्‍वी घालवितो
आपल्‍या नुकसानीला कारणीभूत होतो. २. घरच्यापैकीच कोणी हजामत करणारा असला म्‍हणजे तो घरच्या पुरुषांच्या हजामती मोफत करतो. तितका त्‍याचा वेळ व मेहनत मिळकतीच्या दृष्‍टीने फुकट जातात. घरची नुकसानी होते. बाहेरच्या लोकांच्या हजामती तो करता तर पैसे मिळविता व घराचा फायदा करता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP