भावगंगा - आरती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
योगेश्वर मंदिराच्या (तत्त्वज्ञान विद्यापीठ) प्राणप्रतिष्ठेच्या
वेळी पूजनीय दादांच्या आईने उत्स्फूर्त केलेली
आरती
जयदेव जयदेव जय हरिहरमूर्ती
गणपति, पार्वती, नंदी करु पंचारती
जयदेव जयदेव……….
गणेश शोभतसे पार्वतिच्या अंकी
पृथ्वीगोलावरती उभे चक्रवर्ती
हस्त उंचाऊनी संकेत दावीती
चक्र शोभतसे तर्जनीवरती. जयदेव……….
सिंहासनी बैसे ही शान्तमूर्ती
अर्धा चंद्र भाळी गंगेची मूर्ती
वक्षस्थळावरती नाग डोलती
रुंडमाळांवरती पुष्पें शोभती. जयदेव……….
स्वकुलीच्या सुकृता सापडला ठेवा
म्हणुनी स्थापियलेले शिव-विष्णु-देवा
प्रसाद मागतो आशीर्वाद द्यावा
जन्ममरणाचा फेरा चुकवावा. जयदेव……….
योगेश्वर आले आपुलिया सदनीं
सकल मनोरथ पुरले या क्षणी
जंगलाचे मंगल झाले या भुवनीं
चरणी मस्तक ठेवी पांडुरंगजननी. जयदेव……….
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP