भावगंगा - झाले बहु होतील बहु
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
माणसांस माणसे जोडिली
प्रेम-प्रसादा वाटून आली अनुभव सांगू किती ॥१॥
यज्ञ मांडिला सर्व मिळोनी देवपूजेला श्रेष्ठ मानूनी
संगती करूनी मैत्री करूनी
प्रभुकायीं कटिबद्ध होऊनी लागती जन जागवू ॥२॥
अक्षर ओळख बहु ना ज्याला कोळी गीता गाऊ लागला
मत्स्यगंधा किती जली अवतरल्या
महालक्ष्मीला आणिली घरा, नवल काय सांगू ॥३॥
अमृतालये उभी जहाली, एकच समयी सर्व मंडळी
स्वाध्यायास्तव जमू लागली
सुविचारांची नवी पालवी जीवनी लागे फुलू ॥४॥
योगेश्वरकृषी मधुर कल्पना, नोकर कुणी ना मालक कुणी ना
श्रमभक्ती जीवनी आणण्या
क्षमता प्रभुचरणीच अर्पिण्या स्पर्धा हो जणू सुरू ॥५॥
उपवने किती डोलू लागली बालतरूंच्या मोहकमूर्ती
सर्व पुजारी रक्षण करिती
अभिषेकाची अमोल संधी, सर्व बघती मिळवू ॥६॥
प्रणाम शतश: ‘प्रयोगवीरा’ उजळी जीवने त्या नरवीरा
पाजूनी विचार-अमृतधारा
शक्तीदाता जो सर्वांचा तो योगेश्वर स्मरू ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP