भावगंगा - करूया योगेश्वर पूजन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
झडू लागला सनई-चौघडा, बांधूया तोरण
करूया योगेश्वर पूजन ॥धृ॥
चौरंगी हा मंडप सजला
ध्वजा-पताकांनी हा नटला
ध्वनिक्षेपकावरती उठला
मंत्रघोष पावन ॥१॥
गावकऱ्यांच्या भाव-बळांतुन
मंदिर उठले दान-तपातुन
भक्त होउनी पूजा करिती
लक्ष्मी-नारायण ॥२॥
कुणी न येथे त्रिकाळ-ज्ञानी
हटयोगी ना विरक्त कोणी
संसारी हे जगा दाविती
भक्तीचे दर्शन ॥३॥
मद-मोहाचे रानहिं जळले
सद्भावांचे उपवन फुलले
या गावाचे मनही झाले
तुलसी-वृन्दावन ॥४॥
नुरली पापे, स्वार्थ भीरुता
सरले सगळे भेद, विषमता
तुष्ट जाहल्या देव-देवता
घडले तीर्थाटण ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP