भावगंगा - कधी रे चढविणार तू बाण
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
कधी रे चढविणार तू बाण, तरुणा!
चढविणार तू बाण
पहा चालला संस्कृतिचा हा निज देहातून प्राण ॥धृ॥
संस्कृती छळती जेव्हा कौरव
पार्थाच्या हातातिल गांडिव
टणत्कारले; विसरे मानव
तीच दशा ही जाण ॥१॥
प्रेम-प्रमादी स्वधर्म टाकुनी
भोग पकडसी स्वपंथ चुकुनी
बससि आळसा तूही बिलगुनी
कसा बनसि बेभान ॥२॥
टकमक पाही गाव तुजकडे
पिकली पाने, सडे चहुकडे
उदकाचे भर सततत तू घडे
दे त्यांना जिवदान ॥३॥
आज-उद्याच्या नकोत गोष्टी
सुकुन चालली सगळी सृष्टी
चिपाट पाहून मनात कष्टी
कसली मग तुज शान ॥४॥
दादा धावति गीता घेऊनि
चाल पंथ मागोवा साधुनि
उषा उभी स्वागतास येउनि
सज्ज करी धनु-बाण ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP