Dictionaries | References

घर

   { gharḥ }
Script: Devanagari

घर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  मनुष्यों द्वारा छाया हुआ वह स्थान, जो दीवारों से घेरकर रहने के लिए बनाया जाता है   Ex. इस घर में पाँच कमरे हैं ।; विधवा मंगला नारी निकेतन में रहती है ।
HOLO MEMBER COLLECTION:
कॉलोनी
HYPONYMY:
अतिथि-गृह गजशाला मंदिर मुर्दा-घर प्रसूति गृह शवदाह गृह भवन विमानशाला द्यूतगृह आश्रम गुरुकुल हवेली बँगला घरौंदा खंडहर झोपड़ी खोली चुंगीघर मटकोठा भुसौरा अजिऔरा दाक्षिणशाल बहनौरा अभिलेखागार खपरैल बैरक गुमटी मोटल भूतखाना प्राग्द्वार नृत्यशाला तारागृह कंटकाल प्राग्वश क्लबहॉउस शेड
MERO COMPONENT OBJECT:
शयनकक्ष आँगन नींव कमरा स्नानागार रसोईघर बालकनी
MERO PLACE AREA:
प्रवेश-कक्ष
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गृह मकान सदन शाला आलय धाम निकेतन निलय केतन पण गेह सराय अमा निषदन अवसथ अवस्थान आगार आगर आयतन आश्रय दम
Wordnet:
asmঘৰ
bd
benবাড়ি
gujઘર
kanಮನೆ
kasگَرٕ
kokघर
malവീട്
marघर
mniꯌꯨꯝ
nepघर
oriଘର
panਘਰ
sanगृहम्
tamவீடு
telఇల్లు
urdگھر , مکان , ٹھکانا , آشیانہ , سرائے , رہائش گاہ , قیام گاہ
noun  रोग आदि का मूल कारण   Ex. गंदगी रोगों का घर है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআঁতুরঘর
kasموٗل , جَڑ , گَرِ
urdگھر , وطن , ملجا , محرک
noun  वह स्थान जिससे कोई भली-भाँति परिचित हो   Ex. इलाहाबाद तो मेरे लिए घर है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसिनायनाय जायगा
benঘর
gujઘર
kasگَرٕ
kokघर
mniꯨꯌꯨꯝ
sanगृहम्
urdگھر
See : जन्मकुंडली स्थान, स्वदेश, आवास, कमरा, परिवार, खाना, बुनियाद, देश

घर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  विटो, फातर, लांकूड, बी ह्या वस्तूं पसून तयार केल्लें बांदकाम   Ex. तें घर बांदपाक दोन वर्सां लागली
HYPONYMY:
दोन माळी मळबाक तेंकपी राजवाडो ओश्पिताल पुलीस चौकी पुस्तकालय राजभवन वसतीस्थान विद्यार्थी निवास सिनेमाघर नाटकघर देवूळ मकबरो भोवखंडी भवन मिनार काबा भूल-भुलैया सचिवालय भूल भूलैया थेटर केंद्रीय भवन अकादमी आयफिल टॉवर ह्वायट हावस विधानभवन प्रसाधन गृह
MERO COMPONENT OBJECT:
कूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
इमारत वास्तू भवन
Wordnet:
asmভৱন
bdगिदिर न
benভবন
gujભવન
hinभवन
kanಭವನ
kasعِمارَت
malഭവനം
marइमारत
mniꯌꯨꯝꯖꯥꯎ
nepभवन
oriଭବନ
panਭਵਨ
tamகட்டிடம்
telఇల్లు
urdعمارت , مکان
noun  वणटिनीं घेरिल्ली आसता अशी मनशानीं भरिल्ली सुवात   Ex. ह्या घराक पांच कुडी आसात/ विधवा मंगला नारी निकेतनांत रावता
HOLO MEMBER COLLECTION:
गांव
HYPONYMY:
सोयर्‍यांघर देवूळ कुडींघर घर विमानशाळा अड्डो आश्रम वाडो बंगलो गुरुकूल हतीशाळ बाळंटेरघर प्रेतदहन घर मोडगळ खोप जकात नाको छावणी घुमटी मोटॅल ल्हान कुड भुतबंगलो मातयेघर कुंड्याघर नाचशाळा अपार्टमेंट घरकूल
MERO COMPONENT OBJECT:
न्हिदपाची कूड बुन्यान कूड मान्नें रांदपाची कूड आंगण
MERO PLACE AREA:
साल
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गृह
Wordnet:
asmঘৰ
bd
benবাড়ি
gujઘર
hinघर
kanಮನೆ
kasگَرٕ
malവീട്
marघर
mniꯌꯨꯝ
nepघर
oriଘର
panਘਰ
sanगृहम्
tamவீடு
telఇల్లు
urdگھر , مکان , ٹھکانا , آشیانہ , سرائے , رہائش گاہ , قیام گاہ
noun  जंय कोणतरी रावता अशी सुवात   Ex. नितळ आनी हवेशीर राबितो भलायके खातीर लाब दिणो आसता / हें झाडूच ह्या सुकण्यांचो राबितो
HYPONYMY:
घर कोट घोंटेर घोल दुतावास तंबू भवन मालें गाळो अड्डो फ्लॅट होटॅल अहदीखाना स्वीट
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
राबितो निवास रावणी
Wordnet:
asmআবাস
bdथाग्रा जायगा
benআবাস
gujઆવાસ
hinआवास
kanವಾಸವಾಗಿರುವಿಕೆ
kasروزَن جاے
malആവാസം
marनिवासस्थान
nepआवास
oriଘର
panਆਵਾਸ
sanआवासः
tamவசிப்பிடம்
telనివాస స్థలం
urdرہائش گاہ , رہائش , بودباش , سکونت , مسکن , غریب خانہ , دولت کدہ
noun  गड्ड्यांच्या खेळांत गड्डे मारपा खातीर कागद, लांकूड, बी हांचेर बांदिल्लो विभाग   Ex. ताणें बुद्दीबळाची घुल दुसर्‍या घरांत दवरली
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चौकट खण
Wordnet:
benঘর
hinखाना
kanಚದರ
kasژُ کوٗنٛجَل
malചതുരംഗപ്പട
oriଘର
panਖਾਨਾ
telగడి
urdخانہ , گھر , گوٹی گھر
noun  रात काडपाची जागा   Ex. हें रानच ह्या डाकवांचें घर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujરાત્રિ સ્થાન
hinरैन बसेरा
kasروت ٹِھکانہٕ
oriରାତ୍ରରହଣୀ
See : देश, जल्मकुंडली स्थान, खण
घर noun  ती सुवात जंय कोणूय बरे भशेन वळखता.   Ex. इलाहाबाद तर म्हजे खातीर घर.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घर.
Wordnet:
bdसिनायनाय जायगा
benঘর
gujઘર
kasگَرٕ
mniꯨꯌꯨꯝ
sanगृहम्
urdگھر

घर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Great cry and little wool; much display but no substance.

घर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A house. A frame. A household. A compartment. Footing. A hole, den. Source. Domestic or social life.
घर करणें   To set up or keep house. To effect a lodgment.
घर घेणें   Spoil; ruin. Take up a lodgment in.
घर चालविणें   Manage domestic affairs.
घर जोडणें   Form union with.
घर धरणें   Keep at home; obtain firm seat.
घर धुणें   Consume (the whole property of another).
घर धुवून नेणें   To consume, devour the whole property of another.
घर फिरलें म्हणजे घराचे वांसे फिरतात   Calamities never come singly. In adversity even friends become foes.
घर फोडणें   Break up a household. Burglary.
घर बसणें   Sink a family from misfortunes.
घर बुडणें   Be ruined-a family.
घर भरणें   Enrich one's self by impoverishing others.
घर मारणें   Plunder a house.
घर म्हणून ठेवणें   Keep a stock of as a reserve.
घरात वाजे नकार घंटा   To be extremely indigent.
घरास कांटी लावणें   Make desolate, destroy.
घरीं आलेली   A widowed girl or woman.
घरीं दारीं सारखा   The same a broad and at home.
घरीं बसणें   Be without employment.
घरोघरीं मातीच्या चुली   All are alike.
खाल्ल्या घराचे वासे मोजणें   Seek the evil of a benefactor.
बडा घर पोकळ वांसा   Much display but no substance. Great cry and little wool.

घर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  राहण्यासाठी बांधलेली जागा   Ex. माझे घर येथून फार लांब आहे.
HOLO MEMBER COLLECTION:
वसाहत
HYPONYMY:
हत्तीशाळा अतिथिगृह शवागार प्रसूतिगृह स्मशानभूमी इमारत आश्रम गुरुकुल बंगला देऊळ तारांगण अपार्टमेंट हवेली भग्नावशेष जकातघर जुगाराचा अड्डा खोली झोपडी विमानघर नृत्यशाळा कौलारू घर बहिणीचे सासर घरकूल पणजोळ सैनिकी निवास मोटेल
MERO COMPONENT OBJECT:
शेजघर पाया खोली न्हाणीघर स्वयंपाकघर चौक बाल्कनी
MERO PLACE AREA:
प्रवेशकक्ष
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गृह सदन आलय वसतिस्थान निकेतन
Wordnet:
asmঘৰ
bd
benবাড়ি
gujઘર
hinघर
kanಮನೆ
kasگَرٕ
kokघर
malവീട്
mniꯌꯨꯝ
nepघर
oriଘର
panਘਰ
sanगृहम्
tamவீடு
telఇల్లు
urdگھر , مکان , ٹھکانا , آشیانہ , سرائے , رہائش گاہ , قیام گاہ
noun  जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान   Ex. माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
कुंडली
HYPONYMY:
दशम भाव
MERO MEMBER COLLECTION:
ग्रह
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्थान
Wordnet:
benকোষ্ঠি
gujજન્મકુંડલી સ્થાન
hinजन्मकुंडली स्थान
kanಜನ್ಮಕುಂಡಲಿ ಸ್ಥಾನ
kasگَر
kokजल्मकुंडली स्थान
malരാശി
oriଜନ୍ମ କୁଣ୍ଡଳୀ ସ୍ଥାନ
panਜਨਮਕੁੰਡਲੀ ਸਥਾਨ
tamஜாதகம்
telజన్మకుండలీ స్థానం
urdجنم کنڈلی استھان
noun  सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक विभाग   Ex. पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঘর
hinखाना
kanಚದರ
kasژُ کوٗنٛجَل
kokघर
malചതുരംഗപ്പട
oriଘର
panਖਾਨਾ
telగడి
urdخانہ , گھر , گوٹی گھر
noun  रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण   Ex. मधुमेह हे रोगाचे घर आहे
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআঁতুরঘর
kasموٗل , جَڑ , گَرِ
urdگھر , وطن , ملجا , محرک
noun  एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन   Ex. अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
noun  अतिशय परिचित असलेले स्थान   Ex. अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसिनायनाय जायगा
benঘর
gujઘર
kasگَرٕ
kokघर
mniꯨꯌꯨꯝ
sanगृहम्
urdگھر
See : कूळ, बीळ, संसार, कुटुंब

घर     

 न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०३ .
 न. १ विशिषाट खुणांनी दर्शविलेलें अंतर ; टप्पा ; ' मिनिट कांटा एक तासांत ६० घरें चालतो .' - के २ कोष्टकांतील खण , खाना . ' मध्यें तीन घरें मोकळी टाकलेली होतीं व चवथ्या घरांत पांचचा आंकडा होता .' ( सं . गृह )
 न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा ; वाडा . २ एका कुटुंबांतील ( एके ठिकाणीं ) राहणारी मंडळी ; कुटुंब . ३ गृहस्था श्रमधर्म ; संसार ; प्रपंच . त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें ४ एखाद्या पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा , भोंक , खोबण . भिंतीस घर करून मग खुंटी ठोक . ७ ( मालकाच्या इच्छेविरुध्द मिळविलेलें , बळकावलेलें ) वस्तीचें ठिकाण . कांटयानें माझ्या टाचेंत घर केलें . ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचे , लांकडाचें आवरण , वेष्टण , कोश , उ० चष्म्याचें घर . माझ्या चष्म्याचें घर चामडयाचें आहे . ९ पेटींतील , टाइपाच्या केसींतील कप्पा , खण , खाना . १० सोंगटयांच्या , बुध्दिबळांच्या पटावरील , पंचांगातील ( प्रत्येक ) चौक ; चौरस ; मोहर्‍याचा मूळचा चौरस ; मोहर्‍याचा मारा . राजा एक घर पुढें कर घोडा अडीच घरें ( एकाच वेळीं ) चालतो . ११ ( ज्यो . ) कुंडलीच्या कोष्टकांतील सूर्य , चंद्र इ० ग्रहांचें स्थान . १२ घराणें ; वंश ; कुळ . त्याचें घर कुलीनांचें आहे . त्याच्या घराला पदर आहे . = त्याच्या वंशांत परजातीची भेसळ झाली आहे . १३ उत्पत्तिस्थान ; प्रांत , प्रदेश , ठिकाण , ठाणें ( वारा , पाऊस , प्रेम , विकार , रोग इ० काचें ); सर्वज्ञतेचि परी । चिन्मात्राचे तोंडावरी । परी ते आन घरीं । जाणिजेना । - अमृ ७ . १३० . कोंकण नारळाचें घर आहे . १४ रोग इ० कांच्या उत्पत्तीचे कारण , मूळ , उगम , जन्मस्थान , खाण . वांगे हें खरजेचें घर आहे . आळस हें दारिद्रयाचें घर आहे . १५ वादांतील आधारभूत मुद्दा , प्रतिष्ठान , गमक , प्रमाण . १६ सतार इ० वाद्यांतील सुरांचें स्थान ; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर ; सतारीच्या दोन पडद्यांमधील अंतर . १७ शास्त्र , कला इ० कांतील खुबी , मर्म , रहस्य , मख्खी , किल्ली . तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं . गुणाकार , भागाकार हें हिशेबाचें घर . १८ सामर्थ्य ; संपत्ति ; ऐपत ; आवांका ; कुवत . जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें . १९ मृदंग इ० चर्मवाद्यांचा , वादी , दोरी इ० परिच्छेदानें परिच्छिन्न प्रांत , जागा . २० ( संगीत ) तान , सूर यांची हद्द , मर्यादा , क्षेत्र . २१ ( अडचणीच्या , पराभवाच्या वेळीं ) निसटून जाण्यासाठीं करून ठेवलेली योजना ; आडपडदा ; पळवाट ; कवच ; हा घर ठेवून बोलतो . २२ खुद्द ; आपण स्वत :; स्वत : चा देह . म्ह० इच्छी परा तें येई घरा . २३ ( वर्तमानपत्राचा , पत्रकाचा , कोष्टकाचा रकाना , सदर . ( इं . ) कॉलम . येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वत : चा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें . - नि १५ . २४ वयोमानाचा विभाग ; कालमर्यादा . हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता . - कोरकि ३२ . २५ ( मधमाशीचें पोळें वगैरेतील ) छिद्र . केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनीं पाहिलीं असतील - मराठी सहावें पुस्तक पृ . २२५ . ( १८७५ ) २६ ठाणें ; ठिकाण . कुबल , बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं - ऐपो ९ . २७ बायको ; स्वस्त्री . घरांत विचारा . घर उघडणें पहा . [ सं . गृह ; प्रा . घर ; तुल० गु . घर ; सिं घरु ; ब . घर ; आमेंजि . खर ; फ्रेजि . खेर ; पोर्तु जि केर . ] ( वाप्र . )
०आघाडणें   ( कों . ) घर जळून खाक होणें .
०उघडाणें   १ लग्न करून संसार थाटणें . नारोपंतांनीं आतां घर उघडलें आहे , ते पूर्वीचे नारोपंत नव्हत ! २ एखाद्याचें लग्न करून देऊन त्याचा संसार मांडून देणें . सदुभाऊंनीं आपली मुलगी त्या भटाच्या मुलास देऊन त्याचें घर उघडलें
०करणें   १ विर्‍हाड करणें ; रहावयास जागा घेऊन तींत जेवण - खाण इ० व्यापार करावयास लागणें . चार महिने मी खाणावळींत जेवीत असे , आतां घर केलें आहें . २ ( त्रासदायक वस्तूंनीं ) ठाणें देणें ; रहाणें ; वास्तव्य करणें . कांटयानें माझ्या टांचेंत घर केलें . माझ्या हृदयांत घर करून बसून त्यानें मला घायाळ केलें . - बाय ३ . ३ .
०खालीं   घर सोडून जाणें ; घर मोकळें करून देणें . गांवांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानीं आपापलीं घरें खालीं केलीं .
करणें   घर सोडून जाणें ; घर मोकळें करून देणें . गांवांत प्लेगचें मान वाढतें असल्यामुळें सर्वानीं आपापलीं घरें खालीं केलीं .
०घालणें   ( एखाद्याच्या ) घराचा नाश करणें .
०घेणें   १ ( सामा . ) लुबाडणें ; लुटणें ; नागविणें ; बुचाडणें . मग रेणुकेनें बोलिलें । अहो जेऊनि कैसें घर घेतलें । - कालिकापुराण २३ . ४० . ज्या ठिकाणीं वादविवादाचा किंवा भांडणाचा काहीं उपयोग नसतो त्या ठिकाणीं पडून घर घेणें यांतच मुत्सद्दीपण असतो . - चंग्र ८४ . २ ( एखाद्याचा ) नाश करणें . म्हणती जन्मोनि द्रौपदीनें । आमचें घर घेतलें तिणें । - जै ७१ . ९९ . ३ ( त्रासदायक वस्तु ) घर करून बसणें , ठाणें देऊन बसणें ; घर करणें अर्थ २ पहा .
०चालविणें   प्रपंचाची , संसाराची जबाबदारी वाहणें . म्ह० घर चालवी तो घराचा वैरी .
०जोडणें   इतर घराण्यांशीं , जातींशीं , लोकांशीं इ० मैत्री , शरीरसंबंध घडवून आणणें ; मोठा संबंध , सलोखा उत्पन्न करणें . लक्ष्मीपतीचें घर थोर जोडे । - सारुह २ . १ . याच्या उलट घर तुटणें .
०डोईवर   आरडा ओराड करून घर दणाणून सोडणें ; घरांत दांडगाई , कलकलाट , धिंगामस्ती करणें . वडील माणसें घरीं नाहींत हें पाहून मुलांनीं घर डोईवर घेतलें .
घेणें   आरडा ओराड करून घर दणाणून सोडणें ; घरांत दांडगाई , कलकलाट , धिंगामस्ती करणें . वडील माणसें घरीं नाहींत हें पाहून मुलांनीं घर डोईवर घेतलें .
०तुटणें   मैत्रीचा , नात्याचा संबंध नाहींसा होणें ; स्नेहांत बिघाड होणें . ( दुसर्‍याचें )
०दाखविणें   १ आपल्या घरीं कोणी त्रासदायक मनुष्य आला असतां कांहीं युक्तीनें त्याला दुसर्‍याच्या घरीं लावून देऊन आपला त्रास चुकविणें ; ( एखाद्याची ) ब्याद , पीडा टाळणें . २ घालवून देणें ; घराबाहेर काढणें .
०धरणें   १ घरांत बसून राहणें ; घराच्या बाहेर न पडणें ( संकटाच्या , दंगलीच्या वेळीं पळून जाणें , पळ काढणें , गुंगारा देणें , निसटणें याच्या उलट ). २ ( रोग इ० नीं शरीरावर ) अंमल बसविणे ; एखादा आजार पक्केपणानें जडणें ; दम्यानें त्याच्या शरीरांत घर धरलें . ३ चिटकून राहाणें ; चंचलपणा न करतां एकाच ठिकाणीं भिस्त ठेवून असणें . ४ ( बुध्दिबलांत , सोंगटयांत ) सोंगटी एकाच घरांत ठेवून घर अडविणें .
०धुणें   धुवून नेणें - १ एखाद्याचें असेल नसेल तें लबाडीनें गिळंकृत करणें ; हिरावून नेणें ; नागविणें ; बुचाडणें . तुम्ही कारकुनावर फार भरंवसा टाकून राहूं नका , तो संधि सांपडल्यास तुमचें घर धुवावयास कमी करणार नाहीं . २ नागविणें ; लुबाडणें ; लुटणें ; अगदीं नंगा करणें . शंभर वर्षांनीं घर धुवून नेल्यानंतर ही ओळखा आम्हांस पटूं लागली आहे . - टिव्या . घर ना दार देवळीं बिर्‍हाड - फटिंग , सडा , ज्याला घरदार नाहीं अशा भणंगास उद्देशून अथवा ज्याला बायकानुलांचा संसाराचा पाश नाहीं अशाला उद्देशून या शब्दसंहतीचा उपयोग करतात .
०निघणें   ( स्त्रीन ) नवर्‍याला सोडून दुसर्‍या मनुष्याबरोबर नांदणें ; ( सामा . ) दुसर्‍याच्या घरांत , कुटुंबांत निघून जाणें . माझें घर निघाली . - वाडमा २ . २०९ .
०नेसविणें   घरावर गवत घालून तें शाकारणें ; घर गवत इ० कानीं आच्छादणें ; ( कों . ) घर शिवणें .
०पहाणें   १ ( एखाद्याच्या ) घराकडे वक्रदृष्टि करणें ; ( रोगाचा , मृत्यूचा ) घरावर पगडा बसणें ; घरांत शिरकाव करणें ). कालानें एखाद्याचें घर पाहिलें कीं तें बुडालेंच म्हणून समजावें . म्हातारी मेल्याचें दु : ख नाहीं पण काळ घर पाहतो . २ ( बायकी ) वधूवरांचें योग्य स्थळ निवडणें . सुशील तारेनें आपल्या पुण्यबलाच्या साह्यानें योग्य घर पाहून ... ... ... - रजपूतकुमारी तारा . ( आनंदी रमण . )
०पालथें   ( घर , गांव इ० ) १ हरवलेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें . त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें . २ सर्व घरंत ; गांवांत हिंडणें ; भटकणें . त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहे .
घालणें   ( घर , गांव इ० ) १ हरवलेली वस्तु शोधण्यासाठीं घराचा कानाकोपरा धुंडाळणें . त्या बाईनें आपला सोन्याचा फुटका मणि शोधण्यासाठीं सारें घर पालथें घातलें . २ सर्व घरंत ; गांवांत हिंडणें ; भटकणें . त्या मुलाला रांगतां येऊं लागल्यापासून तें सारें घर पालथें घालूं लागलें आहे .
०पुजणें   १ आपलें काम करून घेण्यासाठीं एखाद्याच्या घरीं आर्जवें , खुशामत करण्यास वारंवार जाणें . २ ( घरें पुजणें ) आपला उद्योग न करतां दुसर्‍यांच्या घरीं भटक्या मारणें .
०फोडणें   १ संसार आटोपणें , आंवरणें . २ कुटुंबांतील माणसांत फूट पाडणें ; घरांत वितुष्ट आणणें . बायका घरें फोडतात . ३ घरास भोंक पाडून आंत ( चोरी करण्यासाठीं ) शिरकाव करून घेणें ; घर फोडतो तो घरफोडया .
०बसणें   कर्ता मनुष्य नाहींसा झाल्यामुळें , दुर्दैवाच्या घाल्यामुळें कुटुंब विपन्नावस्थेस पोहोंचणे ; घराची वाताहत , दुर्दशा होणें .
०बसविणें   संसार थाटणें ; घर मुलाबाळानीं भरून टाकणें ( स्त्रीच्या विवाहोत्तर जीवनाच्या बाबतींत या वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). माझी बायको मेली म्हणून मीं मुलाचें लग्न करून दिलें , म्हटलें कीं सून तरी घर बसवील .
०बुडणें   १ कुटुंबाचा विध्वंस करणें ; संसाराचा सत्यानाश करणें . २ घरास काळिमा आणणें .
०भंगणें   कुटुंब मोडणें , विस्कळित होणे ; कुटुंबास उतरती कळा लागणें ; कुटुंबाचा नाश होणें ; मंडळींत फूट पडणें . बापलेकांत तंटे लागल्यामुळें तें घर भंगले .
०भरणें   १ दुसर्‍यास बुडवून , त्यांची उपेक्षा करून आपण श्रीमंत बनणें . २ दुसर्‍याचें घर लुटणें , धुणें . व स्वत : गबर होणें . घर भलें कीं आपण भला - लोकांच्या उठाठेवींत , उचापतींत न पडतां आपल्या उद्योगांत गर्क असणारा ( मनुष्य ).
०मांडणें   थाटणें - ( संसारोपयोगी जिन्नसांनीं ) घर नीटनेटकें करणें ; घराची सजावट करणें .
०मारणें   घर लुटणें . घर म्हणून ठेवणें - एखादी वस्तु , सामान प्रसंगविशेषीं उपयोगी पडण्याकरिता संग्रही ठेवणें ; प्रत्येक वस्तु जतन करून ठेवणें .
०रिघणें   घर निघणें पहा . घर रिघे जाई उठोनि बाहेरी ।
०लागणें   घर भयास भासणें ( एखाद्याचा मुलगा अथवा पत्नी वारली असतां घरांतील भयाण स्थिति वर्णिताना ह्या वाक्प्रचाराचा उपयोग करतात ). घराचा उंबरठा चढणें - घरांत प्रवेश करणें . जर तूं माझ्या घरची एखादीहि गोष्ट बाहेर कोणाला सांगशील तर माझ्या घराचा उंबरठा चढण्याची मी तुला मनाई करीन .
०घराचा   घरांतील माणसांची वागणूक , वर्तणूक , वर्तन , शिस्त ; घराचें पुण्य पाप . घराचा पायगुणच तसा , घरची खुंटी तशी - कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे ; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस , संवयीस उद्देशून म्हणतात . घराचा वासा ओढणें - ज्याच्यामुळें एखादें काम , धंदा चालावयांचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन , वस्तु , गोष्ट ओढणें ; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहीसें करणें ; अडवणूक करणें . आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें . आतां आम्हीं काय करूं शकूं ! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला . खाल्ल्या घराचे वासे मोजणें - कृतघ्न होणें ; केलेला उपकार विसरणें . घरांत , घरीं - ( ल . ) पतीनें पत्नीबद्दल शिष्टसंप्रदायानें वापरण्याचा शब्द . याच्या उलट पत्नी नवर्‍या संबंधीं बोलतांना बाहेर या शब्दाचा उपयोग करते . तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं . हा जिन्नस घरांत दाखवून आणतों . - विवि १० . ५०७ . १२७ . घरांतले - विअव . ( बायकी ) नवरा ; पति ; तिकडचे ; तिकडची स्वारी . आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें . - एकच प्याला . घरांत पैशाचा , सोन्याचा धूर निघणें , निघत असणें - घरची अतिशय श्रीमंती असणें ; घरांत समजणें - कुटुंबांतील तंटा चव्हाटयावर न आणणें ; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें ; आपापसांत समजूत घडवून आणणें . घराला राम - राम ठोकणें - घर सोडून जाणें . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला . - भा ९० . घरावर काटया घालणें , गोवरी ठेवणें , निखारा ठेवणें - एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण बदनामी करणें ; घरावर कुत्रें चढविणें - ( गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून ) १ एखाद्याच्या घरांत कलागती , भांडणें लावून देणें , तंटे उत्पन्न करणें . २ दुष्टावा करणें ; अडचणींत आणणें . घरावर गवत रुजणें - घर ओसाड , उजाड पडणें . घरास आग लावणें - ( ल . ) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें . घरास कांटी लागणें - घर उध्वस्त होणें ; घरांत कोणी न राहणें . घरास कांटी लावणें - १ घराच्या भोवतीं कांटे , काटक्या लावून येणें - जाणें बंद करणें . २ ( ल . ) घर उजाड , उध्वस्त , ओसाड करणे . घरास हाड बांधणें , घरावर टाहळा टाकणें - ( एखाद्यास ) वाळींत टाकणें ; समाजांतून बहिष्कृत करणें ; जाती बाहेर टाकणें . ( शेत , जमीन , मळा , बाग ) घरीं करणें - स्वत : वहिवाटणे . घरीं बसणें - ( एखादा मनुष्य ) उद्योगधंदा नसल्यामुळें , सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें ; बेकार होणें . तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे . ( एखाद्याच्या ) घरीं पाणी भरणें - ( एखादा मनुष्य , गोष्ट ) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणें ; त्यास पूर्णपणें वश असणें . उद्योगाचे घरीं । ऋध्दिसिध्दि पाणीभरी . घरीं येणें ( एखादी स्त्री ) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं , माहेरीं परत येणें ; विधवा होणें . कुटुंब मोठें , दोन बहिणी घरीं आलेल्या . - मनोरंजन आगरकर अंक . घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्‍हाडीं , घरीं दारी सारखाच - सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा ; ( सामा . ) सर्वत्र उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मूल ); जसा स्वत : च्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्‍याच्या घरीं उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मुलगा ). आल्या घरचा - वि . पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्‍यापासून झालेला ( मुलगा ). म्ह० १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात =( एखाद्या ) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी , नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुध्द उठतात . सामाशब्द -
पायगुण   घरांतील माणसांची वागणूक , वर्तणूक , वर्तन , शिस्त ; घराचें पुण्य पाप . घराचा पायगुणच तसा , घरची खुंटी तशी - कुटुंबांतील माणसाची वागण्याची रीत असेल त्याप्रमाणे ; एखाद्या कुटुंबांतील माणसांच्या सर्वसाधारण अशा वाईट व्यसनास खोडीस , संवयीस उद्देशून म्हणतात . घराचा वासा ओढणें - ज्याच्यामुळें एखादें काम , धंदा चालावयांचें व जें नसल्यास बंद पडावयाचें असें साधन , वस्तु , गोष्ट ओढणें ; एखाद्या मोठया कामांतून फार जरूरीचें साधन नाहीसें करणें ; अडवणूक करणें . आमच्या मंडळींतून पाटीलबुवानीं रामभाऊस फितविलें . आतां आम्हीं काय करूं शकूं ! त्यानीं आमच्या घराचा वासाच ओढला . खाल्ल्या घराचे वासे मोजणें - कृतघ्न होणें ; केलेला उपकार विसरणें . घरांत , घरीं - ( ल . ) पतीनें पत्नीबद्दल शिष्टसंप्रदायानें वापरण्याचा शब्द . याच्या उलट पत्नी नवर्‍या संबंधीं बोलतांना बाहेर या शब्दाचा उपयोग करते . तुम्हांला पदार्थ दिला तर घरांत मनास येणार नाहीं . हा जिन्नस घरांत दाखवून आणतों . - विवि १० . ५०७ . १२७ . घरांतले - विअव . ( बायकी ) नवरा ; पति ; तिकडचे ; तिकडची स्वारी . आमच्या घरांतल्यांनी दादासाहेबांना दारूचें व्यसन लावलें . - एकच प्याला . घरांत पैशाचा , सोन्याचा धूर निघणें , निघत असणें - घरची अतिशय श्रीमंती असणें ; घरांत समजणें - कुटुंबांतील तंटा चव्हाटयावर न आणणें ; घरांतल्याघरांत तंटा मिटविणें ; आपापसांत समजूत घडवून आणणें . घराला राम - राम ठोकणें - घर सोडून जाणें . आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पतकरला . - भा ९० . घरावर काटया घालणें , गोवरी ठेवणें , निखारा ठेवणें - एखाद्याच्या कुटुंबाची धूळधाण बदनामी करणें ; घरावर कुत्रें चढविणें - ( गोव्याकडे घरावर कुत्रें चढल्यास घर सोडावें लागतें यावरून ) १ एखाद्याच्या घरांत कलागती , भांडणें लावून देणें , तंटे उत्पन्न करणें . २ दुष्टावा करणें ; अडचणींत आणणें . घरावर गवत रुजणें - घर ओसाड , उजाड पडणें . घरास आग लावणें - ( ल . ) एखादें दुष्कृत्य करून घराचा नाश करणें . घरास कांटी लागणें - घर उध्वस्त होणें ; घरांत कोणी न राहणें . घरास कांटी लावणें - १ घराच्या भोवतीं कांटे , काटक्या लावून येणें - जाणें बंद करणें . २ ( ल . ) घर उजाड , उध्वस्त , ओसाड करणे . घरास हाड बांधणें , घरावर टाहळा टाकणें - ( एखाद्यास ) वाळींत टाकणें ; समाजांतून बहिष्कृत करणें ; जाती बाहेर टाकणें . ( शेत , जमीन , मळा , बाग ) घरीं करणें - स्वत : वहिवाटणे . घरीं बसणें - ( एखादा मनुष्य ) उद्योगधंदा नसल्यामुळें , सोडून दिल्यामुळें घरीं रिकामा असणें ; बेकार होणें . तो एक वर्ष झालें घरीं बसला आहे . ( एखाद्याच्या ) घरीं पाणी भरणें - ( एखादा मनुष्य , गोष्ट ) एखाद्याच्या सेवेत तत्पर असणें ; त्यास पूर्णपणें वश असणें . उद्योगाचे घरीं । ऋध्दिसिध्दि पाणीभरी . घरीं येणें ( एखादी स्त्री ) विधवा झाल्यामुळें सासरच्या आश्रयाच्या अभावीं पितृगृहीं , माहेरीं परत येणें ; विधवा होणें . कुटुंब मोठें , दोन बहिणी घरीं आलेल्या . - मनोरंजन आगरकर अंक . घरीं तसा दारीं देवळीं तसा बिर्‍हाडीं , घरीं दारी सारखाच - सर्व ठिकाणीं सारखाच वागणारा ; ( सामा . ) सर्वत्र उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मूल ); जसा स्वत : च्या घरीं उपद्रवकारक तसाच दुसर्‍याच्या घरीं उपद्रवकारक असलेला ( मनुष्य , मुलगा ). आल्या घरचा - वि . पुनर्विवाहित स्त्रीस पहिल्या नवर्‍यापासून झालेला ( मुलगा ). म्ह० १ घर फिरलें म्हणजे घराचे वांसेहि फिरतात =( एखाद्या ) घरांतल्या मुख्याची खपा मर्जी , नाराजी झाली तर घरांतलीं लहानमोठीं नोकरचाकर सर्वच माणसें त्याच्या विरुध्द उठतात . सामाशब्द -
०असामी  स्त्री. १ वतनवाडी ; जमीनजुमला ; मालमत्ता . २ घरकामासंबंधाचा मनुष्य ; घराकडचा माणूस .
०कज्जा  पु. घरांतील तंटा ; कौटुंबिक भांडण ; गृहकलह .
०करी  पु. १ पत्नीनें नवर्‍यास उद्देशून वापरावयाचा शब्द ; घरधनी ; कारभारी ; यजमान ; घरमालक . माझे घरकरी गांवाला गेले .
०करीण  स्त्री. पतीनें पत्नीविषयीं वापरावयाचा शब्द ; कारभारीण . माझ्या घरकरणीला तिच्यामुळें आराम वाटतो . - कोरकि ३१५ . २ घरधनीण ; घरची मालकीण ; यजमानीण .
०कलह  पु. घरांतील भांडण ; घरांतील माणसांचें दायग्रहणादिविषयक भांडण ; आपसांतील भांडण ; अंत : कलह .
०कसबी  पु. आपल्या अक्कलहुषारीनें घरगुती जरूरीचे जिन्नस घरच्याघरीं तयार करणारा व घरची मोडतोड दुरुस्त करणारा मनुष्य ; घरचा कारागीर ; बाहेर काम करून उपजीविका न करणारा माणूस .
०कहाणी   काहणी - स्त्री . ( वाईट अर्थी उपयोग ) घरांतल्या खाजगी गोष्टीचें कथन .
०कान्न  स्त्री. ( गो . ) घरधनीण ; बायको ; घरकरीण . [ सं . गृह + कान्ता ].
०काम  न. घरगुती काम . घरासंबंधीं कोणतेंहि काम ; प्रपंचाचें काम . बायकांचा धंदा घरकामाचा लावतात .
०काम्या वि.  घरांतील , कुटुंबांतील किरकोळ कामें करण्यास ठेवलेला नोकर , गडी ; घरांतील काम करणारा . [ घरकाम ]
०कार   कारी - पु . ( गो . कु . ) १ नवरा , पति . २ घरचा यजमान ; घरधनी ; मालक . [ सं . गृह + कार ] घरकरी पहा .
०कारणी  पु. घरचें सर्व काम पाहणारा ; कारभारी , दिवाणजी ; खाजगी कारभारी .
०कुंडा  पु. ( कों . ) १ पक्ष्याचें घरटें ; कोठें . २ ( ल . ) आश्रयस्थान ; आम्हीं तुझ्या विश्रांतीचा घरकुंडा सोडतांच हे आमचे अद्वैतज्ञानाचे पांख आम्हांस तोलत नाहींसे होऊन आम्ही खालीं पडों लागलों . - दादोबा , यशोदा पांडुरंगी . [ सं . गृह + कुंड ]
०कुबडा   कुबा कोंबा घरकोंग्या कोंडा कुंडा कोंघा कोंबडा घुबडा - पु . ( घरांतला घुबड , कोंबडा इ . प्राणी ) ( दुबळया व सुस्त माणसाला - प्राण्याला तिरस्कारानें लावावयाचा शब्द ). नेहमीं घरांत राहाणारा ; एकलकोंडया ; माणुसघाण्या ; चारचौघांत उठणें , बसणें , गप्पा मारणें इ० ज्यास आवडत नाहीं असा , कधीं बाहेर न पडणारा मनुष्य ; घरबशा .
०कुल्ली वि.  ( गो . ) बहुश : घराबाहेर न पडणारी ( स्त्री . ); घरकोंबडी .
०केळ  स्त्री. ( प्रां . ) गांवठी केळ . घरी लावलेली केळ .
०खटला   खटलें - पुन . १ घरचा कामधंदा ; गृहकृत्य ; प्रपंच , शेतभात इ० घरासंबंधी काम . २ घराची , कुटुंबाची काळजी , जबाबदारी - अडचणी इ० . ३ गृहकलह ; घरांतील भांडण .
०खप्या वि.  घरांतील धुणें , पाणी भरणें , इ० सामान्य कामाकरितां ठेवलेला गडी ; घरच्या कामाचा माणूस ; घरकाम्या पहा . [ घर + खपणें = काम करणें , कष्ट करणें ]
०खबर  स्त्री. घरांतील व्यवहारांची उठाठेव - चौकशी ; घराकडची खबर , बातमी . उगाच पडे खाटे वर तुज कशास व्हाव्या घरखबरा । - राला २२ [ घर + खबर = बातमी ]
०खर्च  पु. कुटुंबपोषणाला लागणारा खर्च ; प्रपंचाचा खर्च .
०खातें  न. घरखर्चाचें मांडलेले खातें ; खानगी खातें .
०खासगी   खाजगी - वि . घरांतील मालमत्ता , कामें , कारखाना इ० संबंधीं ; घरगुती बाबीसंबंधीं ; घरगुती , खासगी व्यवहारबाबत .
०गणती  स्त्री. १ गांवांतील घरांच्या मोजणीचा हिशेब . तपशील . ( क्रि० करणें ; काढणे ) [ घर + गणती = मोजणी ]
०गाडा  पु. संसाराचीं कामें ; जबाबदारी ; प्रपंचाची राहाटी ; प्रपंच ; संसार ; घरखटला . ( क्रि० हांकणें ; चालवणें ; संभाळणे )
०गुलाम  पु. घरांतील नोकर ; गडी . चौदाशें घरगुलाम मुकले या निजपायांला । - ऐपो ३१३ .
०गोहो  पु. चुलीपाशीं , बायकांत , आश्रितांत शौर्य दाखविणारा मनुष्य ; गेहेशूर ; घरांतील माणसांवर जरब ठेवणारा पण बाहेर भागुबाईपणा करणारा पुरुष . [ घर + गोहो = नवरा , पुरुष ]
०घरटी  स्त्री. दारोदार ; एकसारखी फेरी घालणें . ( क्रि० करणें ). चंद्र कथुनि मग महेंद्रगृहीं घरघरटी करित वायां । - आमहाबळ १९ . १ .
०घाला   घाल्या घरघालू - वि . १ खोड साळ ; फसवाफसवी करणारा ; बिलंदर . भिजल्या पोरी कशी होरी ग हे घरघाली । - राला ४० . २ कुळाची अब्रू घालवणारा ; घरबुडव्या ; दुसर्‍याचें घर घरघाली रांड बसली आम्हां गिळून । - राला ४६ . ३ सर्व नाश करणारा . भयानका क्षिति झाली घरघाली रुद्रविशति जगिं फांकली । - ऐपो ३६८ . [ घर + घालणें ; तुल० गु . घरघालु = द्रोही , खर्चीक ]
०घुशा   घुसा - वि . सर्व दिवसभर उदासवाणा घरांत बसणारा ; घरबशा , घरकोंबडा ; घरकुबडा पहा . [ घर + घुसणें ]
०घुशी   घुसी - स्त्री . नवर्‍याचें घर सोडून दुसर्‍याच्या घरांत नांदणारी ; दुसर्‍याचा हात धरून गेलेली विवाहित स्त्री . कोण धांगड रांड घरघुशी । - राला ७८ . [ घर + घुसणें ]
०घेऊ   घेणा - वि . घराचा , कुटुंबाचा नाश , धुळधाण करणारा ; घरघाला ; घरबुडव्या ; दुसर्‍यास मोह पाडून , फसवून त्याचें घर बळकावणारा . जळो आग लागो रे ! तुझि मुरली हे घरघेणी । - दंप ८० . लांबलचक वेणी , विणुन त्रिवेणी , घरघेणी अवतरली । - प्रला १११ . [ घर + घेणें ]
०चार   घराचार - पु . १ कुटुंबाची रीतभात ; घराची चालचालणूक ; कौटुंबिक रूढी , वहिवाट . म्ह० घरासारखा घरचार कुळाखारखा आचार . २ गृहस्थधर्म ; संसार ; प्रपंच . - जै १०६ . दुं : खाचा घरचार निर्धन जिणें भोगावरी घालणें । - किंसुदाम ५० . [ सं . गृहाचार ; म . घर + आचार = वर्तन ]
०चारिणी   
०चारीण  स्त्री. ( काव्य . ) गृहपत्नी ; घरधनीण ; यजमानीण ; घरमालकीण . शेवटी नवनीत पाहतां नयनीं । घरचारिणी संतोषे । [ सं . गृहचारिणी ]
०जमा  स्त्री. घरावरील कर ; घरपट्टी . घरजांवई , घरजांवाई - पु . बायकोसह सासर्‍याच्या घरीं राहणारा जांवई ; सासर्‍याच्या घरीं राहून तेथील कारभार पाहणारा जांवई . तो संसाराचा आपण । घर जांवई झाला जाण । देहाभिमानासि संपूर्ण । एकात्मपण मांडिले ॥ - एभा २२ . ५९२ . [ घर + जांवई ]
०जांवई   सक्रि . १ ( एखाद्यास ) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें ; जांवयाला घरीं ठेवून घेणें , त्याला आपली जिंदगी देणें . त्याला त्यांनीं घरजांवईच केला आहे . - इंप २७ . २ ( उप . ) एखादी उसनी घेतलेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें , मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत , ठेवून घेणें .
करणें   सक्रि . १ ( एखाद्यास ) सर्वसंपत्तीसह कन्यादान करणें ; जांवयाला घरीं ठेवून घेणें , त्याला आपली जिंदगी देणें . त्याला त्यांनीं घरजांवईच केला आहे . - इंप २७ . २ ( उप . ) एखादी उसनी घेतलेली वस्तु लाटण्याच्या हेतूनें , मालकानें परत मिळण्याविषयीं तगादा लावीपर्यंत , ठेवून घेणें .
०जांवई   बसणें - अक्रि . आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें , आपणच घेऊन टाकणें .
होऊन   बसणें - अक्रि . आपल्यावर सोपविलेल्या कामाचा किंवा धंद्याचा नफा किफायत आपल्याच कामीं लावणें , आपणच घेऊन टाकणें .
०जिंदगी   जिनगानी - स्त्री . १ घरांतील सामानसुमान , उपकरणीं , भांडीकुंडीं , द्रव्याव्यतिरिक्त इतर मालमत्ता ; घरातील जंगम चीजवस्तु ; मिळकत . २ ( सामा . ) मिळकत ; इस्टेट . पादशहाची घरजिनगानी समग्र लुटून . - ख ८ . ४२२४ . [ घर . फा . झिंदगी , झिंदगानी = मालमत्ता , जन्म , संसार ]
०जुगूत   जोगावणी - स्त्री . १ काटकसर ; मितव्यय ; थोडक्यांत घराचा निर्वाह . २ घरांतील जरूरीची संपादणी ; कसाबसा निर्वाह . एक म्हैस आहे तिणें घर जुगूत मात्र होत्ये . - शास्त्रीको [ घर + जुगूत = युक्ति + जोगवणी = प्राप्तीची व खर्जाची तोंडमिळवणी ]
०टका   टक्का - पु . घरपट्टी घरजमा ; घरावरील कर .
०टण   टणा - घरठाण अर्थ २ घरबंद पहा .
०टीप  स्त्री. १ गांवांतील घरांची गणती . ( क्रि० करणें ; काढणें ). २ घरमोजणीचा हिशेब , तपशील ; घरगणती पहा . [ घर + टीप = टिपणें , लिहिणें ] ( वाप्र . )
०टीप   , टीप करणें , टीप घेणें - ( ल . ) ( शोधीत , लुटीत , मोजीत , आमंत्रण देत ) गांवांतील एकहि घर न वगळतां सर्व घरांची हजेरी घेणें ; कोणतीहि क्रिया , रोग , प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें . यंदा जरीमरींनें ह्या गांवाची घरटीप घेतली .
काढणें   , टीप करणें , टीप घेणें - ( ल . ) ( शोधीत , लुटीत , मोजीत , आमंत्रण देत ) गांवांतील एकहि घर न वगळतां सर्व घरांची हजेरी घेणें ; कोणतीहि क्रिया , रोग , प्रादुर्भाव गांवांतील एकहि घर न वगळतां होणें . यंदा जरीमरींनें ह्या गांवाची घरटीप घेतली .
०टोळ  स्त्री. ( कों . ) प्रत्येक घराचा झाडा , झडती . त्या गांवची घरटोळ घेतली तेव्हां चोर सांपडला . घरडोळ पहा .
०ठाण   ठण - न . १ घर ज्या जागेवर बांधलेलें आहे ती इमारत बांधून राहण्याच्या कामासाठीं उपयोगांत आणलेला जमीनीचा विभाग . - लँडरेव्हिन्यू कोड . २ मोडलेल्या घराचा चौथरा ; पडक्या घराची जागा . घरबंद पहा . [ सं . गृहस्थान ; म . घर + ठाणा - ण ]
०ठाव  पु. १ नवरा ; पति ; संसार . मुदतींत आपल्याकडे नांदण्यास न नेल्यास मी दुसरा घरठाव करीन . २ अनीतिकारक आश्रय ; रखेलीचा दर्जा ; रखेलीस दिलेला आश्रय . नीरांजनीला मुंबईंत एका गुजराथी धनवानानें चांगला घरठाव दिला होता . - बहकलेली तरुणी ( हडप ) ८ .
०डहुळी   डोळी डोळ - स्त्री . १ घराचा झाडा , झडती ; बारीक तपासणी . मग थावली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घरडहुळी । - ज्ञा ६ . २१६ . तया आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । - ज्ञा ११ . ५८६ . २ प्रत्येक घराची केलेली झडती . ( क्रि० घेणें ). [ घर + डहुळणें = ढवळणें ]
०डुकर  न. १ गांवडुकर ; पाळीव डुकर . २ निंदाव्यजक ( कुटुंबांतील ) आळशी , निरुद्योगी स्त्री . [ घर + डुकर ]
०तंटा  पु. गृहकलह ; घरांतील भांडण . [ घर + तंटा ]
०दार  न. ( व्यापक ) कुटुंब ; घरांतील माणसें , चीजवस्तु इ० प्रपंचाचा पसारा , खटलें ; [ घर + दार ] ( वाप्र . ) घरदार खाऊन वांसे तोंडीं लावणें - सारी धनदौलत नासून , फस्त करून कफल्लक बनणें ;
०दार   घर व त्यांतील मालमत्ता विकणें ; सर्व स्थावर जिंदगी घालविणें . म्ह० एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें .
विकणें   घर व त्यांतील मालमत्ता विकणें ; सर्व स्थावर जिंदगी घालविणें . म्ह० एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणें = एका पाहुण्यासाठीं कांहीं मिष्टान्न केलें तर तें घरांतील सर्व मंडळींस वाढावें लागतें .
०देणें  न. घरपट्टी ; घरटका . धणी , धनी - पु . १ यजमान ; गृहपति ; घरांतील कर्ता माणूस . निर्वीरा घरणी म्हणे घरधणी गोंवूनी राजे पणीं । - आसी ५२ . २ पति ; नवरा ; घरकरी . मग घरधन्यास्नी पकडूनश्येनी न्ये . - बाय २ . २ .
०धंदा  पु. घरांतील कामधाम ; गृहकृत्य . [ घर + धंदा ]
०धनीण  स्त्री. १ घरमालकीण ; यजमानीण . २ पत्नी ; बायको ; घरकरीण . माझी घरधनीण फार चांगली आहे . - विवि ८ . २ . ४० .
०नाशा वि.  घराचा , कुटुंबाचा नाश , धुळधाण करणारा ; घरघाल्या . [ घर + नासणें ]
०निघणी   निघोणी - स्त्री . १ घरनिधी पहा . २ ( क्क . ) घरभरणी अथवा गृहप्रवेश शब्दाबद्दल वापरतात . केव्हां केव्हां या दोन्हीहि शब्दांबद्दल योजतात . [ घर + निघणें ]
०निघी  स्त्री. वाईट चालीची , दुर्वर्तनी , व्यभिचारिणी स्त्री ; घरांतून बाहेर पडलेली , स्वैर , व्यभिचारिणी स्त्री . कीं घरनिघेचें सवाष्णपण । - नव १८ . १७२ . [ घर + निघणें = निघून जाणें , सोडणें ]
०निघ्या  पु. १ स्वत : चें कुटुंब , घर , जात सोडून दुसर्‍या घरांत , जातींत जाणारा ; दुर्वर्तनी , व्यभिचारी मनुष्य . २ एखाद्या व्यभिचारणी स्त्रीनें बाळगलेला , राखलेला पुरुष ; जार . [ घर + निघणें ]
०पटी   पट्टी - स्त्री . १ घरटका ; घरदेणें ; घरावरील कर ; हल्लींसारखी घरपट्टी पूर्वी असे . मात्र ती सरकारांत वसूल होई . पुणें येथें शके १७१८ - १९ मध्यें घरांतील दर खणास सालीना ५ रु . घरपट्टी घेत . मात्र घरांत भाडेकरी किंवा दुकानदार ठेवल्यास घेत . स्वत : चें दुकान असल्यास , किंवा भाडेकरी नसल्यास घेत नसत . - दुसरा बाजीराव रोजनिशी २७९ - ८० . पंचाकडे घरपट्टी बसविण्याचा अधिकार आला . - के १६ . ४ . ३० . २ एखाद्या कार्याकरितां प्रत्येक घरावर बसविलेली वर्गणी . [ घर + पट्टी = कर ]
०पांग  पु. निराश्रितता ; आश्रयराहित्य . तंव दरिद्रियासी ठाव तत्त्वतां । कोणीच न देती सर्वथा । जेथें घरपांग पाहतां । बाहेर घालिती पिटोनि ॥ - ह २९ . ३५ . [ घर + पांग = उणीव ]
०पांडया  पु. घरांतल्याघरांत , बायकांत बडाबडणारा , पांडित्य दाखवणारा . [ घर + पांडया = गांवकामगार ]
०पाळी  स्त्री. ( सरकारला कांहीं जिन्नस पुरविण्याची , सरकारचा विवक्षित हुकूम बजावण्याची , भिकार्‍यांना अन्न देण्याची इ० ) प्रत्येक घरावर येणारी पाळी , क्रम . [ घर + पाळी ]
०पिसा वि.  ज्याला घराचें वेड लागलें आहे असा ; घरकोंबडा ; घरकुंडा ; [ घर + पिसा = वेडा ]
०पिसें  न. घराचें वेड ; घरकुबडेपणा ; घर सोडून कधीं फार बाहेर न जाणें . [ घर + पिसें = वेड ]
०पोंच   पोंचता - वि . घरीं नेऊन पोंचविलेला , स्वाधीन केलेला ( माल ). [ घर + पोहोंचविणें ]
०प्रवेश  पु. नवीन बांधलेल्या घराची वास्तुशांति करून त्यांत रहावयास जाण्याचा विधि . ( प्र . ) गृहप्रवेश पहा . [ म . घर + सं . प्रवेश = शिरणें ] घरास राखण - स्त्री . १ घराचें रक्षण करणारा मनुष्य . २ थोडासा संचय , शिल्लक , सांठा , संग्रह . सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव . घर म्हणून पहा .
०फूट  स्त्री. आपसांतील दुही , तंटेबखेडे ; गृहकलह ; घर , राज्य इ० कांतील एकमतानें वागणार्‍या माणसांमध्ये परस्पर वैर . द्वेषभाव . [ घर + फूट = दुही , वैर ]
०फोड  स्त्री. घरांतील माणसांत कलि माजवून देणें , कलागती उत्पन्न करणें . [ घर + फोडणें = फूट पाडणें ]
०फोडी  स्त्री. १ ( कायदा ) एखाद्याच्या घरांत त्याच्या संमतीवाचून कुलूप - कडी काढून , मोडून किंवा मार्ग नाहीं अशा ठिकाणीं मार्ग करून ( चोरी करण्याकरितां ) प्रवेश करणें ; ( पीनलकोडांतील एक गुन्हा ). २ घराची भिंत वगैरे फोडून झालेली चोरी . ( इं . ) हाउस ब्रेकिंग . [ घर + फोडणें ]
०फोडया वि.  १ घरांत , राज्यांत फूट पाडणारा , दुही माजविणारा ; घरफूट करणारा . २ घरें फोडून चोरी करणारा . [ घर + फोडणें ]
०बंद  पु. १ ( कों . ) घरांची वस्ती , संख्या . त्या शहरांत लाख घरबंद आहे . [ घर + बंद = रांग ] २ घराचा बंदोबस्त ; घरावरील जप्ती ; घर जप्त करणें , घराची रहदारी बंद करविणें ; चौकी - पहारा बसविणें . ऐकोनि यापरी तुफान गोष्टी । क्रोध संचरला राजयापोटीं । पाहरा धाडूनि घरबंदसाठीं । ठेविला यासी कारागृहीं । - दावि ४५६ . [ घर + बंद = बंद करणें ]
०बशा वि.  उप . घरकोंबडा ; घरांत बसून राहणारा . [ घर + बसणें ]
०बसल्या   क्रिवि . घरीं बसून ; नोकरी , प्रवास वगैरे न करतां ; घरच्याघरीं ; घर न सोडतां . ( ल . ) आयतें ; श्रमाविना . ( क्रि० मिळणें ; मिळवणें ). तुम्ही आपले पैसे व्याजीं लावा म्हणजे तुम्हांला घरबसल्या सालीना पांचशें रुपये मिळतील .
०बाडी  स्त्री. बेवारसी घरांचें भाडें ( ब्रिटिशपूर्व अमदानींत कांहीं शहरांतून सरकार हें वसूल करीत असे ). घरवाडी पहा .
०बार  न. घरदार ; घरांतील मंडळी व मालमत्ता ; संसार ; प्रपंचाचा पसारा . तेवि घरबार टाकून गांवीचे जन । - दावि ४१२ . घरबार बंधु सुत दार सखे तुजसाठिं सकळ त्याजिले । - देप २७ . [ सं . गृह + भृ ; म . घर + भार ; हिं . घरबार ; गु . घरबार ]
०बारी  पु. १ कुटुंबवत्सल ; बायकोपोरांचा धनी ; गृहस्थाश्रमी ; संसारी . भार्या मित्र घरबारिया । - मुवन १८ . ७१ . २ घरधनी ; घरकरी ; नवरा ; पति . कां रुसला गे माझा तो घरबारी । - होला १४८ . [ सं . गृह + भृ ; म . घरबार ; हिं . घरबारी ; गु . घरबारी ] म्ह० ना घरबारी ना गोसावी = धड संसारीहि नाहीं की बैरागी नाहीं अशा मनुष्याबद्दल योजतात .
०बारीपणा  पु. गृहस्थपणा ; कर्तेपणा . पुरुषास घरबारीपणा प्राप्त होतो . - विवि ८ . २ . ३५ . [ घरबारी ]
०बुडवेपणा  पु. १ घराचा नाश करण्याचें कर्म . २ देशद्रोह ; स्वदेशाशीं , स्वदेशीयाशीं , स्वराज्याशीं बेइमान होणें . हा प्रयत्न त्यांच्या इतर प्रयत्नाप्रमाणेंच घरबुडवेपणाचा आहे हें आम्ही सांगावयास नकोच . - टि १ . ५४८ . [ घर बुडविणें ]
०बुडव्या वि.  अत्यंत त्रासदायक ; दुसर्‍याच्या नाशाची नेहमीं खटपट करणारा ; देशद्रोही . [ घर + बुडविणें ]
०बुडी   
०बूड  स्त्री. १ ( एखाद्याच्या ) संपत्तीचा , दौलतीचा नाश ; सर्वस्वाचा नाश . २ एखादें घर , कुटुंब अजिबात नष्ट होणें ; एखाद्या कुळाचें , वंशाचें निसंतान होणें . [ घर + बुडणें ]
०बेगमी   बेजमी - स्त्री . कुटुंबाच्या खर्चाकरितां धान्यादिकांचा केलेला साठा , पुरवठा , संग्रह ; प्रपंचासाठीं केलेली तरतूद . [ घर + फा . बेगमी = सांठा ]
०बेत्या  पु. ( राजा . ) घराची आंखणी करणारा . ( इ . ) इंजिनिअर . [ घर + बेतणें ]
०बैठा वि.  १ घरीं बसून करतां येण्यासारखें ( काम , चाकरी , धंदा ); बाहेर न जातां , नोकरी वगैरे न करतां , स्वत : च्या घरीं , देशांत करतां येण्याजोगा . २ घरांत बसणारा ( नोकरी , चाकरीशिवाय ); बेकार . - क्रिवि . ( सविभक्तिक ) घरीं बसून राहिलें असतां ; घरबसल्या पहा . [ घर + बैठणें ]
०भंग  पु. १ घराचा नाश , विध्वंस . जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग । - दा ३ . २ . ६० . २ ( ल . ) कुळाचा , कुटुंबाचा नाश ; कुलनाश . [ घर + भंग ]
०भर वि.  ( कर्तृत्वानें , वजनानें ) घर , कुटुंब भरून टाकणारा - री ; घरांत सर्व ठिकाणीं , सर्वजागीं . त्यानें तुला घरभर शोधलें . [ घर + भरणें ]
०भरणी  स्त्री. १ गृहप्रवेश ; नवीन बांधलेल्या घरांत राहण्यास जाण्याच्या वेळीं करावयाचा धार्मिक विधि ; वास्तुशांति ; घररिघणी पहा . २ पतीच्या घरीं वधूचा प्रथम प्रवेश होतांना करण्याचा विधि ; नववधूचा गृहप्रवेश ; गृहप्रवेशाचा समारंभ ; वरात ; घररिगवणी ; घररिघवणी . वधूवरें मिरवून । घरभरणी करविली । - र ४८ .
०भरवण   भरवणी - स्त्री . ( गो . कु . ) गृहप्रवेश ; वरात ; घरभरणी अर्थ २ पहा . [ घर + भरवणें ]
०भाऊ  पु. कुटुंबांतील मनुष्य ; नातलग ; कुटुंबाच्या मालमत्तेचा , वतनवाडीचा वांटेकरी ; हिस्सेदार ; दायाद .
०भाट  पु. १ ( कु . ) घराच्या आजूबाजूची आपल्या मालकीची जागा , जमीन ; घरवाडी ; विसवाट . २ ( गो . ) घराशेजारचा , सभोंवारचा नारळीचा बाग . [ घर + भाट ]
०भांडवल  न. १ कुटुंबांतील मालमत्ता , जिंदगी , इस्टेट . २ एखाद्याचा खाजगी द्रव्यनिधि , ठेव ; उसना काढलेला , कर्जाऊ काढलेला पैसा , द्रव्यनिधि याच्या उलट . [ घर + भांडवल ]
०भांडवली वि.  घरच्या , स्वत : च्या भांडवलावर व्यापार करणारा . [ घरभांडवल ]
०भाडें  न. दुसर्‍याच्या घरांत राहण्याबद्दल त्यास द्यावयाचा पैसा , भाडें . [ घर + भांडें ]
०भारी  पु. ( प्र . ) घरबारी . १ घरबारी पहा . २ ब्रह्मचारी , संन्यासी याच्या उलट ; गृहस्थाश्रमी .
०भेद  पु. कुटुंबाच्या माणसांतील आपसांतील भांडण , तंटा ; फाटाफूट ; घरफूट .
०भेदी   भेद्या - वि . १ स्वार्थानें , दुष्टपणानें परक्याला , शत्रूला घरांत घेणारा ; फितूर ; देशद्रोही . २ घरचा , राज्याचा , पक्का माहितगार ; घरचीं सर्व बिंगें ज्यास अवगत आहेत असा . म्ह० घरभेदी लंकादहन = घरभेद्या मनुष्य लंका जाळणार्‍या मारुतीप्रमाणें असतो . ३ घरांतील , राज्यांतील कृत्यें , गुप्त बातम्या बाहेर फोडणारा ; घर फोडणारा . घरभेद्या होऊनि जेव्हां । - संग्रामगीतें १४० . ४ घरांत , कुटुंबांत , राज्यांत , तंटे , कलह लावणारा .
०भोंदू वि.  १ लोकांचीं घरें ( त्यांना फसवून ) धुळीस मिळवणारा . २ ( सामा . ) ठक ; बिलंदर ; प्रसिध्द असा लुच्चा ; लफंगा ( मनुष्य ). [ घर + भोंदू = फसविणारा ]
०महार  पु. राबता महार .
०मारू   मार्‍या - वि . शेजार्‍यास नेहमीं उपद्रव देणारा ; शेजार्‍याच्या नाशाविषयीं नेहमीं खटपट करणारा .
०माशी  स्त्री. घरांत वावरणारी माशी ; हिच्या उलट रानमाशी .
०मेढा   मेढया - पु . घरांतील कर्ता , मुख्य मनुष्य ; कुटुंबाचा आधारस्तंभ ; घराचा खांब पहा . [ सं . गृह + मेथि ; प्रा . मेढी ; म . घर + मेढा = खांब ]
०मेळीं   क्रिवि . आपसांत ; घरीं ; खाजगी रीतीनें ; आप्तेष्टमंडळीमध्यें ( तंटयाचा निवाडा , तडजोड करणें ). घरमेळीं निकाल केला . [ घर + मेळ ; तुल० गु . घरमेळे = आपसांत ]
०मोड  स्त्री. घर मोडून तें विकणें . कांहीं दिवसपर्यंत येथें घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता . - टि १ . १६९ . [ घर + मोडणें ]
०राखण  स्त्री. १ ( प्रां . ) घराची पाळत ; रक्षण ; पहारा . २ घरराखणारा ; घरावर पहारा ठेवणारा . [ म . घर + राखणें ]
०राख्या वि.  घराचें रक्षण करणारा ; घराचा पहारेकरी ; घरराखण . [ घर + राखणें ]
०रिघणी   रिघवणी - स्त्री . १ नवीन बांधलेल्या घरांत प्रवेश करतेवेळीं करावयाचा धार्मिकविधि ; घरभरणी अर्थ १ पहा . २ घरचा कारभार ; घरकाम . रचून विविध देहकुटी । तो घररिघवणी परिपाठी । - विपू ७ . १२८ . [ घर + रिघणें = प्रवेश करणें ]
०रिघणें   घरांत येणें , प्रवेश करणें . घररिघे न बाहतां भजकाच्या । - दावि १६१ .
०लाठया वि.  ( महानु . ) घरांतील लाठया , लठ्ठया ; घरपांडया ; गृहपंडित ; घरांत प्रौढी मिरविणारा ; रांडयाराघोजी . ऐसेआं घरलाठेआं बोलां । तो चैद्यु मानवला । - शिशु ८९९ . [ घर + लठ्ठ ? ]
०वट   वड - स्त्री . १ ( कु . गो . ) एखाद्या कुटुंबाची सर्वसाधारन , समायिक जिंदगी , मालमत्ता ; कुटुंबाचें , संस्थेचें सर्वसाधारण काम , प्रकरण . घरोटी पहा . २ ( गो . ) कूळ ; कुटुंब ; परंपरा . ३ आनुवंशिक रोग , भूतबाधा इ० आनुवंशिक संस्कार . [ सं . गृह + वृत्त ; प्रा . वट्ट ]
०वण  न. ( कों . ) घरपट्टी ; घरासंबंधीं सरकार देणें .
०वणी  न. घराच्या छपरावरून पडणारें पावसाचें पाणी . याचा धुण्याकडे उपयोग करतात . [ सं . गृह . म . घर + सं . वन , प्रा . वण = पाणी ]
०वंद  पु. ( राजा . ) घरटणा ; पडक्या घराचा चौथरा ; पडलेल्या घराची जागा . - वि . घरंदाज ; कुलीन ; खानदानीचा . शहर पुणें हरहमेष भरलें वाडे बांधिती घरवंदानी । - ऐपो ४२० . [ गृहवंत ? ]
०वरौते  स्त्री. १ घरवात ; प्रपंच ; संसारकथा ; घरवात पहा . २ - न . नवराबायको ; दांपत्य ; जोडपें . तीं अनादि घरवरौतें । व्यालीं ब्रह्मादि प्रपंचातें । - विउ ६ . ५ . पुढती घरवरौतें । वंदिलीं तिये । - अमृ १ . ४९ . [ गृह + वृत - वर्तित ]
०वसात   वसाद - स्त्री . १ वसति ; रहाणें ; वास ; मुकाम . २ घराची जागा ; घराची जागा आणि सभोंवतालचें ( मालकीचें ) आवार , परसू , मोकळी जागा , अंगण . [ घर + वसाहत ]
०वांटणी   
०वाटा   
०हिस्सा   स्त्रीपु . घराच्या मालमत्तेंतील स्वत : चा , खाजगी , हिस्सा , भाग . [ घर + वांटणी ]
०वाडी  स्त्री. ( को . ) ज्यांत घ्र बांधिलेलें असतें तें आवार ; वाडी . कोणाच्या अनेक वाडया असतात , त्यापैकीं जींत धन्याचें घर असतें ती वाडी . [ घर + वाडी ]
०वात  स्त्री. संसार ; प्रपंच ; संसाराच्या गोष्टी ; प्रपंचाचा पसारा ; घरवरौत ; घरकाम . घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ - अमृ १ . १३ . ऐसी तैं घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं । - दा ३ . ४ . ६ . [ सं . गृहवार्ता ]
०वाला वि.  १ घराचा मालक . २ ( खा . ) नवरा ; घरधनी ; पति . [ घर + वाला स्वामित्वदर्शक प्रत्यय ; तुल० गु . घरवाळो ]
०वाली वि.  ( खा . ) बायको ; पत्नी ; घरधनीण . माझ्या घरवालीनें साखर पेरतांच त्यानें सर्व सांगितलें । - राणी चंद्रावती ५३ . [ घर + वाली ; गु . घरवाळी ]
०वासी वि.  कुटुंबवत्सल ; प्रपंचांत वागणारा . [ घर + वास = राहणे ]
०वेडा वि.  १ घरपिसा . २ बाहेर राहून अतिशय कंटाळल्यामुळें घरीं जाण्यास उत्सुक झालेला ; ( इं . ) होमसिक .
०शाकारणी   
०शिवाणी  स्त्री. घरावरील छपराची दुरस्ती करणें ; घरावर गवत वगैरे घालून पावसापासून संरक्षणाची व्यवस्था करणें ; घराच्या छपराचीं कौलें चाळणें . [ घर + शाकरणें , शिवणें ]
०शोधणी  स्त्री. १ स्वत : चीं खाजगी कामें पहाणें . २ स्वत : च्या साधनसामर्थ्याचा विचार करणें ; स्वत : ची कुवत अजमावणें . [ घर + शोधणें ]
०संजोग  पु. १ एखाद्या कामास लागणारा घरचा सरंजाम . त्या हरदासाचा घरसंजोग आहे . = कीर्तनास लागणारीं साधनें तबला , पेटी , टाळ इ० हीं त्या हरदासाच्या घरचींच आहेत . २ काटकसरीचा प्रपंच ; घरजुगूत ; घरव्यवस्था . ३ सुव्यवस्थित घरांतील सुखसोयी , समृध्दता . [ घर + सं . संयोग , प्रा . संजोग = सरंजाम ]
०संजोगणी  स्त्री. घरसंजोग अर्थ २ पहा . घरजुगूत ; काटकसर ; मितव्यय .
०समजूत  स्त्री. घरांतल्याघरांत , आपाअपसांत स्नेहभावानें , सलोख्यानें केलेली तंटयाची तडजोड , समजावणी .
०संसार  पु. कुटुंबासंबंधीं कामें ; घरकाम ; प्रपंच .
०सारा  पु. घरावरील कर ; घरपट्टी ; घरटक्का . [ घर + सारा = कर ]
०सोकील वि.  घरीं राहून खाण्यास सोकावलेला ; घरीं आयतें खाण्यास मिळत असल्यानें घर सोडून बाहेर जात नाहीं असा ; घराची चटक लागलेला ( बैल , रेडा इ० पशु ). [ घर + सोकणें ]
०स्थिति  स्त्री. १ घराची स्थिति ; घरस्थीत पहा . २ गृहस्थाश्रमधर्म ; संसार ; प्रपंच . ॠषीस आर्पिली कन्या शांती । मग मांडिली घरस्थिति । - कथा ३ . ३ . ६३ . [ सं . गृहस्थिति ]
०स्थीत  स्त्री. घराची , कुटुंबाची रीतभात , चालचालणूक , वर्तन , आचार , स्थिति . म्ह० अंगणावरून घरस्थीत जाणावी = अंगणाच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीवरून त्या घरांतील मंडळीचा आचार कसा आहे तें समजतें . शितावरून भाताची परीक्षा या अर्थी . [ घर + स्थिति अप . ] घराचा खांब , घराचा धारण , घराचें पांघरूण - पुन . ( ल . ) घरांतील कर्ता माणूस ; घरांतला मुख्य ; घरमेढया . घराचार - पु . १ संसार ; प्रपंच ; गृहस्थाश्रमधर्म ; घरकाम . परी अभ्यंतरीं घराचार मांडे । - विपू ७ . १३८ . यापरी निज नोवरा । प्रकृती गोविला घराचारा । - एभा २४ . ३२ . - कालिकापुराण ४ . ३५ . २ ( ल . ) पसारा ; व्याप तेथ वासनेचा घराचार । न मांडे पैं । - सिसं ४ . २०७ . ३ घरांतील मंडळींची राहाटी , रीतभात , आचरण , वागणूक , व्यवहार . वंध्यापुत्राचा घराचार । तैसा जीवासि संसार । - एभा २६ . ३० . [ सं . गृह + आचार ] घराचारी - वि . १ घरंदाज . २ नवरा ; पति ; घरकरी ; दादला . ऐशिया स्त्रियांचे घराचारी । खराच्या परी नांदती । - एभा १३ . २१४ . [ घराचार ] घरास राखण - स्त्री . १ घराचें रक्षण करणारा मनुष्य . २ थोडासा संचय , शिल्लक , सांठा , संग्रह . सगळा गूळ खर्चू नको घरास राखण थोडकासा ठेव . घर म्हणून पहा . घरींबसल्या - क्रिवि . घरबसल्या पहा . घरोपाध्या - पु . कुलोपाध्याय ; कुलगुरु ; कुलाचा पुरोहित , भटजी . [ घर + उपाध्याय ; अशुध्द समास ]

घर     

घर आघाटणें
घर जळून खाक होणें, घराची राखरांगोळी होणें
घर जळून भस्‍म होणें.

घर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  मनुष्यद्वारा भरिएको त्यो ठाउँ जुनचाहिँ पर्खालले घेरेर बनाइन्छ   Ex. यस घरमा पाँचवटा कोठा छन्/ विधवा मङ्गला नारी निकेतनमा बस्छिन्
HOLO MEMBER COLLECTION:
बस्ती
HYPONYMY:
मन्दिर अतिथि-गृह शवगृह भवन विमानशाला जुआखाना आश्रम बङ्गला कुटी गजशाला प्रसूति गृह शवदाह गृह खण्डहर कोठरी चुँगीघर गुमटी
MERO COMPONENT OBJECT:
सुत्‍ने कोठा कोठा नुहाउने कोठा भान्साकोठा आँगन
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गृह भवन सदन शाला आलय धाम निकेतन निलय
Wordnet:
asmঘৰ
bd
benবাড়ি
gujઘર
hinघर
kanಮನೆ
kasگَرٕ
kokघर
malവീട്
marघर
mniꯌꯨꯝ
oriଘର
panਘਰ
sanगृहम्
tamவீடு
telఇల్లు
urdگھر , مکان , ٹھکانا , آشیانہ , سرائے , رہائش گاہ , قیام گاہ
See : भवन, स्वदेश, आवास

घर     

घरः [gharḥ]   A house.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP