भावगंगा - पांडुरंग संगात
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्याय रंगात, पांडुरंग संगात
आनंद खरा मज मिळतो रे ॥धृ॥
गीतेच्या ज्ञानाने सकलां उठवतो
आळस झटकून कामास लावतो
जीवनात माधुरी भरतो रे ॥१॥
खरी संस्कृती सर्वां समजावतो
मानवास मानव सच्चा बनवतो
भावनेची दीक्षा देतो रे ॥२॥
योगेश्वर जीवनाची लीला समजावतो
सिंहाची शक्ती तो सर्वात भरतो
स्वाध्याय-झेंडा लहरावतो रे ॥३॥
भक्तीच्या शक्तीने सर्वांस उठवतो
दादांच्या रूपाने हृदयीं विराजतो
जीवनात अस्मिता आणतो रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP