मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
देवाचे नाव मी सांगतो रे

भावगंगा - देवाचे नाव मी सांगतो रे

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


घेऊन गीता मी फिरतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥धृ॥
देवाने गाईली पार्थाने ऐकिली
आश्वासने तीं मी देतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥१॥
अभाव अमाप, उबग समीप
सुधार त्यात मी करतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥२॥
प्रभूस अर्पण स्वाध्यायी जीवन
महत्ता त्याची मी वानतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥३॥
सुख लाभावे, आनंदी व्हावे
गूढतम भाव ते मी खोलतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥४॥
देवापरी मी मोठा असामी
स्थिराचरात देव बघतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥५॥
नाते वत्साचे माझे देवाचे
त्याचा बालक मी शोभतो रे
देवाचे नाव मी सांगतो रे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP