भावगंगा - गुरुकृपेचा महिमा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गुरुकृपेचा महिमा मोठा
परमेशासम जाण रे
देते मुक्ती बंधनातुनि
ऐक्य प्रभूशी करते रे ॥धृ॥
जन्मापासुनि विस्मरणाने
दुरावलो विषयविकारे
मृत्युपर्यंतही चिन्तेने
अन्तरलो त्या प्रभूशी रे ॥१॥
अशांतिने तळमळतो सारे
संसारीं दु:खाने रे
अज्ञानाच्या महान भारे
अंतरलो त्या प्रभूशी रे ॥२॥
गुरुकृपा दिव्यदृष्टि देते
क्रान्ती तियेने होते रे
विश्वातिल या सर्वच होते
पवित्र अन् मंगलमय रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP