भावगंगा - यज्ञ ही अमोघ जीवन-कला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
यज्ञ ही अमोघ जीवन-कला
तोषवि मानवता प्रेमला ॥धृ॥
कृतज्ञतेन कर्म जागवी
ऐक्याने भरलेली जान्हवी
उठवितो मानव, मानव खुळा ॥१॥
भाव गुंफवी भेद नाशुनी
संगम साधी चंद्र-रोहिणी
दुरावा झटकी मनि साठला ॥२॥
विचार-मंथन विचार-दर्शन
करुनि प्रगटवी लपले सद्गुण
जागवी नारायण आतला ॥३॥
संवर्धक पोषक वृत्तीला
तेजविती यज्ञाच्या ज्वाळा
निमंत्रिति सहज सुभग क्रांतीला ॥४॥
यज्ञ सांगतो हवन करावे
कसले ते निट समजुनि घ्यावे
वासना, अहंकार चिकटला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP