भावगंगा - अमृतालयम्
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अमृतालयम्, अमृतालयम्, अमृतालयम्, अमृतालयम् ॥धृ॥
बांबूच्या काठ्या, गवताचे छप्पर,
नाही त्याला एक देखिल पत्थर
साधेपणाचे आहे हे उत्तर ॥१॥
नाही गरिबाची चंद्रमौळी झोपडी
नाही गप्पिष्टांची भरलेली चावडी
अमिरिची नाही इथे कोठेही देवडी ॥२॥
मान मानवाला आहे मंदिरात
भाव सोनियाचा इथे रेंगाळत
एकच आनंद परी भरतोय दिगंत ॥३॥
मान मानवाला आहे मंदिरात
भाव सोनियाचा इथे रेंगाळत
एकच आनंद परी भरतोय दिगंत ॥३॥
हिरवी हिरवी झाडे, हिरवी हिरवी दृष्टी
इथे खेळते ही हिरवीगार सृष्टी
त्यात रमलेला हरि सांगे इथे गोष्टी ॥४॥
भावना मनाच्या अबोला बोलती
प्रेममय भगवंत राहिल सांगाती
समाधान, तृप्ती बैसल्या पंगती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP